१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.
असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.
अॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)
सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)
आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.
१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.
२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.
३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.
४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.
५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.
६. मराठीत टाईप करण्यासाठी -
अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन
क) AnySoftKeyBoard - Devanagari
ड) Lipikaar Hindi Keyboard Free
मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.
७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.
८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.
९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.
१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.
११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.
१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.
१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)
१४. TED - Ideas worth spreading :) :)
बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
- सुझे !!
प्रतिक्रिया
4 Apr 2013 - 2:24 pm | सुहास झेले
सुप्रियाजी,
नोकिया सी५ मध्ये सिम्बिअन ओएस आहे. मिपा अॅप तूर्तास अॅन्ड्रॉईडसाठी आहे. तुम्हाला ब्राउजरमध्येच मिपा वाचता येईल आणि सिम्बिअनसाठी अॅप असेल तर नीलकांत त्याबद्दल जास्त माहिती देऊ शकेल...
4 Apr 2013 - 3:56 pm | सुप्रिया
माहितीबद्द्ल आभार. पण ब्राउजरमध्ये मिपा नीट वाचता येत नाही.
म्हणजे अक्षरं नीट दिसत नाहीत. त्याला काहि उपाय आहे का?
4 Apr 2013 - 7:09 pm | सुहास झेले
ऑपेरामध्ये मराठी उत्तम दिसतं. तुम्ही कुठला ब्राऊजर वापरत आहात?
5 Apr 2013 - 10:55 am | सुप्रिया
आजच ऑपेराडाउनलोड करते. आभारी आहे.
5 Apr 2013 - 8:55 pm | ईन्टरफेल
पन मला एक प्रोब्लेम आहे ! माझा देखिल अॅन्ड्रॉईड मो. आहे पन मि कुनाला फोन केला तर समोरच्या व्यक्तिने फोन कट नाहि केला तर मला जादा बिल येते ! मला फोन कट करायचा म्हन्टले कि खुप शोधा शोध करावि लागते !
एका बट्नात डिस्कनेक्ट व्हायला पाहिजे ! ते होइल का ?
6 Apr 2013 - 10:52 am | सुहास झेले
सेटिंग्जमध्ये जाऊन > कॉल > कॉल आन्सरिंग/एंडिंग > पॉवर की टू एंड कॉल
8 Apr 2013 - 9:18 pm | अश्फाक
मि सुध्दा हैरान होतो फार उपयोग झाला,धन्यवाद .
9 Jul 2013 - 8:34 pm | ईन्टरफेल
धन्यवाद मन ......जमले एकदाचे
6 Apr 2013 - 10:23 am | मदनबाण
काही नविन अॅप्स :-
FREE Hindi Radio Stations :- कालच हे अॅप ट्राय मारले, ठीक वाटले.काही निवडक स्टेशन्स आहेत्,साउंड क्वालिटी छान वाटली.
UltraChron Stopwatch Lite :- एक उपयोगी स्टॉपवॉच अॅप
रुट केलेल्या फोनसाठी काही अॅप्स :-
Android Firewall :- एक सोप्पी फायरवॉल.
CacheMate for Root Users Free :- कॅश क्लिअर करण्यासाठी एक उत्तम अॅप्,एसडी कार्ड वरील कॅश सुद्धा क्लिअर करते.
SD-Booster :- एसडी कार्डचा स्पीड ४०% वाढतो असा दावा हे करते,मला तरी फरक तसा समजला नाही,पण उपयोगी.
SD Maid - System cleaning tool :- एक पॉवरफुल क्लिनींग टुल्,शिवाय इतर काही टुल्स सुद्धा या अॅप मधे आहेत.
CacheMate for Root Users Free :- कॅश क्लीन करायचे एक अजुन उत्तम अॅप
Swapper for Root :- एसडी कार्डची पार्टीशन शिवाय स्वॅप स्पेस करता येते.
Android Assistant :- १८ फिचर्स असलेले हे टुल उपयोगी आहे.
Wifi Signal Speed Booster:- वायफायचा सिग्नल बुस्ट होतो असा या अॅपचा दावा आहे,मला तरी विशेष फरक जाणवला नाही,तरी ट्राय मारुन पाहायला हरकत नाही.
Network Info II :- तुमच्या नेटवर्कची सगळी माहिती मिळवण्यासाठी एक सोप्पे आणि उपयोगी अॅप.
CPU tuner (Rooted phones):- तुमच्या फोनच्या CPU ला ओव्हरक्लॉक करण्यासाठीचे सोप्पे अॅप.
FasterFix :-तुमच्या जीपीएसची क्षमता वाढवते. मी तरी अजुन वापरुन पाहिले नाही,नुसतेच लोड करुन ठेवले आहे.
Smart Time Sync :- अॅन्ड्रॉइडची वेळ अचुक करते.
7 Apr 2013 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्री रेडियो मस्त. बाकी सोसो. पण, माहितीबद्दल धन्स. अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
4 May 2013 - 12:38 pm | दिपक
मस्त रे बाणा!
पण रेडियो मध्ये "TuneIn Radio" ला पर्याय नाही. मस्तच आहे. Pro वर्झन मध्ये रेकॉडींग चे फि़चर आहे.
कालच फोन रुट केला. Gemini Backup आणि Titanium Backup ने बरेचसे चांगले काम केले आहे. रुट फोनसाठी चांगले ऍप्स सुचवा !
15 May 2013 - 1:32 pm | jaypal
PC radio नक्की वापरुन पहा ऑडीओ क्वालीटी आपुन तो एकदम फिदा हो गयेला है
7 Apr 2013 - 5:04 am | निनाद
हिंदी किंवा मराठी भाषा ४ आय सी एस किंवा जेली बीन वर चालते का?
म्हणजे एस एम एस पण दिसतात का? की फक्त चौकोनच दिसतात?
असल्यास सॅमसंग एस २ वर चालते का? की किमान एस ३ घ्यायला हवा?
मला अॅप विषयी माहिती नको आहे.
फोन ने हिंदी किंवा मराठी सपोर्ट करायला हवे आहे.
हिंदी किंवा मराठी सपोर्ट करणारा उत्तम फोन कोणता? (मायक्रोमॅक्स, सोनी नको आहे)
कुणी माहिती देणार का?
7 Apr 2013 - 9:32 am | श्री गावसेना प्रमुख
नोकीयाचा सिंबीयन बेले ओ एस असलेला कुठलाही घ्या
मराठी उत्तम प्रकारे दिसते
7 Apr 2013 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निनाद माझी शिफारस लावा N४००. मस्त फोन. आइस्क्रिम सँडविच ऑसि. आहे. भारतीय रुपयातील किंमत ६२०० फक्त.
फोनचे अवगुण : १] फोनची इंटरनल मेमरी कमी.
२] जीपीएस कनेक्टला उशीर लागतो.
-
-दिलीप बिरुटे
8 Apr 2013 - 8:35 pm | मदनबाण
हे अॅप अनेकांना आवडेल आणि उपयोगी पडेल.
Adblock Plus:- तुमच्या मोबल्यात काही अॅप्स अशी असतात की ज्यात जाहिराती असतात्,आणि त्याचा तुम्हाला कंटाळा येउ शकतो.मग या फुकट्टच्या जाहिराती घालवायच्या कशा ? त्यावर उपाय म्हणजे हे वरती सांगितलेले अॅप.
गुगल प्ले मधे यावर बंदी टाकण्यात आलेली आहे,परंतु हे अॅप धोकादायक नाही.गुगलने यासाठी वेगळे कारण दिलेले आहे.
या बद्धल अधिक माहिती इथे मिळेल :-
http://www.theregister.co.uk/2013/03/14/adblocker_blocked_by_google_play/
तसेच जालावर देखील अधिक माहिती मिळेल.
सध्या मी हे अॅप वापरतो आणि यामुळे फालतुच्या जाहिरातीं मधुन माझ्या मोबल्याला मुक्ती मिळाली आहे.याची फाईल डाउनलोड मारुन फ्लॅश मारा की काम झाले. :)
ज्यांच्या मोबल्यात हे कॉनफिगर करण्यात अडचण येत असेल,तर त्यांनी खालचा दुवा वाचावा.
http://adblockplus.org/en/android-config (गरज लागलीच तरच ही माहिती वापरावी.)
10 Jul 2013 - 9:46 pm | आनंदी गोपाळ
फ्लॅश मारणे या साठी आधी रूट करावा लागतो फोन हे कोण सांगेल :P
11 Apr 2013 - 4:49 pm | प्रकाश घाटपांडे
हे सगळ वाचल्यावर आपण या क्षेत्रात अत्यंत मागासलेलो आहोत हे जाणवल.
18 Apr 2013 - 5:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या फोनवर फोन इनकमींग कॉलच्या वेळी 0 पासून सुरुवात होत आहे. खरे तर +91असे इनकमींग कॉल यायला पाहिजे (भारतातला नंबर)पण तसे येत नाहीत. किंवा फोन नंबर सेव्ह करतांना नंबरच्या अगोदर शुन्य लावून नंबर सेव्ह करावा लागतो म्हणजे फोन येतांना ज्यांच्या नावाने फोन नंबर साठवला आहे, त्याचं नाव दिसतं नसता दिसत नाही. एस्सेमसच्या वेळी बरोबर +91................. पासून सुरुवात दिसते. [मला काय म्हणायचे आहे, ते कळले असावे]
१] मला असं वाटतं हा सीमकार्डचा प्रॉब्लेम असावा. कारण दुसरे सिम टाकले तर बरोबर +९१ ने नंबर येतात.
२] हा अॅन्ड्रॉईडचा बग आहे, यावर उपाय नाही.
असा कोणाला काही अनुभव. काही त्यावर उपाय ?
-दिलीप बिरुटे
18 Apr 2013 - 7:59 pm | तर्री
मी ह्या साठी पुढील गोष्टी करतो.
१. जी-मेल कॉन्टॅक्ट्स सिन्क करतो.
२. डीफॉल्ट देश - भारत .
18 Apr 2013 - 9:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
--------डीफॉल्ट देश - भारत .
हे कसं करायचं ?
-दिलीप बिरुटे
20 Apr 2013 - 9:04 pm | कंजूस
(१)कार्बन लावा वगैरे फोनवाले ५१२ रैम आहे सांगतात पण त्यातली म्हणे ३५० त्यांच्याच ओएसने खाल्लेली असते व वापरायला थोडीच उरते हे खरे आहे का ? (२)सोनीचा नवीन एक्सपिरिआ ई ड्यूल सिम (फास्ट गेम सोडून ) अॅन्ड्रॉईड चा आनंद देतो/देईल का ?
20 Apr 2013 - 11:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> (१)कार्बन लावा वगैरे फोनवाले ५१२ रैम आहे सांगतात पण त्यातली म्हणे ३५० त्यांच्याच ओएसने खाल्लेली असते व वापरायला थोडीच उरते हे खरे आहे का ?
हो. (लावा वापरतो म्हणून)
>>> सोनीचा नवीन एक्सपिरिआ ई ड्यूल सिम (फास्ट गेम सोडून ) अॅन्ड्रॉईड चा आनंद देतो/देईल का ?
माहित नाही. (सोनी एक्सपिरिया माझ्याकडे नाही म्हणून)
-दिलीप बिरुटे
26 Apr 2013 - 11:27 am | आदूबाळ
अॅन्ड्रॉईड ४.० वर मराठी नीट दिसत नाही का? (आंजावर पहाता हा प्रॉब्लेम जेलीबीन वर कसा नाहीये वगैरे स्तुतीसुमनं आहेत. पण ४.० वर कसा सोडवायचा हे लिहिलंच नाहीये.) कोणी मदत करू शकेल काय?
12 May 2013 - 7:32 pm | आनंदी गोपाळ
फोन कोणता आहे? ते सांगितलेत तर नक्की काय प्रॉब्लेम आहे ते समजते.
माझ्या ४.०.क्ष वाल्या दोन्ही फोन्सवर : Galaxy Tab 7 (P3100), MMx A110 वर उत्तम दिसते.
13 May 2013 - 10:52 pm | आदूबाळ
फोन नाही, शामसुंग ग्यालेक्षी ट्याब (नोट १०.१) आहे. पण काहीतरी जादू होऊन आपोआप जेलीबीन अपडेट झाला आणि झक्कास दिसायला लागलं मराठी...
4 May 2013 - 9:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोनवर जर ३जी नेट कनेक्षन असेल तर विविध दुरदर्शन वाहिन्या पाहण्यासाठी Dtv india मस्त अॅप्लीकेशन वाटलं. आता या पेक्षा उत्तम अॅप्लीकेशन असेल तर चाचणी करुन जरुर सांगा.
-दिलीप बिरुटे
12 May 2013 - 7:43 pm | आनंदी गोपाळ
बीएसेनेल २जी वर झक्कास चालतंय माझं. मस्त अॅप आहे धन्यवाद लिंकेसाठी.
12 May 2013 - 7:29 pm | आनंदी गोपाळ
आज सुटी असल्याने रिकाम्या वेळात रूट केला. पण रूट करणे खूप सोपे होते. अजून कस्टम रॉम वगैरे मारली नाही.
रूट केल्यावर पहिल्यांदा सरळ Adfree नावाचे अॅप टाकले. उत्तम काम करते आहे. प्लेस्टोअर वरून सर्व अॅड ब्लॉकर्स गूगलने ब्यान केलेली आहेत. सबब ही .apk इन्स्टॉल करावी लागेल. फोन रूट नसेल तर डालो करून उपयोग नाही.
MMx A110 Rooted वाल्या सम-आनंदी लोकांनी संपर्क साधावा, हे विनंती.
13 May 2013 - 10:38 pm | मराठे
मराठी टाईप करण्यासाठी तसे अनेक कीबोर्ड अॅप्स गूगलबाजारात आहेतच. पण परवाच गूगलचं स्वतःचं ट्रान्सलिटरेशनवालं की-बोर्ड अॅप उचललं. तसं तर ते हिन्दी इन्पुटसाठी असलं तरी मराठी सुद्धा छान टाईप करता येतं.
13 May 2013 - 10:42 pm | मराठे
वायबर: स्काईप सारखंच अॅप आहे. पण बर्याच लोकांकडून चांगला रिव्हु मिळालाय.
14 May 2013 - 9:34 am | नानबा
viber मस्तच अॅप आहे. २जी वरसुद्धा व्यवस्थित कॉलता येतं.
GPS वापरणार्यांसाठी काही कामाची अॅप्स -
१. GPS Speedometer - गाडीचा वेग, कापलेले अंतर, दिशा, मार्ग इ. चा माग ठेवतं.
२. GPS Essentials - GPS वापरणार्यांसाठी सगळ्यात जब्राट अॅप. यात बरेच ऑप्शन्स आहेत. होकायंत्राने दिशादर्शन करण्यापासून Navigation पर्यंत बर्याच गोष्टी आहेत. फोन्सच्या Stock Navigation पेक्षा कैक पटीने उत्तम Navigation मिळतं.
16 May 2013 - 12:06 am | सुहास झेले
वायबर अल्टीमेट आहे.... मी वापरतोय, पण फोनच्या बॅटरीची लागते. लगेच ड्रेन होते. :( :(
15 May 2013 - 1:11 pm | यशोधन वाळिंबे
हल्ली किमती कमी होत-होत ४-५ हजारापर्यंत आल्यात..!! फाईव जी यायला २०२० उजाडेल असले म्हणतात.. आपण बहुतांश सध्या २ जी वापरत असलो तरी फोर जी तरी लवकरात लवकर वापरायला मिळो.. (एयरटेलने सुरूही केलय) ते पण परवडेबल रेट मध्ये..!! :-)
17 May 2013 - 6:08 pm | सुहास झेले
Google Currents - एक जबरदस्त अॅप. जागतिक घडामोडी, बातम्या, काही पूर्वप्रसिद्ध निवडक लेख, खादाडी, आणि तांत्रिक जगत. प्रचंड आवडले :) :)
21 May 2013 - 10:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुगल म्याप वापरतो तेव्हा गुगल म्याप उघडल्याबरोबर कधी कधी काही हँडसेट्सवर वेटींग फॉर लोकेशन असे येते आणि म्यापवर जीपीएस कनेक्ट व्हायला उशीर लागतो किंवा होत नाही. त्यावर मी केलेला उपाय असा. गुगल प्ले Handy GPS फ्री अॅप्लीकेशन इन्ष्टॉल करतो. मोबाईल मधे इनबिल्ट असलेले YGPS अॅप्लीकेशन डिसेबल करतो. आणि ह्यांडी जीपीएस अॅप्लीकेशन सुरु करुन त्यातील सॅटेलाईट वर क्लीक केले की जीपीएस लवकर कनेक्ट होते. आणि मग गुगल म्याप सुरु करा.
बाकी, काही नवीन अॅप्लीकेशन्स आले असतील तर सांगा. काल किसन शिंदे म्हणत होते की वाट्सपसारखे एक अॅप्लीकेशन हँगाऑऊट आले आहे, मी वापरुन पाहिले पण मला काय लाईक झाले नाही.
-दिलीप बिरुटे
21 May 2013 - 12:50 pm | नानबा
We Chat म्हणून एक अॅप आलं आहे. व्हॉट्स अॅप सारखंच इंस्टंट मेसेंजर आहे. पण त्यात ऑडिओ मेसेजसुद्धा पाठवता येतात. म्हणजे टाईप करत बसायची पिडा नाही. आणि २जी वरसुद्धा व्हिडिओ कॉल्स करता येतात हे मला त्याचं सर्वात आवडलेलं वैशिष्ट्य.
27 May 2013 - 9:41 pm | आनंदी गोपाळ
हे बघा.
नुस्ता स्क्रीन ला हात लावून स्क्रीन जागा करायची आयडिया हवी होती ना? इथे आहे असे दिसते. ट्रायल वर्जन वापरून पहा, मग फुल्लॅप्स ला रिक्वेस्ट करून फुडली .apk भेटेल.
27 May 2013 - 11:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या मोबाईलला सपोर्ट नाय करत :(
स्यामसंग,नेक्सस,आणि अन्य साठी उप्योगाचं आहे
धन्स...!
-दिलीप बिरुटे
12 Dec 2014 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
https://play.google.com/store/apps/details?id=dev.suriv.suscreen&hl=en
-दिलीप बिरुटे
30 May 2013 - 6:49 pm | संदिप एस
मी आजच माझा एक्स्पीरीया एस जेलीबीन वर अपग्रेड केलाय, जेलीबीन चे फायदे काय काय आहेत ते सांगू शकाल का? मी स्वतः पण एक्स्प्लोअर करतोच आहे.
9 Jul 2013 - 7:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अॅन्ड्रॉईडसाठी नवं काही आलं का नाही ? आता धाग्यावर आलोच आहे तर वाट्सप साठी Z - Art for WhatsApp चांगलं आहे. मस्त पेनानं लिहिल्यासारखं लिहून WhatsApp वर चित्र पाठविता येतात. काहींच्या हँडसेटवर मराठी अक्षरं उमटत नाही तेव्हा मराठीत संदेश लिहून चित्र पाठविता येतात.
माझ्या फोनमधे इंटरनल मेमरी कमी असल्यामुळे Sygic: GPS Navigation & Maps इच्छा असूनही नकाशा वापरता आलेला नाही, कोणी वापरला असेल तर अनुभव शेअर करायला विसरु नका.
आणि अजून काही खास असलं तर सांगायला विसरु नका.
-दिलीप बिरुटे
10 Jul 2013 - 9:50 am | मदनबाण
बॅटरी सेव्ह करण्याचे एक चांगले अॅप सध्या वापरतो आहे.
GO Battery Saver
24 Jul 2013 - 1:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय सहजपणे मोबाईलवर कळणारे महासुविधा नावाचे अॅप्लीकेशन लातुर येथील उपजिल्हाधिकारी डॉ.विकास नाईक यांनी तयार केले आहे. मला तरी ते अप्लिकेशन आवड्ले. आपल्याला आवडले तर उपजिल्हाधिकारी साहेबांना कौतुकाची पोच नक्कीच द्याल असे वाटते.
आजच्या दै.सकाळमधील बातमी यावरुनच मला हे अॅप्लिकेशन आणि साहेबांचा हा झकास उपक्रम कळला.
-दिलीप बिरुटे
7 Oct 2013 - 10:15 am | मदनबाण
आज एक नविन गेम देत आहे, एकदम झकास आणि मजेदार !
रंगाचा हा खेळ अगदी मजेशीर आहे आणि डोक चालवण्यास भाग पाडणारा देखील. ५ मिलिअन पेक्षा जास्त लोकांनी हा खेळ खेळला आहे.:)
खेळाचे नाव आहे :- Blendoku ( आत्ता लिंक देता येत नसल्याने कॄपया गुगल प्लेवर हा खेळ शोधावा.)
7 Oct 2013 - 10:34 am | डॉ सुहास म्हात्रे
नाव वाचून सुरुवातिला वाटलं की हा "BINdoku" नावाचा गुगली आहे काय? पण गुगलवर बघितल्यावर खराखरा गेम आहे हे कळले. उतववून घेण्यात आला आहे ! धन्यवाद !
7 Oct 2013 - 10:47 am | मदनबाण
नाव वाचून सुरुवातिला वाटलं की हा "BINdoku" नावाचा गुगली आहे काय?
हा.हा.हा... :)
उतववून घेण्यात आला आहे ! धन्यवाद !
कसा वाटला तेही कळवा...
7 Oct 2013 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान आहे. ल्बेंड उर्फ रंगछटा क्रमाने लावाल्या कि तुम्ही यशस्वी !
रंगांधळ्या (color blind) व्यक्तींना हा खेळ खेळता येणार नाही :)
7 Oct 2013 - 5:08 pm | मदनबाण
छान आहे.
थांकु ! :)
तुम्ही कुठले वेगळे उपयोगाचे अॅप वापरत असाल तर नक्की सांगा...
11 Oct 2013 - 12:36 pm | दिपक
फोन रुट केला असेल तर व्हॅट्स ऍप प्लस वापरुन बघा. बरेच फिचर्स आहेत. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचे Online स्टेटस हाईड करु शकता. ;-)
11 Oct 2013 - 4:34 pm | जोशी 'ले'
काढुन टाका ते whatsaap+
ते offical App नाहिये...कदाचित धोकादायक असु शकते हे app
12 Oct 2013 - 8:21 am | दिपक
official whats app हेच सुरक्षित नाहिये. त्याचे conversation आरामात decrypt करता येते.
11 Oct 2013 - 7:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण हल्ली चालत नाही राव. तरी एक ट्राय मारुन पाहतो.
-दिलीप बिरुटे
11 Oct 2013 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहं येरर येतोय. An unexpected error occured forcing C-whatsapp + to stop. please help me. fix this.... इ.इ.
-दिलीप बिरुटे
11 Oct 2013 - 3:25 pm | सुधीर
कालच लिन्होव्हो टॅब घेतला. किंग्ज सॉफ्टच एम. एस. ऑफिस वापरतोय, आणि अॅक्रोबॅटचं पिडीएफ रिडर चांगली वाटतायत. खास करून अॅक्रोबॅटच्या पिडीएफ रिडर मध्ये वाचलेलं डॉक्युमेंट मध्ये हायलाईट करण्याची सोय आहे. बाकी एव्हरनोट्स वापरायला शिकतोय.
डिजिटी जिटीडी हे जीटीडी वरचं अॅप्स पण चांगलं वाटलं.
11 Oct 2013 - 4:46 pm | जोशी 'ले'
Check out "Software Data Cable" - https://play.google.com/store/apps/details?id=com.lyy.softdatacable
मोबाईल टु मोबाईल, पिसी टु मोबाईल फाईल्स ट्रांन्सफर करान्यासाठी जबरदस्त app , जितका वेळ ब्ल्यु ट्रुथ ने 3 mb पाठवायला लागतो तितक्या वेळात हे app 300 mb पाठवतो :-) या द्वारे तुम्हि apps सुद्धा शेअर करु शकतात
अट एकच दोन्हि मोबाईल मधे हे app पाहिजे
11 Oct 2013 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वापरुन पाहतो. पण मला पहिल्याच फटक्यात ते तितकसं युजर फ्रेंडली नाही वाटलं. बहुतेक AirDroid सोपं वाटतं.
-दिलीप बिरुटे
11 Oct 2013 - 9:14 pm | मदनबाण
मी माझ्या जुन्या गॅलॅक्सी वाय वरुन आता झोलो क्यु-८०० {Xolo Q800} वर उडी मारली आहे.
आजचे नविन अॅप्स :-
Clean Master (Cleaner) - FREE
नावावरुनच या अॅपचे काम कळते,पण काम देखील एकदी चोख आणि मस्त करते. {Over 20 million user}
================================
Toucher Pro
तुमच्या अॅन्ड्रॉइड फोनसाठी वनटच Assistive touch, सगळी पेजेस चाळत बसण्यापेक्षा जी अॅप सातत्याने वापरली जातात ती यात अॅड केले की झाले. शिवाय बाकीचे सेटिंग्स पण यात अॅड करता येतात.वन टच फोन सुद्धा लॉक करता येतो तो ही साईडबार की न दाबता. याचे साधे व्हर्जन सुद्धा आहे,पण मी प्रो व्हर्जनच वापरत आहे. {हो,चकटफु आहे.}
*फोन बुट /रिस्टार्ट झाल्यावर दरवेळी मॅन्युअली हे अॅप चालु करावे लागते,हीच काय ती यातली त्रुटी जाणवली. बाकी एकदम चोक्कस ! :)
मला ही दोन्ही अॅप्स आवडली,दोन्ही फार कामाची वाटली.
12 Oct 2013 - 9:55 am | सुधीर
ओटीजी कॉर्ड वापरून युएसबी ड्राइव्ह वरला डेटा अॅक्सेस कुणी केला असेल तर त्याची लिंक मला द्याल का? तसं करता आलं तर एस.डी. कार्डचा खर्च वाचू शकेल.
12 Oct 2013 - 1:36 pm | सुहास झेले
डोंबिवलीच्या श्रीपाद भोसले यांनी दुर्गसह्य़ाद्री या मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ७० किल्ल्यांचे नकाशे उपलब्ध केले आहेत. म्हणावी तितकी माहिती ह्यामध्ये अजूनतरी नाही... बघू पुढे काही बदल होतील अशी अपेक्षा आहे.
दुर्ग सह्याद्री - Durga Sahyadri
24 Oct 2013 - 12:01 pm | मदनबाण
Kingsoft Office 5.8 (Free)
तुम्हाला जर तुमच्या मोबल्यावर एमएस वर्ड आणि इतर फाईल्स उघडायच्या असतील तर हे झकास आहे. :)
Titanium Backup ★ root
तुम्हाला तुमच्या अॅप्सचा बॅकअप घ्यायचा आहे ? फोनचा बॅकअप घ्यायचा आहे तर हे बेस्ट हाय. :)
*हे अॅप वापरण्यासाठी फोन रुट केलेला हवा.
Drippler - Android Tips & Apps
अॅन्ड्रॉइड मधे नविन काय चालले आहे ? नविन उपयोगी अॅप्स कोणती इ. गोष्टींची माहिती देणारे उपयोगी अॅप. :)
Google Keep
तुम्हाला चेकलिस्ट बनवायची आहे ?व्हॉइस नोट बनावायची आहे मग गुगलबाबाचे हे अॅप तयारच आहे. :)
बीबीएम (BBM)
हो,तेच ब्लॅकबेरीचे मेसेंजर आता अॅन्ड्रॉइडवर दाखल झाले आहे. सध्या रजिस्ट्रेशन जोरात असुन तुमच्या मेलवर कन्फर्मेशन आल्या शिवाय हे सुरु करता येणार नाही. हे मेल यायला सध्या बराच वेळ लागत आहे.
*महत्वाची सुचना :- तुमचा बीबीएम पीन विसरु नका, तो योग्य ठिकाणी नोंदवुन ठेवा.
इस्पेश्यल अॅप :-
बर्याच अॅन्ड्रॉइड धारकांना फोन रुट करायचा असतो.पण त्यासाठी लागणारी पद्धत किंवा एपीके जालावर शोधताना घोळ होउ शकतो. पण या अॅपमुळे फोन वन क्लीक रुट करता येतो. माझा झोलो क्यु ८०० काही सेकंदाच रुट झाला. :)
*** रुट करताना फोनचा डब्बा होउ शकतो,ज्यांची रिस्क घेण्याची तयारी आहे त्यांनीच या एपीकेचा उपयोग करावा.
Framaroot
26 Oct 2013 - 10:24 am | कंजूस
(१)जावा सपॉट आहे/नाही म्हणजे काय ?असल्यास फायदा काय ? (२)GPS /AGPS यापैकी कोणते सिमकाड नसतानाही चालेल ? खास GPS चे गैजेट ट्रेकिंगसाठी वापरतात तसा अॅंडरॉईड फोन उपयोगात आणायचा असल्यास .या गैजेटमध्ये चालू ठेवून रानात भटकतांना पडद्यावर रूटची एक रेष उमटत राहाते .त्याचा उपयोग करून वाट चुकल्यास मूळ जागी तरी येता येते .कोणत्या हैँडसेटमध्ये हे करता येते /येत नाही ते कोणी सांगेल का ?जागेची उंची अल्टिट्युडपण कळते .ग्रेव्हिटि सेंसर हे काम करेल का?
28 Oct 2013 - 10:43 am | मदनबाण
जावा सपॉट आहे/नाही म्हणजे काय ?असल्यास फायदा काय ?
Comparison of Java and Android API
GPS /AGPS यापैकी कोणते सिमकाड नसतानाही चालेल ? खास GPS चे गैजेट ट्रेकिंगसाठी वापरतात तसा अॅंडरॉईड फोन उपयोगात आणायचा असल्यास .या गैजेटमध्ये चालू ठेवून रानात भटकतांना पडद्यावर रूटची एक रेष उमटत राहाते .त्याचा उपयोग करून वाट चुकल्यास मूळ जागी तरी येता येते .कोणत्या हैँडसेटमध्ये हे करता येते /येत नाही ते कोणी सांगेल का ?जागेची उंची अल्टिट्युडपण कळते .ग्रेव्हिटि सेंसर हे काम करेल का?
या बद्धल जास्त माहिती नाही, पण सिमकार्ड नसल्यास GPS चालणार नाही असे वाटते.
बाकी GPS Navigation साठी एक चांगले अॅप :- Sygic: GPS Navigation & Maps मी स्वतः हे अॅप अजुन वापरुन पाहिले नाही.
28 Oct 2013 - 4:28 pm | कंजूस
#मदनबाण ,नोकिआ लुमिआ ६२० हा फोन(विंडोज) वर सेव केलेल्या मैप च्या डिरेकशन रेंज नसतांनाही फक्त जिपिएस देतो असे नोकिआने म्हटले आहे तसे अॅनडरॉईड देईल का ?
28 Oct 2013 - 4:43 pm | मदनबाण
मदनबाण ,नोकिआ लुमिआ ६२० हा फोन(विंडोज) वर सेव केलेल्या मैप च्या डिरेकशन रेंज नसतांनाही फक्त जिपिएस देतो असे नोकिआने म्हटले आहे तसे अॅनडरॉईड देईल का ?
या माहितीची लिंक द्याल का प्लीज ? नक्की काय पद्धतीने तुमचे लोकेशन फोनला समजते ते माहित करुन घ्यायला आवडेल.नेटवर्क नसताना जीपीएसला अॅक्सेस मिळु शकतो का ? आणि मिळत असेल तर कोणत्या टेक्नोलॉजीमुळे ?
Sygic India: GPS Navigation
यात तुम्ही ऑफलाईन मॅप्स पाहु शकता,पण ते नेव्हीगेटपण करता येतात की नाही या बद्धल साशंक आहे. { हे Works with GPS only, internet is not needed असे त्यांनी म्हंटलेले आहे.}जीपीएस बद्धल अजुन एकही अॅप मी वापरले नसल्याने त्या बद्धल अधीक माहिती नाही. वेळ मिळताच वरील अॅप वापरुन मात्र नक्की पाहिन.
28 Oct 2013 - 4:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ़ोन फ़ूल रुट करायचे सॊफ्टवेअरचा पत्ता लागला तर सांगा. मला लागलाय पण फ़ोन संपूर्ण रुट होत नै वाटतं. :(
कोणताही अँड्राईड फोन रुट होतो.
दुवा थोड्यावेळाने अपड्वतो.
28 Oct 2013 - 4:52 pm | मदनबाण
सर अहो वरती एका प्रतिसादात दिला हाय की म्या !
परत एकदा देतो :-
Framaroot
28 Oct 2013 - 5:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा लावा इरिस ५०६ क्यु त्या यादीत दिसत नाही.
व्हर्जन ४.२.१ आहे. जमेल का ?
-दिलीप बिरुटे
28 Oct 2013 - 5:56 pm | मदनबाण
जमण्यास हरकत नसावी.माझ्या फोन चे नाव पण त्या लिस्ट मधे नव्हते बहुधा,पण रुट झाला.
त्या पानावरची लेटेस्ट झीप फाइल डाउनलोड करा आणि त्यातली एपीके रन करा.
29 Oct 2013 - 9:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पूर्ण रुट होत नाही. प्रयोग करुन पाहिला आहे. अँड्रॉइड फोनचे फाँट बदलायचा असल्यास कोणते अॅप वापरावे ?
पूर्वी मी माझा फोन रुट असल्यावर फाँट इन्स्टॉलर वापरायचो आता ते चालत नाहीहे. फोन रुट करुनही.
-दिलीप बिरुटे
29 Oct 2013 - 9:46 am | मदनबाण
प्रथम Root Checker वापरुन फोन खरचं रुट झाला आहे का ? ते तपासुन घ्या. फॉन्ट इन्स्टॉलरचा पण प्रॉब्लेम असु शकतो, तेव्हा खालील फॉन्ट इन्स्टॉलर वापरुन पहा:-
iFont(Fonts For Android)
MyFont(Fonts For Android)
अवांतर :- Sygic India: GPS Navigation इनस्टॉल केले,आणि ते आवडले देखील. महाराष्ट्राचा मॅप डाउनलोड मारुन ठेवला आहे,तुमच्या गरजेप्रमाणे देशातल्या कुठल्याही भागाचा / राज्याचा मॅप डाउनलोड करुन ठेवता येतो. नेटवर्क नसताना तसेच जीपीएस नसताना तुम्ही मॅप पाहु शकता.
29 Oct 2013 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे बघा रुट अॅक्सेस आहे. बहुतेक फाँट इन्स्टॉलरचाच प्रॉब्लेम असावा. आता आय फाँट टाकणं आलं.
-दिलीप बिरुटे
29 Oct 2013 - 12:10 pm | कंजूस
#मदनबाण .६२०च्या रिव्युची लिँक
29 Oct 2013 - 12:17 pm | कंजूस
लिँक http://techradar.com/reviews/phones/mobile-phones/nokia-lumia-620-111735...
29 Oct 2013 - 12:39 pm | मदनबाण
कंजूस महोदय तुम्ही विचारलेल्या जीपीएस वैशिष्ठा बद्धल या रिव्हु लिंक मधे काहीच दिसले नाही.
या बद्धल अधिक इथे मिळेल :-
हेच सर्व तुम्हाला - Sygic India: GPS Navigation करता येईल असे दिसते... मी वरती सांगितल्या प्रमाणे हव्या त्या ठिकाणचा / राज्याचा मॅप डाउनलोड मारावा लागतो जसा मी महाराष्ट्राचा मॅप डाउनलोड मारुन ठेवला आहे.
*** विशेष सुचना :- मॅपची साईझ मोठी असल्या कारणाने तो वायफाय नेटवर्क किंवा ३जी च्या सहाय्यानेच डाउनलोड मारावा.
30 Oct 2013 - 4:49 am | कंजूस
#मदनबाण ,मला यामध्ये HERE MAPS बद्दल दिसते आहे की मैप ऑफलाईन डाऊनलोड करता येतात .नंतर त्याठिकाणी गेल्यावर NOKIA DRIVE हे GPS FREE अॅप वापरून ड्रायविँग डिरेक्शन मिळतात .दुसऱ्या एका ठिकाणी (?)हेच वाचले होतं ३जी न वापरता ऑफलाईन मैप सोबत GPS काम करते .
30 Oct 2013 - 8:48 am | मदनबाण
#मदनबाण ,मला यामध्ये HERE MAPS बद्दल दिसते आहे की मैप ऑफलाईन डाऊनलोड करता येतात
कुठलेही अॅप / मॅप डाउनलोड करण्यासाठी ऑनलाईन जावेच लागते. एकदाका मॅप डाउनलोड झाला की मग डेटा नेटवर्कची गऱ नाही लागत कारण तो तुमच्या फोनमधे किंवा एसडी कार्ड मधे सेव्ह झालेला असतो.
दुसऱ्या एका ठिकाणी (?)हेच वाचले होतं ३जी न वापरता ऑफलाईन मैप सोबत GPS काम करते .
परत तेच ! मॅक डाउनलोड करण्यासाठी किंवा त्या अॅपचा अपडेट घेण्यासाठीच फक्त नेटवर्क लागते ! इतरवेळी त्याची गरज नाही. मी जे अॅन्ड्रॉइड अॅप दिले आहे ते नोकिया अॅप प्रमाणेच चालते असे दिसते.
30 Oct 2013 - 3:41 pm | कंजूस
Ndtv gadets च्या http://gadgets.ndtv.com/mobiles/reviews/nokia-lumia-620-review-343837 रिव्युमध्ये "HERE DRIVE application offers offline turn by turn diretions" असे म्हटले आहे ,
1 Nov 2013 - 4:12 pm | सुधीर
Framaroot लिनोव्हो आयडीया ए१००० वर तरी नाही चाललं. :(
2 Nov 2013 - 3:58 am | कंजूस
गुगलची ओएस चांगली असली तरी फोन बनवणाऱ्या कंपन्या त्यामध्ये बरीच काटछाट करून आपला माल भरतात .ब्रैंडेड टैबलेट (आइडिआ ,रिलाअन्स वगैरे )यात ऑपरेटर कंपन्याही आणखी कापतात .वस्तु वापरायला घेतली कि कळते किती कापले आहे .
27 Nov 2013 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अॅन्ड्रॉईडसाठी काही नवीन भन्नाट अॅप्लीकेशन्स वगैरे काही आलंय का ?
-दिलीप बिरुटे
27 Nov 2013 - 12:14 pm | खबो जाप
https://play.google.com/store/apps/details?id=com.eterno
हे वापरून बघितलं का ?
भन्नाट नाही पण भारतातील सगळ्या भाषेतली वर्तमानपत्रे उपलब्ध आहेत.
21 Dec 2013 - 2:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
How to Disable SMS to MMS Conversion एसेमेस करतांना मोठा एसेमेस असला तर अॅड्राइडवर तो आपोआप एमएमस होतो ? याच्यावर काही उपाय आहे का ?
8sms (Stock Messaging, KitKat) हा उपाय आहे पण एकाच हँडसेट मधे दोन वेळेस मेसेज पाहतांना बोर होतं. काही उपाय आहे का कोणाकडे ?
-दिलीप बिरुटे
21 Dec 2013 - 4:45 pm | जोशी 'ले'
सेटींग > मॅनेज अॅप > आॅल > मेसेजिंग मधे जाऊन शो नोटिफीकेशन वर अनचेक करा ...डिफाॅल्ट मेसेजींग चे नोटिफिकेशन आॅफ होईल :-)
21 Dec 2013 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन मेसेजेस दिसत होते ते मात्र बंद झाले. आभार.......!!! :)
बाकी, मुख्य बग कसा सोडवावा बॉ त्यावर काही मदत करता आली तर करा राव.
-दिलीप बिरुटे
21 Dec 2013 - 8:40 pm | जोशी 'ले'
मुळात हा बग नाहिचये :-) हे रिस्ट्रिक्शन सर्विस प्रोव्हायडर चे आहे, cdma मधे 70 कॅरेक्टर चे लिमिट आहे, कदाचित रुटिंग करुन 'बग' टाकुन एक्सपर्टस हा प्राॅब्लम करु शकतील :-)
22 Dec 2013 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> हे रिस्ट्रिक्शन सर्विस प्रोव्हायडर चे आहे, cdma मधे 70 कॅरेक्टर चे लिमिट आहे
हे बरोबर आहे. पण, तीन मेसेज झाले म्हणजे ते अॅटोमॅटीक MMS होते. खरं तर रुट एक्सप्लोररने css फाईल कोणत्या तरी ठिकाणी true चे false करायचे आहे. पण, मला ते तपशिलवार नै म्हैती. मी केलं असतं पण माझ्या फोनला वरच्या वर काड्या केल्यामुळे फोन मेला की चाललो की सर्वीस सेंटरला. सर्वीस सेंटरवाला आता म्हणतो सर आपकेही फोन को कैसा प्रॉब्लेम आता समज मे नही आता. त्यामुळे मी जरा गप्प बसायचे ठरविले आहे.
-दिलीप बिरुटे
21 Dec 2013 - 3:58 pm | सत्याचे प्रयोग
सध्याचे नवं वर्जन तर कीटकॅट आहे ना , काजुकतली नाही बायदवे
अड्राईड वडापाव वर्जन कसे वाटेल
21 Dec 2013 - 7:59 pm | आनंदी गोपाळ
गोडाचा वडापाव काढा तुम्ही, मग W वर व्हर्जन आली, की विचार करू.
22 Dec 2013 - 9:41 am | मदनबाण
सध्या Sophos Antivirus and Security वापरतोय... याचा वापर करुन फोन एनक्रीप्ट केला.त्याच बरोवर Sophos Mobile Encryption वापरुन गुगल ड्राइव्ह कनेकट करुन सिक्युअर केला.
जाता जाता :- सध्या लेटेस्ट काय म्हणाल तर...
hike messenger ची हवा तयार केली जात आहे असे म्हणीन.
22 Dec 2013 - 3:07 pm | सॅगी
ब्लॅकबेरी मेसेंजर (BBM for android) वापरता का कुणी?
बॅटरी आणि मेमरी दोन्ही खुप खातो म्हणतात....तुम्हा सर्वांचा अनुभव काय आहे?
23 Dec 2013 - 11:50 am | मदनबाण
ब्लॅकबेरी मेसेंजर (BBM for android) वापरता का कुणी?
ट्राय मारले होते,एकदमच डब्बा वाटल्याने लगेचच काढुन टाकले.
बॅटरी आणि मेमरी दोन्ही खुप खातो म्हणतात....तुम्हा सर्वांचा अनुभव काय आहे?
माझ्या व्यक्तिगत अनुभवानुसार मेमरी खातो... बॅटरीचा सांगता येत नाही, मला वाटत तितका वेळ सुद्धा बीबीएमला माझ्या मोबल्यात मी दिला नाही.
23 Dec 2013 - 1:33 pm | मिनेश
WECHAT & LINE हे दोन अॅप्स सध्या भरपुर कार्यक्रमांना sponcer करत असतात. या अॅप्स चा INCOME SOURCE काय असेल की एवढे पैसे मार्केट मध्ये ओतणे यांना परवडत असेल??
24 Dec 2013 - 12:36 pm | आवडाबाई
मी माझ्या काही कोन्टॅक्ट्सना रिंग टोन सेट केला होता जो डिफॉल्ट रिंगटोन पेक्षा वेगळा होता. आता मला असे सर्व कॉन्टॅक्ट्सना एकच - डिफॉल्ट रिंगटोन - द्यायचा आहे, हे कसे करता येइल? नक्की कुणाकुणाचे वेगळे आहेत हे कसे शोधावे ?
i have "Me" as a contact in my address book, i tried to set ringtone there but that did not change all these ring tones that i had tampered with previously
फोन - मायक्रोमाक्स canvas A110 jellybean
24 Dec 2013 - 10:10 pm | सॅगी
NSE MOBILE - राष्ट्रीय शेअर बाजाराचे अधिकृत अॅप. समभागांच्या किमती लाईव्ह
स्ट्रीम होतात. २जी वर ही उत्तम काम करते.
Moneycontrol.com - moneycontrol.com चे अधिकृत अॅप.
तुमचा पोर्टफोलिओ moneycontrol.com वर असल्यास कुठुनही पाहता येतो. अर्थविषयक बातम्या पाहता येतात. CNBC TV18 आणि CNBC आवाज या चॅनेल्स चे लाईव्ह स्ट्रिमींगही पाहता येते (३जी किंवा वाय-फाय आवश्यक).
3 Jan 2014 - 5:45 pm | जोशी 'ले'
इंजिनीयर लोकांसाठी... dwg / dxf files viewer
फक्त 830 Kb चे हे साॅफ्टवेअर भलतच कामाचं, यात तुम्हि Autocad च्या फाईल्स offline सुद्घा बघु शकतात ज्या तुमच्या मेमरी कार्ड मधे स्टोर्स असतील... जी सुविधा offical autodesk च्या Autocad 360 मधे नाहि
"SchemataCAD viewer DWG/DXF"
https://play.google.com/store/apps/details?id=com.elmer.SchemataCAD_viewer
4 Jan 2014 - 8:05 am | कैलासवासी सोन्याबापु
अरे कोणी क्रुड स्केचिंग साठी एखादी अॅप सांगा ना , म्हणजे अगदी आपलं फिंगर पेंटींग असते तसे स्केचिंग (स्ट्रेस बस्टर) म्हणुन ! बघा काही मदत आपण करु शकत असल्यास :)
22 Feb 2014 - 6:46 pm | सुहास झेले
हे वापरून बघ...
Autodesk SketchBook Mobile
8 Jan 2014 - 2:38 am | देव मासा
यंदा कालनिर्णय ने त्यांचे ऍप्लिकेशन मोफत देउ केले आहे, सईजला जरा जास्त आहे १५ एमबी , मराठी कालनिर्णयला तेवढी जागा दिली तर काय हरकत आहे , वापरायला अगदी स्मुथ आहे ,अगदी भिंती वरच्या कालनिर्णय सारखा आहे, पंचांग सकट , Reminderchi सोय आहे
height="200" alt="1" />
https://play.google.com/store/apps/details?id=com.kalnirnay.kalnirnay
8 Jan 2014 - 3:23 pm | मदनबाण
धन्यवाद गॉड फिश... डाउनलोडवले आहे.
3 Feb 2014 - 1:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवीन काही फोन मॉडल्स किंवा काही नवीन अप्लिकेशन्स ?
डाटा सोफ्टवेअर केबल नावाचं अप्लिकेशन वापर्तोय एका मोबाइल मधुन वेगाने डाटा सेंड करणारं भन्नाट अप्लिकेशन वाटलं
-दिलीप बिरुटे
3 Feb 2014 - 4:59 pm | मदनबाण
ही आधी दिली आहेत की नाही ते लक्षात नाही...पण ट्राय मारावी अशी आहेत.
AppLock:-हवं ते अॅप लॉक करण्यासाठी असलेल मस्त अॅप.
File Hide Expert:-या अॅपचे नाव त्याचा उपयोग सांगतोय. :)
AndroZip™ File Manager:-अॅन्ड्रॉइडसाठीचे 1 ZIP application and first Android archiver is with you since beginning of 2009.
4 Feb 2014 - 7:23 am | जोशी 'ले'
https://play.google.com/store/apps/details?id=com.baloota.dumpster
हे अॅप रिसायकल बिन प्रमाणे करते , हे अॅप डाऊनलोड केल्यानंतरचा सगळा डाटा जसे इमेजेस,आॅडियो, विडियो व डाॅक्युमेंट्स डिलिट झाले तर ते रिकव्हर करता येतात , रिकव्हरी साठी नेट कनेक्षन ची गरज नाहि...
4 Feb 2014 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगलं वाटलं अॅप्लीकेशन.
-दिलीप बिरुटे
4 Feb 2014 - 3:22 pm | सुहास झेले
मराठयांच्या इतिहासासंबंधी काही अॅप्स...
१. दुर्ग सह्याद्री - ह्यात किल्ल्यांचे नकाशे आणि छोटीशी टीपवजा माहिती आहे. अजून पुढील वर्जन येणे बाकी आहेत. तोवर त्या त्रुटी काढल्या जातील अश्या अपेक्षा करूया.
२. इतिहास मित्र - हे अॅप गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेले आणि आणि सेफ आहे. काळजी करू नका. ह्यात मोडी, ऐतेहासिक नोंदी, कालगणना आणि किल्ल्यांची माहिती आहे. माझ्या मित्राने हे अॅप डेव्हलप केलंय आणि तूर्तास बेसिक लेव्हलला आहे, पण लवकरच अपडेट होणार आहे.
4 Feb 2014 - 3:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
ह्या दोन्ही कल्पना खूप आवडल्या. तुमच्या मित्राला अभिनंदन आणि धन्यवाद पोहोचवावे !
4 Feb 2014 - 4:37 pm | राजेंद्र मेहेंदळे
मी ओपन सोर्सवाला असल्याने (आणि खिसा फार गरम नसल्याने) सफरचंद,खिडक्या वगैरेच्या नादाला कधीच लागत नाही. आणि अॅप्सबद्दल म्हणाल तर गेम्सच जास्त डाउनलोड करतो पोरांना खेळायला.
१.अँगी बर्ड
२. कट द रोप
३. टेंपल रन
सध्या वापरतोय http://swipetelecom.com/store/index.php?route=product/product&product_id=78
4 Feb 2014 - 4:53 pm | मदनबाण
अवांतर :-

गेम्सच जास्त डाउनलोड करतो पोरांना खेळायला.
१.अँगी बर्ड
सध्या रागावलेला पक्षी एका वेगळ्याच वादात सापडला आहे ! NSA spying revelations मुळे या गेमवर सगळ्यांची नजर वळली आहे,परंतु कंपनीने या बाबत सगळ्या आरोपांचा इन्कार केला आहे.
{चित्र जालावरुन घेण्यात आलेले आहे.}
अधिक इथे :- Angry Birds firm calls for industry to respond to NSA spying revelations
9 Feb 2014 - 10:12 am | सुहास झेले
मेसेंजर अॅप्सची महाप्रचंड लाट आलीय... त्यात अजून एक भर टेलिग्रामची वापरायला घेतलंय. इंटरफेस वगैरे WA सारखंच...पण डेटा इंक्रीप्शन आणि सिक्युरिटी हा त्यांचा दावा आहे. वापरतोय सध्या
https://telegram.org/faq
Q: How is Telegram different from WhatsApp?
Unlike WhatsApp, Telegram is cloud-based and heavily encrypted. As a result, you can access your messages from several devices (including desktops!) and share an unlimited number of photos, videos and documents (doc, zip, mp3, etc). Thanks to our multi-data center infrastructure and encryption, Telegram is also faster and way more secure. On top of that, Telegram is free and will stay free — no ads, no subscription fees, forever.
9 Feb 2014 - 9:22 pm | मदनबाण
मी ऑलरेडी टेलीग्रामवर स्वीच झालोय, काही जण आधीच स्वीच झाले आहेत तर काही जण यावर विचार करत आहेत.हे व्होट्सअॅप सारखेच पण सिक्युर असल्याने स्वीच व्हायचे फायदेच आहेत.
जे विचार करत आहेत त्यांच्यासाठी खाली काही दुवे देतो आणि ते वाचुन त्यांनी स्वीच व्हावे का ? यावर नक्कीच करावा.
https://telegram.org/faq#q-how-secure-is-telegram
https://telegram.org/faq#q-get-technical-already
https://telegram.org/faq#q-how-are-secret-chats-different
टेलिग्रामवाल्यांना आपल्या त्यांच्या एनक्रीप्शन बद्धल एव्हढी खात्री आहे की त्यांनी जो हे एनक्रीप्शन ब्रेक करेल त्याला $200,000. चे बक्षिस जाहीर केले आहे.
व्होट्सअॅप सारखेच पण सिक्युर असल्याने स्वीच व्हायचे फायदेच आहेत.
10 Feb 2014 - 11:15 pm | आत्मशून्य
रोचक. प्रयत्न करुन बघावा म्हणतो. दुवा देता येइल काय ?
10 Feb 2014 - 11:22 pm | मदनबाण
दुवा देता येइल काय ?
$200,000 to the hacker who can break Telegram
हाच हवा आहे ना ? की दुसरा कुठला ?
10 Feb 2014 - 11:25 pm | मदनबाण
अजुन एक हे $200,000 बीटीसी मधे आहेत.{बीटीसी = Bitcoins } ;)
10 Feb 2014 - 11:27 pm | आत्मशून्य
याआधी टेलिग्राम वापरले नाहीये, पण ज्या पध्दतीने रिअलटाइअम ट्राफिक दाखवत आहेत ते डिक्रीप्ट करायला मजा येते आहे. बघुया काय शिकता येते ते. की शिकवायची संधी मिळते ;)
11 Feb 2014 - 1:14 am | मदनबाण
२-४ गोष्टी आम्हाला बी सांगा... यातल जास्त काही कळत नाही मला ! पब्लिक की आणि प्राव्हेट की इतकच काय ते माहित. ;)
10 Mar 2014 - 6:09 pm | अमोल मेंढे
व्हॉट्सप मध्ये पीडीएफ डॉक्युमेंट पाठवता येत नाही..ते टेलीग्राम मध्ये पाठवता येते
22 Mar 2014 - 9:40 am | मदनबाण
अच्छा हे माहित नव्हते ! सही आहे मग. :)
10 Feb 2014 - 10:12 am | मदनबाण
आजचे अॅप :-
NoRoot Firewall :-तुमचा फोन रुट केलेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला फायरवॉल वापरणे या अॅपमुळे शक्य आहे. हे वापरण्यास अगदी सोप्पे आहे. तुमचा फोन जेव्हा नेटला कनेक्टेड असतो तेव्हा तुमच्या फोन मधील बरीचशी अॅप त्यांची { तुमच्या फोन मधली त्यांनी जमवलेली} माहिती बाहेर पाठवतात. तुम्हाला फक्त हव्या त्या अॅपनाच जर नेट अॅक्सेस द्यायचा असेल तर फायरवॉलचा उपयोग करता येईल.
सध्या मी हे वापरत आणि याचा परफॉर्मन्स एकदम चंगा वाटला ! ;)
10 Feb 2014 - 8:15 pm | सुहास झेले
सहीच अॅप.. आवडले मला. धन्स बाणा :)
10 Feb 2014 - 10:36 pm | रुस्तम
Prey lets you keep track of your laptop, phone and tablet whenever missing, whether you're in town or abroad. Open source, proven software with hundreds of documented recoveries all around the world.
http://preyproject.com/
10 Feb 2014 - 11:06 pm | मदनबाण
@ निलापी
हल्ली जवळपास प्रत्येक अँन्टीव्ह्यारस {अॅन्ड्रॉइडसाठी बनवलेले} मधे हा ट्रॅक अँड फाइंडचा ऑप्शन दिलेला असतो. मात्र यासाठी सेटिंक मध्ये जाउन Device Administration मधल्या Device administrators या पर्याया जाउन त्या अॅप्लिकेशनला {अॅन्टीव्हायरस आणि तस्तम}सिलेक्ट करावे लागते. हे केल्यावर तुम्ही तुमचा फोन हरवल्यास रिमोटली त्याचा डेटा वाईप करु शकता,अलर्ट अर्लाम सुरु शकता, त्याला लोकेट करु शकता,त्याला लॉक करु शकता.
विशेष सुचना :- जर अश्या प्रकारचे अॅप तुम्हाला तुमच्या फोन मधुन अनइनस्टॉल करायचे असेल तर Device administrators जाउन ते अॅप्लिकेशन अनचेक करावे लागेल {जर चेक केले असेल तर} नाहीतर हे अॅप अनइनस्टॉल होणार नाही.
11 Feb 2014 - 4:03 pm | रुस्तम
नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद …
11 Feb 2014 - 11:34 am | मनिष
फोन कुठे विसरला किंवा कुठे आहे हे शोधायचे असल्यास...जीपीएस वरून लोकेशन बरेच अचूक मिळते. तसेच फोन सायलेंट मोड वर ठेवून सापडत नसल्यास हे छोटेसे अॅप वापरुन रिंग देता येते -
https://play.google.com/store/apps/details?id=com.orisyssoft.phonefinder
22 Feb 2014 - 6:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टेलीग्राम चा काही फीडब्याक ?
वाट्सअॅप आणि टेलीग्राम यांच्यात येत्या काळात स्पर्धा लागून आपल्याला फायदाच होईल असे दिसते. काल काही तरी टेलीग्राम वर काही तरी बग आला होता आणि माझ्या काँटेक्ट लिष्ट मधे नसलेले मित्र मला अॅड झाले होते अर्थात टेलीग्रामचा त्याबद्दल युजर्सना मेसेज आला होता की आम्ही यावर काम करतोय म्हणून. बाकी वाट्सअॅप फेसबूकने घेतल्याने नवीन काय सुविधा मिळतील असे वाटते ?
अँड्राईडचे काही नवे अॅप काही फंडे आले असतील तर सांगा...!
-दिलीप बिरुटे
22 Feb 2014 - 6:44 pm | सुहास झेले
टेलीग्राम आवडलं मला... बाकी फेसबुकने WA घेतल्यावर काही नवीन बदल अपेक्षित आहेत... आज रिलीज झालेल्या अपडेटमध्ये लास्ट सीन डिसेबल करायची प्रायव्हसी सेटिंग उपलब्ध करून देण्यात आलीय...
http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/mobile/whatsapp/articleshow/30844810.cms
22 Feb 2014 - 8:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न्यु व्हर्जन वाट्सअॅपची लास्ट सीन डिसेबलची आयड्या आवडली. आजच ट्राय केले. ऑनलाईन हाईड झालं पाहिजे हो.:)
-दिलीप बिरुटे
22 Feb 2014 - 9:45 pm | मदनबाण
टेलीग्राम चे सातत्याने अपडेट येत आहेत, पूर्वी पेक्षा जरा स्लो झाले आहे असे वाटते, बहुधा युजर डाटाबेस वाढल्याने तसे होत असेल असे वाटते.
26 Feb 2014 - 9:23 am | मदनबाण
आजचे अॅप :-
CM Security - Antivirus FREE
वापरायला अगदी सोपे,सिस्टीमवर एकदम लाईट आणि फास्ट.
यातली vulnerabilities फिक्स करण्याचा फायदा झाला,माझ्या मोबल्यात एसएमएस बद्धल असलेली vulnerabiliti याने फिक्स केली.
26 Feb 2014 - 9:33 am | जोशी 'ले'
vulnerability बद्दल जरा विस्कटुन सांगाल काय?
धन्यवाद..
26 Feb 2014 - 10:21 am | मदनबाण
यावर CM Security वे उत्तर होते :-
The "SMS Phishing Vulnerability" means your android system has a Vulnerability(flaw), which can be used by other application on your phone to insert an incoming SMS to your inbox, the content and sender could be arbitrary, this will be very dangerous, if it's exploited by malware. And fix solution of CM Security is dynamic protection, while malware trying to use this system's flaw and send fake SMS to you, CM Security will help you to block it and remind you it's not a real SMS from the SMS's sender
संदर्भ :- CM (Cleanmaster) Security - Free Antivirus APP Developed by Clean Master Team
तसेच अधिक इथेही वाचता येइल :- Researcher uncovers Android SMS phishing vulnerability
26 Feb 2014 - 10:44 am | जोशी 'ले'
धन्यवाद
26 Feb 2014 - 11:56 am | अत्रुप्त आत्मा
बाणा... मस्त आहे CM Security एप्लीकेशन. धन्यवाद
28 Feb 2014 - 9:43 am | सुनील
भाग २ सुरू करावा. ट्रॅक करणे अवघड झालेय.
5 Mar 2014 - 3:45 pm | आदूबाळ
+१
3 Mar 2014 - 10:27 pm | देव मासा
हाच धागा असावा, नवीन एप्लीकेशन साठी मी इथेच येत असतो , इतर लोक पण येत असावे
3 Mar 2014 - 10:37 pm | सुहास झेले
हो... शेवटच्या पानावर जाऊन तुम्हाला नवीन नवीन एप्लीकेशन्स शोधणे कठीण नाही... :)
4 Mar 2014 - 9:11 am | nandan
एवढे महाग फोन चोरीला वा हरवले कि खूप वाईट वाटते ।
ते हुडकून काढण्यासाठी अथवा डाटा पुसून काढण्यासाठी aaps आहेत क। जेणेकरून डाटा कुणालाही मिळणार नहि.
9 Apr 2014 - 3:59 am | बहुगुणी
मी Where is My Droid हे अॅप वापरलं आहे. इतरही बरेच play.google.com वर उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ phone finder हे एक.
4 Mar 2014 - 3:00 pm | अद्द्या
काल XOLO A500S घेतला
.
Android 4.2.2 हाये . आत्ता त्यात .
True Caller , Flash Light , WhatsApp, Temple Run 2 , App Lock , UC Browser , Misalpav , Clean Master, MX Player,
या गोष्टी आहेत . अजून काही apps गरजेच्या असल्या तर सुचवा मंडळी .
धागा पूर्ण वाचलाय .
CM Security आहे चांगलं ?
इतरही apps सुचवा राव
5 Mar 2014 - 2:37 am | देव मासा
राव साहेब News Hunt , इन्स्टोल करा, मराठीत नेमक्या तेवढ्याच बातम्या फ्लाश करणारे उत्तम aaplication आहे,
7 Mar 2014 - 10:10 pm | जोशी 'ले'
Take a look at "MoboMarket" - https://play.google.com/store/apps/details?id=com.dragon.android.mobomar...
नोकिया सारख्या Android काही मोबाइल्स मधे प्ले स्टोर नाहियेत त्यासाठी मोबोमार्केट चांगला पर्याय.. तसेच बरेचसे apps गुगल पाॅलिसी नुसार प्लेस्टोर मधे नाहियेत जसे फ्लॅपिबर्ड , युट्युब डाउनलोडर सारखे apps मोबोमार्केट मधे उपलब्ध आहेत...
8 Mar 2014 - 9:14 am | मदनबाण
Google Play Newsstand :- Google Current ची जागा या अॅप ने घेतली आहे. फ्लीपबोर्ड सारखेच आहे.
या बद्धल अधिक इथे :- Google Currents app officially replaced by Newsstand
11 Mar 2014 - 12:44 am | देव मासा
आय फोन साठी जसे स्केच बाय ५३ अपलिकेशन आहे , तसेच एखादे अॅन्ड्रॉईडसाठी अपलिकेशन आहे का ? अर्थात मोफत *mail1* *WRITE* *MAIL*
14 Mar 2014 - 11:10 am | सुहास झेले
Autodesk SketchBook Mobile
14 Mar 2014 - 10:19 am | भाते
आत्ताच मटामध्ये हि बातमी वाचली.
14 Mar 2014 - 11:11 am | सुहास झेले
इंटरेस्टिंग... जितकी जास्त स्पर्धा तितक्या सुविधा :)
19 Mar 2014 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फेसबूक मेसेंजर ने फ़ेसबूक टू फ़ेसबूक कनेक्ट असणा-यांना मोबाईलवरुन फ़ूकट कॉल करता येतो हे आपल्याला माहिती असेल तरी माहिती डकवून ठेवतो.
बाकी, माझ्या मोबाईल मधे घुसण्याचा समुद्राच्या लाटेला मोह आवरला नाही. मोबाईल जरा अशक्त झाला आहे. :(
-दिलीप बिरुटे
20 Mar 2014 - 9:46 am | सुहास झेले
NewsHunt हे अॅप माहित असेलच, पण ह्यांच्या ई-बुक सेक्शनमध्ये तुम्हाला ऐतेहासिक, जुनी मराठी पुस्तके मात्रशुल्क १ रुपया देऊन डाउनलोड करता येतात. ही पुस्तके तुम्ही ऑफलाईनदेखील वाचू शकता.
22 Mar 2014 - 3:27 am | आत्मशून्य
मी इमोर्टल्स ऑफ़ मेलुहा मराठीत ज्याची क़ीमत 300 आहे फक्त एक रुपायला विकत घेतले. आणि त्यांचा बुक रिडर्चा नाईट मोड़ इतका मस्त आहे. भारीच प्रकार.
26 Mar 2014 - 11:44 am | संपत
मी आता चेक केले. रु. १५० ला अहे. मध्ये काही स्पेशल स्किम होती वाटते.