देव आहे, का देव नाहीच !
एक शंका घुटमळणारी,
सदैव मनाला पोखरत आहे -
देवळाबाहेर लंगडा माणूस
एका आंधळ्याच्या ताटलीत
आदबीने जवळचे नाणे टाकत आहे -
हे असे का, ते तसे का
अपंग नसतांना माझे मन
पंगु बनायला सरावत आहे -
देव जवळून गेला तरीही
रांगेतल्या लोकांसोबत
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे !
.
प्रतिक्रिया
30 Sep 2012 - 9:25 pm | अत्रुप्त आत्मा
खरच सांगतो विदेशा..!तुझ्या काव्यात, यावेळी वेगळं म्हणावं, असं काहिच जाणवत नाहिय्ये. ....!
1 Oct 2012 - 1:10 am | प्रभाकर पेठकर
>>>>हे असे का, ते तसे का
अपंग नसतांना माझे मन
पंगु बनायला सरावत आहे -
देव जवळून गेला तरीही
रांगेतल्या लोकांसोबत
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे !<<<<
ही दोन्ही कडवी वास्तववादी आणि म्हणूनच कदाचित जास्त भावली.
.
1 Oct 2012 - 10:16 am | ज्ञानराम
कविता....आवडली
1 Oct 2012 - 12:48 pm | निश
कविता खरच विचार करायला लावणारी आहे.