पुनर्जन्मावर शोधकार्य करणारे स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन
डॉ. आयन स्टिव्हन्सन
स्व. डॉ. स्टीव्हन्सन यांचे पुनर्जन्मावरील संशोधन ग्रंथ फार मोठे आणि सहज उपबलब्ध होण्यासारखे नाहीत. उपलब्ध झाले तरी ते वाचण्याची तसदी सहसा कोणी घेत नाही. हे माहित असल्यामुळे बुद्धिवादी लोक या प्रकरणांविषयी व सिद्धांताविषयी धडधडीत खोटे लिहिण्याचे धाडस करीत असतात. म्हणूनच हे ग्रंथ मुळात वाचण्याची शिफारस केला आहे. त्यामुळे हे लोक खोटे लिहायला किती निर्ढावलेले आहेत याची कल्पना येईल.
Page vii - No other doctrine has exerted so extensive, controlling, and permanent an influence upon mankind as that of the metempsychosis, — the notion that when the soul leaves the body it is born anew in another body, its rank, character, circumstances, and experience in each successive existence depending on its qualities, deeds, and attainments in its preceding lives......
पुनर्जन्म सिद्धांतविषयीचे स्टिव्हन्सन यांचे शास्त्रीय आव्हान प्रकरण 5 मधील संदर्भात
माझा (प्रा. गळतगे यांचा) पुनर्जन्मावरील लेख प्रकरण 6 अबकडईच्या 1996 सालच्या दिवाळी अंकात प्रथम प्रसिद्ध झाला. त्या लेखात आयन स्टिव्हन्सन पुनर्जन्म संशोधकाच्या "Twenty Cases Suggestive of Reincarnation" या ग्रंथाचा उल्लेख केला असून पुनर्जन्म सिद्धांत शास्त्रीय पायावर प्रस्थापित करायचे श्रेय मी त्या लेखात त्यानाच प्रामुख्याने दिले आहे.
त्यांनी सुमारे 2500 पुनर्जन्म प्रकरणांचा जगभर फिरून अत्यंत कसोशीने शास्त्रीय निकषांखाली अभ्यास केला आहे. अभ्यास करताना त्यांनी त्या त्या देशातील संबंधित कुटुंबांना अनेकदा भेटी देऊन त्या प्रकरणांचा शास्त्रीय दृष्टीने पाठपुरावाही केला आहे. त्यांचे संशोधन असा प्रकरणाचा शास्त्रीय निकषांखाली कसा अभ्यास करावा याचा वस्तुपाठच आहे. असे म्हणता येईल. त्यांच्या या शास्त्रीय संशोधनात कसलीही उणीव आजतागायत कोणालाही मान्यवर शास्त्रज्ञाने दाखवून दिलेली नाही. The Journal of Nervous and Mental Diseases या गंभीर वैज्ञानिक संशोधनपर लेख प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकाने स्टिव्हन्सनचा पुनर्जन्मावरील लेख प्रसिद्ध करून पुनर्जन्म संशोधन हे शुद्ध वैज्ञानिक असल्याचे मान्य केले आहे. (मे 1977चा अंकात) डॉ. हेरॉल्ड लायेफ् यांनी त्याच नियतकालिकात स्टिव्हन्सन ना विसाव्या शतकातील गॅललिओ म्हटले आहे. त्यामुळे पुनर्जन्म खोटा म्हणणाऱ्यांना त्यांचे संशोधन हे एक मोठे आव्हान ठरले आहे. या आव्हानाला बुद्धिवादी तोंड देऊ शकत नाहीत असे होऊ नये म्हणून (काऱण तसे झाले तर बुद्धिवादी तत्वज्ञान निकालात निघते) पाश्चात्य बुद्धिवादी व नास्तिकवादी पुढे सरसावले व त्यांनी सामान्य लोकांचा - जे स्टिव्हन्सन यांचे संशोधनात्मक ग्रंथ वाचू शकत नाहीत - बुद्धिभेद करण्यास प्रारंभ केला.
या बुद्धिवाद्यांनी खोट्या युक्तीवादाच्या व विधानांच्या आधारे आपली प्रणाली दामटण्यासाठी नियतकालिके चालवली आहेत. काही ग्रंथ ही लिहिले आहेत. पाश्चात्य बुद्धिवाद्यांमधे मार्टीन गार्डनर (विज्ञान विषयक लेखक), जेम्स रँडी (जादुगार) व पॉल कुर्ट्झ(मनसाज्ञ) आहेत. त्यांनी अमेरिकेत अतींद्रिय घटनांचे सत्यत्व प्रस्थापित करणाऱ्या शास्त्रज्ञांचा भांडाफोड (Debunking)करण्यासाठी एक कमिटी स्थापली असून तिचे नाव (कमिटी फॉर दि इन्व्हेस्टिगेशन ऑफ दि क्लेम्स ऑफ दि पॅरानॉर्मल) असे ठेवले आहे. या कमिटीचा उद्योग अतींद्रिय दावे खोटे ठरवण्यासाठी बिनदिक्कतपणे खोटे लिहिणे व खोटे युक्तिवाद करणे याशिवाय दुसरा काही नसतो. शास्त्रीयतेच्या बुरख्याखाली हे सर्व केले जाते. हा या कमिटीचा विशेष आहे. यासाठी वाममार्गाचा सुद्धा वापर केला जातो. या विषयी गार्डनरचेच उदाहरण देता येईल...(प्रकरण ५ (ब) चे पान क्र.100 वाचा)
डॉ स्टिव्हन्सन यांची रिलक्टंट मेसेंजर मधील मुलाखत व परिचय वाचा.
2 टॉम श्रोडर
हा बुद्धिवादी पत्रकार व वॉशिंग्टन पोस्टचा संपादक टॉम श्रोडर डॉ. स्टिव्हन्सनच्या बरोबर पुनर्जन्माच्या केसेसचा खोटेपणा शोधायला गेला व नंतर त्यांच्या कार्यातील सच्चेपणा व अभ्यासपुर्ण संशोधन पाहून फिरला,
प्रतिक्रिया
3 Aug 2012 - 2:31 pm | विजुभाऊ
एक प्रश्न पडलाय
भागवतात एकूण ८४ लक्ष्य योनी आहेत आणि मानव जन्म हा एकदाच मिळतो असे सांगितले आहे.
असे असतानाही पुनर्जन्माच्या तथाकथीत दाव्यांमध्ये बहुतेक जण मागील जन्मी मानवच का असतात हो?
( त्यातही स्त्री ही मागीलजन्मी सुद्धा स्त्रीच असते....... पुरुष हा मागच्याजन्मी पण पुरुषच असतो )
कोणालाच मागचा जन्म झुरळ / अमिबा / घोडा / देवमासा वगैरे असल्याचे आठवत नसते.
3 Aug 2012 - 2:33 pm | पांथस्थ
ज.ब.री. टोला!
3 Aug 2012 - 1:42 pm | बाळ सप्रे
डॉ. आयन स्टिव्हन्सन यांचा ग्रंथ कोणी वाचत नाही अशी खंत आहे ना.. आणि तुम्ही वाचलाय ना तो ?? मग त्यातला सिद्धांत काय आहे तो कळू द्या ..
त्यावर चर्चा करू.. उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टीत कशाला वेळ वाया घालवता..
3 Aug 2012 - 7:23 pm | शशिकांत ओक
मित्रा ,
धाग्यातील लिंक्स वाचा अन आपल्याला काय चर्चा करावीशी वाटते ते लिहा.
4 Aug 2012 - 11:03 am | वीणा३
हेहे. माझा भाऊ सोफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याला कधी विचारला कि मला जावा शिकवशील का तर १-२ मोठी पुस्तक ८-१० लिंक्स देतो आणि म्हणतो हे सगळं वाच मग मी शिकवेन तुला. मी त्याला म्हणते कि हे सगळं वाचायचा पेशंस माझ्यात असेल तर तूझी काय गरज :P.
30 Aug 2012 - 2:18 pm | बाळ सप्रे
अहो मी तुम्हाला सांगितलं की सिद्धांत इथे टाका चर्चा करायला.. सिद्धांताची summary लिहा धाग्यात..
नुसत्या लिंका देउन कोणी वाचायचे श्रम घेणार नाही..
3 Aug 2012 - 1:43 pm | कापूसकोन्ड्या
चिकाटीचे कौतुक करण्यासारखे आहे.
3 Aug 2012 - 7:31 pm | शशिकांत ओक
मित्रा,
खरे आहे डॉ. स्टिव्हन्सन यांनी आपल्या आयुष्याची ४० वर्षे या संशोधनात वेचली चिकाटीने....
3 Aug 2012 - 7:52 pm | sagarpdy
खरोखरच, मानलं पाहिजे!
3 Aug 2012 - 2:18 pm | परिकथेतील राजकुमार
ओक काका,
मी काय म्हणतो, ह्या परदेशातल्या लोकांच्या भांडणात आपण कशाला नाक खुपसायचे?
3 Aug 2012 - 2:30 pm | sagarpdy
तरी मी माझ्या मित्राला सांगत होतो कि करन-अर्जुन खऱ्या जीवनात होऊ शकतात. आता दाखवतो!
3 Aug 2012 - 4:48 pm | रमताराम
आमची रिक्षा रांगेत आणतो आहे: आमच्याही संशोधनाची सुरुवात...नेहमीप्रमाणे प्रश्नांनीच
3 Aug 2012 - 7:58 pm | अत्रुप्त आत्मा
3 Aug 2012 - 8:50 pm | शशिकांत ओक
मित्रा रमताराम,
आजच्या ताज्या बातमीनुसार - उपोषण पितामह हजारे अण्णांच्या
आसपासच्या नागनाथ-सापनाथांच्या विळख्यामुळे कुठल्या पुर्वजन्माचे पाप केले होते ते आठवायला लागायला आता वेळ भरपूर आहे.
4 Aug 2012 - 12:15 pm | रमताराम
सायबा, इतरांच्या ताजमहालाला आपल्या विटा लावायची सवय असेल तुम्हाला, पण माझा ताजमहाल सोडा त्यातून.
काही संघटनांनी सावरकरांना पचवले तरी आंबेडकर पचवता आले नाहीत, कारण त्यांचे अनुयायी जागरूक असतात. तसेच आमच्या लेखनाबाबत आम्ही स्वत: चांगलेच जागरूक असतो. आपले शब्द घुसडण्याची तुमची नेहमीची 'उजवी' चलाखी आमच्यापाशी चालणार नाही.
माझे मूळचे वाक्यः डोस्क्याची आधीच मंडई झालीये, त्याची लोकसभा व्हायला नको, क्काय?
यात 'धर्मनिरपेक्षतावादी पक्ष' हे शब्द नाहीत. शेम ऑन यू मि. ओक.
किनई, तुम्ही काय लिहिलंय हे तुम्हाला आठवतंय/समजतंय की नाही ते तुम्हाला ठाऊक, मला मात्र मी काय लिहिलंय ते पक्कं ठाऊक असतं (याचं एक कारण मी उसनवारी न करता स्वत:च लिहित असतो.)
5 Aug 2012 - 12:30 pm | शशिकांत ओक
राम,
आपल्या ताजमहालाबद्दल मला काय करायचे आहे. आपले वाक्य मी नव्या बातमीच्या संदर्भात सादर केले ते तुमचे आहे म्हणून नव्हे तर त्यातील शब्दरचना मजेशीर वाटली म्हणून.
5 Aug 2012 - 2:09 pm | रमताराम
खरंतर हा तुम्ही असं म्हणाल... असं म्हणत आधीच लिहून ठेवला होता, पण म्हटलं आधी लिहू तर द्या, मग प्रतिवा करू.
शब्द फिरवण्याच्या तुमच्या चलाखीबाबत कधीच शंका नव्हती, हे आणखी एक उदाहरण जमा झाले.
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वाक्य ज्या प्रकारे लिहिले आहे त्याला 'उद्धृत करणे' किंवा मराठीत ज्याला कोट करणे म्हणतात तसे लिहिले गेले आहे. इतर कोणाचे लिखाण मिपावर कोट करण्याची ती पद्धत आहे. असे करताना 'आहे तसे' कोट करणे अपेक्षित असते. जर त्यात बदल करायचा असेल तर असे काहीसे लिहिले गेले पाहिजे. 'तुमचे मूळचे '..xxx..' हे वाक्य आजच्या संदर्भात '..xxxyyy..' असे लिहिता येईल.' यात मूळ लेखकाचे वाक्य नि तुमचे वाक्य यातील फरक वाचकाला समजून येईल.
इतरांच्या वाक्यात बदल करून, आपण तसा केला आहे हे न सांगता लिहिणे नि जणू ते मूळ लेखकाचेच आहे अशी बतावणी करणे ही चक्क वाचकाची फसवणूक आहे नि मूळ लेखकाच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण, चक्क खोटारडेपणा म्हणतात याला. तुम्ही माझ्या नि वाचकांच्या बेसावधपणावर विसंबून होतात नि तुमचा अजेंडा माझ्या वाक्यात घुसवण्याचा प्रयत्न केलात नि वर चलाखीने त्याचे समर्थन करत आहात.
6 Aug 2012 - 12:36 pm | शशिकांत ओक
मित्रा,
भावना कळल्या. पुढील वेळी लक्षात ठेवीन
3 Aug 2012 - 10:11 pm | शिल्पा ब
त्या गळतग्यांच्या नादाला लागुन नाड्या शोधणं बंद केलं का तुम्ही?
4 Aug 2012 - 5:55 am | वीणा३
जरी पुनर्जन्म हे सत्य असेल तरी काय आपण आपला मागचं जन्म बदलू शकणार नाही किंवा पुढचा जन्म ठरवू शकणार नाही. असं असताना त्यावर एवढं संशोधन करून काय फायदा देव जाणे.
4 Aug 2012 - 6:27 am | शिल्पा ब
पुढचा जन्म ठरवु शकणार हे कोणी सांगितलं? चांगलं चुंगलं वागलं की मोक्ष मिळतो अन नाही वागलं की पुन्हा मनुष्य जन्म मिळतो असं ऐकुन आहे. तुम्ही गळतग्यांचे लेख वाचुन काढा पाहु ...अन नाही वाचलेत तर अजुन स्व. स्टीव्हनसन यांची पुस्तकं वाचायची शिक्षा मिळेल.
5 Aug 2012 - 2:22 pm | अप्रतिम
ओक सर तुम्ही मागील जन्मी काय होता?
6 Aug 2012 - 12:33 pm | शशिकांत ओक
मित्रा, मी कोण होतो ते मला लहानपणीच सांगता येत असते तर मग.....
असो... कुठून बातमी कळली तर कळवेन....
6 Aug 2012 - 2:25 pm | नगरीनिरंजन
स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन मधला स्व. म्हणजे 'स्वर्गवासी' आहे काय?
मग या जन्मात कुठे असतात म्हणे हे डॉक्टरसाहेब? आणि पुनर्जन्म असेल तर हे महाशय स्वर्गवासी कसे काय बुवा? पृथ्वीवरच कुठेतरी असले पाहिजेत ना? (या जन्मी त्यांचे आडनाव गळतगे किंवा ओक असेल कदाचित. जरा त्यांची नाडी शोधून पाहा बरे.)
11 Aug 2012 - 12:50 am | आनंदी गोपाळ
यांना कितीही वेळा ठोसे द्या, कितीही छान द्या, हे पुन्हा वर येणार. स्वत: प्रतिसाद देऊनही वर आणणार..