गुबगुबीत कुशन, गुलाबी रंग, आरसा..! :)

कॉमन मॅन's picture
कॉमन मॅन in जनातलं, मनातलं
1 Aug 2012 - 5:12 pm

नुकतेच मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील एका लोकल गाडीमध्ये काही सुखावणारे बदल केले आहेत. सदर लोकलमधील दुसर्‍या वर्गातही आता कडक लाकडी बाके जाऊन छान छान मऊ मऊ कुशन असलेली बाकडे बसवली आहेत. आर्थिक परिस्थिती नसली तरी दुसर्‍या वर्गातील लोकांनाही पहिल्या वर्गातील लोकांप्रमाणे पार्श्वभाग असतो आणि कुशनवाल्या बाकड्यांमुळे तो सुखावू शकतो, हे रेल्वे व्यवस्थापनाला जाणवले हे फार बरे झाले.. :)

त्याचप्रमाणे महिलांच्या डब्यात आता आरसे बसवण्यात आले आहेत. निसर्गतःच महिलांना वारंवार आरशात बघून आपला चेहरा ठाकठीक करण्याची सवय असते, असा बहुधा रेल्वे व्यवस्थापनाचा कयास असावा आणि म्हणूनच रेल्वेने आता लोकलच्या महिलांच्या डब्यात आरसे बसवले असावेत... :)

यापुढे महिलांच्या डब्याचा रंग गुलाबी असणार आहे. या बाबतीत मात्र नेमकी गुलाबी रंगाची निवड करून मध्यरेल्वेच्या अधिकार्‍यांनी अंमळ रसिकता दाखवली आहे असे म्हणावे लागेल. मात्र त्या गुलाबी रंगाकडे आकर्षित होऊन महिलांच्या डब्यात घुसणार्‍या काही कंटकांच्या संख्येत वाढ होऊ नये अशी मात्र अपेक्षा आहे.. :)

असो..

मध्यरेल्वेने केलेले हे बदल स्वागतार्हच म्हणता येतील. लवकरच मुंबई उपनगरीय सर्व लोकल गाड्यांमध्ये हा बदल बघावयास मिळावा अशी अपेक्षा..

-- कॉमॅ.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

1 Aug 2012 - 5:26 pm | बॅटमॅन

मुळात गुलाबी=बायकी हे कैच्याकै समीकरण कधीपासून प्रचलित झाले? हा ब्रिटिश प्रभाव असावा असे राहून राहून वाटतेय.

(सर्व प्रकारच्या उत्तम रंगांचा वेडा) बॅटमॅन.

कॉमन मॅन's picture

1 Aug 2012 - 5:48 pm | कॉमन मॅन

छानच प्रतिसाद, आभारी आहे.. :)

इनिगोय's picture

1 Aug 2012 - 6:16 pm | इनिगोय

हे स.स.करण अमेरिकन असावं. निळे ते मुलांचे आणि गुलाबी ते मुलींचे.

बॅटमॅन's picture

1 Aug 2012 - 6:25 pm | बॅटमॅन

हम्म अगदी शक्य आहे. एकदा तिकडून आलं की इथल्यांनी उचल्लंच :)

विजुभाऊ's picture

1 Aug 2012 - 5:35 pm | विजुभाऊ

रेल्वे ने त्यांच्या बाकड्यांची रुंदी तीन /चार इंचानी कमी केली तरी खूप चाम्गले होइल.
नक्की कोणाच्या साईझचे बाक बनवतात कोण जाणे. सुखाने कोणी पाय जमिनीवर टेकवुन नीट त्या बाकड्यावर बसला आहे हे कधी दिसतच नाही. पाठ टेकायची झाली की पाठीला बाक काढून बसायला लागते.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Aug 2012 - 6:46 pm | परिकथेतील राजकुमार

सुरेख निरिक्षण आणि त्याचे दर्जेदार लेखन.

परांतर :- मला आधी वाटले 'WELCOME' मध्ये काही अमूलाग्र बदल झाल्याची बातमी आहे का काय.

कॉमन मॅन's picture

1 Aug 2012 - 6:58 pm | कॉमन मॅन

प्रतिसाद Like करत आहे.. :)

इणत्या का रे?
तोच रे तोच ;)

चिरोटा's picture

1 Aug 2012 - 6:58 pm | चिरोटा

मध्य रेल्वेची बाकडी पश्चिमवाल्यांच्या तुलनेत उंचीला कमी असायची(बहुदा सध्याही).पश्चिमवाल्यांची बाकडी जरा बर्‍यापैकी पॉलिश केलेली.गडद ब्राऊन रंगाची.

सदर लोकलमधील दुसर्‍या वर्गातही आता कडक लाकडी बाके जाऊन छान छान मऊ मऊ कुशन असलेली बाकडे बसवली आहेत

(First आणि Second मध्ये काहीच फरक नाही ही सबब सांगून)पुढच्या वर्षी प्रवासात भाडेवाढ नक्की.

कॉमन मॅन's picture

1 Aug 2012 - 6:59 pm | कॉमन मॅन

(First आणि Second मध्ये काहीच फरक नाही ही सबब सांगून)पुढच्या वर्षी प्रवासात भाडेवाढ नक्की.

रास्त शंका..!

गुबगुबीत कुशन? म्हणजे त्याला पोरंटोरं ब्लेड मारणार :(