आमच्या वार्ताहाराकडुन
दिनांक २२ जुन
स्थळ : भांबुर्डा
२२जुन हा उभ्या महाराष्ट्राला एक अविस्मरणीय दिवस. बर्रोब्बर एकशे दहा वर्षापूर्वी याच भांबुर्ड्याच्या गणेश खिंडीत एक ऐतिहासीक प्रसंग घडला होता. या प्रसंगाची पुन्हा बरोबरी होणे नाही.
याच दिवसाचा पूर्व दिन भाम्बुर्डा दंगलीसाठी म्हणुन मुक्रर झाला करण्यात आला होता.दंगलीचा काळ ठरला होता पण स्थळ काही ठरत नव्हते.विजुभौ नी लैच टीमकी बडवली म्हणुन शांग्रीला अशा नेपाळी नावाच्या म-हाठी हाटीलात ( पहा एकविसाव्या शतकात देशांच्या सीमा कशा लहान होत चालल्यात ते)दंगल ठरवली. आखाड्यात दस्तुरखुद मोठे आनन्दयात्री आणि संत ईनोबा यानी पानी मारुन धुलीचा बंदोबस्त करुन ठेवला होता. बारीक लाल माती व्यस्थीत मळुन ठेवली होती आखाड्यात एकही खडा रहाणार नाही ( खडा म्हणजे बारका पत्थर....खडा रहाणार नाही म्हणजे उभा रहाणार नाही असा अर्थ घेउ नये)याची चोख खबरदारी घेतली होती. तालीम मास्तर संत ईनोबा असल्यावर कोणतीही कसूर रहाणार नाही हे नक्की होतेच. तरीही थोरले आनन्दयात्री यानी नेहमीच्या सवयीनुसार सर्व काही ठीक आहे याची जातीने पडताळणी केली.
दंगलीची वेळ संध्याकाळची होती. ही वेळ पैलवानाना सोयीची असते...पडझडले तर आराम फ़र्मावता येतो या हिशेबानेच अनुभावी इनोबानी सगळा बंदोबस्त ठेवला होता.
जंगी कुस्तीचा फ़ड आहे हे कळल्यामुळे जणु अवघ्या पुण्यनगरीने कुस्त्यांच्या दंगलीच्या ठिकाणास प्रथम पसंती दिली असावी इतकी तौबा गर्दी रस्त्यावर होती.
हळु हळु एकेक पैलवान येउ लागले. हिमालया येवढे उंच संत ईनोबा स्वातध्याक्ष होते. रुस्तुम ए चिंचवड शेखर , डोमकेसरी डोमकावाळे ,अती लाईट वेट कॆटेगरी पेहेलवान धमालखान ,रुस्तुम ए बिबवेवाडी आनन्दयात्री ,सगळे आले. विजुभाऊ नी धमाल बाळासोबत नन्तर उशीरा येउन अल्यागेल्याची विचारपुस केली. सर्वजण स्थानापन्न होतात्से झाले. दुसरे रुस्तुमे बिबवेवाडी मिपा केसरी पैलवान सखाराम जी याना गटणे त्यावेळी चहा पोह्याच्या लढाईस ऐन वेळी जावे लागले असल्याकारणे ते येतो म्हणुनही येऊ शकले नाहीत. कानोकानी चालत आलेल्या बातमीनुसार कोणी कोठे बोलावले तर आपल्या साहित्यासाधनेत व्यत्यय नको म्हणुन दुसरे रुस्तुमे बिबवेवाडी मिपा केसरी पैलवान सखाराम जी हे नेहमीच चहा पोह्याच्या लढाईस गेलो होतो असे सांगतात. अशी वदंता आहे. विषेश म्हणजे चहापोह्याच्या इतक्या लढाया लढुनही ;गनीमाने आतापावेतो त्याना अनेक वेळा खिंडीत गाठौनही; प्रत्येक वेळी अंगावर एकही जखम न घेता ते सुखरूप परत आलेले आहेत. त्यासाठी आता गनीमच मिपा महागुरु कैलीफ़ोर्नियापीठाधीश पिवळाडाम्बीस काकांच्या शिकवणी लावणार आहेत असे कळते.
सर्व लोक ज्यांची उत्कंठेने वाट पहात होते ते सर्वांचे आवडते सुपारी सम्राट दख्खन केसरी कैसर ई हिन्द महान छोटा डॊन यांचे आगमन झाले. त्याना पाहिल्याबरोबर प्रेक्षकातुन एकदम जी कडकडकड्कडकड टाळी पडली..........किर्र्र्र्र्र्र्किच्च ब्रेक दाबल्याचा...मोटारीवरमोटार आपटल्याचा किंवा एकसाथ एकाच वेळी सगळे फ़डताळ पालथे हौन भांडीकुंडी वाजावी तसा आवाज झाला. आमच्या वार्ताहराच्या मते हा आवाज प्रेक्षकानी वाजवलेल्या टाळ्यांचा होता. लोक तो आवाज कोणीतरी कोनावरतरी आदळल्याचा आवाज होता असे म्हणतात. सर्वांचे आणि वार्ताहाराचे लक्ष्य त्यावेळी सुपारी सम्राट दख्खन केसरी कैसर ई हिन्द महान छोटा डॊन यांचे कडे होते. लोक घाबरु नयेत म्हणुन सुपारी सम्राट दख्खन केसरी कैसर ई हिन्द महान छोटा डॊन यानी यावेळे त्यांचा अंगरक्षक कन्दील्फ़ेम आंबोळी याला सोबत आणले नव्हते. तर त्यांच्याच गेन्ग मधल्या एकाचे तरुणीप्रमाणे केशांतर करवुन लोकाना चकमा दिला होता
कुस्त्यांची दंगल सुरु झाली....एकेक पैलवान दुसयाचा जोर आजमावु लागला. धमाल आणि आनन्दयात्री अशी जोडी प्रथम आखाड्यात उतरली..आपल्याला हा भारी पैलवान जोड म्हणुन दिला म्हणुनअती लाईट वेट कॆटेगरी पेहेलवान धमाल खुश होता..आणि सोबत हा असला पैलवान दिला आता कुस्ती एकदम सोपी जाईल म्हणुन ,रुस्तुम ए बिबवेवाडी आनन्दयात्री खुश होते. त्यानी मोगॆम्बो खुष हुवा अशी आरोळी मारायचीच बाकी ठेवली होती.त्यांनी आर्य आणि पर्शियन परंपरेला साजेल अशा नूरा कुस्तीला प्रारंभ केला.मल्ल डोमकेसरी डोमकावाळे पंचगिरी करत होते. काही निर्णय चुकले तर त्यानाच पंचेस खावे लागत होते.
कट्टा सत्विक असावा अशी सुपारी सम्राट दख्खन केसरी कैसर ई हिन्द महान छोटा डॊन यांची ईच्छा होती. ते वेळोवेळी त्या वचनाला स्मरत होते. दुस-य़ाच क्षणी ते "हेच एक सत्य..बाकी जग मिथ्य " म्हणत मोहाला बळी पडत होते.
अचानक कट्ट्यावर धमाल बाळाने स्वत:ची ओळख करुन दिली. त्यावेळी धमाल मुलाने "धमाल" या नावाचे पेटंट आपल्याकडे असुन ते इतरानी वापरले तर आपल्याला रॊयल्टी म्हणुन केळवण द्यावे लागेल अशा अर्थाचा कायदेशीर कराराचा कागद दाखवला. धमाल बाळाने "बले झाले ले धमु काका; शकाली बशायला आनि पुशायला पन वापलता येईल" असे म्हणुन तो कराराचा कागद स्वत:कडे ठेउन घेतला.
निकाली कुस्ती ची परम्परा असलेल्या मैदानात नूरा कुस्ती हा प्रयोग जरा आगळाच होता. त्यामुळे थकलेले पैलवान एकमेकाना मूठी उलटी करुन "टैम प्लीज" म्हणु लागले. म्हणुन मिपागौरव पुरस्कार देण्यात येऊ लागले.
******मिपा जीवन गौरव नाट्यभैरव
नामंकने १) विजुभाऊ : :धमुचे लग्न
२) भडमकर मास्तर : करीयर गायडन्स क्लासेस
३)डॊ प्रसाद दाढे : मॆरेज सर्टीफ़िकेट रीन्युअल
यावर्षीचा मिपा जीवन गौरव नाट्यभैरव पुरस्कार हा एकमताने "भडकमकर मास्तर" याना देण्यात आला.
******मिपा जीवन गौरव मिपा वेताळ
नामंकने १)मदनबाण : अभ्यंकरांच्या चपला
२)आम्बोळी: कन्दील.
३) आम्बोळी : मी पाहिलेले मयत
हा यावर्षीचा मिपा जीवन गौरव सर्वानुमते देण्यात आला
आम्बोळी: कन्दील.
******मिपा जीवन गौरव मिपा देवर्षी
लोकाना मंत्रमुग्ध करुन त्याना चित्रबद्ध खिळवुन ठेवण्याबद्दल देण्यात येणारा पुरस्कारासाठी नामांकने होती
१) पिवळा डांबीस : गाबीत मास्तर
२) पिवळा डाम्बीस : अब्दुलखान
३)राजे :प्रवास
४)प्रमोद देव :माझे बालपण
हा यावर्षीचा मिपा जीवन गौरव सर्वानुमते देण्यात आला
पिवळा डांबीस : गाबीत मास्तर
******मिपा सर्वोत्क्रुष्ठ विडम्बन काव्य
विनोदी लिखाणा बद्दल देण्यात येणारा हा पुरस्कार याची नांमांकने
१) अवखळ मनाचा झारा
२)जाडी दहा मणांची
३)मदिरेच हाणितो पेले.
विनोदी लिखाणा बद्दल देण्यात येणारा हा पुरस्कार सर्वानुमते देण्यात आला
जाडी दहा मणांची....
मिपा पाकशास्त्री
सर्वोत्कृष्ठ पाककृती साठी नामांकने
१) पेठकर काका
२) स्वाती राजेश
३) स्वाती दिनेश
हा पुरस्कार या तिन्ही नामांकनात विभागुन देण्यात आला
मिपा वात्रटाचार्य चहाटळ झोटिंग
प्रतिसादात वात्रटपणा करण्यासाठी देण्यात येणारा पुरस्कार
या पुरस्कारासाठी सर्वात जास्त चढाओढ होती.
नामांकने
१) धमाल मुलगा :जहब-या आणि ठ्यॊ फ़ेम
२) आनन्दयात्री
३)विजुभाऊ
४) पुण्याचे पेशवे
५)पिवळा डाम्बीस
६)मनस्वी
७)ऋचा
८)पेठकरकाका :
९)छो.डॊन
१०) सखाराम गटणे.
खरड फ़ळ्यावर होणारी दंगले कोणत्या सदरात गृहीत धरायची असे विचारत या पुरस्कारावरुन सर्व पंच मंडळीत बराच वाद झाला. नूराकुस्तीला ख-या कुस्तीचे स्वरूप येईल की काय अशी दंगल ऊसळली.
प्रसंग ओळखुन धमाल बाळाने मध्यम मार्ग म्हणुन एक उपाय सुचवला.
हा पुरस्कार कोणाला द्यावा हा निर्णय सर्व मिपा सदस्यांवर सोपवण्यात आला असुन त्यावर एक स्वतंत्र धागा उघडुन त्यावर कौल घ्यावा.बिरुटे सर, रामदास,चतुरंग काका, छोटी टिंगी.अशा ज्येष्ठ सदस्यानी याचा निवाडा करावा.
सर्व उपस्थित सदस्यानी यास एकमुखाने अनुमोदन दिले.आणि घड्याळाने २२ जुन उजाडली असे जाहीर केल्याने; भांबुर्डा दंगल उरकली असे जाहीर करण्यात आले.
आमचा वार्ताहार कळवतो की पुरस्कार जाहीर झाल्यावर अशी दंगल पुन्हा एकदा घेणेत येईल.स्थळ काळ वेळ मागाहुन कळवनेत येईल.
आपला वाल्ताहल : धमाल बाळ
प्रतिक्रिया
27 Jun 2008 - 10:22 am | भडकमकर मास्तर
यावर्षीचा मिपा जीवन गौरव नाट्यभैरव पुरस्कार हा एकमताने "भडकमकर मास्तर" याना देण्यात आला.
धन्यवाद धन्यवाद...
माझे आभाराचे भाषण घरी विसरल्याने सध्या इतकेच पुरे...
आपला (नाट्यभैरव) भडकमकर मास्तर...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
29 Jun 2008 - 9:36 pm | भडकमकर मास्तर
अंमळ संताप येण्याइतका हा पोस्ट सीरियसली घ्यायचा आहे ही कल्पना नसल्यामुळे आम्ही गमतीत हा पुरस्कार स्वीकारला... चूक झाली...
प्रथम वाचनात खरंच विनोदी वगैरे काय तो वाटला होता हा लेख.... सर्व उत्तरे वाचल्यावर कळाले की एकूण खूप जणांना दु:खात पाडणारा , ग्रुपिझम वाढवणारा हा लेख आहे...
कोणाला काय विनोदी वाटेल काय सीरियस वाटेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे , पण प्रत्येकाने फक्त आपल्या पवित्र्याशी कन्सिस्टंट रहावे इतकीच अपेक्षा...
.
.... आता यापुढे असलं सगळं ग्रुपिझम करणारं साहित्य सीरियसली घेऊन त्याला अजिबात रिप्लाय न लिहिण्याची काळजी घेईन...
दुर्लक्ष करण्याच्या यादीत अजून एक भर...
( ग्रुपिझम तोडणार्या कन्सिस्टन्सीच्या प्रतीक्षेत)
भडकमकर मास्तर
_______________________
गंमतीत लिहिलेला पहिला प्रतिसाद माझाच असल्याने " आपणच ग्रुपिझम करणारे आहोत " या विचाराने आमच्या डोक्याला भरपूर कटकट झालेली आहे...
मला ग्रुपिझम वगैरे करायची गरज नाहीये असं मला प्रामाणिकपणे वाटते...
मिपा वरील व्यक्तिरेखा घेऊन काल्पनिक गोष्ट लिहिणार्या सार्यांनाच माझी विनंती आहे की त्यांनी आमचे नाव त्या गोष्टीत गुंफू नये...
बाकी कोणीही कोणालाही नामांकने देऊन / न देऊन , पुरस्कार देऊन / न देऊन त्याच्या लेखनाचा साहित्यिक दर्जा सुधारत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे ... मला असल्या पुरस्काराच्या लेखांनी काहीही फरक पडत नाही ...
ज्यांना असले लेख टाकायचे त्यांनी टाकत राहावेत, माझा त्यात उल्लेख करू नये ही पुन्हा विनंती...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
27 Jun 2008 - 10:42 am | विसोबा खेचर
अहवाल मस्तच आहे!
पण चला, एकंदरीत झालं ते बरं झालं..!
आम्हाला एकही पुरस्कार नाही. म्हणजे आमचं कुठलंच लेखन परिक्षक मंडळाला आवडलेलं दिसत नाही! आता आम्हाला मिपाकरांकरता जीव तोडून काहीही लिहायची गरज नाही! :)
परिक्षक मंडळाचे आभार व सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...!
आपला,
(निवृत्त व्हायच्या विचारात!) तात्या.
27 Jun 2008 - 10:46 am | विसोबा खेचर
गाबीत मास्तर, अब्दुलखान, राजे :प्रवास, माझे बालपण
यांच्यात आमच्या रौशनीला, पाटणकर आजोबांना, काही व्यक्तिचित्र-काही आत्मचरित्र, यांना साधं नामांकनही मिळू नये याचं वाईट वाटतं!
तात्या.
27 Jun 2008 - 10:50 am | धमाल बाळ
आता आम्हाला मिपाकरांकरता जीव तोडून काहीही लिहायची गरज नाही!
तसे नाही हो.......तुम्ही लिहिले नाहीत त॑र त्यापासुन नवोदिताना प्रोत्साहन कसे मिळणार.....तुम्ही लिहिलेच पाहिजे
तुमचे लिखाण वरील सर्व कॅटेगरीसाठीविचारात घेतली होते...पण नवोदितांस प्राधान्य द्यावे असे सर्वानुमते ठरले.
कृपया ह घ्या :)
27 Jun 2008 - 11:02 am | विसोबा खेचर
तुमचे लिखाण वरील सर्व कॅटेगरीसाठीविचारात घेतली होते...पण नवोदितांस प्राधान्य द्यावे असे सर्वानुमते ठरले.
साला नवोदितांना लेखनकरता प्रोत्साहन मात्र आम्ही द्यायचं आणि बक्षिस मात्र ते पटकावणार! हा काय धंदा?
हां, एक वेळ बक्षिस देऊ नका पण साला, आमच्या लेखनाचा साधा उल्लेखसुद्धा नाही? कोण कोण मंडळी होती परिक्षक मंडळांवर? जरा त्यांची नावे जाहीर करा म्हणजे आम्हालाही कळेल!
कृपया यापुढेही कुठल्याही स्पर्धेत आमच्या साहित्याचा विचार होऊ नये हीच विनंती..! आम्ही तो अधिकार कुणालाही देऊ इच्छित नाही!
च्यामारी, तात्याच्या लेखनाचं परिक्षण करायला निघालेत! गेलात लेको बा XXX....! :)
आपला,
(एक्स मॅनेजर)
झमझम बार.
फोरास रोड, मुंबई.
27 Jun 2008 - 11:10 am | सखाराम_गटणे™
मला वाटते, पुरस्कार वैगरे च्या भानडीत आपण पडु नये. मिपा या पसुन दुर राहील तर चांगले.
कदाचीत त्यामुळे groupisim वैगरे वाढु शकतो. त्यामुळे मिपाचे वातावरण खराब होउ शकते.
ज्यांनी पुरस्कार मिळाला नाही, ते कदाचीत लेखन थांबवतील.
माझा ह्या पुरस्कार वाटपाला विरोध आहे.
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
27 Jun 2008 - 11:25 am | छोटा डॉन
काय रे, कसला पुरस्कार आणि कसलं ग्रुपीझम ???
च्यायला सगळं "मज्जा" म्हणून चाललेलं आहे, आजुन कही तरी वेगळे काढू नका ...
आम्ही मनापस्सुन "मिपाकर" आहोत , आमच्या हातुन "वातावरण बिघडावयाची" असली घाणेरडी गोष्ट कधीही होणार नाही .
कॄपया हा विषय वाढवू नये.
>>ज्यांनी पुरस्कार मिळाला नाही, ते कदाचीत लेखन थांबवतील.
त्याचा काय संबंध ?
आपण कोण दुसर्याचे लेखन परिक्षणारे आणि त्याला पुरस्कार देणारे ?
सगळं हे विनोदाच्या भावनेत आहे ...
तात्यासाहेब, अगदी मनापासनं सांगतो की सगळं आहे ते कृपया " विनोद" म्हणून घ्यावे ...
आमच्या "सरळपणा" बद्दल शंका नसावी ...
कुठल्याही कट्ट्यात ग्रुपीझम वगैरे करुन कुनाच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याचे व कुणाला दाबण्याचे वगैरे धंदे होत नाहीत.
जे काही लिहलं त्यात फक्त आणि फक्त विनोद होता ...
अवांतर : आता माझा हा प्रतिसाद म्हणजे "पुरस्कार देणार्या मंडळाचे स्पष्तीकरण" समजण्यात येऊ नये. कारण अशी कुठलीही गोष्त अस्तित्वात नाही. त्यावेळी ह्या विषयावर कसलीही चर्चा झालेली नाही. हा फक्त विनोद आहे. जे चालले आहे तो फक्त गैरसमज माझ्या मते फक्त गैरसमज आहे.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
27 Jun 2008 - 11:30 am | विसोबा खेचर
डॉन,
आता माझा हा प्रतिसाद म्हणजे "पुरस्कार देणार्या मंडळाचे स्पष्तीकरण" समजण्यात येऊ नये. कारण अशी कुठलीही गोष्त अस्तित्वात नाही. त्यावेळी ह्या विषयावर कसलीही चर्चा झालेली नाही.
जर या विषयावर कोणतीही चर्चाच झालेली नाही तर धमाल बाळाने कुठल्या अधिकारात ही बक्षिसं देऊ केली आहेत??
इथे प्रत्येक जण येतो ते मनापासून, ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार लिहायला. प्रत्येकाचं लेखन हे त्याच्या त्याच्या जागी चांगलंच असतं! असं असताना कुणाला कुठला पुरस्कार द्यायचा, द्यायचा नाही हे ठरवणारा हा धमाल बाळ कोण? असलीच तर ही त्याची वैयक्तिक मतं असतील आणि ती त्याने त्याच्याजवळ ठेवावीत. मिपा प्रशासनाचा या बक्षिस वितरणाच्या कल्पित नाट्याशी काहीही संबंध नाही. इथे लिहिणारा प्रत्येकजण हा मिपा प्रशासनाकरता महत्वाचा अन् मोलाचा आहे.
व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं तर माझं लेखन काय आहे, कसं आहे हे सगळ्यांना माहित्ये! ते कुणी धमाल बाळाने ठरवायची गरज नाही परंतु अशी बक्षिसं वगैरे वाटल्याने एखादा नवोदित जो मनापासून लिहितो आहे तो खट्टू होऊ शकेल/शकतो.
तसेच या प्रकारामुळे गटणे म्हणतात तसं ग्रुपिझमही वाढू शकतं. ही सगळी त्याचीच बीजं आहेत!
आपला,
(संतप्त) तात्या.
27 Jun 2008 - 2:58 pm | सखाराम_गटणे™
>>काय रे, कसला पुरस्कार आणि कसलं ग्रुपीझम ???
>>सर्व विनोद आहे हे पण लक्षात घेत नाही का ?
सगळा विनोद आहे, हे मला समजले रे, पण सगळे लोक समजुन घेतील असे नाही.
वात्रट लिखाण पुरस्काराची अडचण नाही. पण जेव्हा तुम्ही गंभीर विषयावर(नाट्यभैरव वै.) पुरस्कार देउ लागता, तेव्हा गडबड होउ शकते.
ती गोष्ट लोक गंभीर पणे घेतात. मग त्याला का, मला का नाही, अशा गोष्टी सुरु होतात. उगाच स्पर्धा चालु होते.
पुरस्कार द्या, पण वात्रट लिखाणा वर.
हे वाच http://www.misalpav.com/node/2180
मी पण ह्या मताचा आहे. आपण लोकांच्यावर सोडायला हवे, त्यांना काय आवडते.
>>आपण कोण दुसर्याचे लेखन परिक्षणारे आणि त्याला पुरस्कार देणारे ?
>>सगळं हे विनोदाच्या भावनेत आहे ...
आम्हाला तुमच्या बद्दल कसलीच शंका नाही. पण सगळे जग तर तुमच्या सारखे नाही.
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
27 Jun 2008 - 4:14 pm | इनोबा म्हणे
कदाचीत त्यामुळे groupisim वैगरे वाढु शकतो. त्यामुळे मिपाचे वातावरण खराब होउ शकते.
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला ) आता याला काय म्हणावे बरे:?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
27 Jun 2008 - 4:47 pm | ब्रिटिश टिंग्या
सही रे :)
28 Jun 2008 - 9:43 pm | अघळ पघळ
सही रे इनोबा!
गटण्या, दे आता उत्तर! आता का पळून गेलास?
-अघळ पघळ
27 Jun 2008 - 11:15 am | अवलिया
आमच्या नावाचा विचार न केल्याब्द्द्ल आभारी आहोत :) :) :)
(अमीरखान) नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
27 Jun 2008 - 11:20 am | II राजे II (not verified)
"हेच एक सत्य..बाकी जग मिथ्य "
जबरा !!
पण बाकी गोष्टीसाठी गटणे साहबांशी सहमत.
माझ्या तर्फे "नो कमेंटस"
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
27 Jun 2008 - 11:40 am | धमाल नावाचा बैल
अरे काय हे? च्यायला १००० च्या वर संख्या असलेल्या मिपावर खच्चून ४-५ लोक जमता आणि त्यावर वृत्तांत काय ल्हिता???
ह्यो कट्टा जरासा फ्लॉप वाटला राव आणि बक्शिस वितरण विषयी गटण्या आणि तात्याशी १००% सहमत.
-बैलोबा
28 Jun 2008 - 12:17 am | विसोबा खेचर
गटण्या आणि तात्याशी १००% सहमत.
अहो आम्ही अंमळ संतापलो त्याची कारणं आहेत!
त्या स्वाती दिनेशने जपानवर इतकी सुंदर लेखमाला लिहिली आहे त्याचा उल्लेख आहे? रामदासभाऊ इतकं सुरेख लिहितात त्यांचा उल्लेख आहे? कशावरून हे लेखन हेतूपुरस्सर टाळलं गेलं नाही??
मग बक्षिसांचा हा कुठला पोरखेळ सुरू आहे? तेही मिपाच्या नावाखाली?
प्रत्येक गोष्ट 'ह घ्या' या सदरात मोडत नसते! निदान मी तरी या गोष्टी ह घ्या या सदरात घेऊ शकत नाही. प्रत्येक मिपाकर येथे वेळात वेळ काढून आपापल्या कुवतीनुसार, लेखनशैलीनुसार लिहितो त्या प्रत्येकाबद्दल मिपाला आदर आहे. हां, एखाद्याचं लेखन अगदीच सरस असेल, एखाद्याचं नसेल! पण प्रतिसादाच्या माध्यमातून मायबाप वाचक मिपाकर ते दाखवून देतच असतात! त्याकरता कट्टे करून मिपाच्या नावाखाली बक्षिसं वगैरे ठरवण्याचे प्रकार योग्य नव्हेत.
कट्टा जरूर करावा, धमाल मजा करावी इतपत ठीक आहे.
असो...
तात्या.
29 Jun 2008 - 12:01 am | अघळ पघळ
तात्या उगीच कशाला स्वाती दिनेश आणि रामदास बुवांना पुढे करताय तुमच्या 'अंमळ संतापा'चे खरे कारण तुम्हाला नामांकन देखिल हे मान्य करा ना! (वरच्या दोन उत्स्फुर्त प्रतिसादां सारखे१ ;) )
-अघळ पघळ
अवांतर : तात्या, असं आपल्यावर थोडीशी टिका करणारे प्रतिसाद लगेच उडवायचे नाहीत लोक बघत असतात..त्यांना काय वाटेल? :)
28 Jun 2008 - 3:07 pm | इनोबा म्हणे
अरे काय हे? च्यायला १००० च्या वर संख्या असलेल्या मिपावर खच्चून ४-५ लोक जमता आणि त्यावर वृत्तांत काय ल्हिता???
या १००० जणांमधील १०० जणांचा तरी कट्टा आता तुम्हीच भरवून दाखवा.
ह्यो कट्टा जरासा फ्लॉप वाटला राव
हे बाकी खरं आहे हा....लागोपाठ दोन पुणे कट्टे फ्लॉप गेले मिपाचे. का बरं झाल असेल असे...?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
29 Jun 2008 - 9:43 am | llपुण्याचे पेशवेll
अरे हळू हळू येतील रे लोक.
पुण्याचे पेशवे
29 Jun 2008 - 9:14 pm | इनोबा म्हणे
अरे हळू हळू येतील रे लोक.
जेवढे येतील त्यातच समाधान आहे आम्हाला!पण उगाच त्याच्या नावाने बोटे मोडू नये कोणी,एवढीच इच्छा आहे!!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
28 Jun 2008 - 4:33 pm | शैलेन्द्र
लइ तापलाय जणु, पावुस पड्णा झाला काय?
पण ते ईनाम नगा वाटु बॉ, जहागीरदारीन पेशवाई बुडवली...