काय करावे कळत नव्हते
मागुनही मिळत नव्हते
सरपटणार्या त्या आयुष्याला
हक्काचे असे बिळच नव्हते
--------------------------
काय करावे कळत नव्हते
कुणी आपुले म्हणतच नव्हते
शिवलेल्या त्या कावळ्याला
जिवंतपणि जगणेच नव्हते
--------------------------
काय करावे कळत नव्हते
समोर असून दिसत नव्हते
ती हाक ओठांवर पेलण्याला
शब्द माझे धजत नव्हते
----------------------------
काय करावे कळत नव्हते
रक्त व्यथेतून रुकत नव्हते
ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे
अरे घाव काय थोडे होते
-- कौस्तुभ
प्रतिक्रिया
25 Jun 2008 - 11:01 am | प्राजु
वेगळ्या प्रकारची आहे कविता.
काय करावे कळत नव्हते
रक्त व्यथेतून रुकत नव्हते
ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे
अरे घाव काय थोडे होते
इथे
रक्त व्यथेतून खळत नव्हते
हे कसे वाटेल..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Jun 2008 - 2:34 am | अरुण मनोहर
प्राजुताई माफ करा. रागवू नका. पण मला असे वाटते की कवीच्या मूळ संकल्पना बदलू नये.
कधी कधी उत्साहाच्या भरांत कवीला नेमके जे म्हणायचे आहे त्याच्या विरु द्धच सुचवले जाते.
आता इथेच पहा-
कवी म्हणतो-
काय करावे कळत नव्हते
रक्त व्यथेतून स्त्रवत नव्हते
ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे
अरे घाव काय थोडे होते
म्हणजे मोरपिसांचे घाव बसून देखील रक्त आलेच नव्हते.
तुम्ही सुचवले- रक्त व्यथेतून खळत नव्हते म्हणजे रक्त आले व येवढे प्रचंड की ते थांबेचना.
ह्या दोन अगदी वेगळ्या कल्पना आहेत. हां, आता तुम्हाला केवळ एक वेगळी संकल्पना म्हणून तसे सुचवायचे असेल तर ती एक वेगळीच कविता होईल.
कौस्तूभची कविता आवडली....
25 Jun 2008 - 4:57 pm | मदनबाण
काय करावे कळत नव्हते
रक्त व्यथेतून रुकत नव्हते
ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे
अरे घाव काय थोडे होते
हे फार आवडल.....
मदनबाण.....
25 Jun 2008 - 10:35 pm | शितल
काय करावे कळत नव्हते
समोर असून दिसत नव्हते
ती हाक ओठांवर पेलण्याला
शब्द माझे धजत नव्हते
हे मस्त
26 Jun 2008 - 9:10 am | विसोबा खेचर
अंमळ भारीच कविता आहे राव!
आपला,
(रक्तबंबाळ) तात्या.
26 Jun 2008 - 3:21 pm | कौस्तुभ
सर्वांचे आभार!