तो घरात येताच नोकरावर ओरडला,
"ए, बघतोस काय माझे बुट काढ"
पत्नी तिथे येऊन विचारती झाली,
"कधीपासून तुम्हांला विचारावे म्हणते, तुम्ही रोज कुठे जात असता, की तुमचे बुट इतके बरबटतात.. पाऊस पाणी नसताना बुटांना चिखल कसा लागतो, आणि हा चिखल असा रंगबिरंगी, आकर्षक कसा?"
मोठ्याने हसत, उन्मादाने तो म्हणाला,
"हे जाणून घेण्याची गरज तुला काय? मोठे पद, सत्ता, संपत्ती हे सगळे तू उपभोगायचे आणि आनंदी रहायचे..."
ताड ताड पाऊलं टाकत तो आपल्या खोलीत निघून गेला...
नोकराला त्याच्या बाईसाहेबांची विमनस्क स्थिती पाहवली नाही, तो खालमानेने उत्तरला,
"बाई, लोभ, माया, मद्य, मत्सर वासना ह्या सम्द्याचा चा तो रंगबेरंगी च्चिख्खल आहे....
आलोच म्या ह्यो अहंकाराचे बुट सोच्छ करुन, उद्या पुन्यांदा त्यास्नी घालायला लागतील"
-वेणू
प्रतिक्रिया
10 Aug 2012 - 5:55 pm | नाना चेंगट
ओके.
10 Aug 2012 - 6:11 pm | आत्मशून्य
.
10 Aug 2012 - 6:18 pm | चिगो
नोकर "हे" बुट कशाने स्वच्छ करतो म्हणायचा? नाही म्हणजे कुठल्या भावनांचे डिटर्जंट, पॉलिश, ब्रश, कापड इत्यादी वापरतो?
असो..
10 Aug 2012 - 6:38 pm | किसन शिंदे
हम्म!
10 Aug 2012 - 7:57 pm | तिमा
जो दुसर्याचा दिसतो ,पण स्वतःचा कधीच दिसत नाही.
11 Aug 2012 - 12:14 am | अत्रुप्त आत्मा
:)
11 Aug 2012 - 2:38 pm | आनंदी गोपाळ
आयमीन डू यू गेट नोकर्स टू गेट रिड ऑफ युवर अहंकार? आय वुडन्ट माईंड एम्प्लॉइंग वन मायसेल्फ ;)