दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, अतिपरिचयात अवज्ञा होउ नये म्हणुन थोड्या उशीरानं त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे. तांत्रिक किंवा इतर माहिती फार नाही, पण पुर्वी गविंबरोबर झालेल्या चर्चेनुसार जाणं येणं आणि खाणं याची माहिती शेवटी दिलेली आहे.
प्रचि.१
प्रचि.२
प्रचि. ३
यौवनाची दोन रुपं, एक शतकांपुर्वी दगडांत उतरवलेलं दुसरं जिवंत पण दगडातलं देखील तेवढंच जिवंत..
प्रचि.४
प्रचि. ५
प्रचि. ६
प्रचि. ७
प्रचि.८
प्रचि.९
प्रचि.१०
प्रचि. ११
हे मंदिर संपुर्ण फिनिश केलेलं नसल्यानं हेमाडपंती बांधकाम पद्धतीचा अभ्यास करणं इथं शक्य आहे.
प्रचि. १२
प्रचि. १३
प्रचि. १४
प्रचि. १५
प्रचि. १६
संपुर्ण मंदिराला ह्या हत्तीशिल्पांनी उचलुन धरलेलं आहे,
प्रचि. १७
प्रचि. १८
एकतर काम अपुर्ण राहिलंय किंवा ही मंदिरं त्याकाळची आर्किटेक्ट किवा इंजिनियरिंग किंवा आर्टस कॉलेजेसची ऑन साईट प्रयोगशाळा असावीत बहुधा.
प्रचि. १९
प्रचि. २०
प्रचि. २१
हे मुख्य मंदिराचं शिखर
प्रचि.२२
बहुधा दगडाच्या क्वालिटिमुळं देखील इथलं नक्षिकाम पुर्ण होउन अपुर्ण वाटतंय, निसर्गाचा परिणाम जास्त जाणवतोय...
प्रचि. २३
प्रचि. २४
प्रचि. २५
प्रचि. २६
प्रचि. २७
प्रचि.२८
हा सादर मानाचा मुजरा त्याकाळच्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्सना, आणि अर्थात त्या प्रत्येक मजुराला ज्यानं हे काम धर्मासाठी केलं का पोटासाठी केलं का मरणाच्य भितीपोटी केलं माहित नाही, पण का करतोय या पेक्षा कसं करतोय याचं जास्त भान ठेवुन ह्या कलाकृतीला जन्म दिला, निसर्गातल्या दगडांना एक नविन रुप दिलं एक व्याख्या दिली, जगण्याची दिशा दिली, जगण्याचा आशय दिला.
हे सगळं घडताना तो निसर्ग पाहात होताच, तो या सगळ्यांचा बाप, पिता, पितामह , प्रपितामह का त्याहुनही मोठा, मेवे या इथं (http://www.misalpav.com/node/22584#comment-422386) म्हणतात तसं, एखाद्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडं आलेल्या चिल्यापिल्यांनी संध्याकाळी खेळुन दमल्यावर हात पाय धुवुन देवासमोर बसुन शुभंकरोती म्हणुन संपवावी, आणि मग एक क्षण शांतता अनुभवावी तेवढ्यात बाहेरच्या ओट्यावरुन आजोबांचा आवाज घुमावा एखादं मोठं अवघड स्त्रोत्र म्हणणारा हा जो अनुभव आहे.. तो दुस-या भागात.
प्रवासमाहिती
स्थळ - श्री शिवगोंडेश्वर पंचायतन देवस्थान, सिन्नर.
प्रवाससोय - सिन्नर गाव हे नाशिक - पुणे हमरस्त्यावर नाशिकच्या आधी ३० किमी अंतरावर आहे, पुण्याहुन जाणा-या सर्व एसटी या ठिकाणी थांबतातच, मुंबईहुन नाशिकला येउन मग पुण्याच्या बाजुला यावं लागेल,अहमदनगरकडुन येताना सुद्धा सिन्नर नाशिकच्या आधीच आहे, प्रवासाची सोय रात्री १० पर्यंत उत्तम आहे.
हा मंदिरसमुह सिन्नर गावातच पोलिस स्टेशन / कोर्टाच्या मागच्या बाजुला आहे, सिन्नर एस्टिस्टँडपासुन रिक्षाने ४० रुपये खर्च होतो, चालत गेल्यास २० मिनिटांचा रस्ता आहे.
जेवणखाण - सिन्नर औद्योगिक शहर असल्यानं इथं सर्व प्रकारचं, जेवण खाण उपलब्ध आहे, स्टँडसमोरचं पंचवटी गुजराथी थाळी ही नो रिस्क जेवणाची सोय.
सिन्नरचं एस्टि स्टँड हे एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखं दिसतं निदान बाहेरुन तरी.
प्रतिक्रिया
13 Sep 2012 - 8:54 am | अन्या दातार
खल्लास एकदम! मंदिराची शैली खजुराहोशी मिळती-जुळती वाटत आहे असे माझे निरीक्षण नोंदवून रजा घेतो.
13 Sep 2012 - 9:05 am | प्रचेतस
मस्त.
गोंदेश्वर पंचायतनाबद्दल फारशी माहिती नाही पण एकंदर शैलीवरून शिलाहारकालीन असावे
खिद्रापूराचा कोपेश्वर आणि अंबरनाथचे शिवमंदिर या दोन्ही मंदिराच्या शैलीशी कमालीचे साम्य दिसत आहे (प्रचि. क्र. १०).
बाकी ह्या पंचायतनात शिवाबरोबरच इतर कुठले देव आहेत?
भाग २ मध्ये काय?
13 Sep 2012 - 11:25 am | बॅटमॅन
हेच म्हणतो. डिट्टो खिद्रापूरचा भास झाला बघून :) शिवाय सिन्नरच्या कॉर्पोरेट स्टँडबद्दल बाडीस.
13 Sep 2012 - 11:55 am | ५० फक्त
मुख्य मंदिर शंकराचं आहे, इतर चार मंदिरं आहेत त्यात एक देवीचं आहे, ज्याला तिथली लोकं पार्वती म्हणतात, त्या खेरीज एक विष्णुचं मंदिर आहे, आणि एक गणपतीचं. त्या ख्रेरीज पाचव्या देवळात कोणता देव आहे ते समजलं नाही.
अधिक माहिती मिळण्यासाठी तुझी एक भेट गरजेची आहे.
13 Sep 2012 - 2:35 pm | सूड
पंचायतन होतं ना ? मग पाचवा सूर्य असेल कदाचित. जाणकार अधिक माहिती देतील.
13 Sep 2012 - 9:28 am | प्रभाकर पेठकर
मनमोहून टाकणारे सुंदर, बारीक नक्षीकाम आणि तत्कालीन, विस्मयकारक स्थापत्यनमुना.
13 Sep 2012 - 9:54 am | शिल्पा ब
आवडलं.
13 Sep 2012 - 10:40 am | अमोल केळकर
उत्तम माहिती
अमोल केळकर
13 Sep 2012 - 11:32 am | मी_आहे_ना
छान प्र.चि., मस्त माहिती. धन्यवाद.
(ते सिन्नर एस्टि स्टँड हे एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखं कसं दिसतं ते जरा फटू टाकून दाखवा की)
:)
14 Sep 2012 - 2:43 pm | बहुगुणी
14 Sep 2012 - 10:05 pm | रेवती
छानच आहे. स्वच्छही.
असंच ठेवायला मात्र हवं. ;)
13 Sep 2012 - 12:20 pm | अत्रुप्त आत्मा
--^--^--^--
13 Sep 2012 - 2:17 pm | गणेशा
अप्रतिम .. असंख्य सिन्नर वारीतील हे हक्काचे ठिकाण ..
फोटो दिल्या बद्दल धन्यवाद.
बाकी
श्रीराम मिसळ एक नंबर मिसळ आहे सिन्नर ची.
14 Sep 2012 - 12:35 am | पैसा
सिन्नर गावात असं काही आश्चर्य आहे हे नव्हतं बाबा महित! काय बोलू समजत नाहीये पण हे अपुरं राहिलं नसावं. पडझड आणि मूर्तीभंजनातून शिल्लक राहिलेले दगड मग पुराणवस्तू खाते कसेतरी रचून ठेवते तसं वाटतंय.
14 Sep 2012 - 1:56 pm | स्पंदना
२६ नं फोटो अतिशय म्हणजे अतिशयच आवडला.
14 Sep 2012 - 10:41 pm | ५० फक्त
अपर्णाताई, हे त्या प्रचि २६ मधले काही डिटेलस

आणि हा शेवटचा फोटो, कशाचा आहे सांगु शकेल का कोणी ?

14 Sep 2012 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार
कलाकुसर आणि शिल्पे एकदम आवडेश.
अवांतर :- शिर्षकाने उगाच नको त्या भावना चाळवल्या गेल्या.
14 Sep 2012 - 2:48 pm | बहुगुणी
'एक साधन - दोन कलाकार' म्हणताय म्हणजे पुढच्या भागात सिन्नरजवळच्याच 'गारगोटी संग्रहालया'ची माहिती असेल असं वाटतंय, खूप कौतुक ऐकलंय त्याचं...वाट पाहातो.
( प्रकाशचित्र क्र. ३ चं composition अप्रतिम! त्यावरची टिप्पणीही आवडली :-))
14 Sep 2012 - 9:25 pm | मराठे
प्रचंड शिळांमधून इतकं सुंदर आणि नाजूक शिल्पकाम करणार्या अनामिक कलाकारांना सलाम!
14 Sep 2012 - 10:06 pm | रेवती
ये धागा नजरसे सूट गया था इसलिये उशिरा प्रतिसाद दे रही हूं.
सगळे फोटू आणि थोडक्यात पण सगळी माहिती दिल्याबद्दल धन्स.
14 Sep 2012 - 10:10 pm | अर्धवटराव
त्या अनामीक कलाकारांना सलाम.
प्रची बद्दल धन्यवाद ५० जी.
अर्धवटराव
15 Sep 2012 - 2:39 pm | प्यारे१
भारीच.
छान प्रकाश चित्रे नि माहिती!
16 Sep 2012 - 10:14 pm | शिल्पा ब
संपुर्ण भारतभर बर्याच ठीकाणी अगदी छोट्या गावातुनसुद्धा जुनी मंदीरं वगैरे असावीत जी परकियांच्या तडाख्यातुन सुटली. आपल्या आजुबाजुच्या गावात सुद्धा अशी कला आढळु शकते.
16 Sep 2012 - 10:26 pm | गणपा
कोरीवकाम भन्नाट आहे. प्रचि. २२ त्याची साक्ष देतेय.
धन्यवाद हो पन्नासराव ही माहिती आणि प्रकाशचित्रे इथे दिल्या बद्दल.