१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.
असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.
अॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)
सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)
आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.
१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.
२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.
३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.
४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.
५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.
६. मराठीत टाईप करण्यासाठी -
अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन
क) AnySoftKeyBoard - Devanagari
ड) Lipikaar Hindi Keyboard Free
मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.
७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.
८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.
९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.
१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.
११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.
१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.
१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)
१४. TED - Ideas worth spreading :) :)
बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
- सुझे !!
प्रतिक्रिया
26 Mar 2014 - 11:49 am | संपत
पहिले पुस्तक १ रुपयाला. माहितीबद्दल अतिशय आभारी आहे.
22 Mar 2014 - 12:13 am | देव मासा
अगदी खरे , रहस्य कथा तर फक्त १ रुपयात वाचायला मिळते , कामसुत्र तर अगदी मोफत .
26 Mar 2014 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Election watch reporter नावाचं अप्लिकेशन आलंय. आपल्या मतदार संघात उमेदवार काही गैरप्रकार करत असेल तर आपल्याला निवडणुक आयोगाला कळवता येणार आहे. चलो कुछ करके देखे :)
-दिलीप बिरुटे
26 Mar 2014 - 9:42 am | सुहास झेले
व्वा व्वा... मस्त. धन्यवाद सर :)
27 Mar 2014 - 9:03 am | जोशी 'ले'
या धाग्याच्या त्रिशतका निमित्त.. :-)
50 रु. फ्रि टाॅक टाईम , सौजन्या 'लाईन' :-)
http://www.fonearena.com/blog/99644/line-messenger-offers-free-talk-time...
28 Mar 2014 - 3:35 pm | सुहास झेले
आमच्या उपयोगाचा नाही... तुम्हाला मिळाला का?
अजून एक चांगले App - Maharashtra Govt. Resolutions
This is the Official Mobile application released by Directorate of Information Technology (DIT), Government of Maharashtra to access Government Resolutions (GR)
28 Mar 2014 - 3:38 pm | जोशी 'ले'
हो...मिळाल्यावरच पोस्ट केलं
4 Apr 2014 - 1:18 am | सुहास झेले
निवडणुकीचा मौसम... त्यात अजून एका जबरदस्त App ची माहिती मिळाली आज.
Myneta Disseminator - Compare background information of candidates contesting election and make an informed choice. Share information with your friends on Facebook, SMS, and Email with a single click and help them to make an informed choice as well. See criminal, financial and educational information of your MP and MLA (Indian politicians).
.
.
.
8 Apr 2014 - 11:11 pm | अप्रतिम
एक प्रश्नमंजुषेचा गेम : Quiz up
जरूर ट्राय करा.खूपच जबरदस्त आणि प्रचंड addictive.
8 Apr 2014 - 11:56 pm | देव मासा
सुहास झेले आपण वर सांगितलेला Myneta Disseminator एप डाउनलोड केला , चांगला आहे , आमचा इथला उमेदवार ठाण्यातला १०वि पास आहे हे समझले , मागच्या वेळचा याच पक्षाचा उमेदवार ५वि पास होता हे देखील समजले . परंतु आमचा मतदार संघ नेमका कुठून कुठ पर्यंत पसरला आहे हे समजायला त्यात काही मार्ग नाही .
15 Apr 2014 - 10:19 am | मदनबाण
हार्टब्लीड चा फटका अॅन्ड्रॉइड फोनला सुद्धा बसला आहे आणि यांचे इन्फेक्शन चेक करण्यासाठी गुगल स्टोअर अॅप्स उपलब्ध झाले आहेत. या संबंधी माहिती आणि दुवे खाली देतो आहे,
दुवे :-
Android devices and apps affected by Heartbleed: Check if your smartphone is vulnerable
Heartbleed Bug Impacts Mobile Devices
अॅप्स :-
Heartbleed Detector
Bluebox Heartbleed Scanner
15 Apr 2014 - 11:58 am | सुहास झेले
धन्स बाणा..... :)
3 May 2014 - 8:39 am | मदनबाण
CM Security चा Heartbleed Scanner मी इन्स्टॉल केला आहे. उपयुक्त वाटला.
गुगल प्ले चा दुवा :- CM Security Heartbleed Scanner
15 Apr 2014 - 12:01 pm | सुहास झेले
अनायासे हा धागा वर आलाच आहे तर अजून एक App सांगतो
Geet Ramayan Audio - गीतरामायण - इंटरनेट कनेक्टीव्हिटी चांगली असले तर एकदम मस्त App
15 Apr 2014 - 10:26 pm | दिपस्तंभ
मोबिक्विक हे हि मस्त app आहे. झटपट प्रिपेड रिचार्ज करन्यासाठि.... मोबाइल,डाटा कार्ड इ.
15 Apr 2014 - 11:05 pm | दिपस्तंभ
डोट्स नावाची पण मस्त गेम आहे...
1 May 2014 - 5:30 pm | मदनबाण
आज एक वेगळे महत्वाचे अॅप देत आहे. हे अॅप विशेषतःस्त्रीयांच्या सुरक्षतेसाठी बनवण्यात आले आहे.
या अॅपचे नाव आहे Fightback
या अॅपच्या संकेतस्थळाचा पत्ता :- http://www.fightbackmobile.com/welcome
गुगल प्ले चा पत्ता :- Fightback
तुम्हाला माहित असलेले असे आणि इतर सिक्युरिटी अॅप्स इथे जरुर शेअर करा.
2 May 2014 - 4:03 am | बहुगुणी
बी सेफ हे अॅप माझ्या कुटुंबियांच्या फोनवर आहे: वापरायची वेळ सुदैवाने आलेली नाही, पण यातील बरेचसे फंक्शन्स उपयोगी वाटले, उदाहरणार्थः Share locations to find each other, ask friends to walk you home with Follow Me’s live GPS trace, or help friends stay safer by walking them home from wherever you are, Use Timer Mode to program an automatic alarm that will trigger if you have not checked in in time, Use I’m Here to tell selected people where you are right now
3 May 2014 - 2:31 pm | जागु
माहितीपूर्ण लेख.
11 May 2014 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्रीडम नावाचं एक अॅप्लीकेशन आहे, कृपया मोबाईल मधे बिल्कूल टाकू नका. गुगल प्लेष्टोअर ब्लॉक होतं.
जीमेलने कुठेच मोबाईलवर रजिष्ट्रेशन करता येत नाही.
-दिलीप बिरुटे
6 Jul 2014 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अँड्राइड मागे पडलं की नवं काही येणं बंद झालं ? नवीन काहीच प्रतिसाद दिसला नाही.
-दिलीप बिरुटे
6 Jul 2014 - 6:10 pm | सुहास झेले
लवकरच देतो काही अॅप्सची माहिती.... :)
6 Jul 2014 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाट पाहतो. म्हटलं बीझी झालात की काय ;)
-दिलीप बिरुटे
6 Jul 2014 - 8:42 pm | प्रभाकर पेठकर
सॅमसंग नोट २ साठी एखादं जीपीएस अॅप कोणाच्या माहितीत आहे का? रस्ते क्रमांक (स्ट्रीट नंबर) आणि घर क्रमांक (हाऊस नंबर) पातळी पर्यंत अचूकता असावी.
9 Jul 2014 - 4:26 pm | आनंदी गोपाळ
सिजिक व टॉमटॉम दोघेही उपलब्ध आहेत.
फ्री अॅप नाही मात्र.
काही दिवसापूर्वी सिजिकने इंट्रोडक्टरी ऑफर म्हणून इंडिया मॅप्स फ्री दिलेले होते. ती ऑफर संपली आता.
7 Jul 2014 - 6:23 am | मदनबाण
सध्या Emoji प्रकरण समजवुन घेतो आहे...
हे Emoji काय आहे ? तर :- How to Enable Emoji on Android
कालच यासाठी GO Keyboard (Emoji Free) इनस्टॉल केला आहे,डिफॉल्ट की-बोर्ड पेक्षा जास्त चांगला वाटला.
गुगल प्ले चा दुवा :- GO Keyboard (Emoji Free)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tum Hi Ho... Aashiqui 2
7 Jul 2014 - 8:10 am | किसन शिंदे
हे डे (Hay Day) नावाचा गेम टाकलाय मोबाईलमध्ये डाऊनलोड करतानाचा ६० एमबी गेले. *cray2* फेसबूकवरचा फार्मव्हिले मी खेळलो नाहीये, पण हा गेम एकुणात त्याच धर्तीवरचा वाटतो. प्रचंड अॅडिक्टेड आणि सतत खेळायला आवडत राहणारा आहे. फक्त एकच आहे की, हा गेम टाकण्याआधी तुमचा मोबाईल १ जीबी रॅमवाला आहे कि नाही याची खात्री करून घ्या.
16 Jul 2014 - 6:03 pm | इरसाल
वॉटसअॅप वर डायरेक्ट मराठी टाईप करायला कोणता की बोर्ड आहे का ?
16 Jul 2014 - 6:06 pm | आदूबाळ
गूगल इंडिक. यात फोनेटिक आणि अक्षरंवाला असे दोन्ही प्रकार आहेत.
23 Jul 2014 - 10:48 am | Gayatri Muley
अतिशय छान app आहे, मराठी बरोबरच हिंदी, संस्कृत, तसेच अगदी तमिळ, तेलगु ( अर्थात येत असेल तर ) टाइप करू शकतो...
28 Jul 2014 - 11:52 pm | शशिकांत ओक
हे ऐप वापरून पाहिलेत काय त्यात हिन्गीभाषा उतरवून घेतली तर मराठीतून टायपिंग फार सोईचे आहे. वारंवार आपण वापरलेले शब्द समोर आणून आपली सोय होते. मात्र ते इन्सि्क्रिप्ट कळपटावर चालते. वापरून पहा ...
18 Jul 2014 - 6:48 am | मदनबाण
वरती किसना ने गेम दिला असला कारणाने, मलाही काही सुचवावे वाटतात.
१} Jewels Star
२} Traffic Racer
३} Vector
वरील ३ ही खेळ वेगवेगळे आहेत, या पैकी Vector काल-परवाच टाकला आहे,अजुन भरपुर खेळुन पहावयाचा आहे.Jewels भरपुर खेळलो आहे, खेळतो आहे आणि Traffic Racer मधे आत्ता पर्यंत ५०.९९ किमी अंतर पार करुन झाले आहे,या अंतराच्या पुढे जाणे अजुन जम्या नय.
आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone
18 Jul 2014 - 11:26 pm | निनाद मुक्काम प...
गुगल इंडिक ची लिंक हवी आहे
मला प्ले स्टोर मध्ये सापडले नाही
19 Jul 2014 - 1:58 am | बहुगुणी
हेच अॅप शोधता आहात का?
19 Jul 2014 - 8:13 am | मदनबाण
@ निनाद
Google Hindi Input वापरुन बघ. मस्त आहे... मला हे बिरुटे सरांनी सांगितले होते.
खुप आधी मी हे इन्स्टॉल केले होते... नंतर काढुन टाकले होते, पण आता परत वापरतोय. जरी हे हिंदी संपोर्ट अॅप असले तरी मराठी झटपट लिहता येते.
Minglish Marathi +Eng Keyboard :- हे अॅप फार पूर्वी गविंनी मला सांगितले होते... ते बहुतेक हेच अॅप त्यावेळी वापरत होते,आत्ता माहित नाही. पण मला हे ठीक-ठाक वाटले होते.
वरील दोघांची तुलना केल्यास Google Hindi Input अधिक सोप्पे आणि भराभर लिहण्यासाठी जास्त उपयोगी वाटते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ७ समुंदर पार... :- विश्वात्मा
19 Jul 2014 - 10:45 pm | मदनबाण
आत्ताच एक नविन अॅप इन्स्टॉल केले आहे !
Mantras and Stotras in Marathi
काय काय आहे यात ?
{गणपती स्तोत्र,पसायदान,दत्त बावनी,श्री सुक्त्,श्री एकनाथ हरिपाठ,श्री एकनाथी भागवत्,ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा,मनाचे श्लोक्,दासबोध्,समश्लोकी भगवद्गीता,संत बहिणाबाइचे अभंग. आणि बरेच काही. :)
तुम्हाला हे अॅप आवडले तर नक्की सांगा... :)
मदनबाण.....
आत्ताची बदलेली सही :- Tune Maari Entriyaan... :- GUNDAY
22 Jul 2014 - 1:58 pm | सुहास झेले
अॅप आवडले.... माझ्या मित्रानेच डेव्हलप केलेलं आहे :)
22 Jul 2014 - 10:14 pm | मदनबाण
मित्रानेच डेव्हलप केलेलं आहे
सह्ही... त्यांना कळव की अॅप खरेच सुंदर आणि उपयोगी आहे. :)
आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !
20 Jul 2014 - 8:29 pm | श्रीगुरुजी
लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन अँड्रॉईड फोनमधून (वायरलेस पद्धतीने) कसे अॅक्सेस करता येईल? कृपया जाणकारांनी ज्ञान द्यावे ही विनंती.
22 Jul 2014 - 2:00 pm | सुहास झेले
लॅपटॉपवर वापरत असलेले कनेक्शन वायरलेस असेल, तर ते आरामात शक्य आहे. वायर्ड कनेक्शन असे शेअर करणे, माझ्या माहितीत तरी शक्य नाही...
22 Jul 2014 - 10:12 pm | मदनबाण
लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन अँड्रॉईड फोनमधून (वायरलेस पद्धतीने) कसे अॅक्सेस करता येईल?
मला वाटतं हे करता येते, ते कसं हे खालच्या व्हिडीयोत पहा { जरी या व्हिडीयोत लॅपटॉप टु लॅपटॉप शेअरींग दाखवले असले तरी नेटवर्क शेअरींग पद्धतीने मोबाइलवर देखील नेट कनेक्टीव्हीटी मिळवता येइल असे वाटते.}
तुमच्या लॅपटॉप मधे विंडोज ७ ही ओएस आहे हे गॄहीत धरले आहे. प्रयत्न करुन पहा, आणि जमल्यास कळवा म्हणजे इतरांनाही याचा फायदा होइल. :)
आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !
22 Jul 2014 - 11:25 pm | सुहास झेले
परफेक्ट ...
विंडोज ८.० किंवा ८.१ साठी हे ट्राय करा ....
23 Jul 2014 - 12:50 pm | श्रीगुरुजी
माझ्याकडे विंडोज ७.० आहे. वरील चित्रफीत पाहून प्रयत्न केला. अजून जमले नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करतो. माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
22 Jul 2014 - 2:05 pm | सुहास झेले
आजचे काही अॅप्स -
१. ऑफलाईन रीडिंगसाठी उपयुक्त असे - पॉकेट अॅप. तुम्ही वाचत असलेल्या बातम्या, माहिती, व्हिडीओ नंतर बघण्यासाठी उपयुक्त आणि तेसुद्धा कुठल्याही जाहिरातीविना. जरूर वापरून बघा...
२. मोबाईलसाठी जबरदस्त प्रोक्सी अॅप - सायबर घोस्ट
22 Jul 2014 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा
@सायबर घोस्ट >>> या अॅपचा उपयोग काय? नक्की काय काम करते हे अॅप? :)
23 Jul 2014 - 10:07 am | सुहास झेले
हे काही महत्वाचे फायदे - ऑफिसमध्ये वापरण्यास उपयुक्त ;-)
• Protects your privacy online
• We will change your IP every time you connect, so that nobody can detect you.
• Allows unlimited anonymous and secure web browsing
• Protects passwords and other sensitive information from hackers and criminal data hunters in public networks, e.g. for safe online banking transactions
• Free proxy to access content you love
• Bypasses web-blocking by government and business oriented censors
• Bypasses country locks by website operators, employers, university or school and allows easy access to censored content
• Bypasses service barriers such as VoIP through your provider
• THIS APP RESPECTS YOUR PRIVACY; no appropriation of personal information, no access to contacts or other sensitive data
• Unlimited bandwidth, unlimited traffic volume - even for free users
• No backdoors for intelligence services, no logs!
23 Jul 2014 - 10:46 am | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद. :)
23 Jul 2014 - 11:01 am | Gayatri Muley
माझा सॅमसंग gts 6312 हॅंडसेट आहे, पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा app memory card मधे टाकता येत नाहीयेत, त्यामुळे नवीन app घ्यायला अडचणी येत आहेत ( memory फूल असल्याने )
23 Jul 2014 - 2:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सेंटींग मधे जावून स्टोअरेज मधे जावून डिफॉल्ट मेमरी एस डी कार्ड सलेक्ट केले नसेल तर फोन मेमरी गच्च भरुन जाणार.
फोन सेटींग मधे जावून तुम्ही जर स्टोअरेजचा फोटा डकवला तर आम्ही नक्की मदत करु. असा फोटो टाका.
-दिलीप बिरुटे
23 Jul 2014 - 4:20 pm | Gayatri Muley
सॉरी, मला सध्या तरी फोटो नाही टाकता येणार पण माझ्या मोबाईल मधे हा पर्याय उपलब्ध नाहीये, मी स्टोरेज मेमरी मधे गेल्यानंतर मला युवर फोन मेमरी, अवेलेबल मेमरी, आदी पर्याय दिसतात, पण तुम्ही दाखवल्याप्रमाणे वरील डेफोल्ट राईट डिस्क- फोन मेमरी/ एस. डी. कार्ड हे पर्याय दिसत नाहीत.
23 Jul 2014 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अॅप्लीकेशन म्यानेजरमधे फाईल म्यानेजर असं दिसतं का ? तिथे फोन मेमरी आणि तुम्ही टाकलेले एसडी कार्ड दिसतं का ?
जर दिसत नसेल तर त्याचा अर्थ एसडी कार्ड व्यवस्थित बसलेलं नसावं.
-दिलीप बिरुटे
23 Jul 2014 - 4:47 pm | Gayatri Muley
अॅप्लीकेशन मॅनेजरमधे गेल्यानंतर मला downloaded apps, running apps, all apps, इतकेच पर्याय दिसतात... अन् मेमरी कार्ड मधे app जरी नसले तरी फोटो, गाणे आहेत आणि ते मी नेहमीच वापरत असते, त्यामुळे मेमरी कार्ड व्यवस्थित बसलेल आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते...
23 Jul 2014 - 5:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
all apps मधे ते फाईल म्यानेजर असतं. पण असो, उद्या आपल्या कंपनीचा फोन पाहतो आणि मग सांगतो.
-दिलीप बिरुटे
23 Jul 2014 - 2:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या अँड्राइड मोबाईलवरुन फोन मेमरी किंवा मेमरी कार्डवर असलेले फोटो, डॉक्युमेंट्स, एम्पी थ्री, व्हिडियो, आणि काही आपण चुकुन डिलिट केलं असेल तर पुन्हा ते मिळवायचा मार्ग म्हणजे डिस्कडिगर. फोन रुट केलेला असला पाहिजे ही अट हे अप्लिकेशन वापरायला पहिली अट आहे.
काल मोबाईल ग्यालरीतून काही कचरा डिलिट करण्याच्या नादात मला आवडलेला फोटो टाकला डिलिट करुन मग तो येईपर्यंत जीवाची तगमग सुरु झाली. डिस्कडिगर ने तो फोटो मिळवता आला. आपल्याला सांगावं वाटलं म्हणुन हा प्रपंच. :)
-दिलीप बिरुटे
23 Jul 2014 - 11:26 pm | आ युष्कामी
माझ्याकडे Karbonn Taitanium S5 हा फोन आहे. मला फोन रूट मारायचा आहे . मी खूप सारे पर्याय try करून पहिले. परंतु मला हे जमत नाहिये.
मी computer(windows 7) च्या मदतीने रूटचा प्रयत्न केला . पण संगणकात फोनचे USB Driver install होत नाहीये . याबाबतीत कुणी मदत करू शकता का ? रूट करण्याची प्रोसेस स्टेप्स wise समजावले तर अधिक चांगले . THANX IN ADVANCE
24 Jul 2014 - 6:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
http://forum.xda-developers.com/apps/framaroot/root-framaroot-one-click-... यादुव्या वरुन एकेक फर्मरुतअप्लिकेश् न टाकुन पाहा ! नवीन व्हर्जन पासून सुरुवात करा.एकच अप्लिकेशन मोबाइल मधे टाकल्यावर
ते ओपन करा त्यात बोरोमीर किंवा बराहीर असे पर्याय दिसतात पैकी एकावर क्लिक केल्यावर सक्सेस असा मेसेज येतो नंतर फोन बंद करा आणि पुन्हा चालु करा फोन मधे सुपर सु हे अप्लिकेशन आपोआप येते ते आले असले तर आपला फोन रूट झाला असे समजा
फोन रूट १००% होतो झाला नाही तर पुन्हा इथे विचारा मदत नक्की करतो.
-दिलीप बिरुटे
24 Jul 2014 - 10:31 am | सुहास झेले
लई भारी... बिरुटेसाहेब द रूट किंग ;-)
24 Jul 2014 - 12:09 pm | आ युष्कामी
failed to root ! try another exploit असा मेसेज येतो.
24 Jul 2014 - 6:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण बरोबर अॅप्लीकेशन इन्स्टॉल केलं आहे. आपल्या मोबाईल मधे आपण टाकलेलें फार्मरुट चालत नाही, त्यातल्या Boromir केल्यावर वरचा येरर आला आहे येऊ द्या अजिबात घाबरु नका. :)
मी दिलेल्या लिंकवरुनच दुसरे अप्लीकेशन व्हर्जन टाका. Framaroot-1.9.3.apk इन्स्टॉल केल्यावर Boromir Faramir Barahir असे पर्याय दिसतील. त्यातल्या Barahir वर क्लीक करा. सक्सेसचा मेसेज येईल. फोन बंद करुन चालू करा. आणि मेसेज आल्यावर गुगल प्लेवरुन सुपर सु हे अप्लीकेशन टाकून घ्या. फोन रुट झालेला असेल. :)
-दिलीप बिरुटे
25 Jul 2014 - 11:10 pm | आ युष्कामी
framaroot मधील दोन्ही exploit try करून पहिले पण रूट होत नाहीये. screenshots सुद्धा काढलेत पण डकवण्याबद्दल माहित नाही. मी इथे फक्त वाचनमात्रच असतो
25 Jul 2014 - 10:58 pm | बहुगुणी
आधी ही माहिती कुणी दिली असेल तर पुनरुक्तीबद्दल क्षमस्व!
अँड्रॉईड फोनचं रुपांतर वाय फाय हॉट स्पॉट मध्ये करणं आणि त्यावरून लॅपटॉप वापरणं हे प्रवासात बर्यापैकी उपयोगी पडू शकतं. मी यासाठी फॉक्स-फाय हे अॅप वापरतो. Continuous connectivity मिळतेच असं नाही, बरेचदा ५-१० मिनिटांनंतर इंटरेनेट अॅक्सेस बंद होतो, पण लगेचच परत सुरू करता येतो. पण थोड्याच वेळ लॅपटॉप चालू करून एखादी-दुसरी फाईल इमेल वरून डाऊनलोड करणं वा पाठवणं यासाठी १० मिनिटं पुरतात. मला विमानतळांसारख्या ठिकाणी - जिथे अन्यथा १० मिनिटांसाठी तासभराचे पैसे भरावे लागतात- ही सोय उपयोगी पडलेली आहे.
26 Jul 2014 - 10:28 am | मदनबाण
Clean Master च्या अॅप मॅनेजरचा वापर करुन डेटा कार्डवर अॅप ट्रान्सफर करता येतात की... यासाठी अॅप मॅनेजरचा मुव्ह हा ऑप्शन पहावा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lasya :- Anoushka Shankar
28 Jul 2014 - 9:10 pm | सुधीर
टिम व्हिवर वापरतोय. डेस्क्टॉपचा डेटा टॅब वर आणि टॅबचा डेस्क्टॉपर इंटरनेटवरून ट्रान्स्फर करण्यासाठी उपयोगी वाटतयं. (अर्थात त्याचं डेस्कटॉप व्हर्जन डेस्कटॉपवर इन्स्टॉल असलं पाहिजे). सध्या तरी घरच्या घरीच वायफायवर डेटा ट्रान्स्फर करतोय. पण घरचा डेस्कटॉप ऑन असेल तर जगात कुठूनही डेटा ट्रान्स्फरच काय पण डेस्कटॉपचा रिमोट अॅक्सेसही घेता येतो.
28 Jul 2014 - 10:48 pm | वामन देशमुख
मोबाइल वर स्क्रीनशॉट घेण्यासाठी एखादे अॅप आहे का?
29 Jul 2014 - 1:08 am | यसवायजी
श्यामसिंगच्या मोबाईलवर "मोशन्स अॅन्ड जेस्चर्स" मध्ये "पाम मोशन" असा ऑप्शन आहे.
स्क्रीनवर हाताचा तळवा फिरवला की, स्क्रीनशॉट सेव्ह होतो.
अॅपसुद्धा असेल.
29 Jul 2014 - 6:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्ह्यालुम कमी करण्याचं आणि मोबाइल स्विच ऑफ़ करण्याचं बटन असे दोन्ही एकाच वेळी दाबा मोबाइल स्क्रीन शॉट घेतला जातो !!!
-दिलीप बिरुटे
6 Aug 2014 - 10:55 am | सुहास झेले
कार्टूनिस्ट प्राण आपल्यात नाहीत... आज सकाळी त्यांचे निधन झाले...:( :(
त्यांनी अजरामर केलेली कार्टून्स (चाचा चौधरी, बिल्लू, पिंकी) Android App वर उपलब्ध आहेत - Pocket Toons
23 Aug 2014 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणताही अँड्राईड फोन रुट करण्यासाठी व्हीरुट हे संगणकावर उतरवून घेणारं अॅप्लीकेशन वापरा.
आपल्या फोन सेटींग मधे जाऊन डेव्हलपर ऑप्शन मधे युएसबी डबींग वर क्लीक करा. मग कॉड लावून संगणकाला जोडा व्ही रुट अॅप्लीकशन सुरु करा. एक दोनदा फोन रिस्टार्ट झाल्यावर आपला फोन रुट झालेला असेल. फोन रुट झाला की नै हे तपासण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील रुट चेकर हे अॅप्लीकेशन वापरा.
-दिलीप बिरुटे
23 Aug 2014 - 11:19 am | सुहास झेले
व्वा सर.... धन्स :)
24 Aug 2014 - 10:39 am | सुधीर
रुट करणं आता अधिकाधिक सोप होत चाललयं. धाग्याच्या सुरुवातीला वाटलेली "रुट करण्यातली थ्रील" कमी होईल काय? टॅब जूना झाला की करेन म्हणतो.
14 Sep 2014 - 12:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट्युबमेट युट्युबवरील व्हिडियो डाऊनलोड करण्यासाठी एक बेष्ट अॅप्लीकेशन.
व्हिडियो चे एम्पी थ्री मधे कन्व्हर्ट करता येते.
-दिलीप बिरुटे
14 Sep 2014 - 1:08 pm | सुहास झेले
यप्प... खूप आधीपासून वापरतो... जबरदस्त आहे. मी सगळे HD व्हिडीओ डाउनलोड करतो... :)
15 Sep 2014 - 3:03 pm | मदनबाण
ट्युबमेट फार पूर्वी पासुन वापरतो आहे, व्हॉट्सअॅपवर सर्क्युलेट करण्यासाठी. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट
15 Sep 2014 - 6:45 pm | अत्रुप्त आत्मा
ट्युबमेट १ नंबर आहे. सहज सोपे!
16 Sep 2014 - 3:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Black Market गूगल प्ले स्टोअर सारखं अप्लिकेशन पेड़ अप्लिकेशन फुकट मिळतात
16 Sep 2014 - 10:19 pm | सुहास झेले
ट्राय करतो.... :)
17 Sep 2014 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अप्लीकेशन बरोबर काही पॉप सारख्या जाहिराती अडवण्यासाठी कोणतं अप्लिकेशन आहे का ?
अॅडब्लॉक प्लस टाकुन पाहिलं. अॅड आवरत नै ये त्या अप्लीकेशनला ! हेल्प मी.
-दिलीप बिरुटे
12 Oct 2014 - 3:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाट्सअॅप प्ल्स माझ्या कीटकॅट व्हर्जन असलेल्या मोबाईलवर टाकायचे आहे पण Application not installed.
an existing package by the same name with a conflicting signature is already installed.'' असा संदेश सारखा दिसतो. मी पूर्वीचे वाट्सअॅप काढून व्यवस्थित च्याटचा ब्याकपही घेऊन इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला पण मला अजूनही वाट्सॅप प्ल्स इन्स्टॉल करता आलेले नाही.
माझा प्रश्न आहे, मोबाईल सिस्टीम मधे असलेले व्हेरीफाय सिग्नेचर कसे डिसेबल करावे किंवा सिष्टीमला ऑलरेडी जी वाट्सअॅपची फाईल दिसते आहे, ते कशी काढावी. काही मदत करा प्लीज. गुगलुन गुगलुन मी वैतागलो आहे.
-दिलीप बिरुटे
26 Oct 2014 - 10:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय राव काय नवे प्रयोग चालु आहेत की नै. मी Xposed Installer मोबाईल मधे टाकले आणि त्याच्या विविध मोड्युल्सशी खेळुन पाहिले. मी यातले फाँटर हे मोड्युल टाकून वेगवेगळे फॉंट आणि त्या फाँटला वेगवेगळे रंग दिले मजा आली. ही मजा थोड्याच वेळ टीकली. कारण मला पुन्हा इनबिल्ट फाँटच बरा असे वाटल्यामुळे फाँट रंगकाम पूर्ववत केले आणि फाँट तेवढा बदलला.
बाकी, Xposed Installerचे प्रयोग काळजीपूर्वक आणि आपापल्या जवाबदर्यावर करावेत. फोन कोमात गेला तर मी जवाबदार राहणार नै. :)
-दिलीप बिरुटे
9 Nov 2014 - 2:17 am | देव मासा
फाईल एक्सप्लोर इंस्टाल करून आधीचा वॉटस्प फोल्डर डिलीट करा आणि नंतर वॉटस्प प्लस इंस्टाल करा , शक्यातो वाट्सॅॅप प्लस इंस्टाल करताना 3जी वापरा किंवा WIFI वापरा
वाट्साप प्लस 32 ची लिंक खाली पेस्टात आहे
http://www.mediafire.com/download/u5zhm2giaejjr9t/Whatsapp%2B6.32C-Rahil...
9 Nov 2014 - 2:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रूट फ़ाइल एक्सप्लोरने मी वाट्सप फ़ाइल उडवली प्रॉपर पूर्वीचे अनइंस्टॉल केले तरी तोच मेसेज एरर येतोय :(
4 Mar 2015 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण वरीजनल वाट्सपवाल्यांनी प्लस वाल्यांना ब्यान केलं. सुरुवातीला १२ तास आणि नंतर चोवीस तास त्यामुळे आता वाट्सपप्लस जवळ जवळ बंद झालंय. मी वापरतो तो भाग वेगळा. कारण वाट्सप प्लस वाल्यांनी त्यांच्या संकेतथळावर आम्ही आता अशा भानगडीत पडणार नै असं म्हटलं आहे.
संस्थळ बंद होण्यापूर्वी मी वाट्सप प्लस reborn आणि saavan अॅप साठवून ठेवलं आहे, कोणास हवे असल्यास अजिबात मिळणार नै. :)
-दिलीप बिरुटे
9 Dec 2014 - 8:08 pm | बहुगुणी
ट्रॅफलाईन हे अॅप ट्रॅफलाईन.कॉम या संस्थळाच्या कंपनीने गूगल प्ले वर उपलब्ध केलेले आहे.
आज पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे ट्रॅफिक लोणावळ्यापाशी का अडला आहे आणि किती वेळ (किती अंतरापर्यंत) अडलेला राहील हे शोधण्यासाठी आंतर्जालावर हुडकत असतांना ट्रॅफलाईन.कॉम सापडलं. त्यांच्या नंबरवर फोन (9223 111 000) केला असता ट्रॅफिक अमृतांजन पुलापासून पुढे सुरळीत आहे हे कळलं. माहिती देणारा तरूण ती तत्परतेने आणि उत्साहाने देत होता. अॅप मी अजून वापरून पाहिलं नाही, पण ट्रॅफिकची (विशेषतः मुंबईतल्या) सद्यस्थिती व्यवस्थित कळते, आपल्यालाही congestion / accident प्रत्यक्ष फोटो वा टेक्स्ट द्वारे 'रिपोर्ट' करता येतं, असं दिसतं. काही अप्रिय अनुभव आला तर याच धाग्यात कळवेन, पण तोपर्यंत एका उपयोगी अॅपची माहिती द्यावीशी वाटली.
10 Dec 2014 - 2:00 am | सुहास झेले
त्यांचे ट्विटर हँडल अल्टीमेट आहे... त्यावर फारच तत्पर माहिती मिळते (मुंबईची तरी :)). त्यातूनच ते अॅप सिंक करत असावेत. नक्की वापरून बघेन :)
12 Dec 2014 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रिकव्हरी फाईल (CWM इमेज) मिळविण्यासाठीचं एखादं सॉफ्टवेअर आहे का माहिती कोणाला ?
-दिलीप बिरुटे
23 Jan 2015 - 6:32 pm | प्रचेतस
मोटो जी साठी आताच अॅन्ड्रॉइड लॉलिपॉप ५.०.२ OTA अपग्रेड मिळालं.
फोन स्मूथ वाटतोय. मात्र अगदी किंचित स्लो वाटतोय.
इंटरफेस मधे बराच फरक झालाय.
14 Feb 2015 - 9:07 pm | भक्त प्रल्हाद
तुम्हाला माहित आहे का कि काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही online shopping वर बरेच पैसे वाचवू शकता?
१. किमतीची तुलना करून : एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या साईट वर वेगळी असते. त्यांची तुलना केल्यावर तुम्हाला सर्वात कमी किंमत माहित पडू शकते.
२. फ्लिपकार्त आणि अमेझॉन रोज त्यांच्या वस्तूंच्या किमती बदलतात. तुम्ही त्या रोज चेक केल्या तर तुम्हाला नक्कीच किमतीमधील फरक दिसून येईल.
आम्ही या गोष्टी पहिल्या आणि यासाठीच आम्ही एक नवीन मोबाईल app बनवले आहे, ज्याचा नाव आहे buckasur.
या app वर तुम्ही वस्तू शोधा आणि तुमच्या आवडत्या वस्तूंच्या यादीत टाका. जेव्हा वस्तूची किंमत कमी होईल तेव्हा हे app तुम्हाला सांगेल.
तुम्ही हे app इथे डाऊनलोड करू शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.buckasur
आमचे आतापर्यंत अनुभव तुम्ही इथे वाचू शकता.
http://buckasur.com/blog/
आतापर्यंत अनेकांना याचा फायदा झाला आहे आणि होत आहे.
मी हे ऍप सध्या डायपरच्या किमती चेक कन्यासा वापरतो.
23 Feb 2015 - 2:10 pm | ग्रेटथिंकर
पाच ईंची फोन ब्राऊजींग करताना जास्त डेटा खातात, यावर ऊपाय काय आहे.?
23 Feb 2015 - 2:34 pm | टवाळ कार्टा
=))
हा तुम्हीच दिलेला पुरावा...गुर्जी जपून ठेवणार बघा हा प्रतिसाद =))
23 Feb 2015 - 4:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
साईजचा आणि डेटा कंजंप्शनचा काय संबंध?
23 Feb 2015 - 4:16 pm | टवाळ कार्टा
आप्ल्यासार्ख्या स्मॉलथिंकर्ना नै कळ्ळ्णार ते =))
23 Feb 2015 - 5:51 pm | कपिलमुनी
जास्त मोठी स्क्रीन म्हणजे जास्त मोठी इमेज , जास्त मोठे फाँन्ट डाउनलोड होणार ना !
व्हिडीओ प्ले होताना पण जास्त मोठा दिसणार तेवढे पिक्सेल जास्त डाउनलोड होणार !
नुकत्याच आलेल्या नानॅमॅटीक माईटोनिक टेकनॉलॉजीने शोधले आहे
23 Feb 2015 - 7:12 pm | ग्रेटथिंकर
मला फक्त इतकेच विचारायचे होते कि स्क्रीन साईज वाढल्याने डेटा कंझ्मशन जास्त होते का?
आधी मी नोकियाचा क्वार्टी फोनवरुन नेट वापरायचो 1GB /month पुरायचे. आता मी नवीन फोन घेतला आहे, ज्याचा स्क्रीन पाच इंची आहे व साधे मिपा पेज ओपन केले तरी 200,300kb data कंझ्युम होतोय ,पुर्वीच्या फोनवर 20,30KBत मिपा फ्रंट पेज लोड व्हायचे. नक्की काय प्रॉब्लेम आहे? कि मोठा फोन जास्त डेटा असा प्रकार आहे.
24 Feb 2015 - 11:33 am | नांदेडीअन
तुमच्या वेब ब्राऊजरवरसुद्धा अवलंबून असतं हे.
ऑपेरा मिनी वापरा, सगळ्यात कमी डाटा कन्झ्युम होतो यावर.
24 Feb 2015 - 7:12 am | देव मासा
माझा HTC Desire -x फोन आहे.
दोन वर्ष झाली फोनला ,कधि फॉर्मेट
करायची गरज भासलि नाही. टेंपल रन
कैंडी क्रश, तीन पत्ती ,सबवे सर्फर या सारखे गेमस गेल्या दोन वर्षात या फोन वर तासन तास खेळलो आहे, अगदी प्रमनाच्या बाहेर, नंतर रॉउटर wifi वापरु लागलो ६-७ महीने झाले, अचानक एक दिवस माझा wifi चालन बंद झाल. wifi चालुच होईना , फोनच्य सेटिंग्स मध्ये जिथे आपल Wifi बटन असत तिथे फ़क्त
wifi turning on अस दाखवात असे ,पण
wifi चालुच होत नसे, शेवटी गुगल वर या
प्रॉब्लम वर शोध घेतला , तिथ समजल अंनेक लोकांना वेग वेगळ्या कंपन्यांच्या वेग वेगळ्या मॉडल्स वर हा प्रॉब्लम येतो , आणि त्या वर फैक्टरी रिसेट हा शेवटचा इलाज आहे , आनी तो करूनही प्रॉब्लम काही लोकांचा दुर होत नाही ,म्हणजे काहीनचे पुन्हा चालु होतात
काहींचे नाही, मी बराच शोध घेऊन फैक्टरी रिसेट सोडून आणखी काही इलाज आहे का पाहिले , त्यात आमुक आमुक कोड डायल करा त्याने wifi चालु होइल असे एक दोन फोरम वर वाचायला मिळाले, तो इलाजहि करुन पाहिला , उपयोग झाला नाही, शेवटी फोन फैक्टरी रिसेट केला ,म्हंटले आता चालु होईल पण
फुस्सsss ,पुन्हा तेच wifi turning on
पुन्हा दोन तीन दिवसानि फैक्टरी रिसेट केला फोन, तरी तेच wifi turning on
सहज एक दिवस गुगुल प्ले स्टोर वर wifi साठी काही टूल्स आहेत का शोधले .
दोन तीन सापडले, त्यातले FXR Wifi Fixer एप डाउनलोड करुण ओपन केले.
एपच्या वारच एक टिप लिहली होती.
हे एप सगळेच wifi प्रोब्लेम्स फिक्स करेल आसा दावा करत नाही अथवा त्याची शास्वतीही देत नाही, आणि खाली
Fix WiFi बटन होते, देवाचे नाव घेऊन
बटन दाबले , दोन तीन वेळा स्कैन होताना
जसे दाखवतात तशी प्रोसेस दाखवली ,
आणि टुनकन माझा wifi ऑन झाला ,सिगनल आला. दोन तीन महीने विन तक्ररार wifi सुरळीत चालले ,
पुन्हा दोन तीन महिन्याने तोच प्रॉब्लम पुन्हा उगवला ,या वेळी फोन वाइच गरम
होत असे, या वेळी या रोगावर इलाज
माहीत असल्याने निशचिंत होतो.
पुन्हा ते FXR WiFi Fixer उघडले आणि बटन दाबुन प्रोसेस चालु केलि, पण प्रोसेस पुरणच होइना डीलिटीनग वायफ़ाई प्रोफाइल वर प्रोसेस अडकून राहत असे ,
दोन तीन वेळा करुण पाहिले उपयोग झाला नाही, महन्टले एप अपडेट झाला असेल पण प्ले स्टोर वर तोच जुना एप होता, तरी सुद्धा जुना एप अनइंस्टॉल करुण नव्याने इंस्टॉल केला , परिणाम शून्य ,फोन पुन्हा रिसेट केला पुन्हा एप वापरून पाहिले तरी तेच wifi turning on
शेवटी नाइलाजने ठाण्यात इटर्निटी मॉल मधे HTC फोनच्या सर्विस सेंटर मध्ये गेलो.
ते म्हणाले फोनचे सॉफ्टवेर पुन्हा नव्याने आपडेट करावे लागेल ( तसा मी वेळो वेळी आपडेट करत होतो ) त्या साठी ५६० रूपये खर्च येईल , आणि फोन दुरुस्त नाही झाला तर काही चार्जेस द्यावे लागणार नाहीत ,आणि १ तासचा वेळ लागेल , मी तयार झालो त्यानी फोन एक तासानी अपडेट करुन wifi चालतो का तपासन्यास सांगितले , मी चेक केला चालत न्हवता , त्यावर ते म्हणाले कदाचित
हार्डवेर प्रॉब्लम असावा , तो दूर करायला १२०० रुपये लागतील आणि विस-पंचवीस दीवसांचा अवधि लागेल.मी नंतर येतो सांगुन बाहेर पडलो , मॉलच्या तळ मजल्यावर अनेक मोबाइल फोन दुरुस्त
करनारी दुकाने होती ,आणि त्या दुकानांच्या बाहेर एका तासात कुठलाही फोन दुरुस्त करुन देणार अशी फलक लागले होते, त्यातल्याच कमी लुटेल आशय दिसनार्य एका माणसाच्या दुकानात शिरलो , त्याने ८५० रूपये खर्च सांगितला आणि एक तासाचा अवधि लागेल संगीतले , फोनचा हार्डवेर प्रॉब्लम आसवा असे त्याने सांगितले, मी घसा-घास करुण पहिली पण एक रुपया कमी घ्यायला तो तयार न्हावत ,मी ठीक आहे म्हणत फोन त्याच्या स्वाधीन केला .आणि
तिथच वाट पाहात बसलो,तो फोन घेऊन दुकानातल्या पोट माळ्या वर गेला . तो ४० पेक्षा कमी मिनिटांत खाली आला, wifi
चालु झाले होते, शिवाय माझे जे वोल्यूम बटन चालत न्हावते तेही आता चालत होते.
नेमका काय प्रॉब्लम झाला होता विचारल्या वर त्याने हार्डवेर प्रॉब्लम झाला होता एवढेच सांगितले , मी पेमेंट करुण फोन घेतला.
आता माझ्या शंका
माझ्या फोनला नक्की काय झाल असेल?
HTC सर्विस सेंटर वाल्यनि माझा फोन निट तपासला असेल की काम जास्त आहे म्हणुन तसाच एक तासाने परत केला असेल?
नक्की हार्डवेअर प्रॉब्लम झाला असेल का?
अणि तस झाले असेल तर तो इतक्या कमी वेळात दुरुस्त करता येऊ शकतो का?
तसा आता माझा फोन पुर्वी जसा होत असे तसा गरम होत नाही
८५० रुपये जास्तच दिले , पण मला वाटले होते सर्विस सेंटर वल्लयना जमले नाही याला काय जमनार तरी बघू या विचाराने मी गेलो.
wifi turning on प्रॉब्लम कशा मुळे येत असावा?
4 Mar 2015 - 8:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वायफायचं चिन्ह येत होत का ? म्हणजे वायफायच्या चिन्हाला क्लिकुन राहिल्यावर पुढे काही प्रोसेस होत होती का ?
-दिलीप बिरुटे
4 Mar 2015 - 8:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पीसी सुट कोणता चांगला अँड्रॉइडला ? वंडरशेअर हल्ली चालत नाही माझं.
-दिलीप बिरुटे
4 Mar 2015 - 10:16 pm | नांदेडीअन
वंडरशेअरच सगळ्यात चांगलं आहे.
काय प्रॉब्लेम येतोय ?
5 Mar 2015 - 7:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कनेक्ट होत नै ये.. सोडतय कनेक्ट होता होता.
-दिलीप बिरुटे
5 Mar 2015 - 12:08 pm | नांदेडीअन
USB Debugging ऑफ करा आणि मोबाईल रिस्टार्ट करा.
मोबाईल सुरू झाल्यावर USB Debugging परत ऑन करा आणि मग वंडरशेअरने कनेक्ट करून बघा.
5 Mar 2015 - 1:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विंडोज सात ला चालत नै असं वाटतंय. कारण मॅक असेल तरच सपोर्ट करतं असं एका प्रश्नाच्या उत्तरात गुगलवर कळलं.
तुमच्याकडे संगणकावर कोणती ओएस आहे ? मी वाय फायवरुन ट्राय करतो पण त्यालाही लै वेळ घेतंय.
-दिलीप बिरुटे
5 Mar 2015 - 2:34 pm | नांदेडीअन
मीसुद्धा विंडोज ७ च वापरतो.
मी सांगितलेले करून पाहिले का तुम्ही ?
5 Mar 2015 - 2:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्याकडे असलेलं जुनं व्हर्जन वापरत होतो त्यामुळे हा रोग आला होता. आता नवं व्हर्जन डाऊनलोडून टाकलं. लै फ्यासिलिट्या आहेत आत्ताच्या व्हर्जनमधे. हे व्हर्जन तितकं स्मुथ नाही पण आता जमलंय. थ्यांक्स. :)
अजून काही नवी खटपट.
-दिलीप्ल बिरुटे
5 Mar 2015 - 10:51 am | पिंपातला उंदीर
मोटो जी वर अॅन्ड्रॉइड लॉलिपॉप ५.०.२ OTA अपग्रेड घेतल्यापासून माझा पण फोन स्लो झाला आहे . बर्याच वेळा hang पण होतो आहे . kitkat अॅन्ड्रॉइडच बर होत अस वाटून राहिलंय राव
5 Mar 2015 - 12:14 pm | नांदेडीअन
developer options मधून Background Process Limit २ किंवा ३ सेट करून बघा.
असे केल्यानंतर काही प्रॉब्लेम येत असतील, उदा. काही ऍप अचानक क्लोज होणे, तर Background Process Limit परत Standard वर सेट करा.
गरज नसेल तर Animations सुद्धा बंद करून टाका सगळे.
5 Mar 2015 - 12:26 pm | कंजूस
काही अॅप उदाहरणार्थ रेल्वे ,बातम्या यांचेमधील माहिती त्यासंबधी असलेल्या अधिकृत वेबसाइटवरूनच आणत असतील तर ती वेबपेजिज बुकमार्क करून ठेवली तर काम सोपे नाही का होणार?आपल्याला अमुक एक पेपरच्याच बातम्या अमुकेक विषयासाठी हव्या असतात त्यात खिचडी कशाला?ते पेजच बुकमार्क करून उघडायचे.
5 Mar 2015 - 1:40 pm | सुकामेवा
http://allaboutmotog.com/how-to-clear-cache-partition-on-moto-g-and-moto...
6 Mar 2015 - 6:28 am | देव मासा
चिन्ह येत न्हवते
6 Mar 2015 - 2:42 pm | कंजूस
अॅप नाहीये पण सोनीचा बजेट फोन MWC मध्ये जाहीर झाला ४जी रेडी परंतू मिडिआटेक quadcoreप्रसेसर आणि फक्त QHD 960X540pix
सोनी XPERIA e4G फोन स्पेसि
31 Mar 2015 - 9:37 pm | आयुर्हित
WhatsApp voice calling feature is now available to all users of the app's Android version. The app had begun rolling out this month to some users and they could pass it on to others by making a WhatsApp call during time-limited invite windows. However, the feature has been activated on Tuesday for several users who didn't receive invites.
To get this feature on your Android smartphone, all you need to do is download the latest version of WhatsApp from its website. The feature has appeared on WhatsApp version 2.12.5 in some smartphones, but most people will need the latest 2.12.19 version to get WhatsApp calling. The update has already started being pushed to Google Play as well, so just sit tight until it rolls out in your region or download the apk from the company site.
When the feature is activated on your smartphone, you will notice a new three-tab layout featuring Calls, Chats and Contacts. You can head to the Calls tab, tap the phone icon, and pick a contact to make your first WhatsApp call.
While the feature is available to Android users now, those on other platforms continue to wait. WhatsApp confirmed that the feature would be rolled out to iPhone users soon. There's no word yet about the feature when the feature will be available on other platforms. Until then, Android users with WhatsApp calls enabled won't be able to call WhatsApp users on other platforms. These people won't appear in the list of contacts that Android users can call. The long-awaited feature is finally available on one platform, and there's no more waiting for invite windows to open again.
NEWSWhatsApp Voice Calling Now Available to All Android Users, No Activation Required
1 Apr 2015 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुवाद करा की जरा. वाट्सप कॉलींगला जरा आवाज घुमल्यासारखा वाटतो.
आणि त्यावर बोलण्याचा अजून येईना बघा. :)
-दिलीप बिरुटे
1 Apr 2015 - 6:26 pm | बॅटमॅन
अजून प्रश्न विचारल्यास व्यनि करायचा सल्ला देतील की नाही बघा.
-टेक्नोहित.
1 Apr 2015 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बघु काय म्हणता ते. :) बाकी आता त्या वाट्सपच्या नवनव्या फिचर्सचा आता कंटाळा आला.
सदस्यांनी आत्तापर्यंत ग्रुप मधे किती मेसेजेस टाकले त्याची संख्या आता दिसते, काय उपयोग त्याचा.
वाट्सप धड बंद करता येईना आणि चालुही ठेवता येईना. वाजलं की पाहावंच लागतं. :(
-दिलीप बिरुटे
1 Apr 2015 - 9:42 pm | सुहास झेले
वायफाय किंवा ३जी नेटवर्क असेल तर ही कॉलिंगची सुविधा उत्तम आहे.... :) :)
7 May 2015 - 3:31 am | द-बाहुबली
वाजत नाही.
6 Apr 2015 - 8:44 am | अत्रुप्त आत्मा
@ -टेक्नोहित. >> =)))))
10 Apr 2015 - 2:56 pm | रुस्तम
=))
6 Apr 2015 - 12:59 pm | स्वधर्म
इंटर्नल स्टोरेज ५०३ एमबी, ४१ एमबी फ्री
फोन स्टोरेज २ जीबी ३०७ एमबी अॅव्हेलेबल
फोनमध्ये एसडी कार्ड नाही.
तरीही कोणतेच अॅप्लीकेशन डाउनलोड करता येत नाहीए. व्हाॅट्स अप अपग्रेड करता न अाल्यावर जुने व्हर्जन काढून टाकले, तरी स्पेस शिल्लक नाही अशी एरर येत अाहे. दुकानदाराने व्हायरस शिरला असेल असे सांगितले अाहे. हा व्हायरस मुळे अालेला प्राॅब्लेम असू शकेल काय? तसेच जर अॅंटी व्हायरस घ्यायचा झाला तर कोणता घ्यावा? एखादे अाॅनलाइन स्कॅनिंग करणारी साइट वगैरे अाहे काय?
धन्यवाद.
- स्वधर्म
6 Apr 2015 - 2:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटतं फोनची मेमरी (इंटरनल स्टो) कमी आहे त्यामुळे तुमच्या हातात फार काही शिल्लक नाही.
-दिलीप बिरुटे
6 Apr 2015 - 2:39 pm | स्वधर्म
धन्यवाद, पण फाॅर्मॅट मारणे, हा माझा लास्ट अाॅप्शन असेल. सगळे काॅंटॅक्ट्स, अकाउंट्स वगैेेरे जाणार ना? सिंक केले नाहीत बर्याच दिवसात, बराचसा डेटा फोनमध्येच अाहे.
- स्वधर्म
6 Apr 2015 - 2:39 pm | नांदेडीअन
व्हायरसमुळे हा प्रॉब्लेम आला असण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे ऍन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सेल्फ रेप्लिकेट करून जागा खाणारे व्हायरस अजून आले नाहीत.
तुमच्या फोनची इंटर्नल मेमरीच मुळात खूप कमी आहे.
हे ऍप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.diskusage
या ऍपद्वारे तुम्हाला कळेल नेमकी जागा कशाकशाने व्यापली आहे.
6 Apr 2015 - 4:18 pm | स्वधर्म
कॅशे क्लिअर केल्यावर, तुंम्ही सांगितलेले अॅप डाउनलोड करू शकलो. लागलीच डिस्क युसेज व व्हाॅटस अॅपही डाउनलोड केले. डिस्क युसेज अाता उपलब्ध मेमरी फक्त ४१ एमबी दाखवत अाहे. तुंम्ही म्हणता तसे माझ्या फोनचे इंटर्नल स्टोरेज कमी अाहे, पण फोन स्टोरेजमध्ये भरपूर जागा दाखवत अाहे - एकूण २ जीबी व उपलब्ध ३०० एमबी. मी ‘डिफाॅल्ट राइट डिस्क’ = फोन स्टोरेज असे सेट करूनही व्हाॅटस अॅप इंटर्नल स्टोरेजमध्येच डाउनलोड झाले अाहे. त्या सेटींगमध्ये ‘मूव्ह टू इंटर्नल स्टोरेज’ हा अाॅप्शन डिसेबल्ड दिसतो. समजा मी एसडी कार्ड घालून मेमरी वाढवली, तर ही अॅप्स तिकडे हलवता येतील काय?
अतिशय उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
6 Apr 2015 - 3:07 pm | के.पी.
@स्वधर्म, फॉरमेट करण्याआधी एक काम कराल का?
manage app मधे जाऊन जास्तीत जास्त apps च clear cache आणि clear data करणे , ते झाल्यावर मोबाइल रीस्टार्ट करुन मग एखादं app डाउनलोड होतय का ते बघा.
6 Apr 2015 - 3:58 pm | स्वधर्म
जमलं. माझी फ्री स्पेस ४१ एमबी वरून ७५ एमबी झाली. मग मी वरी ल डिस्क युसेज चे अॅप व व्हाॅटस अॅप ही डाउनलोड करू शकलो अाहे. जवळजवळ पंधरा दिवस अडकलो होतो राव. मोठीच मदत झाली. खासच धन्यवाद.
6 Apr 2015 - 8:37 pm | के.पी.
अरे व्वा!! :) मस्तच झाल तर.. आणखी एक लक्षात ठेवा कदाचित पुन्हा तुम्हाला असा प्रॉब्लम आलाच आणि हे वरची पद्धत लागू नाही पडली तर अश्यावेळी गूगल प्ले स्टोर चे अपडेट्स uninstall केले तरी चालतं.
बादवे मी सर नाही.... मला ताई म्हटल तरी चालेल ;)
10 Apr 2015 - 2:41 pm | स्वधर्म
लक्षात राहील. तुंम्ही दिलेल्या टीप्सबद्दल धन्यवाद.
7 Apr 2015 - 8:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्ले स्टोअरवरुन बाकी अॅप्लीकेशन अपडेट झाल्यावर पुन्हा म्हणु नका की इनसफिशियंट स्पेसचा मेसेज येतोय म्हणुन. :)
हा तात्पुरता विलाज झाला.
-दिलीप बिरुटे
6 Apr 2015 - 3:56 pm | ग्रेटथिंकर
मिपाचे फ्रंट पेज ओपन करताना 200 kb खर्च होत आहेत.डेटा यूज कमी व्हावा यासाठी कोणती सेटिंग बदलावीत?
8 Apr 2015 - 4:47 pm | अद्द्या
माझा झोलो (XOLO A500s)फोन रूट करायचा आहे .
गुगल वर शोधून बर्याच लोकांनी "फ्रामारूट" इंस्टाल .
लिंक मध्ये सांगितल्या प्रमाणे सगळं केलं . पण घंटा फरक पडला नाय .
कोणी मदत करेल का
9 Apr 2015 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किंग युजर किंवा व्ही रुट हे संगणकावर टाकले जाणारे अॅप्लीकेशन टाका.
डबींग मोड मोबाईल ऑन करुन ठेवा. बाकी प्रोसेस होऊन तो अॅटो रुट होतो.
व्ही रुटचा वर धाग्यात दुवा दिला आहे.
-दिलीप बिरुटे
9 Apr 2015 - 12:10 pm | अद्द्या
फोन चा USB पोर्ट गंडलाय माझा . फक्त चार्ज करतो तो .
फोन वरच इंस्टाल करून रूट करण्यासाठी एखाद APP नाहीये का ?
9 Apr 2015 - 3:13 pm | ग्रेटथिंकर
मला माझ्या फोनसाठी Lolipop upgrade मीळत आहे.3G नेटवर्क वापरावे कि वाय् फाय् ने अपग्रेड करावे.?सर्विस सेंटरला वॉरंटी पिरीयडमध्ये फ्री अपग्रेड करुन देतात का?
10 Apr 2015 - 1:12 am | सुहास झेले
वायफाय असेल तर चांगले ... सर्विस सेंटरवाले करून देणार नाही मोस्टली
10 Apr 2015 - 2:43 pm | ग्रेटथिंकर
थॅन्क्स
9 Apr 2015 - 3:13 pm | ग्रेटथिंकर
मला माझ्या फोनसाठी Lolipop upgrade मीळत आहे.3G नेटवर्क वापरावे कि वाय् फाय् ने अपग्रेड करावे.?सर्विस सेंटरला वॉरंटी पिरीयडमध्ये फ्री अपग्रेड करुन देतात का?
19 Apr 2015 - 5:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थीम बदलणे, लुक बदलणे असं काही नवीन.
-दिलीप बिरुटे
19 Apr 2015 - 7:44 pm | आनंदी गोपाळ
20 Apr 2015 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इनबिल्ट नै करता येणार का ??? लोंचर पेक्षा इनबिल्ट काही प्रयोग करता आले तर बर असं वाटलं होतं ?
-दिलीप बिरुटे
22 Apr 2015 - 8:36 pm | आनंदी गोपाळ
मग कस्टम रॉम लिहावी लागेल गुरुजी. एके काळी वेळ भरपूर होता, तेव्हा लिहिलीही असती. आजकाल तितका वेळ नाही मिळत..
23 Apr 2015 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नोकियाचे फ़र्म्वेअर लै बद्लायचो सिम्बियनला बद्लायचो मजा यायची. एंड्राइडच्या रोमला काहीच खटपट करता येत नै ये...
किंवा आहे ते रोम काढून पिसिवर सेव करून काही बदल करून इंस्टाल तरी करता आलं पाहिजे होतं. एम्केटुल्स मधे मला काहीच समजत नै आणि काही प्रयोगही करता येईना ??
सर फुरसत में मुझे जरुर बताना....तुम्ही तयार केलेली थीम आवडली आणि असा खटपटया माणूस मला आवडतो. :)
-दिलीप बिरुटे
24 Apr 2015 - 5:44 pm | टीपीके
तुम्ही डॉक्टर कि इंजिनियर? ह घ्या.
हे कसे करतात?
24 Apr 2015 - 7:59 pm | सुबोध खरे
गोपाळराव
मी हाच प्रश्न विचारणार होतो आणि थीम पाठवा असे सांगण्याचा मोह सुद्धा झाला पण त्यात काही वापरता आलं नाही आणि फोन बंद झाला तर लफडं होईल म्हणून विचार बदलला. पण थीम लैच भारी आहे.
20 Apr 2015 - 9:13 pm | श्री
ही मराठी थिम कशी काय करतात हो?
21 Apr 2015 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा
+++१११
लिंक द्या की तिची! दू...दू...दू.. :-/
22 Apr 2015 - 8:41 pm | आनंदी गोपाळ
आत्माराव, ही माझ्यासाठी मीच तयार केलेली कस्टम लाँचर थीम आहे. जालावर उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे लिंक नाही.
22 Apr 2015 - 9:17 pm | श्री
मग प्लिझ ह्याची झीप फाईल देऊ शकाल का? थीम खुप आवडलीये
23 Apr 2015 - 9:04 pm | किसन शिंदे
मस्त आहे थिम, जमल्यास मलाही पाठवा झिप फाईल.
24 Apr 2015 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा
आं............. मग मलाहि पायजेल! :-/
24 Apr 2015 - 7:52 pm | श्री
पण मी पयला हय..
23 Apr 2015 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झिप फ़ाइल मलाही द्या. बदल्यात एक सुला वाईन देईन. :)
-दिलीप बिरुटे