जेव्हा जवळ काय घडतय, ह्याची जानिव होवुन, काहीच करता येत नाही त्या वेळी अगतीकता जानवते. न मिळालेली उत्तरं सतावतात, त्या वेळी स्वतवर राग काढन्याशिवाय काहीच करु शकत नाही.
मग एक मळीभ दाटून येते...
वेशीवर पाहिली काही लटकती लक्तरे
सापडल्या अनोळखी खुणा माझ्याच त्या रे…
शोधताना मीच माझा हरवून गेलो…
मी तसाच पुढे निघालो…
पाहिले हात जोडूनी लाचार मंदिरी…
मलमली वस्त्रात लाज गुंडाळुनी…
माझ्याच पडुनी नजरेत मग मी निर्लज्ज झालो…
मी तसाच पुढे निघालो…
फना काढून मग रात्र उभी,
भेसूर पसरली कोळोख नभी,
अंधारास मग आपुले मानीत गेलो…
मी तसाच पुढे निघालो…
म्हणतात लपले अंतरी मग दिसत का नाही…
काय खोटे काय खरे समजत नाही…
हसता हसता मग स्वतःला फसवत गेलो…
मी तसाच पुढे निघालो…
पाहून स्वकीयांचे रक्त मी हसत होतो
लाथाडून थडगे त्यांचे मार्गस्थ झालो
गिळूनी निखारे आग मी पचवीत गेलो...
मी तसाच पुढे निघालो…
लटलटत्या हातात मी शस्त्र घेतले…
खिळखिळ्या पाठीवर जग माझे पेलले…
ठेऊन गहाण कणा माझा सरपटत गेलो
मी तसाच पुढे निघालो…
गरळ ओकुनी सूड माझा मी घेतला…
माझाच काळ मग समोर उभा ठाकला…
टाकून गळ्यात हात त्याच्या हसत गेलो…
मी तसाच पुढे निघालो…
प्रतिक्रिया
21 Jul 2012 - 12:51 pm | मयुरपिंपळे