हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा ही कविता बरी की ती कविता बरी हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे.
अनुवाद झाल जरी तरी तो कॉपी कॅट नसावा. मराठीतला शब्दभांडार उघडून आपल्याला हवे तेव्हडे शब्द वापरायला-जसं माळावर बोंब मारायला पाटलाची परवानगी नको-तसं कहिसं इथे पण असावं नाही काय?
म्हणूनच म्हणतो,
प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
जा तुही करीत निर्मिती
मात्र
करू नको दुसऱ्याची कॉपी
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
29 Jun 2008 - 2:24 pm | अरुण मनोहर
>>नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
निसर्गात जे वैविध्य आहे तसेच माणसाच्या कलेत असणार हे ओघानेच आले. निसर्गाच्या सगळ्या निर्मीतींचे आपण तोंड भरभरून कौतूक करतो. मात्र मानवी निर्मीतीला स्पर्धेच्या टोचण्या लावून प्रतीसादांच्या तराजूत तोलतो.
नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
29 Jun 2008 - 11:10 pm | श्रीकृष्ण सामंत
"मात्र मानवी निर्मीतीला स्पर्धेच्या टोचण्या लावून प्रतीसादांच्या तराजूत तोलतो."
अरूण मनोहरजी,अगदी माझ्या मनातलं सांगितलंत.
आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
29 Jun 2008 - 11:40 pm | पक्या
छान आहे कविता...आवडली.
30 Jun 2008 - 12:07 am | श्रीकृष्ण सामंत
आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com