व्हायचं ते तसं होऊन गेलं आहे
फक्त आठवणी उरल्यात आता
कालचा दिवस केव्हाच संपला
आलीस सोडून तू काटेरी वाटा
समजायचं तसं ते एक वादळ होतं
आयुष्याला फिरवून ते निघून गेलं
किती खंबीर आहेस तू मनाने हेच
जाता जाता त्यानं जाणवून दिलं
वेदनांमधून सार्या बाहेर पड आता
एक छान हसरं आयुष्य दिसेल तुला
पुन्हा एकदा भर मनात उत्साह जरा
दिसेल जागोजागी प्राजक्त फुललेला
तुझ्या निरागस भावी आयुष्यामध्ये
माझी भाबडी साथ तुला चालेल का
तुझा जीवनसाथी होण्याचं भाग्य
जिवलगा, सांग मला मिळेल का ?
(ही कविता ऑन डिमांड पाडलेली आहे. अशाच प्रकारच्या कविता तसेच चारोळ्या आमच्या इथे घाऊक तसेच किरकोळ दरात पाडून मिळ्तील :D)
आपलाच,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
प्रतिक्रिया
24 Jun 2008 - 10:55 am | चेतन
तुझ्या निरागस भावी आयुष्यामध्ये
माझी भाबडी साथ तुला चालेल का
तुझा जीवनसाथी होण्याचं भाग्य
जिवलगा, सांग मला मिळेल का ?
हे मस्तं
बाकी ठीक आहे. भाउ आता जरा आपला कविता पाडायचा साचा बदला की
"कितिही येउ देत" नंतर बर्याच कविता बहुतेक एकाच साच्यातुन आल्यातं काय याचापणं प्रोग्राम बनवला की काय दाब एंटर की पाड कविता (ह. घ्या.)
अशाच प्रकारच्या कविता तसेच चारोळ्या आमच्या इथे घाऊक तसेच किरकोळ दरात पाडून मिळ्तील
हे मात्र लय भारी (जोडधंदा चांगला आहे)
जिवलग (कोणाचा :? )चेतन
24 Jun 2008 - 11:25 am | मयुरयेलपले
अशाच प्रकारच्या कविता तसेच चारोळ्या आमच्या इथे घाऊक तसेच किरकोळ दरात पाडून मिळ्तील ...
हे मात्र सांगुन आपण गद्य स्वरूपात पत्र लिहिणार्या प्रेमविरांसाठि नवे दुकान उघडल....
आपला गिर्हाइक..
आपला मयुर
25 Jun 2008 - 10:53 am | विसोबा खेचर
तुझ्या निरागस भावी आयुष्यामध्ये
माझी भाबडी साथ तुला चालेल का
तुझा जीवनसाथी होण्याचं भाग्य
जिवलगा, सांग मला मिळेल का ?
वा! छान रे सतिश....
तात्या.