सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
16 Sep 2007 - 4:36 pm | विसोबा खेचर
>>हे मासिक मिसळपाव साठी मात्र 'रुचीपालट' म्हणून ठरायला हरकत नाही.
मिसळीला कशाचंच वावडं नसतं. त्यात फरसाणाच्या सोबतीला चटकदार चिवडाही छान लागतो,
त्यातल्या दाणे आणि भाजलेल्या सुक्या खोबर्याचे तुकडेही मिसळीला विशेष चव आणतात. सोबत दही असेल
तर काही वेळेला दहीमिसळही छान लागते! :)
सबब, मिसळपाववर रुचिपालटाचे स्वागतच होईल असे वाटते! :)
आपला,
(मिसळपावचा एक सभासद!) तात्या.
:)
17 Sep 2007 - 12:48 pm | सागर
प्रकाशराव,
तात्यांचे म्हणणे एकदम बरोबर आहे. पण त्यात थोडीशी भर घालू इच्छितो...
"मिसळपाव"वर हे मासिक रुचिपालट म्हणून ठेवण्यापेक्षा मिसळीतच मिसळून टाकले तर कसे?
:)
आणि अशा साहित्याचे दुवे असतील तर कृपया देत जा.
म्हणजे चातकाचा दृष्टिकोन बाळगणार्या आम्हा तृषार्तांना मिसळ-पावच्या वेगवेगळया चवी चाखता येतील.
धन्यवाद
(मिसळ-पाव भक्त) सागर
17 Sep 2007 - 1:01 pm | सहज
घाटपांडेकाका तुमची सगळी वेगवेगळ्या संस्थांची जसे साधना इ. जुने अंक एकत्र सगळे काढू नका किंवा नीट आवरुन ठेवा नाहीतर काकू ओरडायच्या अजून एक नवीन वेबसाइट मिळाली म्हणून अजून जास्त पसारा करू नका. :-) ह. घ्या.
17 Sep 2007 - 1:08 pm | टिकाकार
कोपि राइट म्हनुन काय तरी अस्त.
कदि ऐकल का वो.
टिकाकार
17 Sep 2007 - 1:15 pm | सहज
कॉपीराइट मधे बहूतेक २०% वापरले तर हरकत नाही असे काहीतरी वाचल्याचे आठवते. एकदा परत विचारायला पाहीजे, कायदा नविन आहे बदलला पण असेल. तर एखाद, दुसरे पान व असेल तर मूळ संकेतस्थळाचा दुवा दिला की ????
17 Sep 2007 - 7:18 pm | विकास
बहुतांशी वेळेस "प्रकाशन हक्क" अथवा "कॉपी राईट"चा संबंध हा जर त्यातून कुठलाही लाभ होणार असेल "आर्थीक" / शैक्षणीक (पेपर पब्लिकेशन) / संशोधनात्मक / पेटंट वगैरे तर असतो. जर जालावर कॉपीराईट मटेरीयल हे संदर्भासहीत अशा चर्चात्मक/विरंगुळा ठरतील अशा ठिकाणी वापरले तर विशेष प्रश्न नाही. न्यू यॉर्क टाईम्सची गंमत बघा. त्यातील एखादा लेख आवडला आणि तो काही दिवसांनी त्या दिवशीच्या (लेख प्रसिद्ध झालेला दिवस) दुवा वापरून पाहीला तर मिळत नाही, कारण तो विकत घ्यावा अशी अपेक्षा असते. पण त्याच लेखाची, प्रसिद्ध झालेल्या दिवशी , "परमनंट लिंक" फुकट मिळते जी वापरून तोच लेख आपल्या ब्लॉगवर चढवता येतो!
थोडक्यात प्रकाशरावांची काही चूक नाही.. असल्यास त्वरीत काळजी घेण्यासाठी, त्यांच्या पोलीस खात्यात ओळखी असतीलच :-)
याबाबत अजून माहूती हवी असल्यास हा कॉर्नेल विद्यापिठाचा दुवा पहा.
17 Sep 2007 - 1:19 pm | प्रकाश घाटपांडे
<<जास्त पसारा करू नका>>
यावेळच्या ( सप्टेंबर २००७) च्या अनुभवच्या अंकात हरिशंकर परसाई यांची मूळ हिंदी कथा "बुद्धिवादी' ही उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केली आहे. यात या बुद्धिजीवी पसार्याचे गमक मांडले आहे. जालावरील आवृत्तीत त्याचा समावेश नसल्याने त्याचा दुवा देणे कष्टप्रद आहे. छापील आवृत्तीत वाचावे. तेव्हापासून मला घरात बुद्धिवादी (बुवा) असे हिणवले / चिडवले जाते
प्रकाश घाटपांडे
17 Sep 2007 - 2:00 pm | टिकाकार
हा ... हा... हा...(हास्य)
टिकाकार
18 Sep 2007 - 5:48 pm | चित्तरंजन भट
अत्यंत वाचनीय असे नियतकालिक आहे. माझ्याकडून विवेकवादी चिंतन फारसे होत नसले तरी मी वर्गणीदार आहे.
22 Jul 2010 - 7:06 pm | क्रेमर
चांगली माहिती
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.