लग्नाआधी नि लग्नानंतर !

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जे न देखे रवी...
26 Jun 2008 - 12:56 am

राम राम मंडळी --'शादी से पहले और शादी के बाद' ह्या माझ्या हिंदी कवितेचा मराठी अनुवाद :)
-------------------------------
लग्नाआधी हाती हात
शब्दांमधे मधुर मिठास
फोनवर बोलणं तासनतास
भेटल्यावरही रोजचं खास ..१

आकाशीचा रंग निळा
वा असो घनघोर वर्षा
कप कॉफीचा, एक छोटासा
दोन जीवांना हो पुरेसा ..२

लग्न होता सारे संपले
तिचे 'ना' केवळ नाव बदले
संध्याकाळी येतो घरी मी
घेऊनिया भाजीचे ओझे ..३

तसे एकांती बोलतो अजूनि
वेळेचा ना हिशोब ठेवूनि
घरखर्च नि 'फी' पोरांची
जमा संपते चुटकीसरशी ..४

मात्र आटलं प्रेम नाही
पण सांगाया वेळ नाही
करता संवाद नजरेतूनी
शब्दांचा फुका खेळ नाही ..५
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------

कविताभाषांतर

प्रतिक्रिया

मिसळपाव's picture

26 Jun 2008 - 1:45 am | मिसळपाव

पहिली वाचली म्हणून असेल, पण मुळातली हिंदी जास्त आवडली.

विसोबा खेचर's picture

28 Jun 2008 - 8:33 am | विसोबा खेचर

हेच म्हणतो...! :)

संदीप चित्रे's picture

28 Jun 2008 - 8:36 am | संदीप चित्रे

आवर्जून कळवल्याबद्दल धन्स ! साधारणपणे असं नेहमीच होतं की आधी जे वाचतो / पाहतो ते मनात जास्त ठसतं :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------