दारू फुकट झालीच पाहिजे...

अस्वस्थामा's picture
अस्वस्थामा in जे न देखे रवी...
10 Nov 2012 - 3:38 am

दारूच्या या गुत्त्यावरचा,
गुंता काही सुटत नाही..
किती उधारी दिली तरी ही,
हिशेब काही मिटत नाही..

चकन्यामधले शेंगदाणे,
मी बारीक्क नजरेनं मोजतो आहे,
रोज एक्केक दाणा कसा,
कमी कमी भरतो आहे..

एक दिवस एकच शेंग,
पाहून आमचा सरकला..
'म्हागाई माजली न् भौ',
संप्या वेटर चिरकला ..

आधीच साला बायको आमची,
पगार आमचा करीत नाई..
शेट्टी उधारी ठेवीत नाई,
अन् आता संप्या चकनापण देत नाई..

डोक्याला हात लावून,
बाटलीकडं बघत बघत..
टेबलावर उभा राहून बोलला बाब्या मोडक..
'सरकारनं आता तरी,
गरिबांकडं पाह्यल पायजे..
बीपीयल(BPL) जनतेला, दारू फुकट झालीच पायजे..
बीपीयल(BPL) जनतेला, दारू फुकट झालीच पायजे..'

हास्यमौजमजा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

10 Nov 2012 - 3:31 pm | स्पंदना

येकदम मनातल बोलला भावा...कुठल्या गुत्त्यावरच म्हणायच तुमी?

अस्वस्थामा's picture

17 Nov 2012 - 2:48 am | अस्वस्थामा

'भावा' हाक ऐकून लय बर वाटलं .. तसा या गुत्त्यावर नवाच आहे बगा.. ;)

(नावावरून भौ की तै ते काय कळत नै नायतर बसुयात कधीतरी म्हणालो असतो .. :D )

इष्टुर फाकडा's picture

10 Nov 2012 - 4:58 pm | इष्टुर फाकडा

आवडली :)

उत्तम चोरगे's picture

10 Nov 2012 - 5:42 pm | उत्तम चोरगे

आवडली

शर्वरी नेने's picture

12 Nov 2012 - 9:02 pm | शर्वरी नेने

हीच कविता जर एक ग्लास दुधावर असती (आणि दुध फुकट झालंच पाहिजे असं शीर्षक असतं तर.)
कवितेला वाईट म्हणायचा हेतू नाही, मला आवडली ही कविता.
फक्त मनात विचार आला असं असता तर.

अस्वस्थामा's picture

17 Nov 2012 - 2:53 am | अस्वस्थामा

शर्वरी बै दूध फुकट असून तरी काय होणार.. गविंची ही कमेंट वाचलीत काय ?

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Nov 2012 - 9:15 am | श्री गावसेना प्रमुख

दारु फुकट होवो नको होवो, चखना माझ्याकडुन(फुकटात)

अभ्या..'s picture

13 Nov 2012 - 9:14 pm | अभ्या..

काय नाय हो हे कॉम्प्लिमेंटरी मिळण्याचे पर्णाम हैत.
दारू फुकट मिळाली तर चकण्याबरोबरच फ्री घ्यावी लागेल. ती सुध्दा ब्रांडेड चकण्याबरोबर.
आय्बीआरेसआर्सीओएम्बीपी आसल्या नावाने शेंगाच्या पुड्या मिळतील दिड्शे दोनशे रुपयाला.
मग चालेल का?

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Nov 2012 - 9:41 am | श्री गावसेना प्रमुख

पिणार्याला दिडशे काय अन दोनशे काय तो घेईलच.

हिटलर's picture

16 Nov 2012 - 1:35 pm | हिटलर

चकन्यामधले शेंगदाणे,
मी बारीक्क नजरेनं मोजतो आहे,
रोज एक्केक दाणा कसा,
कमी कमी भरतो आहे..

बॅटमॅन's picture

16 Nov 2012 - 2:03 pm | बॅटमॅन

एक्कच नंबर!!

(तरीबी दारू महांग झालीच पाहिजे!!)

अस्वस्थामा's picture

17 Nov 2012 - 3:02 am | अस्वस्थामा

अशे कशे ब्याटम्यानराव.. जगात अलिखित नियम आहे की दारू ( आणि मजेच्या गोष्टी जसे की धूम्रकांडी वगैरे ) तेवढीच महाग असावी की लोकांनी विकत तर घ्यावी पण उतमात करू नये..
बाकी सरकार समर्थ..

आमी आपले गंगा वाहात होती दारूबद्दल, म्हणून हात धुवून घेतले.. D

(सोत्रींच्या कॉकटेल मालिकेचा फ्यान..)

आनंदी गोपाळ's picture

17 Nov 2012 - 8:24 pm | आनंदी गोपाळ

तुमच्या मागणीला तथास्तु ;)
तुमच्याआमच्यासाठी महागच होईल हो. तिथं बीपिएल-वाल्यांसाठी फुकट झालीच पायजे असं आहे.