प्रेमात असलं की आपल्यासोबत आपल्या पावलांखालचा निर्जीव पाचोळादेखील नाचायला लागतो आणि आभाळातला चंद्र जणू फक्त आपल्यासाठीच प्रकाशतो आहे, असं वाटतं. (माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र )
चित्रातील चंद्राचं माहीत नाही पण पक्षी तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. बगळ्यांच्या ब्रीडिंग प्लुमेजच्या वेळी बगळे असे दिसतात. वर सहज यांनी दिलेल्याप्रमाणे अन्य प्रतिमा "egret breeding plumage" अशी कीवर्ड सर्च गूगलला दिल्यावर मिळतील.
breeding plumage येण्याच्या काळात वर मान करुन आकाशाकडे बघण्याची स्टाईलही प्रणयनृत्यात दिसते.
कविताताईंवरच्या आणि त्यांच्या कलाकृतींवर होणार्या टीकेने व्यथित होऊन त्यांच्या बाजूने लिहिणार्यांना वा त्यांची भलामण करणार्यांना माझा एक प्रश्न आहे की मिपावरच्या लोकांना कविताताईंच्या बोचर्या, कुत्सित आणि उपरोधी उत्तरांचा प्रसाद मिळत होता, किंवा इतरही काही लेखन आहे, जेथे इतरांवर राळ उडवलेली आहे, तेह्वा सोयीस्कररीत्या ह्या सर्व लेखण्या का म्यान होत्या? किंवा खरेच मला हा प्रश्न पडला आहे. की समोर कोण आहे हे पाहून त्याप्रमाणे सारेच बदलते की काय? आश्चर्य मात्र वाटले नाही. खरे तर हा प्रश्न विचारण्यातही फारसा अर्थ नाही म्हणा.. तरीही.
बाकी जुने स्कोर सेटल करण्या वरून इथे हताश होणारी मंडळी पाहून तर अजूनच आश्चर्य वाटले
हा तर मिपाचा USP आहे .., जुन्या जाणत्या व्याक्तीन्कादुनच ते बाळकडू नवीन मिपाकरांना मिळाले आहे ते काही आत्ताच सुरु झालेलं नाही
ते स्कोर सेटलींग वगैरे प्रकारांशी मला मतलब नाही. तसल्या तद्दन फालतूपणाकडे लक्ष द्यायची गरजही नाही पण इतकंच मनापासून जाणून घ्यायचं आहे की हे असे सोयीस्कर प्रतिसाद देऊन तेढ सांधली जाते की अजून वाढते? अशाने नक्की काय साध्य करावयाचे असते?
जर योग्य/ अयोग्य सांगावयाचे तर ते नि:पक्षपातीपणे सांगावे, प्रत्येक वेळेसच. प्रत्येक वेळेस हे महत्वाचे. नाहीतर त्या सोयीस्कर संभावितपणाला अर्थ नाही.
एखाद्याने "आत्ता" या चालू विषयावर /चर्चेत काय म्हटलं आहे ते आत्ताच्याच चालू संदर्भात पाहणं फार उत्तम असतं. पण प्रत्यक्षात मनुष्यस्वभावामुळे तसं होणं अवघड असल्याने यापूर्वी भूतकाळात याच व्यक्तीने काय काय म्हटलं /केलं होतं हे आपण पाहतो. हेही ठीकच..
अशा वेळी आपल्याला असं दिसलं की याच व्यक्तीने यापूर्वी अशाच बाबतीत आत्ताच्या नेमकं उलट मत दिलं होतं तर मग तेव्हा विरोधाभास होतो. व्यक्तीच्या मतातली इंटेग्रिटी जाते.
(मतं बदलू शकतात हा विचार इथे बाजूला ठेवला आहे. सदैव न बदलता राहू शकणारी एक हटवादी विचारधारा सर्वांकडे आहे असं धरुन..)
पण यापूर्वी हीच व्यक्ती अशाच प्रसंगी "काहीच बोलली नाही" / "काहीच मत दिलं नाही" यावरुन आत्ताच्या त्याच्या मताबद्दल निष्कर्ष काढणं अपुरं होईल. कारण "काहीच मत न देणं" हा एक वेगळाच भाग आहे.
पॉझिटिव्ह दिसलं तर कौतुक करावं आणि आवडलं नसेल तर टीकेच्या ऐवजी मौन बाळगावं असा एक रास्त विचार काहीजणांचा असू शकतो. तलवारी, म्यान वगैरे भाषा बर्याचदा वापरली जाते, पण सर्वचजण काही लढाऊ सैनिक नसतात. दाद देण्याच्या वेळी दाद द्यावी. आवडलं नाही तर पुढे चालू पडावं, संघर्ष /वाद करत बसण्यात रस नाही असं मानणारेही बरेच असतात.
त्यातही काही लोकांना प्रत्येक वेळी आवर्जून मत देणं जमेलच असं नाही. ही काही निवडणूक नव्हे की प्रत्येक मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.
आणखीही बरीच कारणं असतात ज्यामुळे "मत न देण्याला" थेट "मूक संमती"च मानणं गैर ठरावं.
...
आत्ता म्हटलंय त्याविषयी फक्त विचार करुन मुद्दा योग्य की अयोग्य ते पाहणं ब्येष्ट..
गवि, मिपावरच्या सर्वसाधारण जनतेबद्दल हे तुम्ही म्हणालात तर मी बहुतांशी मान्य करेन. मुद्दा असा आहे, की एखाद्याला मसीहावतार धारण करायचा असल्यास, ठराविक लोकांचा मसीहा बनून राहता येत नाही. तसे वागले तर सुरुवातीला ते खपूनही जाते पण एका पॉइंटनंतर तो दुट्टपीपणा प्रत्येकाला समजतो, जरी कोणी फारसे बोलून दाखवत नसले तरीही.
दुसरे असे की अशा लोकांसाठी ही एक पळवाट होते. दर वेळी हवं तसं वागून, बोलून, पुन्हा चांगुलपणा घेऊन (!) नामानिराळे राहणे ही एक वहिवाट बनून जाते. ते चूक आहे. काळ सोकावत राहतो, ते व्हायला नको.
पूर्वीच्या मिपावर मला फोनवरून लिहिताच यायचं नाहीमग बर्याचदा वाचून परत जायला लागायचं. कधी काँपवर लॉग ऑन झालेच तर वाईट प्रतिसाद देण्यात काय वेळ दवडायचा म्हणून आवडलेल्या एक दोन धाग्याना मस्त, वा वा करून जायचे.
हल्ली फारसं यायला ही मिळत नव्हतं.
नव्या मिपावर माझ्या फोनवरून लिहिता येतंय.
प्रस्तुत चित्रकर्तीबद्दल तर तिने कुणाला काय लिहिलंय हे माहित नाही.
ता.क. या त्याच सुप्रसिद्ध लेखिका आहेत हे कळल्यावर काल कौतुकाने राजाला हे चित्र दाखवलं तर तो म्हणाला ' बापरे , ब्र सारखी भयाण कादंबरी लिहिणारी इतकं छान चित्र काढू शकेल यावर विश्वासच बसत नाही.' ;)
बाकी ती कादंबरी मला फारच आवडली होती आणि मी ती विकत घेतलीय माझ्या संग्रहात आहे आणि अधून मधून वाचत असते.
प्रतिक्रिया
28 Sep 2012 - 1:45 am | किसन शिंदे
>>>आजचा चंद्रही चित्रातल्या चंद्रासारखाच आहे. खात्री करून घ्या.
आज अंदाज आला होताच कोणीतरी हे टाकणार म्हणून. ;)
28 Sep 2012 - 1:01 pm | गवि
चित्रातील चंद्राचं माहीत नाही पण पक्षी तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. बगळ्यांच्या ब्रीडिंग प्लुमेजच्या वेळी बगळे असे दिसतात. वर सहज यांनी दिलेल्याप्रमाणे अन्य प्रतिमा "egret breeding plumage" अशी कीवर्ड सर्च गूगलला दिल्यावर मिळतील.
breeding plumage येण्याच्या काळात वर मान करुन आकाशाकडे बघण्याची स्टाईलही प्रणयनृत्यात दिसते.
28 Sep 2012 - 1:11 pm | तर्री
गुगल मिपा नजर ठेवून आहे ही आनंदाची गोष्ट !
28 Sep 2012 - 2:27 pm | यशोधरा
कविताताईंवरच्या आणि त्यांच्या कलाकृतींवर होणार्या टीकेने व्यथित होऊन त्यांच्या बाजूने लिहिणार्यांना वा त्यांची भलामण करणार्यांना माझा एक प्रश्न आहे की मिपावरच्या लोकांना कविताताईंच्या बोचर्या, कुत्सित आणि उपरोधी उत्तरांचा प्रसाद मिळत होता, किंवा इतरही काही लेखन आहे, जेथे इतरांवर राळ उडवलेली आहे, तेह्वा सोयीस्कररीत्या ह्या सर्व लेखण्या का म्यान होत्या? किंवा खरेच मला हा प्रश्न पडला आहे. की समोर कोण आहे हे पाहून त्याप्रमाणे सारेच बदलते की काय? आश्चर्य मात्र वाटले नाही. खरे तर हा प्रश्न विचारण्यातही फारसा अर्थ नाही म्हणा.. तरीही.
असो.
28 Sep 2012 - 2:33 pm | स्पा
बाकी जुने स्कोर सेटल करण्या वरून इथे हताश होणारी मंडळी पाहून तर अजूनच आश्चर्य वाटले
हा तर मिपाचा USP आहे .., जुन्या जाणत्या व्याक्तीन्कादुनच ते बाळकडू नवीन मिपाकरांना मिळाले आहे ते काही आत्ताच सुरु झालेलं नाही
28 Sep 2012 - 3:01 pm | यशोधरा
ते स्कोर सेटलींग वगैरे प्रकारांशी मला मतलब नाही. तसल्या तद्दन फालतूपणाकडे लक्ष द्यायची गरजही नाही पण इतकंच मनापासून जाणून घ्यायचं आहे की हे असे सोयीस्कर प्रतिसाद देऊन तेढ सांधली जाते की अजून वाढते? अशाने नक्की काय साध्य करावयाचे असते?
जर योग्य/ अयोग्य सांगावयाचे तर ते नि:पक्षपातीपणे सांगावे, प्रत्येक वेळेसच. प्रत्येक वेळेस हे महत्वाचे. नाहीतर त्या सोयीस्कर संभावितपणाला अर्थ नाही.
28 Sep 2012 - 4:19 pm | गवि
तुमच्या मुद्द्यात रस वाटला म्हणून लिहीतो:
एखाद्याने "आत्ता" या चालू विषयावर /चर्चेत काय म्हटलं आहे ते आत्ताच्याच चालू संदर्भात पाहणं फार उत्तम असतं. पण प्रत्यक्षात मनुष्यस्वभावामुळे तसं होणं अवघड असल्याने यापूर्वी भूतकाळात याच व्यक्तीने काय काय म्हटलं /केलं होतं हे आपण पाहतो. हेही ठीकच..
अशा वेळी आपल्याला असं दिसलं की याच व्यक्तीने यापूर्वी अशाच बाबतीत आत्ताच्या नेमकं उलट मत दिलं होतं तर मग तेव्हा विरोधाभास होतो. व्यक्तीच्या मतातली इंटेग्रिटी जाते.
(मतं बदलू शकतात हा विचार इथे बाजूला ठेवला आहे. सदैव न बदलता राहू शकणारी एक हटवादी विचारधारा सर्वांकडे आहे असं धरुन..)
पण यापूर्वी हीच व्यक्ती अशाच प्रसंगी "काहीच बोलली नाही" / "काहीच मत दिलं नाही" यावरुन आत्ताच्या त्याच्या मताबद्दल निष्कर्ष काढणं अपुरं होईल. कारण "काहीच मत न देणं" हा एक वेगळाच भाग आहे.
पॉझिटिव्ह दिसलं तर कौतुक करावं आणि आवडलं नसेल तर टीकेच्या ऐवजी मौन बाळगावं असा एक रास्त विचार काहीजणांचा असू शकतो. तलवारी, म्यान वगैरे भाषा बर्याचदा वापरली जाते, पण सर्वचजण काही लढाऊ सैनिक नसतात. दाद देण्याच्या वेळी दाद द्यावी. आवडलं नाही तर पुढे चालू पडावं, संघर्ष /वाद करत बसण्यात रस नाही असं मानणारेही बरेच असतात.
त्यातही काही लोकांना प्रत्येक वेळी आवर्जून मत देणं जमेलच असं नाही. ही काही निवडणूक नव्हे की प्रत्येक मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.
आणखीही बरीच कारणं असतात ज्यामुळे "मत न देण्याला" थेट "मूक संमती"च मानणं गैर ठरावं.
...
आत्ता म्हटलंय त्याविषयी फक्त विचार करुन मुद्दा योग्य की अयोग्य ते पाहणं ब्येष्ट..
28 Sep 2012 - 5:29 pm | यशोधरा
गवि, मिपावरच्या सर्वसाधारण जनतेबद्दल हे तुम्ही म्हणालात तर मी बहुतांशी मान्य करेन. मुद्दा असा आहे, की एखाद्याला मसीहावतार धारण करायचा असल्यास, ठराविक लोकांचा मसीहा बनून राहता येत नाही. तसे वागले तर सुरुवातीला ते खपूनही जाते पण एका पॉइंटनंतर तो दुट्टपीपणा प्रत्येकाला समजतो, जरी कोणी फारसे बोलून दाखवत नसले तरीही.
दुसरे असे की अशा लोकांसाठी ही एक पळवाट होते. दर वेळी हवं तसं वागून, बोलून, पुन्हा चांगुलपणा घेऊन (!) नामानिराळे राहणे ही एक वहिवाट बनून जाते. ते चूक आहे. काळ सोकावत राहतो, ते व्हायला नको.
तात्विक भूमिका ही व्यक्तीसापेक्ष बदलू नये इतकंच.
28 Sep 2012 - 5:34 pm | साती
पूर्वीच्या मिपावर मला फोनवरून लिहिताच यायचं नाहीमग बर्याचदा वाचून परत जायला लागायचं. कधी काँपवर लॉग ऑन झालेच तर वाईट प्रतिसाद देण्यात काय वेळ दवडायचा म्हणून आवडलेल्या एक दोन धाग्याना मस्त, वा वा करून जायचे.
हल्ली फारसं यायला ही मिळत नव्हतं.
नव्या मिपावर माझ्या फोनवरून लिहिता येतंय.
प्रस्तुत चित्रकर्तीबद्दल तर तिने कुणाला काय लिहिलंय हे माहित नाही.
ता.क. या त्याच सुप्रसिद्ध लेखिका आहेत हे कळल्यावर काल कौतुकाने राजाला हे चित्र दाखवलं तर तो म्हणाला ' बापरे , ब्र सारखी भयाण कादंबरी लिहिणारी इतकं छान चित्र काढू शकेल यावर विश्वासच बसत नाही.' ;)
बाकी ती कादंबरी मला फारच आवडली होती आणि मी ती विकत घेतलीय माझ्या संग्रहात आहे आणि अधून मधून वाचत असते.
28 Sep 2012 - 5:39 pm | श्रावण मोडक
आता माझ्या त्या असहमतीशी सहमती दर्शवणार का? मघाशीच हा प्रश्न विचारणार होतो, पण राहून गेलं. ;-)
28 Sep 2012 - 2:37 pm | चेतन
काय म्हणले आहे त्या पेक्षा कोणि म्हणले आहे हे महत्वाचे कसें ;-)
अवांतरः एकानी गाय मारली म्हणुन दुसर्याने वासरु मारु नये ;-(
28 Sep 2012 - 5:24 pm | मीनल
वरील प्रतिसाद पाहून कुणालाही कुठलेही चित्र इथे मिपावर टाकायची हिंम्म्त होइल का? विशेषतः स्वतः चे !!
बाकी चित्र १००री गाठण्याच्या दर्जाचे आहे हे दिसलेच.
28 Sep 2012 - 5:28 pm | सहज
असे नाही हा! मला आठवतेय की एकसे एक कलाकार आपली कला दाखवू लागल्याने मिपाकरांनी आग्रह करुन कलादालन नावाचा विभाग उघडायला लावला. त्यामुळे आरोप अमान्य.
धाग्यात १०० प्रतिसाद यावे म्हणुन मिपाकरही हिरीरीने साथही देतात :-)