सध्या लिहायला फारसे काही सुचत नाही आहे. पण काहीतरी खरडायचे आहे.
काय करावे ?
म्हणून आता दिसेल ती नवी बातमी मिपावर चिकटवावी असे ठरवले आहे.
कुणाचा वाढदिवस, कुणाचे परीक्षेतील यश, कुणाचे लग्न, कुणाचा जन्म हेही मिपावर चिकटवणार आहोत.
याही पलिकडील बातमी असेल तर सोन्याहून पिवळे...
टोल बाबत सत्य काय ते जनतेसमोर मांडण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केली होती.
त्याप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केल्यानंतर लक्षात आले की मूळ खर्चापेक्षा काहीपट टोल वसूल होत आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र टोल हा गंभीर प्रश्न बनला होता. महामार्गावर तर टोल आहेतच पण कोल्हापूरासारख्या ठिकाणी
शहरातील रस्त्यावरही टोल भरावा लागत असे.
यात काही टोल अनधिकृतही सापडले.
काही ठिकाणी ४० किमीच्या आत २ टोलनाके हाही प्रकार आढळला.
राज यांनी काढलेला मुद्दा महत्वाचा आहे.
टोल भरणे आवश्यक असेल तर त्याचा हिशेबही पारदर्शकपणे जनतेला मिळाला पाहीजे.
आपण पैसा कशासाठी देतो आहोत हे जाणून घेणे गैर नाही.
राज यांनी नव्याने मुद्दे काढले असे नाही. लोकांच्या मनातही शंका होत्याच.
यामुळे टोल म्हणजे वादावादी, बाचाबाची आणि मारामारीचे ठिकाण बनलेले पहायला मिळत असे.
अनेक ठिकाणी टोल भरायला नागरीक विरोध करीत असत तिथे लोकांना बदडून काढायला
टी शर्ट जीन्समधील पैलवान ठेवलेले असत.
काही अनधिकृत टोलला मोठ्या भाई, दादा नेत्यांचे आशीर्वाद आहेत असे समजते.
गरीबांच्या एस टी ला टोल का हा न कळणारा प्रश्न आहे.
प्रचंड गबर झालेल्या आमदार, खासदार यांच्या गाडीला टोलमाफी का असाही प्रश्न आहे.
टोल कुणाकुणाला माफ याची भली मोठी यादी दिलेली असते. पण
आपल्या मर्जीतल्या काही जीपवाल्यांनाही टोलमाफी दिली जाते.
वाहतूक पोलिस अशी खूण असलेल्या जीपला टोलमाफी नाही. पण ही गाडी प्रवाशांची वाहतूक करताना आढळू शकते.
एखाद्या आमदाराचे नाव सांगून त्याची गाडी टोल चूकवत प्रवासी वाहतूक करताना आढळू शकते.
म्हणजे सरकारी पैसा चूकवायचा आणि आपल्या तिजोरीत भरायचा हा काही जनप्रतिनिधींचा धंदा पहायला मिळतो.
राज यांनी आन्दोलन छेडले आहे. पुढे काय होइल सांगता येत नाही.
पण जे एकट्या दुकट्या सामान्य माणसाला शक्य नव्हते ते करायला आता सामान्य माणसाला हत्तीचे बळ आलेले आहे.
हे टोलविरोधी आंदोलन यशस्वी व्हावे हीच एक इच्छा !
प्रतिक्रिया
25 Jul 2012 - 11:50 pm | नर्मदेतला गोटा
>>वाहतूक पोलिस अशी खूण असलेल्या जीपला टोलमाफी नाही <<
हे वाक्य
"वाहतूक पोलिस अशी खूण असलेल्या जीपला टोल नाही " असे वाचावे
---
२५ जुलैच्या eprabhat.com मधे सुहास यादव यांचा लेख १ ल्या पानावर जरूर वाचावा
25 Jul 2012 - 11:57 pm | शिल्पा ब
कुणी कितीही बोंबाबोंब केली तरी खट काही फरक पडणार नाही.
सामान्य लोकं "मिळुन सगळे गप्प बसु" आहेत तोपर्यंत सोयी, सुविधा वगैरे प्रकार नाहीत अन त्याचे टोल मात्र भरावेच लागतील. असो. एकटे अण्णा हजारे कुठे कुठे फिरणार...लोकांना बुड न हलवता सगळ्या सुविधा हव्या असतात अन ते शक्य नाही...त्यामुळे गपचिप टोल भरावाच लागेल...आज नै तर उद्या.
बाकी आम्ही अमेरीकेत असल्याने आम्हाला सुद्धा खट कै फरक नै...त्यामुळे चालुद्या.
26 Jul 2012 - 12:07 am | कुंदन
आमच्या कडे चार चाकी नसल्याने आम्हाला सुद्धा खट कै फरक नै...त्यामुळे चालुद्या.
26 Jul 2012 - 10:49 am | स्पा
खट कै फरक नै
म्हणजे काय? ब्वा
26 Jul 2012 - 9:27 am | इरसाल
आमच्या कडे चार चाकी आहे पण आम्ही महाराष्ट्रात नसल्याने आम्हाला सुद्धा खट कै फरक नै...त्यामुळे चालुद्या.
26 Jul 2012 - 12:04 pm | मन१
आमच्याकडे चार चाकीही नाही आणि आम्ही महाराष्ट्रातही नाही.
आम्हाला सुद्धा खट कै फरक नै...त्यामुळे चालुद्या.
26 Jul 2012 - 10:45 am | मी_आहे_ना
"चालू द्या"च म्हणणार होतो..कारण 'पुण्यात' आहे, 'चारचाकीही' आहे (केविलवाणा प्रयत्न नव्हे, गरज म्हणून आहे) पण टोलवाल्या रस्त्याने जायची रोज वेळ येत नाही. म्हणून "काय फरक पडतो" असाच सामान्य विचार करत होतो.
पण आता 'श्रावणात' एक दिवस कोल्हापूरला देवीला जाऊन यायचे म्हणजे ४१८ रू. (रिटर्न मिळेल तिथे घेऊन, नाहीतर जास्तच) टोल द्यायला लागतो, तो "का?" हे नक्कीच जाणून घ्यायला लागेल. साधी रांगा नीट लावायला लोकांना भाग पाडायचीसुद्धा ह्यांना शिस्त नाही, तिथे प्रसाधनगृहासारख्या किमान सुविधांचीही आपण अपेक्षा ठेवू शकत नव्हतो. आता ह्या मनसेच्या आंदोलनाने का होईना, लोक विचार तर करतील..
26 Jul 2012 - 11:54 am | शिल्पा ब
लोकं लाख विचार करतील पण पुढे काय?
अनावश्यक टोलनाके काढुन टाकणार का?
जे पैसे येतात त्यातुन रस्ते चांगले - न खड्डे पडणारे - बांधणार का?
उत्तर सगळ्यांनाच माहीती आहे...म्हणुनच चालु द्यायचं दुसरं कै नै!
27 Jul 2012 - 12:41 am | सोत्रि
अरे! शिल्पातै, ते खट राहिले की हो :)
- (खट) सोकाजी
27 Jul 2012 - 2:10 am | शिल्पा ब
तुम्ही केलंय ना ! झालं तर मग!
26 Jul 2012 - 12:53 pm | आनंद भातखंडे
अहो ही टोल-धाड नियंत्रित नाही केली गेली तर काही दिवसांनी चालणाऱ्या माणसाला पण टोल द्यावा लागेल ;) किंवा आपले वाहन गेटातून बाहेर काढल्या काढल्या पावती फाडावी लागेल. ;)
26 Jul 2012 - 2:40 pm | परिकथेतील राजकुमार
पुण्या मुंबईतले गाडीवाले माजले आहेत.
एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायला ह्यांना महामार्ग हवेत, लवकर पोचता यावेत म्हणून ते चार पदरी देखील हवेत पण टोल भरायची वेळ आली की भोकाड पसरायला सुरुवात. गाड्या उडवत माज दाखवायचा आणि कोणी हटकले की स्टेट ट्रान्सपोर्ट किती भिकार आहे ह्याचे रडगाणे गात बसायचे, आम्हाला फार मजबूरीने गाडी घ्यावी लागली असे सांगत उसासे टाकायचे. आणि उसासे टाकत टाकत पाऊस एंजॉय करायला गाडी काढून एक्सप्रेस-वे कडे पळायचे.
साला चौका चौकात टोल नाके बसवायला हवेत. त्यामुळे विनाकारण फुगलेली ही गाड्यांची संख्या कमी होईल आणि वाहतुकीला जरा शिस्त लागेल.
27 Jul 2012 - 12:05 am | शिल्पा ब
उद्या तुमच्या सायकलसाठी सुद्धा टोल भरावा लागला म्हंजे कळेल ! हुं!
27 Jul 2012 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार
तुम्ही अमेरीकेत असल्याने तुम्हाला खट कै फरक नै...त्यामुळे टोलवाटोलवी चालुद्या.