असेही पालकत्व

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
16 Oct 2012 - 2:46 pm

काल माहेरी गेले. जाताच माझ्या भाच्या मी भेटल्या पर्यंतच्या ताज्या बातम्या मला लगेच देतात. तशाच त्या मी गेल्याबरोबर धावत आल्या आणि म्हणाल्य आत्या आत्या भुषणच्या मांजरीला ३-४ कुत्र्यांनी मारून टाकल. आता तिची तिन बाळं बाटलीने दुध पितात. पहिला त्या मांजरीबद्दल आणि अनाथ झालेल्या पिल्लांबद्दल वाईट वाटले. मग ही पिल्ले बाटलीने दूध कशी पितात त्या बद्दल उत्सुकता लागली. कॅमेरा नेहमीप्रमाणे होताच बरोबर. भाच्यांना सांगितले भुषणला सांगा मी फोटो काढायला येतेच दूध पाजायचे असल्यावर मला हाक मार.

भुषण म्हणजे माझ्या आईच्या शेजारी असलेल्या कुटूंबातील ८ वीतील मुलगा. आमच मानलेल नात आहे. तोही मला आत्याच म्हणतो. माझ्या भाच्यांचाही तो मानस भाऊ. त्यांच्याकडे ती मांजर अशीच आली होती. भुषणला प्राण्यांची आवड म्हणून तो तिला खाऊ घालायचा आणि मग मांजरीने आपले उदरनिर्वाह होत आहे म्हणून तिथेच वास्तव्य स्विकारले. तिथेच तिने पिलांना जन्म दिला आणि आपला अखेरचा श्वास तिथेच सोडून तिने आपले पालकत्व भुषण आणि त्याच्या कुटूंबीयांवर सोपवले.

ह्या मांजरीने प्राण सोडले तेंव्हा माझी छोटी भाची ओक्साबोक्शी रडली असे माझी वहिनी सांगत होती. त्या मांजरीबरोबर आणि पिलांबरोबर माझ्या दोन्ही भाच्या तसेच माझी मुलगी जायची तेंव्हा ती ही त्यांच्याबरोबर खेळायची.

मांजर गेल्यावर आता ह्या पिलांना कसे वाढवायचे हा मोठा प्रश्न भुषणला पडला. मग त्याच्या आईने व ताईने दुधाच्या बाटलीचा पर्याय सुचवून बाळांची जबाबदारी स्विकारली. ह्या पिलांना दर २-३ तासांनी बाटलीने दूध पाजावे लागते. पहा तर ही गोंडस पिल्ले. तिघांची नावे आहेत रोझी,सुझी,बझी.

ही पिल्ले खुप चतुर आहेत. फोटो काढताना एकत्र येतच नव्हती.

१)

२) माझ्या भाच्या किंवा भुषण ह्यांच्या जवळ बसला की त्यांच्या अंगावर चढून खेळतात तिघे पण.

३) हे पाहूनच गहिवरायला होत.

४)

५)

६)

७)

८) रिकाम्या बाटलीवरही अशी आशा असते.

९) खेळताना.

१०)

११) ही रोझी

१२) ही सुझी असावी.

१३) ही बझी आणि ह्या तिन माउंचा झालेला पालक भुषण.

जीवनमानसद्भावना

प्रतिक्रिया

पियुशा's picture

16 Oct 2012 - 3:12 pm | पियुशा

सुपर्ब अन क्युट !!!!
माउ माझा वीक पॉइट आहे :)
(सध्या दोन पिलांना सांभाळ्नारी एक मोठि माउ - पियु ;)

मी_आहे_ना's picture

16 Oct 2012 - 3:28 pm | मी_आहे_ना

खरंच त्या पिल्लांना आधार दिल्याबद्दल भूषणचे कौतुक ... फोटो मस्तच!

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Oct 2012 - 3:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

फोटो खुप छान आले आहेत (नेहमी प्रमाणेच)
विषय सुध्दा सुरेख आहे (नेहमी प्रमाणेच)
फोटो क्र ३,८,१२,१३ विषेश आवडले आहेत (नेहमी प्रमाणेच)
तुमचे अभिनंदन (नेहमी प्रमाणेच)
नेहमीचाच

पियुषा, मि आहे ना धन्यवाद.

ज्ञानोबा तुमचा प्रतिसादही आवडला नेहमीप्रमाणेच.

५० फक्त's picture

16 Oct 2012 - 6:16 pm | ५० फक्त

लई भारी,

अशा ब-याच लेकरांचा सांभाळ केलेला मी, खरं सांगतो ही माया फार वाईट असते, मांजरांची तर जास्तच वाईट.

प्रचेतस's picture

17 Oct 2012 - 8:14 am | प्रचेतस

खरंय.

इवल्याशा पिलांना वाढवण्याचं कौतुक आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2012 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

म्या......................ऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ....................http://www.sherv.net/cm/emoticons/cats/cat-chasing-tail-smiley-emoticon.gif

खुप आवडलं लेखन... --^-- :-) http://www.sherv.net/cm/emoticons/cats/cat-with-kittens-smiley-emoticon.gif

जेनी...'s picture

16 Oct 2012 - 11:09 pm | जेनी...

भुषण चं खुप खुप कौतुक :)

मला माऊच्या केसांची अ‍ॅलर्जी आहे :( ,पण माऊ बघायला खुप आवडते :)
हात नाहि लावु शकत :(

श्रीरंग_जोशी's picture

17 Oct 2012 - 12:19 am | श्रीरंग_जोशी

भूषणचे कौतुक वाटते.
फोटोजबद्दल अनेक धन्यवाद.

काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मी लहान असताना उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाउन महिनाभर राहिलो होतो. तेव्हा २-४ घरे मिळून पाळलेली एक मांजर होती. तीचे नाव इंदिरा ठेवण्यात आले होते. तिला दोन पिल्ले झाली तर मी त्यांचे नाव राजीव अन संजीव ठेवले होते. (संजय गांधींचे मूळ नाव संजीवच होते हे अनेक वर्षांनी कळले ;-).

मोदक's picture

17 Oct 2012 - 12:51 am | मोदक

मी त्यांचे नाव राजीव अन संजीव ठेवले होते.

जबरा लॉजीक रे... :-D

जागूतै.. फटू मस्त.

प्रभाकर पेठकर's picture

17 Oct 2012 - 1:53 am | प्रभाकर पेठकर

नशिब, त्या मांजरीला अंगरक्षक ठेवले नव्हते.

भडकमकर मास्तर's picture

17 Oct 2012 - 1:03 am | भडकमकर मास्तर

आठवीत पाळलेल्या मांजरीच्या पिलांची आठवण झाली.. मस्त फोटो

स्पंदना's picture

17 Oct 2012 - 5:57 am | स्पंदना

खरच माया कुणाला फुटेल काही सांगता नाही येत. भूषणच कौतूक वाटतय म्हणुन सांग त्याला.

गवि's picture

17 Oct 2012 - 10:38 am | गवि

आवडले..

लहानपणापासून सदैव मांजरं पाळत असल्याने असे अनुभव बर्‍याचदा आले आहेत. पिल्ले देऊन भाटी मरणे किंवा डोळेही न उघडलेल्या पिल्लांना अचानक त्यांच्या आईने दूर लोटणे अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकच गोष्ट जाणवली. ती अशी की माणसाच्या बाळांना देण्याच्या बाटलीचं निप्पल हे मांजराच्या लहान पिलांसाठी फार मोठं आहे. अनेक फोटोंमधे पिल्लांचा जबडा मर्यादेपलीकडे ताणला गेलेला दिसेल. त्यापेक्षा मलमलीच्या स्वच्छ फडक्याचा बोळा दुधात बुडवून त्याचा लहान भाग पिल्लाच्या तोंडात दिला तर अधिक बरं. बोळ्याच्या मोठ्या भागावर आपली पकड असावी. छोटा बोळा केला तर मांजराच्या घशात जाऊन अडकून जीव धोक्यात येऊ शकतो.

यात पाजणार्‍याला जरा जास्त त्रास आहे कारण पुन्हापुन्हा बोळा भिजवावा लागणार..पण पिल्लाचा जबडा दुखणार नाही.

माझ्या अनुभवावरुन बशीतून दिलं तरी पिल्लं पिण्यासाठी सक्षम असतात. फोटोत दिलेल्या वयाची पिल्लं तर नक्कीच. ते जास्त सेफ आहे. बशी थाळीसारखी खोल नसली म्हणजे झालं.

दादा कोंडके's picture

17 Oct 2012 - 12:32 pm | दादा कोंडके

अनेक फोटोंमधे पिल्लांचा जबडा मर्यादेपलीकडे ताणला गेलेला दिसेल.

अर्रर्र खरच की. फोटो काढण्याच्या बघण्याच्या उत्साहात ते लक्षातच आलं नाही.

अवांतरः आमच्या शेजारचांच्या मांजरीचं एक पिल्लू तीनं स्वतःच खालं होतं. उरलेली दोन पिल्लं बोक्यानं फस्त केली. :(

औषधाचं ड्रोपर पण चालत. मी आमच्या माउच्या पिल्लांना त्यातुनच औषध द्यायची. आपण दुध सुध्धा पाजु शकतो.

ड्रॉपर चालतो पण त्यात २ समस्या आहेतः
१. काचेचा ड्रॉपर नकोच.. प्लॅस्टिकचा हवा. पण तोही कडकच असतो. पिल्लाच्या तोंडात तो बोचतो. मऊ बोळ्याने येणारा तुलनेत नैसर्गिक फील ड्रॉपरमधे येत नाही.

२. बाटलीचं निपल किंवा मलमलीचा स्वच्छ बोळा यात पिल्लाच्या चोखण्याच्या प्रमाणात दूध बाहेर येतं. यात नैसर्गिक दुधाच्या डिलीव्हरीप्रमाणे मागणीनुसार आणि पिलाच्या इच्छेनुसार आवश्यक तितकं दूध बाहेर येतं. यामधे पिल्लाची स्वाभाविक क्षमताही वापरली आणि वाढवली जाते. ड्रॉपरने येणारं दूध हे पाजणार्‍याच्या इच्छेनुसार वेगाने / पाजणार्‍याच्या इच्छेच्या प्रमाणात ओतलं जात असल्याने पिल्लू त्यावर कंट्रोल ठेवू शकत नाही आणि बर्‍याचदा एका दमात जास्त दूध बळंच त्याच्या घशात जाऊ शकतं. शिवाय या प्रकारच्या पॅसिव्ह फीडिंगमुळे पिल्लं नैसर्गिक क्षमता गमावतात / ओव्हरफीड होतात.

पिल्लू अशक्त असेल, दूध खेचू शकत नसेल तर ड्रॉपरने हळूहळू द्यावं..

पालक आणि पाल्यांचे फोटो आवडले.
पाल्यांना अंमळ बाळसे आल्यावर आणखी एक फोटो सत्र होऊद्या...

सुधीर's picture

17 Oct 2012 - 1:02 pm | सुधीर

"ही माया फार वाईट असते, मांजरांची तर जास्तच वाईट."
खरंय, डोळ्यातून पाणी काढते.

Maharani's picture

17 Oct 2012 - 4:31 pm | Maharani

खुपच छान फोटो....

इरसाल's picture

18 Oct 2012 - 10:22 am | इरसाल

मला वाटले की जागुतै ने पालकाच्या भाजीचे, भजीचे किंवा तत्सम प्रकार केले असावेत. धागा उघडला तर हे मार्जार पालकत्व दिसले. छान फोटो आणी मस्त सांभाळ चाललाय हं !

सगळ्यांचे धन्यवाद. त्याला मी नक्कीच बोळ्याचे आणि ड्रॉपरचे पर्याय सांगते.

वाचुन आणि फोटो पाहुन छान वाटले.

मदनबाण's picture

18 Oct 2012 - 7:21 pm | मदनबाण

छान!
आपल्याला बाँ "रोझी" आवडली ! ;)