नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सुप्रीम कोर्टानेही पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. सविस्तर बातमी येथे - http://www.hindustantimes.com/India-news/NewDelhi/Kasab-death-penalty-up...
या निकालानिमित्त मला पडलेले काही प्रश्न -
१. असे कळले की परत हा अतिरेकी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करू शकतो. असे आपल्या घटनेत आहे म्हणे, भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीला घटनेने दिलेले अधिकार असतात का / असावेत का?
२. राजकारणी पैशाचे घोटाळे करतातच आणि आपण ते सहनही करतो पण देशाच्या दृष्टीने या संबंधात घटना दुरुस्ती करून (३/४ मते) अतिरेकी हे भारतीय नसल्याने त्यांना वेगळे फास्ट ट्रॅक कोर्ट, वेगळे कायदे का असू नयेत.
३. २६-११-२००८ पासून ह्या अतिरेक्याला आपण पोसत आहोत याचा खर्च कुठून होतो?
४. परत जर दयेचा अर्ज होऊन फाशी लांबणार असेल तर परत दयेच्या अर्जावर विचार होऊन फाशीला किती वेळ लागेल सांगता येत नाही (येथे भाबड्या भारतीय मनाला परत असेच वाटते की राष्ट्रपती फाशीच कायम ठेवतील) तोपर्यंत त्याला परत आपल्या देशाने पोसायचे का?
५. अतिरेक्यांचा प्रश्न लवकर सुटेल (किंवा अशीच नरमाईची, बोटचेपेपणाची धोरणे राहिली तर तो कायमचा सुटेलच) असे वाटत नाही, त्या दृष्टीने लवकरात लवकर त्या संबंधात नवीन कायदा किंवा घटना दुरुस्ती महत्वाची नाही का?
प्रतिक्रिया
29 Aug 2012 - 12:10 pm | पुण्याचे वटवाघूळ
त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी आणि मिसळपाववरील कसाबवरच्या/दहशतवादावरच्या धाग्यांचा भस्मासूर कायमचा बंद व्हावा ही सदीच्छा.
29 Aug 2012 - 12:14 pm | प्रसाद प्रसाद
दहशतवादाचा भस्मासूर संपत नाही तोपर्यंत अशाप्रकारच्या तुम्ही म्हणता तसा अशा धाग्यांचा भस्मासूर संपेल असे वाटत नाही.
29 Aug 2012 - 12:20 pm | अत्रुप्त आत्मा
29 Aug 2012 - 1:40 pm | मोहनराव
परंतु आत्म्याच्या स्मायलींचा भस्मासुर कधीच संपणार नाही! ;)
29 Aug 2012 - 2:23 pm | अत्रुप्त आत्मा
@भस्मासुर कधीच संपणार नाही! >>> चिअर्स....!
29 Aug 2012 - 3:50 pm | श्री गावसेना प्रमुख
29 Aug 2012 - 5:51 pm | पैसा
तुम्ही विचारलेले प्रश्न मला पण पडतात. पण उत्तरे कोणीच देत नाहीत!
29 Aug 2012 - 6:18 pm | सागर
१. असे कळले की परत हा अतिरेकी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करू शकतो. असे आपल्या घटनेत आहे म्हणे, भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीला घटनेने दिलेले अधिकार असतात का / असावेत का?
भारताची घटना ही फक्त भारतात आणि कायदेशीर भारतीय नागरीकत्व असलेल्या व्यक्तीलाच फक्त लागू होते. एन.आर.आय. व विदेशी नागरीकांना काही वेगळे कायदे आहेत. पण देशात घुसून सर्वसामान्य नागरीकांना गोळीबार करुन ठार करणार्या नराधम अतिरेक्यांना न्यायालयीन प्रक्रियेचा निकष लावणे हा एक प्रकारे घटनेचाच अपमान आहे. सर्वसामान्य लोकांनी कष्ट करुन कमावलेल्या पैशातून देशाला दिलेल्या टॅक्सच्या रकमेचा राजरोसपणे केलेला गैरवापर आहे. कसाबची न्यायालयीन प्रक्रिया व सर्व खर्च हा एक फार्स आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण इस्त्रायलसारखे ताकदीने खेळण्याची ताकद भारतात दुर्दैवाने नाहिये. बोटचेपी भूमिका घेणार्या बुद्धीवाद्यांनी सहिष्णुतेचे कोंदण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर भारताच्या भूमिकेला चिकटवले आहे.
(हे अर्थातच माझे वैयक्तीक मत आहे.अनेकांना हे पटेल, किंवा पटणारही नाही)
29 Aug 2012 - 6:19 pm | सागर
३. २६-११-२००८ पासून ह्या अतिरेक्याला आपण पोसत आहोत याचा खर्च कुठून होतो?
अर्थातच आपल्या खिशातून ;)
29 Aug 2012 - 11:10 pm | राही
कसाब हा सध्या भारताच्या हातातला हुकुमी एक्का आहे. दहशतवाद्यांच्या वर्तुळात अति महत्त्वाचे स्थान असलेला अबु जिंदाल हा भारताच्या हातात आल्यावर त्याची आणि कसाबची भेट घडवून आणण्यात आली. काही प्रश्नोत्त्तरेही झाली असतील. यातून नक्कीच काही अधिकचे धागेदोरे हाती लागले असतील. अजूनही कित्येक दहशतवादी हाती लागायचे आहेत. त्यांच्या चौकशीच्या वेळी 'कसाब कनेक्शन' उपयोगी पडू शकते.
31 Aug 2012 - 3:59 pm | रमेश आठवले
राही यांच्याशी मी सहमत आहे.
कसाब हा पाकिस्तान भारताविरुद्ध अखंड करीत असलेल्या कारवायांचा सगळ्यात मोठा आणि जीता जागता पुरावा आहे. त्याची वेळ भरेपर्यंत त्याला सांभाळून, जागतिक माध्यमातून त्याच्या कृत्याविषयी प्रचार करीत राहणे गरजेचे आहे.
त्याने दयेचा अर्ज केल्यास त्यांचा अनुक्रमे क्रमांक १२ येईल.
एकदा सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर अपराधांची प्रतवारी करून कोणाला आधी किंवा कोणाला नंतर फाशी द्यायची हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नसावा
30 Aug 2012 - 12:13 am | सुहास
फाशीसाठी आणि दयेच्या अर्जासाठी खूप लोक लायनीत आहेत म्हणे, त्यात कसाबचा नंबर कितवा आहे त्यावर फाशी कधी मिळेल ते ठरेल... कसाबच्या आधी राजीव गांधींचे मारेकरी आहेत, तसेच अफजल गुरू नावाचा एक प्राणी आहे ज्याची केस पॉलिटिकली सेन्सिटीव्ह होऊ शकते म्हणे...
-- सुहास
30 Aug 2012 - 4:16 pm | हुप्प्या
तमाम फाशी दिलेले कैदी हे योग्य त्या क्रमानेच फाशी दिले जावेत असा संकेत आहे का? काही अतीमहत्त्वाच्या कैद्यांकरता हा नियम शिथिल का करु नये?
कसाबही संपेल आणि काँग्रेसला फुशारक्या मारता येतील की बघा आम्ही न भिता त्याला फाशी दिले.
31 Aug 2012 - 1:36 am | सुहास
कसाबही संपेल आणि काँग्रेसला फुशारक्या मारता येतील की बघा आम्ही न भिता त्याला फाशी दिले.
तुम्ही म्हणता तसे होईल पण त्याला थोरल्या गांधी बाईंसारखे धाडस लागेल जे त्यांनी मकबूल भट केस मध्ये केले...!
कसाबला फाशी लवकर द्या वा उशिरा, पण एखादे कंदाहार सारखे प्रकरण झाल्यावर सोडू नका म्हणजे मि़ळवली..
--सुहास
31 Aug 2012 - 7:58 pm | विकास
तुम्ही म्हणता तसे होईल पण त्याला थोरल्या गांधी बाईंसारखे धाडस लागेल जे त्यांनी मकबूल भट केस मध्ये केले...!
सहमत, पण ते धाडस करण्या आधी रविन्द्र म्हात्रे (ज्यांच्या नावाने पुण्यात म्हात्रे पूल आहे) यांना शहीद व्हावे लागले हे विसरता कामा नये. या संदर्भात विकीवरील माहिती येथे थोडक्यात लिहीत आहे: (त्यातील ठळक केलेल्या तारखा बघाव्यात)
मकबूल भट हा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट चा संस्थापक सदस्य होता. १४ सप्टेंबर १९६६ ला त्याने भारतीय सुरक्षा जवानांवर हल्ला केला. त्यात एक जवान आणि एक दहशतवादी मारला गेला. पण मकबूल भट पकडला गेला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली.
१९६८ साली त्याने श्रीनगर मधील तुरूंगातून भुयारी मार्ग काढला आणि पाकीस्तानात पळून गेला. (तेथे त्याला काही काळासाठी अटक केली गेली. अर्थातच परत पाठवले गेले नाही.)
१९७१ साली त्याने लाहोरला एक विमान अपहरण केले आणि त्यात जम्मू-काश्मीरला स्वतंत्र घोषित करून स्वतःस त्याचे नेता ठरवले. पाकीस्तान सरकारने त्याला परत अटक केली पण १९७४ साली सोडून दिले. नंतर तो परत भारतात घुसखोरी करून आला, पण पकडला गेला. त्याची आधीची फाशीची शिक्षा ग्राह्यच असल्याने त्यावरच शिक्कामोर्तब केला गेला. नंतर त्याने राष्ट्रपती ग्यानी झैलसिंगांकडे दयेचा अर्ज केला. झैलसिंग हे १९८२ साली राष्ट्रपती झाले, याचा अर्थ साधारण १९७५ पासून ते तो पर्यंत शिक्षेचे विधान तसेच पडून होते. नंतर त्याला सोडावे म्हणून आयएफएस मधील रविन्द्र म्हात्रे यांचे ब्रिटन मध्ये अपहरण झाले. पण वाटाघाटी होऊ शकल्या नाहीत आणि त्यात म्हात्र्यांना दुर्दैवाने प्राण गमवावे लागले. त्यानंतर (ज्यांना येथे आठवत असेल त्यांना) देशभरात संतापाची लाट उसळली होती. सरकार विरोधात नसावी पण जनता चिडली होती. इंदिरा गांधी विक्रोळीस अंत्यदर्शन घ्यायला आल्या होत्या. आणि नंतर चक्र फिरले, राष्ट्रपतींनी मकबूल भटचा दयेचा अर्ज नाकारला आणि तात्काळ फाशीची शिक्षा १९८४ सली अमलात आणली.
कारणे काय होती माहीत नाही, पण इंदीरा गांधी बोटचेप्या नसल्याने आत्ता सारखेच असेल असे वाटत नाही... मात्र त्यात एका सनदी अधिकार्याची हत्या झाली. अजूनही त्याच संदर्भात काही घडले असले तर माहीत नाही. जेकेएलएफ नक्कीच वाढत गेली आणि काश्मीर प्रश्न भडकत गेला. पण १९६६ ते १९८४ असा १८ वर्षाचा काळ हा फाशीची शिक्षा मिळून ती देण्यात गेला.
राहून राहून इंदिराजींबद्दल एकच म्हणेन की त्यांनी चुका केल्या पण लक्षात आल्यावर त्या दुरूस्त करायला मागेपुढे पाहीले नाही. ऑपरेशन ब्लू स्टार हे त्याचे सर्वोच्च उदाहरण आहे. दुर्दैव इतकेच की त्याचे दुष्परीणाम त्यांना आणि देशाला भोगावे लागले... असो.
31 Aug 2012 - 3:37 pm | रमेश आठवले
गूगल वर शोध करून मिळालेल्या माहितीनुसार नवीन राष्ट्रपती मुखर्जी यांच्याकडे सध्या ११ दयेचे अर्ज विचाराधीन आहेत. कसाबने अजून दयेचा अर्ज केलेला नाही.
30 Aug 2012 - 4:22 pm | इरसाल
२०१४ ला होणार वाटल्यास लिहुन देतो.
हा नक्की दयेचा अर्ज भरणार आणी दॉदॉ २०१४ पर्यन्त लटकवणार.
निवडणुकीच्या आधी ह्याचा नारळ फोडणार.
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र एक र्हायलं हुतं....
जर का मध्यावधी निवडणुका लागल्या तर मग ह्याचा नारळ कधीही फुटु शकतो.
30 Aug 2012 - 5:43 pm | गवि
दयेच्या अर्जासाठी लागणारी कारणं : अज्ञान वयोगट, आरोप झालाय तितका "रेअरेस्ट ऑफ रेअर" गुन्हा नसणे, कुटुंबाचा एकमेव कमावता आधार, अटकेनंतर पश्चात्ताप, चांगली वागणूक, कस्टडीदरम्यान सहकार्य, बदल / सुधारणेची दृश्य शक्यता यापैकी काहीही नसताना आणि त्याने एकदाही दाखवलेलं नसताना कोणत्या ब्याक्ग्राउंडवर तो दयेचा अर्ज स्टँड होणार आहे.. ? मान्य होणं तर दूरच..
31 Aug 2012 - 12:25 am | विश्वनाथ मेहेंदळे
ज्या ब्याक्ग्राउंडवर मागचे ३५ झाले त्याच.