' एप्रिल फुल ?? '

जेनी...'s picture
जेनी... in जनातलं, मनातलं
1 Nov 2012 - 10:46 am

मित्रांच्या भयानक मस्करीला बळी ठरलो होतो.

संध्याकाळच्या बरोब्बर पाचच्या दरम्यान टाईम स्क्वेअरच्या पायर्‍यांवर जाऊन आजूबाजूची मस्ती बघत विसावलो होतो . एप्रिल महिन्याची पहिलीच तारीख. अनायसे आलेला शनिवार. शनिवारि आम्हा भारतीयांचा छोटासा मेळावा ज्याला सोप्प्या इंग्रजीत गेट टुगेदर म्हटल जातं. शनिवार खास असायचा आमच्यासाठी .बीअर चे टिन घेऊन संध्याकाळच्या वेळी न्युयॉर्क शहरातल्या भन्नाट गर्दीत ,आजुबाजुच्या झगमगाटात ,त्याच गर्दीचा एक भाग बनायचो आम्ही.मजा यायची .मस्त ग्रुप होता .

सहा वाजत आले, पण कुणाचाच पत्ता नाही. फोनही उचलेनात कुणी. एक सोडला, दुसरा सोडला, 'अरे यार कुणीतरी रीप्लाय करा ! ..साले भांग पिवून पडलेत का? ' असा जोरदार प्रश्न मीच माझ्या मोबाईलला विचारला ,आणि डोक्यात सणक यावी तशी " ओह्ह शिट् ! फस्ट एप्रिल ,एप्रिल फुल?" जबरा कळ येऊन गेली .
मग काय ! झालेला जबरदस्त पोपट ,त्यावर तिथे तरी निदान मीच हसत होतो. स्वत:शीच हसत तिथेच त्या लाल
रंगांच्या पायर्‍यांवर बसून राहिलो. उंचच्या उंच इमारतींकडे बघत. परत जायचच नव्हतं इतक्यात.
रंगीबिरंगी लाईट्स, जबरदस्त माहोल, सुट्टीचा दिवस त्यामुळे कपल्सचा गोंडस क्राउड, माझं लक्ष गोर्‍यांच्या देखण्या ललनांवरुन हळूहळू घसरत जात होतं. 'ओझरता कटाक्ष' काय भारी शब्द असतात ना मराठीत. मस्त वाटलं !.
निदान तेवढ्यावेळापुरतं तरी.

त्याच गर्दीत एका चेहेर्‍याने माझी नजर अलगद खेचून घेतली. गळ्यात कॅनॉनचा डिएसेलार घेऊन लूकलूकत्या डोळ्यानी
आजूबाजूच्या गर्दीचा, त्यातल्या वेगळेपणाचा वेध घेणारा चेहेरा. गोर्‍या असंख्य चेहेर्‍यात एक गहूवर्णीय तजेलदार चेहेरा.
तिचे पाठीवर रुळणारे कुरळे केस, चेहेर्‍यावर येणार्‍या एखाद्या पेनातल्या स्प्रिंग सारख्या लटा, त्यात तिचं स्वतःशीच स्व:तावर खुश होत हसणं ,लाजणं .. कुणीतरि एकदम २४औन्झ चा मॉन्स्टर एनर्जी ड्रींकचा टीन अख्खा घशात रिकामा करावा असली भन्नाट एनर्जी नसानसात शिरली. बराच वेळ तिची हालचाल पहात होतो मी. मरुन कलरचा लाँग कुर्ता ,त्यावर ब्लॅक कलरची जीन्स ,गळ्यात ग्रे-मरुन कॉम्बिनेशनच्या साधारण मोठ्या बीट्सची लांबलचक माळ, त्याच बीट्सचे ईअरिन्ग्स. एकंदरित हिरवळीत उठून दिसणार्‍या निशिगंधेसारखी वाटली मला ती त्याक्षणी .

आधी जाऊन डायरेक्ट बोलावं तिच्याशी असं वाटलं, कशी रिअ‍ॅक्ट होइल? पण बोलायला काय हरकत आहे? असा विचार करुन मी तिच्यापासून पाच दहा पावलांच्या अंतरावर गेलो. तिने एका उंच इमारतीचा व्ह्यू घेतला होता कॅमेर्‍यात. म्हटलं.. तिला क्लिक करायला आणि 'क्लिक ' व्हायला जरा वेळ देऊ .

तिथे अनोळखींशी बिन्धास्त बोलायची सवय लागली होती, त्यामुळे हिच्याशी बोलायला जायचं कसलच दडपण येत नव्हतं. मी थोडा तिचा अंदाज घेत होतो ,इतक्यात ..." हाय .हँडसम" अशी तिचीच हाक आली ,आणि मी चाट.
ती लांबुन जेवढी निरागस, सोज्वळ ,मोहक वाटली त्यापेक्षा कितीतरी पटीने बिन्धास्त, चंचल, सुंदर वाटली.
बोलता बोलताच कळलं दोघही भारतातून, एकाच शहरातून आहोत, दोघहि मराठीच आहोत. दोघंहि नोकरीनिमित्त न्युयॉर्क सारख्या रोमँटिक शहरात तात्पुरत्या वास्तव्याला आहोत .

तिच्याशी पहिल्यांदा बोलत होतो मी, पण जुनी ओळख असल्यासारखं. तिच्या आवडीच्या गप्पा मारत होती ती ,पण खुप जवळच्या मित्राशी मारल्यासारख्या .बोलता बोलता डोळ्यावर येणारे कुरळे केस मोठ्या शिताफीने बाजुला सारायची .
डोळ्यात मिश्किल हसणं , शब्द उच्चारताना होणारी ओठांची गडबड, हातांच्या नाजुक बोटांशी त्यांच्या त्यांच्यातच चालणारी मस्ती . सारंच एकदम धुंद पावसात भिजताना येणारा अनुभव .आणि तो अनुभव म्हणजे ती .

त्यानंतर ती मला पुन्हा त्यानंतरच्या शनिवारी पुन्हा एकदा भेटली. वेगळ्या रंगांचे बीट्स चे नेकलेस आणि ईअरिंग्स,
तिच्या पेहेराव्याला उठावदार बनवायचे. मी आजच्या दिवशी तर मित्राना सरळसरळ टांग देऊन आलो होतो. भेटायचा प्लान अक्षरशः वेळ नाही हे कारण देऊन टाळलं, आणि जिच्याशी भेटायचं न ठरवून सुद्धा तिला भेटायला तिथेच आलो होतो. अजब गजबच चाललल होतं सारं. आम्ही बरंच फिरलो. ब्रॉडवे वर इतकी सुंदर सोबत, अन हवाहवासा वाटणारा सहवास बरोबर घेऊन चालण्याची मजाच और. तिला घरी जायची घाई नसायची, कि पटापट चालण्याची घाई नसायची. कॅमेरा मात्र सोबत असायचा .विचारलही तसं कि "हा नेहेमीच सोबत घेऊन फिरतेस का?" त्यावर "कधी कुठला क्षण माणसाच्या आयुष्यात अचानक येईल हे जसं त्याला माहित नसतं ,आणि माणुस तोच शोधत फिरत असतो, तसच काहिसं माझ्या कॅमेर्‍याचंही आहे " असं म्हणाली होती.

शनिवार टू शनिवार न ठरवता भेटायचो .कुठल्याच शनिवारी जाताना भेटू परत असं न म्हणणारी ती, नेमक्यावेळी, नेमक्या शनिवारच्या संध्याकाळी टाईम स्क्वेअरच्या त्याच पायरीवर बसलेली दिसायची ,ज्या पायरीवर ती मला आधीच्या शनिवारी भेटलेली असायची.

असंच एकदा तिथल्या गर्दीतुन चालता चालता तिने हात पकडला. पण तो केवळ त्या गर्दीत चुकामूक होऊ नये म्हणून.
एकदा आइस्क्रिम खाताना "हा फ्लेवर ट्राय कर" म्हणत उष्टं आइस्क्रिम बिन्धास्त माझ्या तोंडाला लावलं, कदाचित माझ्याजवळ तिचा मोकळेपणा जास्त सुरक्षित असल्याची तिला खात्री होती. निघताना नकळत तिच्या ओठातुन बाहेर
पडलेलं "मिस्स यु " माझ्या कानानी " नक्की हेच म्हणाली का ? " केलेला प्रश्न, सगळंच दुपारच्या उन्हात कुणीतरी थंड सावली द्यावी इतकं शीतल ,म्रुदु आणि सवयीचं होउन बसलं .

मी आठवडाभर शनिवारची वेड्यासारखी वाट बघु लागलो .मित्रांना न भेटण्याची कारणे आणि तिला भेटल्यावर बोलण्याचे बहाणे शोधू लागलो. ती फक्त मलाच भेटायला तिथे येते अशी समजुत करुन घेतली. तो अनुभव अगदी धडधडत्या हृदयात साठवण्यासारखा, तिच्याच विचारात तिला जपण्यासारखा होता. आयुष्यात, जर कुणी पहाट सुंदर आहे असं म्हटलं तर मला फक्त तिचा चेहेरा, तिचा कधीतरी चुकून होणारा स्पर्श, तिच्या ओठांवर उपजत असलेलं हसणं, एवढंच आठवतं .

एकदा रात्रीच्यावेळी आकाशातल्या उंच उडणार्‍या विमानाकडे बघत खूप हळवी झालेली पाहिली. "इकडे आल्यावर, इकडे राहिल्यावरच त्या विमानानं किती अंतर कापलय हे कळतं !". एका दमात संपवलेल्या तिच्या ह्या वाक्याचा गर्भित अर्थ कळलाच नव्हता तेव्हा, पण हळूहळू मला ती उलगडु लागली. माझ्या नजरेतुन मी तिच्या मनाचा ठाव घ्यायचो .
जितकं ओळखावं तितकी ओढ वाढायची. जितकं जवळ जावं तितकी जास्त तिची सोबत आवडायची.
बहुतेक माझ्या रात्रीच्या झोपेला छानसं स्वप्न मिळालं होतं .

नेहेमी हसताना, न थकता बडबड करताना पाहिलं तिला. माझी प्रत्येक शनिवारची संध्याकाळ तिने स्वतःच्या सहवासाने सजवली. वाट पहाताना, चिडताना, चिडवताना, खळखळुन हसताना, आठवणी जपताना, मनातलं सांडताना. मी पाहिलंय तिला स्वत:च स्वतःच्या विश्वात जगताना.

असच फिरत असताना एकदा पावसाची चाहुल लागली होती . नको म्हणत असतानाहि तिचं भिजणं . तिच्या गालावरुन निथळणार्‍या प्रत्येक थेंबाचा हेवा वाटला होता तेव्हा .चांदण्या रात्रीत तिला एकदा बिलगणार्‍या थंडीला
मिठित घेताना पाहिलं .दोन्हि हातानी स्वतहालाच घट्ट मिठित घेऊन बसली होती ." अश्यावेळी आपण नेमके किती
अपूर्ण आहोत ,ह्याची जाणिव होते " तिच्या तोंडुन निघालेलं हे वाक्य ,कदाचित मी कधीच विसरु शकणार नाहि .

आम्हाला भेटून जवळजवळ वर्ष होत आलं होतं. "आपल्यला भेटून वर्ष होइल पुढच्या महिन्यात, वर्ष कसं गेलं कळलंही नाही". त्यावर हसून म्हणाली "काही क्षण अनमोल असतात, जपायचं असतं पापण्यात, त्यांच्या आठवणीनीही, डोळ्यात दु:खाचे अश्रू असले तरीही ओठांवर हसु फुलावं, इतकं बळ मिळवून द्यायचं त्या क्षणाना".
कधी कधी खूप खोलवर नजर लावून असंच काहीतरी खोल खोल बोलायची. मी क्षणभर विचारात पडायचो, पण मग लगेच तिच्या पापण्यांची उघडझाप पहाण्यात दंग होउन जायचो .

ह्या शनिवारी मी तिच्यासाठी दवात भिजलेल्या, अर्धवट उमललेल्या गुलाबांचा गुच्छ घेऊन गेलो. नेहेमी ठरलेल्या पायरीवर आज ती दिसली नाही. म्हटलं भेटल्यापासून पहिलाच शनिवार असेल हा तिच्या उशिरा येण्याचा. मग तिथे वाट पाहिली, अगदि बराच वेळ. ह्या वर्षभरात आम्हाला एकमेकांच्या नावाव्यतिरिक्त आणखी काहीही माहिती नव्हती. मी कधीच तिचा फोन नंबर मागितला नाही कि तिचा पत्ता विचारला नाही. तिच्या कलाने, तिला वाटेल तेव्हा स्वतःहून देइल असाच विचार केला. एप्रिल महिन्यात अगदी एप्रिल फूलच्या दिवशी झालेली आमची भेट. त्यानंतर न ठरवता, नियतीने ठरवल्यासारख्या होणार्‍या आमच्या भेटी, तिचं मुक्त मोकळं बोलणं, जगण्याच्या उमेदीपासून ते कोमेजलेल्या कळीच्या भावनांपर्यंत चघळलेले विषय, तिचा तोल जाताना मी दिलेला हात, तिनं सहज खांद्यावर ठेवलेला हात, विचारात मग्न असली की गळ्यातल्या मोठ्या बीट्सच्या माळेचे मणी दाताखाली घ्यायची सवय, बोलताना अगदी डोळ्यात डोळे घालून पापण्याही न पडू देता आपलं म्हणणं समोरच्याच्या पार काळजात घुसवण्याचा अट्टाहास हे सगळच इतकं मस्त होतं कि ती समोर नसली तरीही मी फक्त तिच्या विचारातुन तिच्या जवळ पोहोचू लागलो होतो .

पण ,त्या शनिवारी मात्र ती आलीच नाही. मी खूप वाट पाहिली. खूप खूप. एखादं सुंदर स्वप्न मोडून जावं आणि झोपेतून जागं होण्याचा पश्चाताप व्हावा असं वाटून मी शेवटी उठलो. मी नऊ वाजेपर्यंत वाट पाहिली. अख्ख्या ब्रॉडवे वर कितीतरी दिवसांनी मी आज एकटा चाललो, एकटाच. मनात नको नको ते विचार येऊन गेले .शेवटी म्हटलं. काहितरी अडचण असेल. पूढच्या शनिवारी नक्की येईल ती.

मी दर शनिवारी ,मीच माझ्या ठरवलेल्या वेळी टाइम स्क्वेअरला हजर व्हायचो, पण ती यायची नाही. एक गेला, दुसरा गेला ..असे कित्येक गेले ,पण एकाही शनिवारी ती आली नाही. मी मात्र आजही प्रत्येक शनिवारी, जिथे ती माझी वाट बघत बसायची, त्या पायरीवर तिची वाट पाहून येतो. मला तिची सवय लागली होती. तिच्या असण्याची, तिच्या शब्दांची, कोड्यात बोलत, खोल अर्थ असणार्‍या वाक्यांशी खेळत, तिनेच समजवलेल्या ओळींना संदर्भ लावण्याची.

सहा महिने उलटून गेलेत, ह्या सहा महिन्यात, ती आता येणार नाही असं एकदाही वाटलं नाही. मी पुन्हा मित्रानां भेटू लागलोय. त्यांना भेटण्याचा बहाणा करुन, तीची वाट बघण्याचं कारण शोधू लागलोय. मी खूप बदललोय की मी बदललो होतो, आणि आता मी पुन्हा पूर्वीसारखाच जगतोय? .

हे अख्खं वर्ष माझ्यासाठी एक सुंदर स्वप्न होतं. मला एक सुंदर फूल मिळालं होतं. मी ते झाडावरंच जपलं, आता ते झाडावरुन गळून गेलंय, पण माझ्या आयुष्यात स्वत:चा गंध ठेवून. कधी कधी मात्र मनापासून वाटतं, एप्रिलच्या
फसव्या तारखेला भेटलेली ती एप्रिलच्याच महिन्यात अशी एकाकी लुप्त का झाली असावी? कि मी पुन्हा एकदा 'एप्रिल फुल?'

मांडणीविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

1 Nov 2012 - 11:19 am | स्पंदना

हं!

(हा वाचुन झाल्यावरचा एक अतिशय लांब नि:श्वास आहे)
कुठेच न पोहोचणारा, अन तरीही हवाहवासा नात्यांचा गुंता.

चिगो's picture

1 Nov 2012 - 12:21 pm | चिगो

व्वाहऽऽ.. सुंदर लिहीलंय. आवडलं..

ह भ प's picture

1 Nov 2012 - 12:30 pm | ह भ प

मनातल्या मनात 'ति'चं चित्र रेखाटायला लागलो होतो..

५० फक्त's picture

1 Nov 2012 - 12:37 pm | ५० फक्त

लई भारी लिहिलंय,

जेंव्हा तुम्हाला सगळा रस्ता मोकळा मिळतो आणि तुम्ही सुसाट जावु लागता, तेंव्हा एकदा विचार करा..
तुम्ही वनवे उलट्या बाजुनं घुसलेला नाहीत ना ?

अत्रुप्त आत्मा's picture

1 Nov 2012 - 1:07 pm | अत्रुप्त आत्मा

बालिका इज ग्रेट....! स्टेजवर येत रहा अशीच... :-)

ज्ञानराम's picture

1 Nov 2012 - 1:10 pm | ज्ञानराम

छानच लिहीलस ग...

वर्ष भरात फोन नम्बर नाहि का घेतला ?

आवो पर शिम्कार्ड बदल्लं अस्लं तर?

अभ्या..'s picture

1 Nov 2012 - 2:07 pm | अभ्या..

असं करतेस का?
छान छान एप्रिल फुल
कि मी पुन्हा एकदा 'एप्रिल फुल?'
भारीये ;)

माझीही शॅम्पेन's picture

1 Nov 2012 - 2:15 pm | माझीही शॅम्पेन

खूप छान - सविस्तर प्रतिक्रिया नंतर :)

चेतन माने's picture

1 Nov 2012 - 4:49 pm | चेतन माने

अमेरिकेतल्या शनीवारच वर्णन फारच मस्त वाटलं , खासकरून त्यांचं भेटणं
मस्तच :)

लीलाधर's picture

1 Nov 2012 - 9:33 pm | लीलाधर

येउदेत अजून :)

लीलाधर's picture

1 Nov 2012 - 9:34 pm | लीलाधर

येउदेत अजून :)

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2012 - 9:45 pm | टवाळ कार्टा

;)

पैसा's picture

1 Nov 2012 - 9:57 pm | पैसा

अधुरी कथा आवडली.

सोत्रि's picture

1 Nov 2012 - 10:00 pm | सोत्रि

फ्रेश झालो हे वाचून!

- (कधीही 'एप्रिल फूल' न झालेला) सोकाजी

पिवळा डांबिस's picture

2 Nov 2012 - 12:02 am | पिवळा डांबिस

"भातुकलीच्या खेळामधली, राजा आणिक राणी"
ह्याचं गद्यकरण आवडलं....

पण तपशीलात काही चुका आहेत, शक्य असेल तर दुरुस्त करून घ्याव्यात.
१. तो 'टाइम' स्क्वेअर नाहिये, तो 'टाइम्स' स्क्वेअर आहे. कारण द न्यूयॉर्क टाईम्स या जगप्रसिद्ध वर्तमानपत्राचं हेडक्वार्टस तिथे आहे (१ टाईम्स स्क्वेअर, मॅनहॅटन, न्यूयॉर्क सिटी, न्यूयॉर्क)
२. "टाईम स्क्वेअरच्या पायर्‍यांवर जाऊन"
टाईम्स स्क्वेअरला पायर्‍या? कुठायत?
मला तरी माहिती नाहीत, कुणी बिग अ‍ॅपलवाला मिपाकर इथे फोटो टाकेल काय?
३. "बीअर चे टिन घेऊन संध्याकाळच्या वेळी"
न्यूयॉर्क शहरात (विशेषतः मॅनहॅटनमध्ये) पब्लिक प्लेसमध्ये, उघड्यावर अल्कोहॉलिक ड्रिंक्स प्यायला कायद्याने बंदी आहे. पोलिस दंड करतात. (हां, बारमध्ये आत बसून पिऊ शकता, पण उघड्यावर नाही!)
४. "मरुन कलरचा लाँग कुर्ता ,त्यावर ब्लॅक कलरची जीन्स "
नुसता लॉन्ग कुर्ता? न्यूयॉर्कमध्ये एप्रिल महिन्यात?
एप्रिल महिन्यात त्या शहराचं तपमान सरासरी १० ते १५ डिग्री सेल्सियस असतं!!!!
तुमची कन्या कुडकुडून जाईल ना!!!!
५. "इतक्यात ..." हाय .हँडसम" अशी तिचीच हाक आली"
एक मराठी मुलगी? आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या अनोळखी मुलाला स्वतःहून आणि तेही पहिलंच वाक्यं 'हाय..हँडसम!' असं म्हणाली?
अनबिलिव्हेबल!!!!
कारण ती मुलगी एफोबी असेल तर हे असंभव वाटतं! आणि जर एबीसीडी असेल तर हे शब्द वापरील हे काहिसं कठीण वाटतं...
अर्थात, ह्या मुद्द्याबद्दल चूभूद्याघ्या...
कारण हल्लीच्या मराठी मुली काय म्हणतात याचा आमचा अभ्यास नाही!!! :)

मुंबई आणि न्यूयॉर्क दोन्हींचा महाअभिमानी,
पिडांकाका

लॉरी टांगटूंगकर's picture

2 Nov 2012 - 12:08 am | लॉरी टांगटूंगकर

काका की जय हो!!!

बॅटमॅन's picture

2 Nov 2012 - 12:10 am | बॅटमॅन

एफोबी म्हंजे हो काय? एबीशीडी माहितेय ;)

जेनी...'s picture

2 Nov 2012 - 12:16 am | जेनी...

=))

पिवळा डांबिस's picture

2 Nov 2012 - 12:36 am | पिवळा डांबिस

पूजाबाई, सर्वप्रथम आमची सडेतोड प्रतिक्रिया स्पोर्टिंगली घेतल्याबद्दल धन्यवाद!
त्याचं काय आहे ना, की आजकाल मिपावर कुणाचा चंडोल कशामुळे बुडेल हे सांगता येणं कठीण झालंय!!!
:)

आणि इथे आणि माझ्या खवमध्ये विचारणा झाली म्हणून....
एफोबी आणि एबीसीडी ही अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या भारतीय पहिल्या आणि दुसर्‍या पिढीतल्या वंदनीय लोकांनी एकमेकांना दिलेली विशेषणं आहेत....
एबीसीडी = अमेरिकन बॉर्न कन्फ्यूझ्ड देसीज (दुसरी अनिवासी पिढी)
एफोबी = फ्रेश ऑफ द बोट (पहिली अनिवासी पिढी)
गो!! एन्जॉय!!!!
:)

||पिडां म्हणे आता, उरलो ज्ञानवृद्धीपुरता ||

बॅटमॅन's picture

2 Nov 2012 - 11:25 am | बॅटमॅन

एफोबीबद्दल धन्यवाद :) बाकी एबीसीडीचा वेग्गळाच लाँगफॉर्म माहिती होता ;)

शैलेन्द्र's picture

2 Nov 2012 - 3:28 pm | शैलेन्द्र

तेच.. आम्हालाही अग्गोबाईवालाच महित होता

काका अग्गोबाई म्हणजे अग्गोबाई ढग्गोबाई का हो ?

ह्यात फक्त टाइम्स स्क्वेअर लिहिताना झालेलीच चुक कबूल करते .
बाकिच्या पास . :)

पिवळा डांबिस's picture

2 Nov 2012 - 12:56 am | पिवळा डांबिस

जशी तुमची इच्छा!
:)

खुलासा: तुम्हाला चुका कबूल करायला लावाव्यात या उद्देशाने वरील प्रतिक्रिया मी लिहीलेली नव्हती. तुम्हाला ते तपशील दुरुस्त करून घेता यावेत यासाठी लिहिलं होतं. बर्‍याचदा कथा फुलवतांना लिहिण्याच्या भरात तपशीलाकडे कधीकधी दुर्लक्ष होऊ शकतं. आम्ही तर एकदा श्रीमान योगी हे रणजीत देसाईंच्या ऐवजी शिवाजी सावंतांना बहाल केलं होतं! :)
अशाच एका मिपाकराने सावध केल्यानंतर आम्ही ती चूक सुधारली....
तुमचं लिखाण चांगलं आहे म्हणून इतकी टंकनप्रक्रिया करण्याचा खटाटोप केला. बाकी काही नाही.
तेंव्हा राग नसावा...

जेनी...'s picture

2 Nov 2012 - 1:04 am | जेनी...

नाहि ओ काका . राग कसला??
उलट तुम्ही मन लाऊन वाचलत हे तुमच्या प्रतिक्रियेवरुन लक्षात आलं :)
इतका खोलवर विचार मी कधी तिथे फिरतानाहि केला नव्हता ;)
पण काहि डीटेल्स न दिलेल्या चांगल्या असतात , तर काहि मुद्दाम गुलदस्त्यात
ठेवाव्या लागतात . मी शक्य तेवढ्या दिल्या . बाकिच्या गुलदस्ता जिंदाबाद ;)
पण तुमच्या आधिच्या लांबलचक प्रतिक्रियेतल्या पहिल्या दोन ओळीतच मला
जे लिहायचं होतं , जे वाचकांपर्यंत पोचवायचं होतं , नेमकं ते तुम्ही हेरलत :)
बस्स इतकच !

इरसाल's picture

2 Nov 2012 - 9:14 am | इरसाल

त्यांनी वेळोवेळी प्रतिसादात (इकडे-तिकडे) लिहीलेय ना की त्या पहिल्यांदा त्यांच्या बहिणीकडे अम्रिकेत आल्यात म्हणुन मग तुम्ही ती पहिलेपणाची पालवी का बरे कोमेजुन टाकत आहात.
लेखिकिने भावनेच्या भरात थोडे कुशन घेतले असेल.

जेनी...'s picture

2 Nov 2012 - 9:24 am | जेनी...

कै च्या कैच ...!!

अहो इरसाल काका ,तुमचा (इकडचं ,तिकडचं वाचुन कैतरी (गैर)समज झालेला दिसतोय . :)

इरसाल's picture

2 Nov 2012 - 2:36 pm | इरसाल

आपल्यापेक्षा वयाने,मानाने मोठ्या लोकांना असे बोलु नये बाळ.

बाळ तु आहना हे नाव लंडनच्या विमानतळावर ऐकले होतेस ना इकडे येताना म्हणुन इकडे-तिकडे लिहीले होते बरं. असु दे असु दे.
तुकारामांनी की रामदासांनी म्हटले आहेच की...........

सुनील's picture

2 Nov 2012 - 1:03 am | सुनील

नुसता लॉन्ग कुर्ता? न्यूयॉर्कमध्ये एप्रिल महिन्यात?

सोडा ना राव! कुर्त्याच्या आत थर्मल असेल! तुम्हाला भारीच शंका बॉ ;)

मरुन कलरचा लाँग कुर्ता ,त्यावर ब्लॅक कलरची जीन्स

वर की खाली? की मुलगी भर टाईम्स स्क्वेयरमध्ये शीर्षासन करीत होती?
न्यूयॉर्क शहरात (विशेषतः मॅनहॅटनमध्ये) पब्लिक प्लेसमध्ये, उघड्यावर शीर्षासन करायला बंदी नसावी! ;)

अनबिलिव्हेबल!!!!
कारण ती मुलगी एफोबी असेल तर हे असंभव वाटतं! आणि जर एबीसीडी असेल तर हे शब्द वापरील हे काहिसं कठीण वाटतं...

मुलगी एफोबी असेल तर कदाचित हँडसम म्हणेलही पण एबीसीडी असेल तर मात्र, (म्हणायचच असेल तर) हॅनसम म्हणेल (हँडसम नव्हे), असे वाटते! ;)

संबंधितांनी ह घ्यावे, असे मीपावर सांगण्याची गरज नसावी!!!

गणपा's picture

2 Nov 2012 - 2:16 pm | गणपा

पोष्टमार्टेम !
=))

असो कथा म्हणून आवडली. :)

प्रभो's picture

2 Nov 2012 - 2:23 pm | प्रभो

काकाश्री,

हा घ्या फटू..
NY

*फोटो मधे मी नसून माझा मित्र आहे. ;)

जेनी...'s picture

2 Nov 2012 - 7:16 pm | जेनी...

@प्रभो ,

;) ......:P

तिमा's picture

3 Nov 2012 - 1:43 pm | तिमा

एबीसीडी चे आता एक स्पेशल वर्जन, 'एबीसीडीइएफजी' झालेले पण कानावर आले.
अमेरिकन बॉर्न कन्फ्यूज्ड देसी एमीग्रेटेड फ्रॉम गुजरात

या शीर्षकाच्या निमित्ताने "एप्रिल् फुल् कानात्त डुल् हातात्त बांगड्या सासुबाई लंगड्या" हे सनातन अपौरुषेय कवित्व आठवले :)

मोदक's picture

2 Nov 2012 - 12:39 am | मोदक

मस्त.. :-)

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2012 - 1:56 am | प्रभाकर पेठकर

कथा नक्कीच आवडली.

पण वर्षभरात, म्हणजे अंदाजे ५२ भेटीत, एकतर्फी प्रेम करणारा, ना हिरो पुढे सरकला, ना, अनोळखी तरूणाला 'हाय हँडसम' म्ह्णणारी गुलजार तरूणी पुढे सरकली हे तथाकथित वास्तव पचनी पडायला जड आहे. ह्या पेक्षा आमच्या अडाणी भारतातील दूरस्थ खेडेगावातील तरूण-तरूणीही ४ भेटीत सोक्षमोक्ष लावून टाकतात. ५२ शनिवारांत तर कित्येकींचे पहिले बाळंतपणही झालेले असते.

पण वर्षभरात, म्हणजे अंदाजे ५२ भेटीत, एकतर्फी प्रेम करणारा, ना हिरो पुढे सरकला, ना, अनोळखी तरूणाला 'हाय हँडसम' म्ह्णणारी गुलजार तरूणी पुढे सरकली हे तथाकथित वास्तव पचनी पडायला जड आहे. ह्या पेक्षा आमच्या अडाणी भारतातील दूरस्थ खेडेगावातील तरूण-तरूणीही ४ भेटीत सोक्षमोक्ष लावून टाकतात. ५२ शनिवारांत तर कित्येकींचे पहिले बाळंतपणही झालेले असते. >>>

=)) =)) =)) =))

शैलेन्द्र's picture

2 Nov 2012 - 3:40 pm | शैलेन्द्र

प्रतिसाद ऑफ द डे..

लय विचार केला की काम होत नाही.. (काम- कर्म या अर्थी)

चिगो's picture

2 Nov 2012 - 11:29 pm | चिगो

पेठकरकाका, दंडवत स्विकारावा..

>>ह्या पेक्षा आमच्या अडाणी भारतातील दूरस्थ खेडेगावातील तरूण-तरूणीही ४ भेटीत सोक्षमोक्ष लावून टाकतात. ५२ शनिवारांत तर कित्येकींचे पहिले बाळंतपणही झालेले असते.<<

मेलो ऽ ऽ.. गावाकडच्या "वावरातल्या" गोष्टी आठवल्या.. ;-)

श्रीरंग_जोशी's picture

2 Nov 2012 - 2:22 am | श्रीरंग_जोशी

या विषयावरच्या कथा फारशा वाचायला आवडत नाही, एखादी वाचलीच तर सुरुवातीनंतर सरळ शेवट वाचतो.
बरेच दिवसांनी पूर्णपणे वाचली कारण ती छान रंगविली होती.

बाकी सदर लेखिका या विषयाखेरीज दुसरे काही लिहू लागेल तो सुदिन असेल.

वपाडाव's picture

2 Nov 2012 - 10:14 am | वपाडाव

>>> बाकी सदर लेखिका या विषयाखेरीज दुसरे काही लिहू लागेल तो सुदिन असेल. >>>
का बरे? लिहु द्या की त्यांना जे लिहायचंय ते. बाकीचे विषय घोटायला लै खच्च पब्लिक आहे म्हटलं मिपावर.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Nov 2012 - 10:30 am | अत्रुप्त आत्मा

@का बरे? लिहु द्या की त्यांना जे लिहायचंय ते. बाकीचे विषय घोटायला लै खच्च पब्लिक आहे म्हटलं मिपावर. >>> जोरदार अनुमोदन ;-)

****नी काडी टाकली असली म्हणून काय झालं :-p

अभ्या..'s picture

2 Nov 2012 - 2:26 am | अभ्या..

पेठकर काका अगदी परफेक्ट ओ.
आणि त्याला टाईम्स स्क्वेअर ही लागत नाही. हापश्यावरची भेट सुध्दा पुरते. ;)

इनिगोय's picture

2 Nov 2012 - 7:24 am | इनिगोय

प्रपेकाका अाणि नसलेल्या अभिजितशी सहमत..
शिवाय वर्षभरात किमान एकमेकांच्या एफबीवरदेखील फिरकले नाहीत, हेही अंमळ जड वाटले.
साधे मिपावर नमस्काराचा व्यनि केला तरी उत्तर देण्याअाधी एफबीवर जाऊन सगळा गृहपाठ करून घेतात मंडळी. ;-)

=)) ते एफबी वर जाऊन अभ्यासाच्या मुद्द्यावर प्रचंड सहमती :D

बॅटमॅन's picture

2 Nov 2012 - 11:35 pm | बॅटमॅन

आम्चीपण ;)

अन्या दातार's picture

2 Nov 2012 - 8:09 am | अन्या दातार

मस्त! :-)

सर्व वाचकांचं मनापासुन आभार ! :)

प्रचेतस's picture

2 Nov 2012 - 8:51 am | प्रचेतस

छान लिहिलीय कथा.
आता तिच्या बाजूने सुद्धा एक मुक्तक येउ देत.

>>>आता तिच्या बाजूने सुद्धा एक मुक्तक येउ देत.>>>
वल्लीदांना आण्मोदण...

किसन शिंदे's picture

2 Nov 2012 - 9:46 am | किसन शिंदे

मस्त!

नगरीनिरंजन's picture

2 Nov 2012 - 9:57 am | नगरीनिरंजन

गोष्ट आवडली! मुक्याने प्रेम वगैरे! कधी सुधारणार मराठी पोरं देव जाणे! ;-)
असो.

गोष्ट आवडली! मुक्याने प्रेम वगैरे! कधी सुधारणार मराठी पोरं देव जाणे!
असो.

ननी?????????

बॅटमॅन's picture

2 Nov 2012 - 2:39 pm | बॅटमॅन

मुक्याने प्रेम वगैरे!

पन इंटेंडेड ? ;)

नगरीनिरंजन's picture

2 Nov 2012 - 3:13 pm | नगरीनिरंजन

पन समोरच्या पार्टीला इंटेंडेड असली तरी या कथानायकासारखी पोरं विनापन मुक्याचं व्रत घेतात आणि मग आयुष्यभर पाणी काढत बसतात डोळ्यातनं. ;-)

विनापन मुक्याचं व्रत घेतात >>

अच्छा ते मुक्याचं व्रत व्हय , मी काही औरच समजलो होतो ;)

जुइ's picture

2 Nov 2012 - 11:55 am | जुइ

कथा आवडली!

जुइ's picture

2 Nov 2012 - 11:55 am | जुइ

कथा आवडली!

सस्नेह's picture

2 Nov 2012 - 1:41 pm | सस्नेह

एकूण कथा वाचून ज्ञानात दोन गोष्टींची भर पडली.
१. एफोबी असू दे नाहीतर एबीसीडी, मराठी पोरे अन पोरी अमरिकेत जाऊनसुद्धा मऱ्हाटी सौन्स्कृती विसरत नाहीत.
२. पोरगा अन पोरगीचे ‘जमणे’ हि प्रोसेस अमेरिकेपेक्षा भारतात फाष्ट आहे.

पोरगा अन पोरगीचे ‘जमणे’ हि प्रोसेस अमेरिकेपेक्षा भारतात फाष्ट आहे.

यामध्ये "मराठी संस्कृत्यभिमानी पोरगा अन पोरगीचे ‘जमणे’ " अशी दुरुस्ती सुचिवतो.

मालोजीराव's picture

4 Nov 2012 - 3:52 pm | मालोजीराव

पोरगा अन पोरगीचे ‘जमणे’ हि प्रोसेस अमेरिकेपेक्षा भारतात फाष्ट आहे

बेन्च वाज्वुन अणुमोदन !

सूड's picture

2 Nov 2012 - 2:13 pm | सूड

सुटला बिचारा !!

पुजा पवार जी ,कथा चांगली आहे. कथा आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2012 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. कथा आवडली.

-दिलीप बिरुटे

अनिता ठाकूर's picture

2 Nov 2012 - 7:52 pm | अनिता ठाकूर

शेवट धक्कादायक करणे ही वपुंचि खासियत होती. पण, त्यातहि एक ओघ असे. इथे कथा अपुरी वाटते.पण, प्रयत्न चांगला आहे. By the way, मण्यांना बीटस नाही, तर, बीडस(beads) म्हणतात. चूक राहू नये म्हणून हे लिहिले आहे. कृपया, राग मानु नये.

हो गं लक्षात आलं होतं ,पण इथे छापुन झालं होतं तोवर .:(

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2012 - 2:35 am | प्रभाकर पेठकर

By the way, मण्यांना बीटस नाही, तर, बीडस(beads) म्हणतात.

स्त्री आयडी घेतला तरी, तपशिलातील असले बारकावे सत्य उघड करतात.

पेठकर काका , ही वरची स्त्री आयडीवाली पोस्ट माझ्यासाठी आहे का??
जर असेल तर,

स्त्री आयडी मुद्दामुन नाहि घेतला , स्त्री आहे म्हनुन स्त्री आयडी घेतलाय .
दुसरी गोष्ट हे डूआयडी घ्यायची तशी मला तरी काहिएक गरज वाटत नाहि :)
आणि खरच हि चुक अभिजीत मी नाहि याने बरोबर करुनहि दिली होती ,
पण काहि ठिकाणी थोडेफार एक्स्ट्रा चेन्जेस झाले होते . ज्यावेळी हा लेख
इथे टाकायचा होता तेव्हा अभि ऑनलाइन नव्हता , मग मी वल्लीला मदत मागितली
पण त्यावेळी अभि ने नीट करुन दिलेला लेख वल्ली ला चुकुन पाठवला गेला नाहि ,
त्याऐवजी मीच ओबडधोबड लिहिलेला वल्लीला पाठवला गेला .
त्यातहि चुक झाली . मी लेख दुसर्‍या वेलांटी वाल्या वल्लीला न पाठवता , तो पहिल्या
वेलांटीवाल्या वल्लि याला गेला :( .
मी लेख त्याला शुद्धलेखनासाठी पाठवला होता .
असो .
एवढ स्पष्टिकरण देण्याचं कारण हेच कि झालेली चुक अगदि स्त्री आयडी \ पूरुष आयडी
इतके निश्कर्ष लावन्या एवढी मोठी होती का??

तुम्हाला तसं वाटत असेल तर माझा फोन नंबर व्यनी करेन , बोलुन खात्री करुन घ्या
वीडीओ चाट करा हवं तर . पण खात्री झाल्या शिवाय कुणावरहि असले आरोप करु नका .

हे ' जर ' वर अवलंबून आहे हे लक्षात घ्या .

माझा ह्या धाग्याला राम राम .

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2012 - 4:47 pm | प्रभाकर पेठकर

आयला, एवढं चिडायला काय झालं? आणि आरोप वगैरे काय? वाटल्यास संपादक मंडळाने माझा 'तो' प्रतिसाद उडवून टाकावा.

कमाल झाली बुवा!

अभ्या..'s picture

3 Nov 2012 - 12:09 pm | अभ्या..

गंमतीचा भाग म्हणजे पूजाने ह्या धाग्यात त्या मुलाच्या दृष्टीकोनातून लिहिले होते त्यामुळे तपशीलात कच्चे म्हणायचे का पर्फेक्शन?

काहीही असले तरी मुलीचा आयडी घेऊन मुलाने/प्रौढाने लिहिणे अथवा व्हाइसव्हर्सा दोन्हीही विचित्र प्रकार आहेत. हे जालावर सर्रास चालते पण. ते किती सिरियसली घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. आणि इथे जो आयडी स्वत:ची इमेज बनवतोय तसा तो खराच तसा आहे का असा का आग्रह? आणि त्याला ऊघडे पाडायचा पण किती सोस?
पूजा म्हणा किंवा मी, आम्ही फारच ज्युनिअर आहोत या संस्थळावर, जगात आणि अनुभवात सुध्दा.
भाषाप्रयोगात चुकतो कधी तर कधी स्वप्रकटनात. त्याचे एवढे काय?
छान नवीन नवीन सदस्य येताहेत, मिपा पण आपले रूपडे खुलवून त्यांचे स्वागत करतेय, त्यांना वाव देतेय प्रकटनाला.
अशा वातावरणात कशाला एकमेकाबद्दल शंका?
हरिकेन सँडी च्या धाग्यात एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे
१. मिपा हे केवळ मराठी व्यासपीठ नसून एक जगव्यापी परिवार आहे.
२. या परिवारातील सदस्य स्नेहाच्या वत्सल 'धाग्यां'नी एकमेकांशी जोडलेले आहेत.
याचीच प्रचिती यावी एवढीच इच्छा

इरसाल's picture

3 Nov 2012 - 12:52 pm | इरसाल

मी काही मराठी संस्थळ पाहिलीत जिथे सदस्यच डु-आय्डींना उघडे पाडतात (नावानिशी) जेणेकरुन पुढे त्रास नको.मिपावर सगळे डु-आयडी डु-आयडी म्हणुन बोलतात, लेख पाडतात, वैचारीक मंथन करतात पण अजुनपर्यंत कोणालाही " हा डु-आयडी आहे" (माहित असुनही) असे छातीठोकपणे सांगताना पाहिले नाही.

अनिता ठाकूर's picture

3 Nov 2012 - 3:47 pm | अनिता ठाकूर

मी 'अनिता ठाकूर' नावाची खरीच सद्स्य आहे बरेका पेठकरकाका!! मी मिपावर नव्याने सदस्य झाले आहे.

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2012 - 4:49 pm | प्रभाकर पेठकर

अहो अनिता ताई, मी काय प्रत्येक स्त्री आयडी चा संशय घेत नाही आणि उगा गंमतही करत नाही.

पू बै, कथा म्हणून छान आहे पण वर म्हण्टल्याप्रमाणे तपशीलातल्या चूका जाणवतात हेच खरं.

लिहित्या रहा म्हणजे झालं.....

बाकी तुमच्या त्या डूआयडीपणाची तुम्हाला एव्हाना सवय झाली असली पाहिजे नै ;-)

तुझा बबल्या's picture

4 Nov 2012 - 5:23 am | तुझा बबल्या

पूजा,
छान लिहिलीये कथा ..आवडली ...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Nov 2012 - 3:01 am | विश्वनाथ मेहेंदळे

अमेरिकेत एक भारतीय व्यक्ती दुसर्या भारतीय व्यक्ती कडे बघून हसली आणि बोलायला सुरुवात केली हा प्रसंग वाचला तेव्हाच कळले पूर्ण गोष्ट स्वप्नात घडते म्हणून.नाहीतर अमेरिकेत भारतीय माणसांनी एकमेकान्कडे साधारण मेलेल्या कुत्र्याचा कलेवराकडे आपण बघू तसे बघायची प्रथा आहे. लेखिकेने येथे वाचकांना एप्रिल फूल केले आहे.

स्पंदना's picture

5 Nov 2012 - 8:44 am | स्पंदना

खरतर एक भारतिय व्यक्ती दुसर्‍या भारतिय व्यक्तीच्या जवळपासही फटकत नाही भारताबाहेर गेल की.

प्रभाकर पेठकर's picture

5 Nov 2012 - 10:01 am | प्रभाकर पेठकर

आमच्या आखातीप्रदेशात असे नाही बरं का....

इरसाल's picture

5 Nov 2012 - 11:45 am | इरसाल

तुमच्या आखातीप्रदेशात आसपास फटकत नाहीत तर "फटके" देतात म्हणे. ;)

प्रभाकर पेठकर's picture

5 Nov 2012 - 4:25 pm | प्रभाकर पेठकर

'महाराष्ट्र मंडळात', (जगात बहुतेक ठिकाणी असते तशी),थोडीफार 'लाथाळी' आहे, बाकी सर्वजणं गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

काय काका... इथे पण द्विरूक्ती?

छ्या.. ;-)

मनातले मांडे आहेत ते विमेकाका !! ;)

रुमानी's picture

5 Nov 2012 - 10:38 am | रुमानी

कथा मस्त झालिये.
आवडली.

स्वप्नाचीदुनिया's picture

6 Nov 2012 - 12:03 am | स्वप्नाचीदुनिया

आवडेश.....

इथे जनता बरिच चौकस आहे बरका..
हिंदी विंग्रजी शिनेमा बगाया गेलेतर येवढ्या शंका एकुन शेजारी बसलेला निम्म्यातुन उठुन जात असेल अशी शंका येण्याएवढी चौकस..

डटे रहो.....

शेवटी स्वप्नांशिवाय इथं काहीच आपले नसते..
अमित पोवार