बडबड

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
12 Sep 2012 - 8:36 pm

"ए हळू रे!"

"काय हळू? अशीच मजा येते!"

"म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?"

"नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?"

"ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!"

"आणि तू माझी गाय"

"पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!"

"ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना."

"नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?"

"हा हा हा"

"जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... वळणावर तरी हळू कर ना. प्लीज!"

"काही नाही होत गं... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

"बघ तरी तुला सांगत होते... हळू चालव, हळू चालव."

"हो गं! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी."

"आता समजून काय उपयोग! त्या दिवशी समजलं असतं तर आज हे असं रोज याच वेळी याच वळणावर येऊन हीच बडबड करायची अंतहीन पाळी नसती आली आपल्यावर."

कथाअनुभव

प्रतिक्रिया

लोकांनी कोणत्या हॉस्पिटलमध्ये यायचं बिका?

शुभ बोल नार्‍या तर म्हणे मांडवाला आग लागली!
काय हे यकु! आँ?
हॅलोविन जवळ येतोय एवढाच बोध घ्यायचा, बाकी काही नाही.

यकु's picture

12 Sep 2012 - 10:30 pm | यकु

मला वाटलं वैनी व बिका गाडीवरुन पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पडल्यापड्ल्या बिकांनी हे लिहिलंय.
बाकी तशीही बिकांना गाडी नीट चालवता येत नाहीच ! ;-)

श्रावण मोडक's picture

12 Sep 2012 - 11:09 pm | श्रावण मोडक
मला वाटलं वैनी व बिका गाडीवरुन पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पडल्यापड्ल्या बिकांनी हे लिहिलंय.

"पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!"

! हे राम!!! वय काय, बोलतंय काय... छ्या...खातंय आता मार बिकाचा.

हिंदी शिरियली फार पह्याला लागला का हो काका? ;)

बॅटमॅन's picture

12 Sep 2012 - 9:48 pm | बॅटमॅन

+१.

असेच म्हणतो.

शिल्पा ब's picture

12 Sep 2012 - 9:45 pm | शिल्पा ब

लेखु आवडला.
मला आधी वाटलं लोकं कशी बडबड करतात, मग काय गमतीजमती होतात असं कैतरी लिहिलंय की काय ! ही एक्दम भुताची स्टोरीच लिहिली की तुम्ही.

आदिजोशी's picture

12 Sep 2012 - 9:47 pm | आदिजोशी

बाईने बडबड केली नसती तर त्याचे चित्त विचलीत होऊन दोघे गचकले नसते.

डाण्या न सांगता परदेशी गेल्याचे बिकाने फारच मनाला लाऊन घेतलेले दिसतेय.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Sep 2012 - 6:19 am | अत्रुप्त आत्मा

पैसा's picture

12 Sep 2012 - 10:13 pm | पैसा

तरी सांगत होते, जास्त वेळ माणसांच्या जगात राहू नको म्हणून!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2012 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भयकथांना सुरुवात म्हणायची का ? ष्टोरी मस्त जमली आहे.

-दिलीप बिरुटे

पक पक पक's picture

12 Sep 2012 - 11:18 pm | पक पक पक

आवड्ल..... :)

भडकमकर मास्तर's picture

12 Sep 2012 - 11:34 pm | भडकमकर मास्तर

साधी शिम्पल भयकथा... मस्त... सोप्या भयकथंचा जॉनर एष्टाब्लिश केल्याबद्दल धन्यवाद...

नंदन's picture

12 Sep 2012 - 11:59 pm | नंदन

मरणोत्तरही बडबड थांबत नाही, हेच ह्या कथेतले 'भय इथले संपत नाही' असावे :)

सहज's picture

13 Sep 2012 - 8:15 am | सहज

भयकथा आवडली.

मन१'s picture

13 Sep 2012 - 12:40 am | मन१

अपेक्षित, सोपे पण छान.
वरील सर्वाम्शी( यकु, आदिजोशी,नंदन ह्यांच्याशी विशेष करुन) सहमत.

Nile's picture

13 Sep 2012 - 1:33 am | Nile

ष्टोरी वळकीची वाटतीए! ;-)

विकास's picture

13 Sep 2012 - 1:52 am | विकास

गोष्ट एकदम आवडली पण त्यामुळे आपण अंधश्रद्धा प्रसार तर करत नाही आहात ना असा प्रश्न पडला आहे. ;)

श्रीरंग_जोशी's picture

13 Sep 2012 - 7:07 am | श्रीरंग_जोशी

सुटसुटीत व मिश्किल भयकथा आवडली.

मी_आहे_ना's picture

13 Sep 2012 - 9:40 am | मी_आहे_ना

भयकथा आवडली

छोट्या भयकथेतुन चांगला संदेश..:)

विजुभाऊ's picture

13 Sep 2012 - 11:44 am | विजुभाऊ

छोट्या भयकथेतुन चांगला संदेश.
काय संदेश मिळाला ते आम्हालाही सांगाकी तै

गाडी जोरात चालवु नये आणि चालवताना बडबड करु नये हा संदेश. :)

निखिल देशपांडे's picture

13 Sep 2012 - 10:19 am | निखिल देशपांडे

अनुभव कथन आवडले.

अमोल खरे's picture

13 Sep 2012 - 10:34 am | अमोल खरे

तरी बिकांना सांगत होतो की भारतात दुबईसारखी बाजुला अरबी मुली घेऊन फास्ट गाडी / बाइक चालवत जाऊ नका, पण ऐकतील ते बिका कसले.

स्पा's picture

13 Sep 2012 - 10:23 am | स्पा

ठीक

कवितानागेश's picture

13 Sep 2012 - 10:30 am | कवितानागेश

ही गोष्ट नाई आवडली!
काका, दुसरी गोष्ट सांगा ना.... :)
(हाच प्रतिसाद पुढच्या कथेला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही)

ही गोष्ट लई आवडली!
बिका, दुसरी गोष्ट सांगा ना....
(हाच प्रतिसाद पुढच्या कथेला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही)

पण आधीचा संवाद जरा अजून फुलवला असता तर ...... ;)

किसन शिंदे's picture

13 Sep 2012 - 10:52 am | किसन शिंदे

सुरुवातीची पाच-सहा वाक्य वाचून जरा सरसावूनच बसलो होतो. ;)

शैलेन्द्र's picture

13 Sep 2012 - 11:54 am | शैलेन्द्र

त्याच असं आहे..
बाइकवर जर बसायच असेल, त्यातही डबल्सीट, त्यातही मागे किलबिलती मैना असेल, तर मागच्या मैनेने आपल्या हाताचा उपयोग करुन पुढच्या राघुला घट्ट सीट्बेल्ट घालावा.. अस केलं की वेगावर नियंत्रण आपसुक येत.. उगा जोरात पळवुन ब्रेका मारायची गरज पडत नाही.. :)

आनंद भातखंडे's picture

13 Sep 2012 - 2:49 pm | आनंद भातखंडे

+१

बि.का. कं लिवलय कायच कल्ल नाय ;)

पांथस्थ's picture

13 Sep 2012 - 12:44 pm | पांथस्थ

"ए हळू रे!"

आमची गाडी थोडा वेळ इथेच अडकली :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Sep 2012 - 2:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हीहीही !! भारी टाकला राव, पंच !!!

स्पा's picture

13 Sep 2012 - 2:16 pm | स्पा

हीहीही !! भारी टाकला राव, पंच !!!

विमे आता स्वतः पंच टाकायचं वय झालंय तुमच..
दुसर्यांच्या "टाकलेल्या" पंच वर काय हीही करत बसला हात ?

विमे आता स्वतः पंच टाकायचं वय झालंय तुमच..

वैयक्तिक आणि अवांतर प्रतिसाद. संपादक मंडळ श्री. स्पा यांना समज देईल काय?

-
(उगाच) कावणे.

इरसाल's picture

13 Sep 2012 - 12:52 pm | इरसाल

१. घ्या
२. आय्ला
३.खरच काय
४. आम्ही बघतोय हं
५. काय तरीच काय ?
६. कोण म्हणे
७. संदेश का.. बरं बरं कोणता ?
८. काही कळलं असेल तर शपथ.
९.ह्यांच आपलं वेगळंच.
१०. आवडला/नाय आवडला

इति समर्पित.

सस्नेह's picture

13 Sep 2012 - 1:15 pm | सस्नेह

मस्त कथा. 'भयकथा' म्हणणे योग्य वाटत नाही.
बिका, अजून जरा खुलवा ना कथा. वाचे-वाचेपर्यंत संपली !

पप्पु अंकल's picture

13 Sep 2012 - 3:15 pm | पप्पु अंकल

भावना पोचल्या.
वळणावर सांभाळू

विनायक प्रभू's picture

13 Sep 2012 - 3:57 pm | विनायक प्रभू

शेवट आल्यावरच भयकथा असल्याचे कळ्ळे.
मला तर बॉ सुरुवातीला वेगळेच वाटले.

नाना चेंगट's picture

13 Sep 2012 - 7:16 pm | नाना चेंगट

तुमचं असंच आहे. आधी तुम्हाला वेगळं वाटतं नंतर कळतं सेमच आहे ;)

लेखन छान :)

प्यारे१'s picture

13 Sep 2012 - 9:17 pm | प्यारे१

अरेच्चा???????

रोज बल्ल्या का आता? ;)

गाडी बदला नशीब बदलेल.

-ररा पै

पिवळा डांबिस's picture

14 Sep 2012 - 2:14 am | पिवळा डांबिस

च्यामारी, विडंबन करायच्या उत्साहात अभिप्राय द्यायचा राहूनच गेला की!!!!
उत्तम लघुभयकथा!
साधी, सोपी, उगाच फापटपसारा नाही!!!

पण कितीहि परिश्रम करून रिपोर्ट पुढ्यात ठेवला तरी आमचे खवचट प्रोफेसर जसं म्हणायचे त्याप्रमाणे,
"इट्स अ गुड स्टार्ट!"

नाही म्हणजे या वर्षी भयालीताईची शिव-ब्रूम उचलायचीये तुम्हाला!!!
:)