गोल्डफिश आणि गेस्टाल्ट

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
10 Aug 2012 - 12:09 pm

माझ्या काल या लेखावर गविचा एक सुरेख प्रतिसाद आहे

स्टीफन हॉकिंग्जच्या द ग्रँड डिझाईन या थरारक पुस्तकात त्याने जगाच्या अस्तित्वाविषयी जे काही विचार मांडले आहेत ते मुळापासून वाचण्यासारखे आहेत. ग्लास बाऊलमधल्या गोल्डफिशला बाहेरचं जग अत्यंत डिस्टॉर्टेड, मेग्निफाईड आणि भलतंच दिसतं. त्याचा तोच पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याने त्या आभासाशी जुळवून घेतलं आहे. आपणही गोल्डफिश आहोत आणि आपल्याला जे भासतं (काळ म्हणा किंवा स्पेस म्हणा किंवा आणि काही मसण म्हणा) ते आपल्याला भासतं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जरी गोल्डफिशने हे परसेप्शन आहे, भास आहे आणि बाऊलबाहेर खरं जग आहे किंवा नाही इत्यादि तात्विक शक्यता कितीही चर्वण केल्या तरी बाऊलमधून जे दिसतंय त्याला खरं मानून जगण्याखेरीज गोल्डफिशला दुसरा ऑप्शनही नाहीये..

गोल्डफिश

प्रतिसाद अत्यंत प्रातिनिधिक आहे त्या अनुषंगानं `गेस्टाल्ट' काय चीज आहे ते विशद करणारा हा लेख

________________________

पहिली गोष्ट, "आपण गोल्डफिश आहोत" ही मान्यता आहे, वस्तुस्थिती नाही.

तिथेच आलेल्या निरंजनच्या प्रतिसादातून त्या मान्यतेच नेमकं कारण व्यक्त होतं :

आयुष्य क्षणभंगुर आहे हे माहित असूनही एक खेळ म्हणून मला ते खेळायचंय, त्यातले सुख-दु:ख, ताण-तणाव सगळ्याचेच नियम पाळून आणि त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन. त्यामुळे शरीर म्हणजेच मी एवढे अध्यात्म मला सध्या पुरेसे आहे.

प्रश्न आयुष्य क्षणभंगुर आहे किंवा ते इन्व्हॉल्व्ह होऊन जगण्याचा नाहीये, त्यातली सुख-दु:ख, ताण-तणाव वगळून जगण्याचाय! तिथे गविला प्रतिसाद देताना संदीप खरेच्या या अप्रतिम काव्यपंक्ती उधृत केल्यात :

मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरि स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो

ही चौकट लंघून पार निघण्याचं रहस्य एका साध्याशा गोष्टीत लपलंय ती म्हणजे गेस्टाल्ट बदलणं!

_______________________
"गेस्टाल्ट" हा गुर्जीएफचा आवडता शब्द! गेस्टाल्टला मराठी प्रतिशब्द नाही; त्याचा अर्थ "दृष्टीचं रूपांतरण" असाये.

दृष्टीचं रूपांतरण म्हणजे दृष्टीकोन बदलणं नाही, दृष्टीकोन बदलणं तिच गोष्ट नव्या अ‍ॅंगलनं पाहणंय , तिची अधिक माहिती मिळवणंय, त्यानं ज्ञान वाढेल पण सत्य गवसणार नाही. गेस्टाल्ट चेंज म्हणजे ज्या नजरेनं आपण आतापर्यंत आकार पाहात होतो त्या नजरेनं निराकार पाहणं किंवा जी नजर सदैव समोर रोखलेली होती तिचा रोख वळवून स्वत:ला पाहणंय, जस्ट अ हंड्रेड अ‍ॅंड एटी डिग्री टर्न ऑफ द गेझ!

बुद्ध " बात तो आखोंके सामने थी और मैं कहाँ कहाँ ढूंढता फिरा" म्हणतो आणि आपल्याला समोर बघून निराकार दिसत नाही याचं कारण गेस्टाल्ट आहे; दृष्टीला सतत आकार बघण्याची सवय झाल्यामुळे निराकार दिसत नाही.

फोटोतलं काचपात्र देह आहे, गोल्डफिश `आपण व्यक्ती आहोत आणि काचपात्रात बंद आहोत' ही आपली धारणाये आणि सतत शरीरातून बाहेरचं जग पाहात असल्यानं ते डिस्टॉर्टेड वाटतय. ही बद्धता `मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी ' असं वाटायला लावतेय आणि `मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो ' असं म्हणायला लावतेय.

`तो सताड उघड्या खिडकीपरि स्वच्छंदी' हे आपलं निराकार स्वरुप आहे आणि ज्या क्षणी या धरणेतून आपण मुक्त होतो त्या क्षणी `तो लंघून चौकट पार निघाया बघणारा' बंदी स्वछंद होतो!
_______________________

गेस्टाल्ट बदलणं सोपयं:

प्रथम ओशो काय म्हणतात ते बघू : ज्याप्रमाणे तुम्ही डोळ्यांनी समोर बघता त्याचप्रमाणे मागे (किंवा स्वतःकडे, म्हणजे बघणार्‍याकडे) देखील बघू शकता. आत्ता या क्षणी तुम्ही समोरची वस्तू बघा आणि त्याच वेळी स्वतःकडे देखील बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला आता नुसती समोरची वस्तू दिसणार नाही तर तिच्या अवतीभवतीची जागा देखील दिसू लागेल, तुमच्या आणि वस्तुच्यामधलं "अंतर" जाणवायला लागेल, तुमचे विचार थांबतील, तुम्हाला शांत वाटायला लागेल. नजरेला असं बघायची सवय नसल्यामुळे सुरुवातीला जरा अवघड वाटेल पण नुसत्या गेस्टाल्ट चेंजनी मनावरचं दडपण जाऊन हलकं वाटायला लागेल. फक्त ती वस्तू न जाणवता तुमच्या शरीराच्या भोवतालची जागा सुद्धा जाणवू लागेल, हा निराकाराचा बोध आहे. कोणत्याही सिद्ध पुरुषाचे डोळे बघा ( ओशोंचे बघा) ते स्थिर दिसतात, ही स्थिरता नजरेचा गेस्टाल्ट बदलल्यामुळे आलेली आहे... ती नजर एकाच वेळी आकार आणि निराकार दोन्ही पाहातेय.

नुकत्याच जन्मलेल्या लहान मुलाचे डोळे कधी पाहिलेत? ते अनाहूतपणे निराकाराशी संपर्क ठेवून असतात, आपण म्हणतो मुलाची नजर अजून स्थिर झाली नाही. हळूहळू मुलाला फोकसिंग शिकवलं जातं (आणि कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी ते अनिवार्यपणे करायला लागतं), मग त्याचा निराकाराशी संपर्क तुटतो.
__________________________

गेस्टाल्ट बदलल्यामुळे जीवनात अनेक परिवर्तनं घडून येतातः

कोणत्याही खेळात किंवा नृत्यात प्राविण्य मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीरापासूनचं वेगळेपण जाणवणं, सगळा रियाज फक्त या एका गोष्टीसाठी चालू असतो, बाकी कौशल्य, स्वतःची स्टाइल वगैरे नंतर येतं. गेस्टाल्ट बदलल्यामुळे तुम्हाला आपण शरीरापासून वेगळे आहोत असं जाणवू लागेल, शरीरात एक हलकेपणा जाणवू लागेल.

तुम्ही जीवनाकडे आणि कोणत्याही प्रश्नाकडे त्याच्या समग्रतेनं बघू लागाल, निष्कारण डिटेल्समध्ये शिरणं आणि गुंतून पडणं कमी होईल. तुमच्या आकलनाचा आवाका वाढेल, एखादी गोष्ट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत कळू लागेल.

आकारात अडकलोय असं वाटल्यानं निराकाराची सुटका दिसत नाही, ती कळू लागेल, "आता सर्व पर्याय संपले" असं वाटत असताना अचानक नवा पर्याय उपलब्द्ध होइल.

______________________________

सारखे आकार बघायची सवय आणि नजरेनं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के संवेदना ग्रहण असल्यानं सर्वात जास्त ताण आपल्या डोळ्यांवर आहे (पण आता त्याची इतकी सवय झाली आहे की तो जाणवत नाही); गेस्टाल्ट बदलल्यानं तुमच्या नजरेवरचा आणि पर्यायानी मनावरचा ताण कमी व्हायला लागेल.

एकदा तुमचा नजरेचा गेस्टाल्ट बदलला की इतर संवेदनांचे गेस्टाल्ट पण बदलू लागतील, एकण्याचा गेस्टाल्ट हळूहळू बदलायला लागेल; आवाजा बरोबर तुम्हाला शांतता देखील ऐकू यायला लागेल. गाण्याचा किंवा वादनाचा सगळा रियाज कलाकाराला शांतता ऐकू आली नाही तर व्यर्थ होतो; कारण प्रत्येकाचा आवाज जरी वेगळा असला तरी ज्या पडद्यावर सूर उमटातायत ती शांतता एक आहे आणि जो पर्यंत शांततेचा फिल येत नाही तो पर्यंत स्वराला गोडवा नाही; मजा म्हणजे तुम्हाला स्वतःचा आवज गोड वाटायला लागेल!

"स्पर्शाचा गेस्टाल्ट बदलणं" अध्यात्मातलं बहुदा सर्वात महत्त्वाचं परिमाण आहे. तुम्ही संवेदनेकडून ज्याला संवेदना होते आहे त्याच्याकडे (म्हणजे स्वतःकडे) वळता. तुम्हाला कळतं की भोग जरी कोणताही असला तरी भोगणारा एकच आहे आणि तो एकदा स्थिर झाला की सगळे भोग सारखे आहेत. ज्ञानी संभोगाचं सुख उपभोगतो असं म्हणतात पण ते तसं नाहीये, त्याला सगळे भोग सारखा आनंद देऊ लागतात, ते `सम' होतात कारण त्याचा गेस्टाल्ट बदललेला असतो.

______________________

`स्वस्मरण' हा गुर्जीएफचा दुसरा आवडता शब्द! ज्या क्षणी तुम्हाला दु:ख, निराशा, ताण-तणाव घेरेल, तुमचा मूड जाईल त्या क्षणी स्वतःला सावरा कारण आपण गोल्डफिश आहोत असं तुम्हाला पुन्हा वाटायला लागलय इतकाच त्याचा अर्थये. समग्रतेनं फक्त समोर पाहा, तुमचा गेस्टाल्ट बदलेल, तुम्ही काचपात्रातून बाहेर पडलेले असाल!

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

निराकार गाढव's picture

6 Dec 2015 - 10:46 pm | निराकार गाढव

हो ना!
क्खूप्प क्खूप्प मज्जा आली.
.

अजया's picture

6 Dec 2015 - 11:01 pm | अजया

=)))))))
गाढवाला मजा आली तर आम्हालापण आली.

कवितानागेश's picture

7 Dec 2015 - 1:06 am | कवितानागेश

काय बाई वात्र ट मूली आहेत!
येऊ दे की ठाकुर आजोबाना मज्जा. तुम्हाला काय करायचय?

मितान's picture

7 Dec 2015 - 6:21 am | मितान

माझी सकाळ सार्थक झाली !!!

ईश्वरसर्वसाक्षी's picture

20 Jan 2016 - 3:06 pm | ईश्वरसर्वसाक्षी

आपल सेम हिअर