आतला आवाज

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
26 Jun 2008 - 9:58 pm

"मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात. माझ्या आईने मला हे सिद्ध करून दाखवलं आहे."

अशोक त्या दिवशी माझ्या घरी मुद्दाम म्हणून आला होता.त्याचे वडिल अलीकडेच निर्वतले होते.त्यांचे काही फोटो आणि त्यांनी जाण्यापुर्वी माझ्यासाठी काही पुस्तकं वाचायला म्हणून ठेवली होती.ती तो घेवून आला होता.त्याच्या वडिलांची चौकशी केल्यावर तो म्हणाला,
"हाताच्या बोटावर मोजले जातील एव्हड्याच तुमच्यासारख्या काही लोकाना माझ्या ह्या गोष्टी बद्दल माहित असावं.माझ्या वडिलाना असा एक असाध्य रोग झाला होता की त्यांचे सर्व स्न्यायु तो रोग हळुहळु आत्मसात करीत होता की ज्यामुळे ते नंतर नंतर चालू पण शकत नव्हते.

ती घटना एक आयुष्याला वेळण देणारी होती.त्या घटनेमुळे मला कुठचच कायम स्वरुपाचं निर्णय घेण्यासारखं उदाहरण शिकवून जात नव्हतं.उलट त्या सर्व घटनने मी पुरा गोंधळून गेलो की कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये.
आणि ही माझी सर्व हकिकत माझ्या वडिलांच्या निर्वतण्याच्या घटनेकडे जास्त केंद्रित नसून माझ्या आई बद्दल आहे.

मला माझ्या आतल्या आवाजावर खूप विश्वास आहे. माझे वडिल त्या आजाराने पछाडले असताना देव माझ्या आईची सत्व -परिक्षा घेत होता असं मी म्हणेन.किंबहूना मी म्हणेन आजाऱ्यापेक्षा सुश्रुषा करणाऱ्याचीच नेहमी त्रेधा होत असते.स्वतःच्या जीवाची देखभाल करून झाल्यावर त्या आजाऱ्याची पण देखभाल करणं म्हणजे एकाच व्यक्तिला दोन व्यक्तिचं काम
करण्यासारखं आहे.आणि ते सुद्धा किती दिवस करावं लागेल हे माहित नसताना.

वडिल आजारी पडून घरी असल्यामुळे तिला उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागायची.रोज कामावरून घरी आल्यावर तिला जेवण शिजवावं लागायचं.माझ्या वडिलाना तिला भरवूं लागायचं कारण स्वतःहून जेवण्याची त्यांची क्षमताच गेली होती.रात्री रात्री माझी आई जागरणं करायची कारण झोपेतही कदाचित ते घुसमटतील असं तिला वाटायचं.सकाळी उठून घरची कामं करून कामावर जायचं असलं तरी ती त्यांना आराम मिळावा याची पराकाष्टा करायची.
अखेरच्या दिवसात आपल्याला हॉस्पिटलमधे दिवस काढावे लागू नयेत ह्या वडिलांच्या एकच इच्छेकरता माझी आई तसे घडुनये म्हणून तिच्या मनातल्या भिती शी दोन हात करीत होती.

माझे वडिल खूप स्वाभिमानी होते.त्यांच्या त्या झुरत झुरत जाण्याच्या अखेरच्या दिवसात कुणी भेटायला येवू नये असं त्याना मनोमनी वाटत होतं.पण माझी आई त्यांच्या मनाविरुद्ध जावून त्यांच्या जुन्या मित्रांना बोलावून त्यांना माझ्या वडिलांचा अखेरचा निरोप घेण्याची संधी दिल्यावाचून राहिली नाही.आणि माझ्या वडिलानी जरी उघड उघड कबूल केलं नाही तरी प्रेत्यक मित्राची झालेली भेट त्याना खूप आनंद देवून गेली.

माझ्या आईने माझ्या वडिलांसाठी घेतलेली मेहनत पाहून माझ्या लक्षात आलं की तिने कंबर कसून एकट्या आधारावर त्यांची सेवा करून तिला जमेल तेव्हडं त्यांना जगूं देण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
आता माझी आई आरामात आहे.आता ती माझी काळजी घ्यायला लागली आहे.माझी आणि माझ्या वडिलांची ते आजारी असताना काळजी घ्यायची तशीच.निर्वतण्यापुर्वी माझ्या वडिलानी तिला सुचवलं होतं की त्यांच्या पश्चात ती माझी वडिलधारी म्हणून असणार.जरी ती माझे वडिल नसली ती जास्तित जास्त त्यांच्या सारखी वाटते.मधून मधून मला ती तशी गमतीत आठवण करून देते.मला जमेल तेव्हडी मी माझ्या आईला मदत करीत असतो.ती मला नेहमीच म्हणते की मला पाहून तिला माझ्या वडिलांची आठवण येत असते.

मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात. माझ्या आईने मला हे सिद्ध करून दाखवलं आहे."

त्याचं हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
"किती सत्य हा बोलतो. ह्या जगात किती लोकना कस कसले प्रॉबलेम असतात."

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Jun 2008 - 6:07 pm | विसोबा खेचर

छोटेखानी, परंतु चांगला लेख...

मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.

सहमत आहे. मलाली प्रत्येक वेळेस माझ्या आतल्या आवाजाचीच मदत होते!

सामंतसाहेब, आपल्या आईच्या आठवणीही हृद्य आहेत. वाचून बरं वाटलं!

आपला,
(मातृभक्त) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

4 Nov 2008 - 12:34 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com