कांदासंस्थानाचे चिलखती उत्तर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
19 Jul 2012 - 9:33 am

कांदा संस्थान, दि. १८ जुलै. - संस्थानात खास भरवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थानाच्याच संशोधन संस्थेत बनवलेल्या चिलखताची चाचणी दाखवण्यात आली. कांदा संस्थान ग्रामपंचायतीतल्या सर्व स्तरातल्या ग्रामस्थांनी या प्रकल्पात सहभाग घेतल्याचे आवर्जून सांगण्यात आले. काय आहे हे चिलखत? ऐकू या संस्थानाच्या संशोधन संस्थेच्या प्रभारी श्रीमती ज्योतीकिरण छेदी यांच्याच शब्दांत.

""असभ्य पुरूषांचा उपद्रव न झालेली स्त्री दाखवा, १०० कांदे मिळवा" या आमच्या योजनेला अतिशय गेल्या वर्षी अतिशय थंडा प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही पारितोषिकाचे मूल्य दुपटीने वाढवले. तरीही कोणीही मुलगी, स्त्री समोर आली नाही. सर्व कांदे सडून गेले तेव्हा संस्थानाच्या संस्कृतीरक्षण समितीच्या अहवालात यावर कडक ताशेरे ओढण्यात आले. आणि सूचनांमधे आमच्या संशोधन संस्थेने या प्रकरणात लक्ष घालण्याचाही एक मुद्दा होता. आमच्या संस्थेने हा मुद्दा मनावर घेऊन एक नवीन चिलखत तयार केलेलं आहे.

"संस्कृतीरक्षण हा या चिलखताचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही बघतच आहात त्याप्रमाणे हे चिलखत खांद्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत मुली आणि स्त्रियांचे शरीर झाकते. पबमधे मुली एकेकट्या जातात, तोकडे कपडे घालून अचकट विचकट अंगविक्षेप करतात. या मुलींकडून अनेक पातळ्यांवर संस्कृतीभंजन होते. एकतर या मुली पबमधे जातात, दुसरं म्हणजे दारू पितात. आपल्या संस्कृतीत चौदा विद्या, चौसष्ट कलांमधे पुरुषांना मोहून घेणारे नृत्य करणे याचाही समावेश असेल तरीही पाश्चिमात्यांच्या पबमधे असे कृत्य करणे हा आपल्या महान संस्कृतीवर आघात आहे. हे चिलखत घातल्यामुळे त्यांच्याकडूनही संपूर्ण संस्कृतीरक्षण होईल. एकतर या चिलखतामुळे या मुलींचे सर्व शरीर झाकले जाईल. शिवाय चिलखताची रचनाही अशा प्रकारे केली गेली आहे की एकदा ते चढवल्यावर मुलींना अचकट विचकट अंगविक्षेपही करता येणार नाहीत. कोणी केलीच तर इतर कोणाला ते समजणारही नाही.

"शिवाय कोणा पुरूषांनी त्यांचा विनयभंग अथवा त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यास तो असफल होईल. या चिलखताला एक पासकोड आहे. तो आकडा फक्त चिलखत घालणार्‍या मुलीलाच माहित असेल. हा आकडा टाकल्याशिवाय हे चिलखत अनलॉक होणार नाही. अगदी सुर्‍याच्या वारांनीसुद्धा या चिलखतावर फारतर ओरखडे उठतात याचे प्रात्यक्षिक आपण पाहूच. अफजलखानाच्या वारांनी जसा शिवाजीवर काहीही परिणाम झाला नाही तशा प्रकारची सुरक्षितता या चिलखतामधून सर्व चवचाल, उठवळ आणि बाजारबसव्या मुलींनाही मिळेल. आपोआपच आपली महान संस्कृती जपली जाईल."

श्रीमती छेदी यांच्या या भाषणानंतर चिलखताचा चाचणी प्रयोग करण्यात आला. ज्योतीकिरणताईंनी स्वतःच हे चिलखत अंगावर चढवून चिलखत सर्वांग झाकते, कोणत्याही प्रकारचे अंगविक्षेप केल्यास फक्त समोरच्या पुरूषाला झुकून आदर दाखवल्यासारखेच दिसते आणि चिलखतावर मटनाचा सुरा वापरल्यास फक्त मामुली ओरखडे उठतात याचे प्रत्यक्ष दर्शन घडवले. त्यापुढच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठीही ताईंनी उत्सुकता दाखवली. हा त्याचा अहवालः

प्रश्न १. चिलखत तयार करण्यापेक्षा निदान संस्थानाततरी पब्जवर बंदी का आणत नाही?

या प्रश्नाचं उत्तर संस्कृतीरक्षण समितीचे अध्यक्ष आणि संस्थानाचे तहसीलदार इमरान काटकर यांनी दिले. "पब्जवर बंदी आणणं सध्याच्या कायद्याप्रमाणे शक्य नाही. कांदा संस्थानाच्या घटनेप्रमाणे अस्तित्त्वात असणारा कायदा बदलण्यासाठी लोकांच्या दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल आणि बहुसंख्य मतदारांना पब्ज हवे आहेत. दुर्दैवाने कांदा संस्थानातली निम्मी लोकसंख्या तरूणांची आहे आणि या पिढीचा पब्जना संपूर्ण पाठींबा आहे. याचा दोष सर्वथा शिक्षण मंडळावर येतो. त्यांनी योग्य अभ्यासक्रमाची रचना केली नाही. त्याशिवाय इंटरनेट, जगभरातले चित्रपट तरूण पिढीला उपलब्ध होणे, बाहेरच्या देशात लिहीलं जाणारं साहित्य आमच्या तरूण पिढीला उपलब्ध होणे यांसारखे दुर्दैवी प्रकार आज घडत आहेत. या सगळ्यामुळे जग कुठे जात आहे याचं भान तरूण पिढीला आलं तरी आपल्या संस्कृतीचं महत्त्व ही पिढी समजून घेत नाही. आमच्यासारख्यांची 'ओल्ड फॅशन्ड' म्हणून टिंगल होते आणि बहुसंख्येच्या जोरावर हे तरूण आम्हाला बाजूला सारत आहेत."

प्रश्न २. संस्कृतीचा र्‍हास तुम्हाला थांबवायचा आहे आणि यामागची तुमची तळमळ, प्रामाणिकपणा स्पृहणीय आहे. परंतु तरूण पिढीला तुमची संस्कृती मान्य नसल्यामुळे तोकड्या कपड्यांतल्या तरूण मुली हे चिलखत वापरतीलच यासाठी तुम्ही काही उपाययोजना केली आहे का? काही पब-कायदे वगैरे??

ज्योतिकिरण ताईंनी याचे उत्तर दिले, "पब्जमध्ये जाताना हे चिलखत अनिवार्य करण्याचा आमचा विचार आहे. त्या कायद्याने मूळ धरलं की त्याचा विस्तार करून बसमध्ये, ट्रेनमध्ये, अथवा गर्दीच्या कुठच्याही ठिकाणी जाताना हे चिलखत घालावं लागेल अशा तरतुदी करणार आहोत. अनेक स्त्रियांनी अशा ठिकाणी छेड काढली जाण्याची तक्रार केलेली आहेच. त्यांच्या संरक्षणासाठीच हा कायदा असेल. मोटरसायकलवर किंवा स्कूटरवर बसताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसते का? तसंच. तरूण वर्गात, विशेषकरून मुलींमधे आमची ही योजना अप्रिय असेल याची आम्हाला कल्पना आहे. पण गोड बोलून, बोलण्यात गुंगवून तरूण मुलींना हे चिलखत घालण्यास प्रवृत्त करण्याकडे आमचा सध्या कल आहे. कायद्याची मदत घेणं किती किचकट काम आहे हे मगाशी श्री. काटकर यांनी सांगितलंच आहे. त्यापेक्षा आम्ही सध्या लोकप्रियतेसाठी प्रयत्न करत आहोत. या तरूण मुली कितीही तोकडे कपडे घालून आल्या तरीही त्यांच्यावर टीका करायची नाही ही आमची पहिली पायरी आहे. त्याशिवाय या चिलखताबरोबर आम्ही नेकलेस फुकट देणार आहोत. हा साधासुधा नेकलेस नाही. याच्या पेंडंटमधे वाघनखं आहेत. ही वाघनखं मुलींना वेळप्रसंगी स्वसंरक्षणासाठीही वापरता येतील. ही वाघनखं खास पॅरीसहून शिक्षण घेऊन आलेल्या आमच्या खास फॅशन डिझायनरने बनवलेली आहे. आज बाजारात या फॅशन डिझायनरची चलती असल्यामुळे त्यांच्या ब्रँडनेममुळेही अनेक मुली हे चिलखत आणि वाघनखं घेऊन वापरण्यास उद्युक्त होतील. शिवाय या उत्पादनाची जाहिरात प्रसिद्ध अभिनेत्री सखी सामंत करत आहेत. त्यांच्या प्रसिद्धी आणि प्रतिमेचाही या उत्पादनास फायदा होईल."

प्रश्न ३. स्त्रियांचे शीलरक्षण वगळता या उत्पादनाचा इतर काही हेतू आहे का?

"अर्थातच!" श्री. काटकर आणि श्रीमती छेदी एकमुखाने उत्तरले. "स्त्रियांच्या खांद्यावर संस्कृतीरक्षणाची आणि पुढची आरोग्यवंत पिढी जन्माला घालण्याची मोठी जबाबदारी आहे. यातली पहिली जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही हे चिलखत बनवले आहेच. पण दुसर्‍या जबाबदारीसाठी, पुढच्या पिढीचा विचार करता स्त्रियांनी दारू न पिणे, तोकडे कपडे न घालणे आणि अचकट विचकट अंगविक्षेप न करणे हे फार महत्त्वाचे आहे. चिलखत घातल्यामुळे स्त्रियांचे शरीर पूर्ण झाकले जाईल. स्त्रियांनी दारू न प्यायल्यामुळे स्त्रियांच्या अंगावर असणार्‍या या दोन महान जबाबदार्‍या पार पडतील याबद्दल आम्हाला शंका नाही."

प्रश्न ४. पण या जबाबदार्‍या जेवढ्या स्त्रियांच्या आहेत त्या पुरूषांच्याही नाहीत का? आणि नक्की कोणती संस्कृती जपण्याबद्दल तुम्ही बोलत आहात? आपली मराठमोळ्या नऊवारीची संस्कृती पाचवारीने मोडून काढली, त्याबद्दल तुम्हाला आक्षेप नाही का?

"तुमच्यासारख्या तर्कटी शंकेखोरांमुळेच आपली संस्कृती नाश पावते आहे. स्त्रिया दारू पितात, पबमधे जातात म्हणूनच पुरूषांना त्यांच्यावर हात टाकण्याची मुभा मिळते. आणि पुरुषांनी लाजलज्जा सोडली म्हणून स्त्रियांनी सोडावी असं तुम्हाला सुचवायचं आहे का? पुरूष आदीम काळापासून दारू पितात म्हणून स्त्रियांनीही दारू प्यावी असं तुम्ही सुचवता आहात का? त्यातून पुरूष दारू प्यायले किंवा पुरूषांनी अचकट विचकट अंगविक्षेप केले तरीही स्त्रिया त्यांचं काहीही बिघडवू शकत नाहीत. स्त्रियांची अब्रू मात्र काचेच्या भांड्याप्रमाणे असते. एकदा फुटली की परत जोडता येत नाही. पुरूषांवर कधी बलात्कार होतो काय? पुरूषांना संस्कृतीरक्षण आणि चिलखताची काहीही गरज नाही." -- श्री. काटकर आणि आमदार श्री. रामशास्त्री फुटाणे

प्रश्न ५. तुमच्या या चिलखताचा साडीधारी स्त्रियांना काहीही उपयोग नाही. साडी नेसणार्‍या स्त्रियांच्या शीलरक्षणाचं काय?

"साडी नेसणार्‍या स्त्रिया या मुळातच शालीन आणि सुस्वरूप असतात. त्यांच्या मागे गावगुंड लागत नाहीत. उत्तान वागणार्‍या स्त्रियांनाच याचा त्रास होतो. मुळात साडी नेसून स्त्रिया संस्कृतीरक्षण करत आहेत, त्यांना या चिलखताची मुळी गरजच नाही. साडी नेसणार्‍या स्त्रिया पबमधे जात नाहीत, वा दारू पीत नाहीत. त्यांच्यामुळे बलात्कारी आणि विनयभंग करणार्‍यांना प्रेरणा मिळत नाही. या लोकांना असं वागण्याची प्रेरणा पाश्चात्य पेहेराव करणार्‍या मुलींमुळेच मिळते. तोकडे कपडे घालून, रेव्हपार्ट्यातून नशापाणी करून, रस्त्यावर अचकट विचकट अंग विक्षेप करीत जाणार्‍या मुलींनीच समाज आणि संस्कृतीचं नुकसान केलेलं आहे." -- आ. रामशास्त्री फुटाणे

प्रश्न ६. गावगुंडांना अटकाव करण्याऐवजी तुम्ही मुलींचं व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आणत आहात असं तुम्हाला वाटत नाही का? संस्थानाची वाटचाल सौदी अरेबियासारख्या देशांकडे होते असं तुम्हाला वाटत नाही का?

श्रीमती छेदी यांनी थोडं विचारमग्न होऊन याचं उत्तर दिलं, "हे पहा, पब्जमुळे हे गावगुंड फैलावतात. मुळात पब्ज बंद केले तर गुंडगिरी कमी होईल. पण ही आजची तरूण पिढी ऐकत नाही. इथे सौदी अरेबियाचा संबंध आलाच कुठे? स्त्रियांनी त्यांचा चेहेरा उघडा ठेवण्याला आमचा काहीही विरोध नाही." त्याला श्री. काटकर आणि श्री. फुटाणे यांनी पुरवणी जोडली, "व्यक्तीस्वातंत्र्य? अहो महान संस्कृतीसमोर कसलं आलंय व्यक्तीस्वातंत्र्य? आधी संस्कृती जपा मग सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला सर्वांना आपोआप मिळेलच. आपल्या महान सांस्कृतिक ठेव्यांमधला हा श्लोक तुम्ही ऐकला असेलचः
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ।
यत्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ॥
अर्थात, जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवता नांदतात. जिथे स्त्रियांचा अपमान होतो तिथे सर्व क्रिया, योजना असफल होतात. कांदा संस्थानात नेहेमीच स्त्रियांचा सन्मान होतो. आमच्या ज्योतीकिरणताई पहा किती मोठ्या अधिकारपदावर आहेत! आमच्या संस्थानात स्त्रियांच्या रक्षणासाठी संशोधकही कामाला लागले आहेत. आम्हाला या योजनेत निश्चित सफलता मिळेल. आमेन"

पत्रकार परिषदेच्या शेवटी आ. रामशास्त्री फुटाणे यांच्या आमदारनिधीचा वापर करून सदर चिलखते गटारी अमावस्येच्या मुहूर्तावर सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याचे सर्वांना सांगण्यात आले. शिवाय सर्व महिला पत्रकारांना एकेक चिलखत आणि वाघनखांच्या नेकलेसची जोडी देऊन सन्मानित करण्यात आले.

(पत्रकारभवनाबाहेर आल्यावर सर्व महिला पत्रकारांनी एकमुखाने या चिलखतांचा निषेध केला, आपापली चिलखतं समोरच्या कचरापेटीत भिरकावून दिली आणि नेकलेसची फॅशन आवडल्याचे सांगत ते आपल्या झोळ्यांमधे टाकले.)

प्रेरणेसाठी अनिकेत सुळे यांचे हे ब्लॉगपोस्ट, ममता शर्मा आणि इतर अनेकांचे आभार.

संस्कृतीबातमी

प्रतिक्रिया

कायदे स्ट्रिन्जन्ट (कठोरात कठोर) करायचं बोलायचे सोडून सगळं फालतू बोलत बसले आहेत हे राजकीय नेते. "पेर्स्पेक्टिव्ह डेफिसीट" (आकलनातील गोची) हेच खरं.

मन१'s picture

19 Jul 2012 - 10:37 am | मन१

कठोर कायद्यांचा अभाव ह्यापेक्षाही ; उप्लबध कायद्याचीही अंमलबजावणी न होणं ही मोठी समस्या आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jul 2012 - 11:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कायदे बनवा, त्याची अंमलबजावणी करा हे व्यवस्थेच्या पातळीवर असायला हवं हे मान्य आहे. पण मुलींनी इथे त्यांचे स्वतःचे जे अनुभव मांडलेले आहेत, तसे अनुभव होलसेलमधे येतात याचाच अर्थ मुळात शिक्षणसंस्था, घरातली असो वा घराबाहेरची, कमी पडते आहे. वटवाघूळ यांनी एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणे कुलूप लावलं नाही म्हणून चोरीचा अधिकार मिळतो असं होत नाही. समोर दिसणारी मुलगी-स्त्री ही आपल्यासारखीच एक व्यक्ती आहे आणि तिलाही आपल्याप्रमाणेच भावभावना वगैरे आहेत त्याचा विचार काही पुरूष करत नाहीत. आणि अशा प्रकारच्या पुरूषांची संख्या नगण्य म्हणण्याएवढी कमी नाही.

अगदी पुढारलेल्या, पाश्चात्य देशांमधेही मुलींनी तिखट-मिरीचा स्प्रे जवळ बाळगावा अशा प्रकारच्या सूचना येतात. अशी एखादी स्प्रेची बाटली उघडावी लागली तरी त्या घटनेचा तपास होतोच. पण मुळात ही वेळ का आली याचा विचार होतो. दूरगामी परिणाम पहाता हिंसेचं उत्तर हिंसा होऊ शकत नाही. गुन्हे वाढले आहेत हे एक लक्षण असतं, पोलिस ही मलमपट्टी आहे, इलाज नाही.

लंडनमधे ट्यूब्जमधे बाँबहल्ले झाले तेव्हा मी तिथल्या बातम्या ऐकल्या आहेत. जेवढा भर हल्लेखोरांना शोधण्यावर होता त्यापेक्षा कितीतरी अधिक चर्चा सर्व समाजाचं इंटीग्रेशन (मराठी?) करण्याबद्दल होत असत. लोकांचा धर्म काहीही असो त्यांची वर्तणू़क ब्रिटीश असेल यावर अधिक भर द्यावा असं सर्व थरातल्या लोकांचं, विचारवंतांचं, राजकारण्यांचं म्हणणं होतं. ब्रिटीश पोलिसांकडे बंदूका नसत, या हल्ल्यांमुळे पोलिसांच्या हातात बंदूका आल्या तेव्हा एक अतिशय मार्मिक प्रतिक्रिया आली, "दहशतवाद जिंकला."

श्रावण मोडक's picture

20 Jul 2012 - 9:13 am | श्रावण मोडक

इंटीग्रेशन (मराठी?)

काहीही विचारत जाऊ नकोस. गप्प की जरा. त्या मराठी शब्दात 'आत्मा' येतो. चालेल का? ;-)

इंटीग्रेशन शब्दाचा अर्थ या चर्चेच्या संदर्भात एकत्रीकरण असा घेता येईल

बाकी श्रामोँच्या दटावणीच आश्चर्य वाटल नाही :p

जाई.'s picture

19 Jul 2012 - 10:13 am | जाई.

च्यायला _/\_

एमी's picture

19 Jul 2012 - 10:23 am | एमी

:-D
__/\__

प्रीत-मोहर's picture

19 Jul 2012 - 10:28 am | प्रीत-मोहर

खीक्क

कांदा संस्थानचा विजय असो!!!!

क्लिंटन's picture

19 Jul 2012 - 10:31 am | क्लिंटन

मानले अदिती तुला. __/\__

मृत्युन्जय's picture

19 Jul 2012 - 10:39 am | मृत्युन्जय

:) एक उत्तम तिरकस लेख.

तिरकस नथीतुन मारलेले काही तीर चुकीच्या निशाण्यावर डागलेले होते असे वाटते तरी लेख उत्तमच आणि बहुतांशी मुद्द्याला धरुन.

मन१'s picture

19 Jul 2012 - 11:10 am | मन१

+१
बादवे, अशा घटनांचे प्रमुख कारण स्त्रियांचे अस्तित्व हेच आहे.
(स्त्रियांचे दारु पिणे, स्त्रियांचे असे-तसे कपडे घालणे वगैरे.)
एकदा स्त्रियाच संपल्या की अशा घटनाही संपतील.

मस्त कलंदर's picture

19 Jul 2012 - 11:22 am | मस्त कलंदर

१००% पटले...

बॅटमॅन's picture

19 Jul 2012 - 11:36 am | बॅटमॅन

हॅ हॅ हॅ.....एकदा स्त्रिया संपल्या की मग सुंदर पुरुषांवर असे अत्याचार सुरू होतील, गे लोक थैमान घालतील.

(पुरुषहितचिंतक आणि स्ट्रेट) बॅटमॅन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jul 2012 - 6:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मनोबा :-)

बॅटमॅन, स्त्रियांनंतर सुंदर पुरूषांआधी बालकांचा नंबर लागेल.

गे लोक थैमान घालतील.

आत्तापर्यंत त्यांच्या परस्परसंमतीच्या प्रेमसंबंधांना बेकायदेशीर ठरवलं गेलं, संधी मिळाली तर त्यांचा भडका दिसेल यात वरवर आश्चर्य वाटत नाही. त्यासाठी स्त्रियांनी मरण्याचीही आवश्यकता नाही. पण सर्व पुरूष-समलैंगिक पुरूषी वर्चस्ववादाचे गुलाम असतील असं वाटत नाही. या वर्चस्ववादाचा त्रास झाल्यामुळे बहुतेकांची प्रतिक्रिया पूर्णतः विरूद्ध असू शकते.

(... वेळ मिळाल्यास प्रतिक्रिया विस्ताराने पूर्ण करेन)

आत्मशून्य's picture

19 Jul 2012 - 11:17 pm | आत्मशून्य

ह्या दिशाहीन प्रतीसादाने लेखाचा जो बाज आहे त्याला हीन मतधारीप्रवृत्तिधारे हरताळ फासणेत आला आहे. व लेख ट्यार्पीला कमी पडला हे वास्तव बदलण्याचा चंग धरला असं आढळतयं असो.

स्त्रियांनंतर सुंदर पुरूषांआधी बालकांचा नंबर लागेल.

अशक्य, स्त्रिया संपुर्ण नश्ट होइ पर्यंत बालके तरूण झाली असतील. व स्त्रिया नश्ट होत असताना लहानमुलांच कोण बघणार म्हणुन जन्मदर शुन्यावरही आला असेल.

आत्तापर्यंत त्यांच्या परस्परसंमतीच्या प्रेमसंबंधांना बेकायदेशीर ठरवलं गेलं, संधी मिळाली तर त्यांचा भडका दिसेल यात वरवर आश्चर्य वाटत नाही. त्यासाठी स्त्रियांनी मरण्याचीही आवश्यकता नाही. पण सर्व पुरूष-समलैंगिक पुरूषी वर्चस्ववादाचे गुलाम असतील असं वाटत नाही. या वर्चस्ववादाचा त्रास झाल्यामुळे बहुतेकांची प्रतिक्रिया पूर्णतः विरूद्ध असू शकते.

काय म्हणता ? मग सध्य परीस्थीतीत असा शुरपणा स्त्रिया का दाखवु शकत नाहीत ? का त्या माणुस नाहीत ?

(... वेळ मिळाल्यास प्रतिक्रिया विस्ताराने पूर्ण करेन)

नवीनच धागा काढावा अथवा ह्याचा ट्यार्पी असंबध्द होइल.

- डॉ़क्टर स्ट्रेंजलव्ह.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Jul 2012 - 12:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अशक्य, स्त्रिया संपुर्ण नश्ट होइ पर्यंत बालके तरूण झाली असतील. व स्त्रिया नश्ट होत असताना लहानमुलांच कोण बघणार म्हणुन जन्मदर शुन्यावरही आला असेल.

वैचारिक प्रयोग असा एक प्रकार भौतिकशास्त्रात असतो. ज्ञानाच्या आणि माहितीच्या इतर शाखांमधेही त्याचा उपयोग होतो. त्याबद्दल अधिक माहिती इथे मिळेल.

काय म्हणता ? मग सध्य परीस्थीतीत असा शुरपणा स्त्रिया का दाखवु शकत नाहीत ? का त्या माणुस नाहीत ?

द सेकंड सेक्स या स्त्रीवादाचं बायबल समजल्या जाणार्‍या पुस्तकात याबद्दल एक संपूर्ण धडा आहे. त्याहून अधिक मूलगामी आणि/किंवा वेगळे विचार माझ्याकडे नाहीत.

मस्त कलंदर's picture

19 Jul 2012 - 11:08 am | मस्त कलंदर

गुडाडगुड..

विजुभाऊ's picture

23 Jul 2012 - 1:55 pm | विजुभाऊ

गुडाडगुड..


हे म्हणजे पोट बिघडल्यासारखे वाटतय

प्यारे१'s picture

19 Jul 2012 - 11:12 am | प्यारे१

लेखिकेला स्वयंस्फूर्तीने अधिक चांगले लिहीता येत असावे असे वाटते.
सातत्याने प्रतिक्रियात्मक लिहीण्यात आपला प्रतिभाव्यय करण्यात काय हशील आहे ते समजत नाही.
हे सांगणे लेखिकेपेक्षा अधिक तिच्या 'प्रेरणादायी व्यक्तीमत्वां'स आहे.
लेखिका 'स्वबुद्धी'वर विश्वासून अधिकाधिक चांगले लिहू शकते असा ठाम विश्वास आम्हास वाटतो.
एखादी गोष्ट एखाद्या वेळी बरी जमली म्हणून त्याच प्रकारात पुढे करावी ही जाणीव लोकप्रियतेसाठी उत्तेजना देणारी असली तरी तिचा तारतम्याने उपयोग करायला जमावं. न जमल्यास हसे होते हा इतरांचा पूर्वानुभव असतो.
असो.
सूज्ञ लोकांस जास्त सांगावं लागू नये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2012 - 5:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सातत्याने प्रतिक्रियात्मक लिहीण्यात आपला प्रतिभाव्यय करण्यात काय हशील आहे ते समजत नाही.

आता काय बोलायचं. चर्चा जिथे चालली होती तिथेच काय वाद-संवाद करायला हवा होता. आपापली मत मांडुन सदस्यांनी योग्य अशा चर्चा केल्याच होत्या. उगाच ’काटकर’ ’ज्योतिकिरण ताई’ यांच्या तोंडी असलेले नसलेले संवाद टाकायचे आणि कै च्या कै लिहायचं. व्यक्तिश: मला लेखन पटलं नाही. डोकं सटकतं. असो. आवरतो.

एखादी गोष्ट एखाद्या वेळी बरी जमली म्हणून त्याच प्रकारात पुढे करावी ही जाणीव लोकप्रियतेसाठी उत्तेजना देणारी असली तरी तिचा तारतम्याने उपयोग करायला जमावं. न जमल्यास हसे होते

हसंच होतं. दुसरं काही नाही.

बाय द वे, द सेकंड सेक्स या स्त्रीवादाचं बायबल पुन्हा पुन्हा वाचण्याची आणि नीटपणे समजून घेण्याची गरज आहे.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

20 Jul 2012 - 5:26 pm | बॅटमॅन

+१ सहमत.

बाय द वे, द सेकंड सेक्स या स्त्रीवादाचं बायबल पुन्हा पुन्हा वाचण्याची आणि नीटपणे समजून घेण्याची गरज आहे.

त्यावर कुठे लिखाण झालेले आहे का? पुस्तक वाचले, छान आहे. पण त्याचे खंडनमंडन मराठी आंजावरती नाही वाचले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2012 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'द सेकंड सेक्स' बाबत खुप काही मराठीत जालावर मला काही वाचायला मिळालं नाही. ( पुस्तकच संग्रही असल्यामुळे शोधाशोध करण्याची गरज वाटली नाही) बाकी, या पुस्तकाबाबत स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती, समानता याच संदर्भाने बर्‍याचदा उल्लेखच येत राहीलेले दिसतात. आपापल्या सोयीचे संदर्भ घ्यायचे आणि पाठीवर शाबासकी मिळवुन घ्यायची इतकंच मला दिसलं आहे. बाकी, स्त्री-पुरुष समानतेसाठीचा उत्तम युक्तिवादानं भरलेलं पुस्तक आहे. सिमॉन बोव्हुआर च्या (उच्चार काय असेल ते असेल ) पुस्तकातच उत्तम खंडनमंडन आहे, असं माझं मत आहे.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

20 Jul 2012 - 6:15 pm | बॅटमॅन

आपापल्या सोयीचे संदर्भ घ्यायचे आणि पाठीवर शाबासकी मिळवुन घ्यायची इतकंच मला दिसलं आहे.

अगदी अगदी. एकच एक पुस्तक आणि त्यातले तेच ते संदर्भ. किमानपक्षी त्यात तरी नावीन्य आणा म्हणावं :) बाकी पुस्तकात स्वतःचे मंडन उत्तम केलेले आहे हे नक्की.

(त्या पुस्तकाच्या नावामुळे हातात घेतलं आणि सुरुवातीची निराशा नंतर इंटरेस्ट मध्ये कधी बदलली तेच कळालं नाही.)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Jul 2012 - 10:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अगदी अगदी. एकच एक पुस्तक आणि त्यातले तेच ते संदर्भ. किमानपक्षी त्यात तरी नावीन्य आणा म्हणावं

माझ्या डोक्यातही हेच आले होते. अजून कुणालाही जाणवले हे वाचून बरे वाटले. काही लोक केवळ मृत्युंजय वाचून महाभारतावर अधिकारवाणीने बोलतात त्याची आठवण झाली.

८ मार्च च्या काळात आलेल्या लेखांत पण या पुस्तकाचा आणि लेखिकेचा उल्लेख अनेकदा केला होता. तेव्हा मला तेच तेच संदर्भ देणारे काही समीक्षकीय लेखन आठवले होते. इब्सेनची नोरा दरवाजा आपटून गेली त्याची आठवण अशा समीक्षकांना दर तिसऱ्या लेखात होत असते. एके काळी इतके वाचले होते की खुद्द इब्सेन न वाचता मी पण नोरा आणि तिच्या दारावर २ मिनिटे बोलू शकतो असतो.

अवांतर :- मार्च मधील मॅडनेस च्या काळात एक विडंबन टाकायची उर्मी मनात दाटून आली होती. तेव्हा मी "द फर्स्ट फोरप्ले" अशा पुस्तकाचा संदर्भ देणार होतो वारंवार ;-)

बॅटमॅन's picture

21 Jul 2012 - 12:33 am | बॅटमॅन

हा हा हा "द फर्स्ट फोरप्ले" लैच्च भारी बरंका ;)

मन१'s picture

21 Jul 2012 - 10:14 am | मन१

इतर कशाशीही नाही पण
एकच एक पुस्तक आणि त्यातले तेच ते संदर्भ.
ह्याच्याशी सहमत. त्यात पुन्हा आपण ते वाचलं नसेल तर उगीच आपण अडाणी वगैरे असल्याचं जाणवू लागतं.
माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक म्हणून आवडलं,; पण दर चौथ्या डायलॉग नंतर "माय फेअर लेडी"चे संदर्भ पाहून हैराण झालो होतो. अरे एखाद्यावेळेस ठीक आहे, पुन्हा पुन्हा काय "आधी ते वाचून या आणि मग आमच्या कलेची मजा घ्या" म्हणत रसिकांचा पाणउतारा करायचा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2012 - 11:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असल्या व्यक्तिगत आरोपांकडे लक्ष देण्याचं खरंतर कारण नाही. पण एक मिपा संपादक आणि काही उच्चशिक्षित सभासदांना मूलभूत (fundamental) काम आणि उपयोजित, तपशीलवार (applied, detailed) लेखन यांच्यातला फरक माहित/समजत नसल्यास समजावून देणं इष्ट वाटतं.

एकच एक पुस्तक आणि त्यातले तेच ते संदर्भ.

'स्त्रीवादाचं बायबल' असं बिरूद या पुस्तकाला इतर अभ्यासकांनी निष्कारण जोडलेलं नाही. सिमोनने मांडलेले आहेत त्याहून अधिक आणि/किंवा जास्त मूलभूत विचार इतर कोणी लिहील्याचं माझ्या वाचनात नाही. कोणाच्या माहितीत असेल तर कळवणे. (हमारी मांगे पूरी करो..., बाप दाखव ... )
अन्यथा स्थानिक आणि/किंवा तत्कालिन संदर्भ, ऐतिहासिक संदर्भ यांच्यासंदर्भात करूणा गोखले (बाईमाणूस), मंगला आठलेकर (महापुरूषांच्या नजरेतून स्त्री, महर्षी ते गौरी) आणि अर्थातच ताराबाई शिंदे (स्त्री-पुरूष तुलना) ही नावं सहज आठवली. राजन खान (बाईजात) यांचं लिखाण फार भडक आणि ऑबव्हीयस (मराठी?) वाटल्यामुळे वाचत नाही. अजून काही पुस्तकं मानवशास्त्रातील लिंगभावाची शोधमोहीम (लीला दुबे, अनुवादः विद्युत भागवत), स्त्री विरूद्ध पुरूष (शिवराज गोर्ले) ही पुस्तकंही तपशील भरण्याचं काम करत आहेत.

----

सापेक्षता म्हटल्यावर आईनस्टाईन सोडून इतर काही नावच काढत नाहीत. अगदी सामान्य सापेक्षतावादाचं गणित सोडवणार्‍याचं नावही गूगल केल्याशिवाय आठवत नाही.

---

'माय फेअर लेडी' असो वा 'पिग्मॅलियन', ते उच्चारशास्त्रामधलं मूलभूत काम नव्हे. त्यात फक्त तपशील, उपयोजन आहे.

बॅटमॅन's picture

22 Jul 2012 - 12:50 am | बॅटमॅन

अरे हो, खालच्याच एका प्रतिसादात इतर काही लिंका दिलेल्या आहेत. त्यात कुठेच सिमोनचा संबंध नाही, ना 'सेकंड सेक्स'चा! असे इतर अनेक प्रतिसाद नजरेआड करणं हेतूपुरस्सर आहे का दृष्टीदोष?

खालच्या लिंका स्त्रीवादाच्या ओव्हरऑल सीनबद्दल नाही बोलत. एकतर निव्वळ विदा नैतर कायद्याची कलमं अस्लाच कैतरी प्रकार. विदा म्हणजे निष्कर्ष नाही हे सांगायला कोणा महालानोबिसांची गरज नै. त्यामुळे सेकंड सेक्स सारख्या पुस्तकात जे दिलंय तत्सम कंटेंट इथे नाही हे सरळ असतानादेखील त्याचा हवाला देणे हा कसला दोष?

इतर काही लेखक लेखिकांची नावे दिलेली आहेत हे चांगलेय. इतर रेफरन्सेस दाखवल्यामुळे स्त्रीवादाचा किती लोकांनी कसा विचार केलाय हे कळण्यास मदत होते, मग तो वरिजिनल असो वा डेरिव्हेटिव्ह असो.

सापेक्षता म्हटल्यावर आईनस्टाईन सोडून इतर काही नावच काढत नाहीत. अगदी सामान्य सापेक्षतावादाचं गणित सोडवणार्‍याचं नावही गूगल केल्याशिवाय आठवत नाही.

मुळात ही तुलनाच गैरलागू आहे. सापेक्षता ही कल्पना त्याने एकट्याने मांडली म्हणून त्याचे नाव घेतले जाते.
स्त्रीवादाबद्दल असे म्हणता येईल का?? नसेल तर इतर कोण लोकं आहेत , त्यांचे काय विचार आहेत, हे लोकांसमोर आलं तर नको का? मराठी आंजाच्या माझ्या तोकड्या अभ्यासात मला फारसं काही दिसलं नाही या बाबतीत. चूक असेल तर सप्रमाण दा़खवून द्यावी. मी आनंदाने प्रकाटाआ करेन, हाकानाका :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jul 2012 - 12:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सेकंड सेक्स सारख्या पुस्तकात जे दिलंय तत्सम कंटेंट इथे नाही हे सरळ असतानादेखील त्याचा हवाला देणे हा कसला दोष?

या धाग्यावर विचारलेला मूळ प्रश्न स्त्रिया एकजूट का दाखवत नाहीत, असा काहीसा होता. या(ही प्रश्ना)चं उत्तर 'द सेकंड सेक्स'मधे सिमोनने अतिशय खोलात जाऊन दिलं आहे (आणि आठलेकर, गोखले* मंडळींनी दिलेलं नाही), अशा प्रकारचं विधान मी केलं हा जणू माझ्या लिखाणातला दोष आहे अश्या पद्धतीने आरोप केल्यावर तितपतच तर्क देऊन (दोष)साधर्म्य दाखवलं.

सापेक्षता ही कल्पना त्याने एकट्याने मांडली म्हणून त्याचे नाव घेतले जाते.

गुरूत्वाकर्षण इत्यादींवर काम करणारे सापेक्षतावाद पुन्हा शोधायला जात नाहीत. ते मॉडीफाईड न्यूटोनियन डायनॅमिक्स, डार्क मॅटर डिस्ट्रीब्यूशन आणि इतर गोष्टींवर काम करतात. गोखले, आठलेकर* वगैरे मंडळीही सिमोनने केलेलं मूलभूत काम पुन्हा करत नाहीत. इतरांची नावं न घेण्याचं कारण एवढंच की गुरूत्वाकर्षणावर केलेलं काम प्रकाशित करताना हायजेनबर्ग, चॅडविक वगैरे लोकांचे संदर्भ निष्कारण दिले जात नाहीत.

असो.

*१. हीच दोन नावं मुद्दाम घेतली कारण या दोघींच्या तर्कशुद्ध आणि रोखठोक लिखाणाच्या मी प्रेमात आहे. तरीही त्यांचं काम अतिशय मूलभूत स्वरूपाचं आहे असं मला वाटत नाही. अन्यथा मंगला गोडबोले त्यांच्या गोष्टींमधूनही विनोदी शैलीत स्त्रीवादी विचार मांडतात.
२. अवांतरः 'बाईमाणूस' संदर्भात राजेशने एक लेख लिहीला होता.

या धाग्यावर विचारलेला मूळ प्रश्न स्त्रिया एकजूट का दाखवत नाहीत, असा काहीसा होता. या(ही प्रश्ना)चं उत्तर 'द सेकंड सेक्स'मधे सिमोनने अतिशय खोलात जाऊन दिलं आहे (आणि आठलेकर, गोखले* मंडळींनी दिलेलं नाही), अशा प्रकारचं विधान मी केलं हा जणू माझ्या लिखाणातला दोष आहे अश्या पद्धतीने आरोप केल्यावर तितपतच तर्क देऊन (दोष)साधर्म्य दाखवलं.

तुमच्या लिखाणातला दोष आधी कोणीच दाखवला नव्हता तर इन जनरल विधान होते ते. असे असून वैयक्तिक आधी जाऊन , मग नंतर वैयक्तिक प्रत्युत्तर आले तर परत गळा काढू नये.

गुरूत्वाकर्षण इत्यादींवर काम करणारे सापेक्षतावाद पुन्हा शोधायला जात नाहीत. ते मॉडीफाईड न्यूटोनियन डायनॅमिक्स, डार्क मॅटर डिस्ट्रीब्यूशन आणि इतर गोष्टींवर काम करतात. गोखले, आठलेकर* वगैरे मंडळीही सिमोनने केलेलं मूलभूत काम पुन्हा करत नाहीत. इतरांची नावं न घेण्याचं कारण एवढंच की गुरूत्वाकर्षणावर केलेलं काम प्रकाशित करताना हायजेनबर्ग, चॅडविक वगैरे लोकांचे संदर्भ निष्कारण दिले जात नाहीत.

बरं. स्त्रीवादाबद्दल आमचं सेकंड सेक्स पलीकडे जास्त वाचन नाही. त्यामुळे याबद्दल अन्य काही वरिजिनल युरोपियन /भारतीय/ अमेरिकन/अन्य वैग्रे लोकं असतील आणि त्यांनी कैतरी लिहिले असेल तर ते समोर यावे म्हणून म्हणालो. तर भौतिकशास्त्र मध्ये आणलेत. आणण्यालाही हरकत नाही, पण त्याची उपमा/शिरा इथे बरोबर लागू होत नाही. कारण सापेक्षता वैग्रे मध्ये मूलभूत काम फक्त ऐन्स्टैनने केले तसे स्त्रीवादात मूलभूत काम फक्त सिमॉन ने केले आहे का? साधे विकीपांडित्य दाखवले तरी बर्‍याच लोकांची नावे दिसतात. भैतिकशास्त्रात नवनवीन थेर्‍या मांडणारे स्ट्रिंगवाले, लूपवाले वैग्रेंची नावे मधूनमधून का होईना कानावर आदळत असतात. पण त्या लिंकेतले लोक मात्र आम्ही नै ऐकले ब्वॉ कधी. आमचा सिलेक्षन बायस असेल तो, पण स्त्रीवादात इंट्रेस्ट असणार्‍यांनी तरी मराठी आंजावर अथवा वाङ्मयात यांची दखल घेतलेली आहे, असे नै दिसले. त्यामुळे जर कोणी म्हटले, की "एकच एक पुस्तक आणि त्यातले तेच ते संदर्भ ," तर त्यात चूक असे काहीच नाही. बाकीच्यांचे नामोनिशान न दिसल्यामुळे हे विधान केले गेले आहे, मूलभूत काय आणि उपयोजित काय वैग्रेंच्या अज्ञानामुळे नाही. त्याला उत्तर म्हणजे निव्वळ जे झाले / होते आहे त्याचे रॅशनलायझेशन करणे असे नसून इतर रेफरन्स देणे किंवा स्वतः कैतरी लिहून बाकीच्यांची ओळख करून देणे हे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2012 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुळ लेखनात गम्मत म्हणुन का असेना याची त्याची उदाहरणासाठी नावं घ्यायची आणि व्यक्तिगत बकवास सुरु करायची आणि आव आणायचा मोठं गंभीर असं लेखन चाललंय याचा, अर्थात हे काही नवं नाही आणि त्याचं काही नवल नाही. म्हटलं एवढं कन्हत कन्हत टाकलेल्या प्रतिसादात काही 'मूलभूत उपयोजित आणि तपशिलवार' असं वाचायला मिळतं का तर अपेक्षाभंगच झाला. बाकी, तुमचं चालु द्या.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jul 2012 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार

टिपिकल विक्षिप्त लेख.

भट्टी मस्त जमली आहे. मुख्य म्हणजे काही काही पंचेस खल्लास.

सिंड्रेलाच्या बहिणी ह्या नुसत्या हलकटच नाहीत तर उत्तम लेखीका आहेत हे काळाने सिद्ध केले आहे. ;)

नावातकायआहे's picture

19 Jul 2012 - 11:01 pm | नावातकायआहे

__/\__

नेहमीची ( तिरकस) रडारड असली तरी ' लेकी बोले सुने लागे ' स्टाईल आवडल्या गेली आहे :)

बॅटमॅन's picture

19 Jul 2012 - 2:11 pm | बॅटमॅन

तिरकस रडारडीबद्दल +१. लेख टिपिकल सटायरिकल आहेच.

चित्रगुप्त's picture

19 Jul 2012 - 2:51 pm | चित्रगुप्त

प.पू. कामदेव बाबा, घासाराम बापू, जन्मकुमारीज (रजि.) इ. नी एकत्र येऊन या चिलखतास पाठिंबा दिलेला आहे. सदर चिलखते ऑनलाईन बुक करायची सोय लवकरच करण्यात येत असून सध्या ती खालील पत्त्यावर उपलब्ध आहेत:

जन्मकुमारीज भवन (राजीव भवन चे समोर), घासाराम आश्रम (जवाहर केंद्राशेजारी)
१०८, श्री श्री श्री कविशंकर मार्ग (महात्मा गांधी मार्ग वरील सातवी गल्ली), पुणे.
सदर चिखत घेणारास एक पावित्र्य- पट्टा मोफत दिला जाईल. त्वरा करा.

विशेषः आकर्षणः या चिलखताचे रिमोट कंट्रोल घरी पालकांकडे ठेवण्याची सोय, तसेच त्याची एक कळ दाबल्यावर चिलखत कार्यरत होऊन आतील व्यक्तीसकट घरच्या दिशेने चालायला लागून सातच्या आत घरात पोचण्याची गॅरंटी.

चिलखत व पट्टा:

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jul 2012 - 8:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ते हेल्मेट काढून टाका. कांदा संस्थान म्हणजे सौदी अरेबिया नव्हे! आणि चिलखताचा वरचा भाग वाळूच्या घड्याळ्यासारखा थोडा अधिक ... म्हणजे एकदम फिट्ट! ;-)

या चिलखताचे रिमोट कंट्रोल घरी पालकांकडे ठेवण्याची सोय, तसेच त्याची एक कळ दाबल्यावर चिलखत कार्यरत होऊन आतील व्यक्तीसकट घरच्या दिशेने चालायला लागून सातच्या आत घरात पोचण्याची गॅरंटी

ही सूचना अगदी मान्य आहे. मुलींच्या हातात पासकोड दिला तर त्या त्याचा दुरूपयोग नाही करणार?

आणि हो, भारतीय संस्कृतीचे महान पाईक, हे अध्यात्मिक गुरू, यांच्याबद्दल काही बोलू नका. त्यांच्याकडून चिक्कार मटेरियल मिळतं! ;-)

श्रावण मोडक's picture

19 Jul 2012 - 4:27 pm | श्रावण मोडक

बातमीचे हे स्वरूप गेलाबाजार चालणाऱ्या दूरचित्रवाहिन्या, साप्ताहिक किंवा त्याहून अधिक कालखंडाची लंगोटीपत्रे यासारखे आहे. अजून कसदार बातमीलेखन करता येऊ शकते असा हा विषय आहे.

वीणा३'s picture

19 Jul 2012 - 11:30 pm | वीणा३

झकास लेख. पूर्वी म.टा. मध्ये एक सदर यायचं (नाव आठवत नाही) त्यात असेच तिरकस लेख असायचे, त्याची आठवण झाली.

रामपुरी's picture

20 Jul 2012 - 4:32 am | रामपुरी

१. तोकडे कपडे घालण्याचे समर्थन
२. पब मध्ये जाण्याचे समर्थन
३. तोकडे कपडे घालून पबमध्ये जाण्याचे समर्थन
४.स्त्रियांनी तोकडे कपडे घालण्याचे समर्थन
५. स्त्रियांनी पबमध्ये जाण्याचे समर्थन
६. स्त्रियांनी तोकडे कपडे घालून पबमध्ये जाण्याचे समर्थन

यापैकी नक्की कसला प्रयत्न आहे?
हल्ली लोक कशाचं समर्थन करतील सांगता येत नाही. रेव्ह पार्टी आयोजित करण्याचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी एक आंदोलन उभारावं म्हणतोय. :)

(शेवटी स्वातंत्र्याचा उपयोग कुठल्या गोष्टीसाठी करायचा हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून आहे म्हणा तेव्हां चालू द्या)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Jul 2012 - 8:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

यापैकी नक्की कसला प्रयत्न आहे?

इथे या लेखाचा मुख्य उद्देश बरोब्बर पकडला आहे. (दुवा ऐसी अक्षरेवर जातो. आपापल्या जबाबदारीवर उघडावा.)
मला न जमलेला आणि अधिक भर घालणारा खोचकपणा इथेच चित्रगुप्त काकांनी दाखवला आहे.

१-६ या गोष्टी भारतात कायद्याने गुन्हा नाहीत.

रेव्ह पार्टीचा विषय (या किंवा 'गुवाहाटी आणि बागपत' या धाग्यातही) मी काढलेला नाही. तरीही माझं मत हवं असा हट्टच असेल तर तसं वेगळं विचारा.

(शेवटी स्वातंत्र्याचा उपयोग कुठल्या गोष्टीसाठी करायचा हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून आहे म्हणा तेव्हां चालू द्या)

बौद्धीक आणि शारीरिकही! उदाहरणार्थ, ब्रिटीश साईझ ८ चे कपडे घालायचं स्वातंत्र्य (ब्रिटन आणि भारतात) सगळ्यांना आहे, पण ठराविक आकारापेक्षा स्थूल वा सूक्ष्म असणार्‍यांना ते जमत नाही. तसंच स्त्रियांचे कपडे वापरण्याचं स्वातंत्र्य पुरूषांना आहे, हे स्वातंत्र्य फार पुरूष वापरत नाहीत. विशेषतः दुसर्‍या महायुद्धानंतर स्त्रिया हे स्वातंत्र्य उपभोगायला शिकल्या, शिकत आहेत.

अवांतरः पब्लिक या महाजन आणि सामान्यमान्य शब्दाचा उगम ब्रिटीश पब संस्कृतीमधेच आहे.

रामपुरी's picture

21 Jul 2012 - 2:44 am | रामपुरी

दुव्यावर चित्रगुप्त काकांनी लिहिलेलं काहिही सापडलं नाही.

"१-६ या गोष्टी भारतात कायद्याने गुन्हा नाहीत."
भारतात कायद्याने बर्‍याच गोष्टी गुन्हा नाहीत तेव्हां त्या सर्व बरोबर आहेत असं म्हणावं काय?
वानगीदाखल
१. भारतात बाहेरख्याली पणा कायद्याने गुन्हा नाही (पुरूष आणि स्त्रिया दोघांसाठी)
२. गरोदर असताना स्त्रियांनी दारू पिणे गुन्हा नाही
३. घरात धूम्रपानाला बंदी नाही
अशी अनेक उदाहरणे देता येतील.
"रेव्ह पार्टीचा विषय (या किंवा 'गुवाहाटी आणि बागपत' या धाग्यातही) मी काढलेला नाही "
रेव्ह पार्टीचा विषय तुम्ही काढला असं मी म्हटलेलंच नाही. तो स्वातंत्र्याच्या लढाईतला कदाचित पुढचा मुद्दा असेल असं मला वाटलं म्हणून तो मी अगोदरच मांडून ठेवला.
"तरीही माझं मत हवं असा हट्टच असेल तर तसं वेगळं विचारा"
गरज वाटत नाही.
लेखात दिलेल्या मोनिका शर्माचा दुवा उघडला असता आक्षेप घेण्याजोगी दोन वाक्ये मला आढळली (अर्थात माझ्या बौद्धिक कुवतीनुसार)
Dress carefully to avoid crime
Be careful about how you dress... Aping the west blindly is eroding our culture and causing such crimes to happen
पण मी ती "घराला कुलुप लावा अन्यथा चोरी होईल" या अर्थाने घेतली. त्यामुळे मला वैयक्तिकरित्या ती वादळी वाटली नाहीत. कदाचित एखाद्या जबाबदार आईने आपल्या मुलांना घराबाहेर पडताना हेच सांगितलं असतं. अगदी पाश्चिमात्य देशांतूनही शाळेत जाताना आई मुलींना अतिशय तोकडे कपडे घालायला विरोधच करताना दिसते (अगदी दूरदर्शनवरील मालिकंमधूनही)
मला नेहेमीच एक प्रश्न पडतो, उत्तान कपडे घालून निघलेल्या एखाद्या मुलीकडे बघून एखाद्या मुलाने जर शिट्टी मारली तर तिला अभिमान वाटत असेल का की आपण घातलेल्या अश्या कपड्यांचं चीज झालं. ज्या कारणासाठी मी असे कपडे घातले तो उद्देश सफल झाला. म्हणजे त्या मुलीच्या अश्यावेळी नक्की काय भावना असतील? जर तिला ते आवडलं नाही तर तिने असे कपडे आपण होऊन घालण्याचे कारण काय असेल? समजा एखादी नटी चित्रपटगृहात गेली तर पहिल्या रांगेतलं पब्लिक ज्या शॉटच्या वेळी शिट्ट्या मारतं ते बघून त्या नटीला काय वाटेल?

असो, "शेवटी स्वातंत्र्याचा उपयोग कुठल्या गोष्टीसाठी करायचा हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून आहे" हे अगोदर म्हटलंच आहे, तेच परत म्हणतो. पण एक नक्की आहे, घराला कुलूप न लावल्याने जरी चोरीचा अधिकार मिळत नसला तरी चोरांना उघड्या घरात चोरी करायला उत्तेजन जरूर मिळेल. नुकसान आपलंच असतं म्हणूनच पोलिस सुद्धा घराला कुलूप लावूनच बाहेर पडत असतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2012 - 4:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतात कायद्याने बर्‍याच गोष्टी गुन्हा नाहीत तेव्हां त्या सर्व बरोबर आहेत असं म्हणावं काय?

मी कायद्याचा अभ्यास केलेला नाही त्यामुळे त्या बर्‍याच गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. पण कायदाही कधीमधी नको तिथे तोंड खुपसतो (असं माझं मत आहे.) याची काही उदाहरणं माहित आहेत. कधीमधी वेगवेगळ्या उच्च न्यायालयांमधले आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कायद्याचे अर्थ आधीपेक्षा वेगळे लावतात. याचं चटकन आठवणारं उदाहरण कलम ३७७.

१. भारतात बाहेरख्याली पणा कायद्याने गुन्हा नाही (पुरूष आणि स्त्रिया दोघांसाठी)
२. गरोदर असताना स्त्रियांनी दारू पिणे गुन्हा नाही
३. घरात धूम्रपानाला बंदी नाही

घटना, ़कायद्याने लोकांना ठराविक गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. करावं का नाही याची याचा निर्णय आणि कृत्याच्या परिणामाची जबाबदारीही पर्यायाने लोकांकडेच दिलेली आहे. बाहेरख्यालीपणाने घटस्फोट, विशिष्ट रोग होणे, गर्भारपण इ. घडल्यास त्याची जबाबदारी प्रत्येकाची आपापली आहे, घटनेची, सरकारची, पोलिसांची, न्यायसंस्थेची नाही. कायद्याप्रमाणे बाहेरख्यालीपणा हे घटस्फोटासाठी पुरेसं कारण आहे.

भारतात घटनेला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे आणि घटनाही अनेक गोष्टींबद्दल, (उदा: कशा प्रकारचे कपडे घालावेत, कोणत्या आस्थापनेत, दुकानात कधी, कोणी जावे, इ.) भाष्य करत नाही.

मला नेहेमीच एक प्रश्न पडतो, उत्तान कपडे घालून निघलेल्या एखाद्या मुलीकडे बघून ...

मला नेहेमीच एक प्रश्न पडतो, उत्तान कपडे कोणते हे कोण ठरवणार?
खांद्यांपासून पावलांपर्यंत संपूर्ण शरीर झाकणारा, ढगळ, अपारदर्शक नाईट ड्रेस घालून मला एकदा बिल्डींगमधल्या एकांकडे जावं लागलं. त्या घरातल्या आजोबांनी त्या कपड्यांवरही आक्षेप घेतला होता, जे कपडे मला, माझ्या भावाला, वडलांना नॉर्मल वाटत.
शाळेचा गणवेश (गुडघ्या-पोटर्‍यांखाली पाय उघडे टाकावे लागायचे) घालून रस्त्यातून जाताना माझ्याकडे पाहून एका मुलाने शिट्टी मारली होती. माझ्या घराबाहेर पडण्याचा उद्देश तेव्हा सफल झाला असं काही मला वाटलं नाही ब्वॉ! वर मी घरी येऊन या प्रकाराची तक्रारही केली.
नऊवारी जाऊन पाचवारी आली तेव्हाही पाचवारी सभ्य नसण्याचे आक्षेप घेतल्याचं मिपावरच वाचलं.

... नुकसान आपलंच असतं म्हणूनच पोलिस सुद्धा घराला कुलूप लावूनच बाहेर पडत असतात.

कमी कपडे म्हणून लैंगिक अत्याचार हा कार्यकारणभावच मुळात चुकलेला आहे. पूर्ण कपड्यांतल्या बायकांनाही अत्याचारांना सामोरं जावं लागतं, 'गुवाहाटी आणि बागपत' या धाग्यात अनेक स्त्री-आयडींचे अनुभव सांगणारे प्रतिसाद अशाच अर्थाचे आहेत. कपड्यांच्या लांबीरूंदीचा 'नुकसान' होण्याशी काहीही संबंध नाही. अनेक सेक्स अफेंडर्सचं प्रोफायलिंग करूनही हाच निष्कर्ष निघातो.

मी वाचलेल्या बातम्यांप्रमाणे, गुवाहाटीच्या या मुलीचं पबच्या आत कोणाशीतरी भांडण झालं आणि त्याचं पर्यवसान या निंदनीय घटनेत झालं. भांडण पबमधे होऊ शकतं तसं शाळा, कॉलेजातही होऊ शकतं. शिवाय एका बातमीप्रमाणे एका पत्रकाराने या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या आहेत. कपड्यांच्या लांबी-रूंदीचा पुन्हा एकदा संबंध नाहीच.

(मोनिका नव्हे) ममता शर्मांच्या वक्तव्याचा संदर्भ हा फक्त निषेधासाठी दिलेला आहे, किरण बेदींच्या निषेधाप्रमाणेच (जो संदर्भ अनिकेतच्या ब्लॉगमधे आहे).

(दुवा वेगळ्या प्रतिसादाचा होता. चित्रगुप्त काकांचा प्रतिसाद इथेच आहे असं आधीच्या प्रतिसादातही लिहीलेलं आहे.)

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Jul 2012 - 4:42 pm | पुण्याचे वटवाघूळ

शेवटी स्वातंत्र्याचा उपयोग कुठल्या गोष्टीसाठी करायचा हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून आहे म्हणा

अगदी बरोबर. आणी म्हणूनच आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा वापर योग्य कारणासाठीच करत आहोत. तुम्हाला काळजी नसावी.

३_१४ विक्षिप्त अदिती जी, लेख मस्त चुरचुरी झाला आहे.
लेख वाचताना हसु येत होतच त्याच वेळी स्त्रियांवर होणार्‍या अन्यायात वाढ होत असल्यामुळे मन खंतावत ही होत.
अन्याय करणार्‍या लोकांच्या अधमपणाची चीड येत होती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Jul 2012 - 10:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रियांवर होणार्‍या अन्यायात वाढ होत असल्यामुळे मन खंतावत ही होत.

स्त्रियांवर अजूनही अन्याय होत असला तरीही होणारा अन्याय वाढता आहे याच्याशी असहमती.

पूर्वी मुलींना न शिकवणे, बालिकांचे म्हातार्‍यांशी लग्न लावून देणे, मनाविरूद्ध डोक्यावर सवत बसवणे, जिवंतपणी धर्माच्या नावाखाली जाळणे, विधवांना अतिशय विरूप आणि अत्यंत नीरस आयुष्य जगायला लावणे, विधवांचा शारीरसुखासाठी उपयोग करून त्यातून स्त्री गरोदर राहिल्यास तिचं जिणं हराम करणे अशा अनेक गोष्टी न्याय्य समजल्या जात असत. आज या गोष्टी धडधडीत अन्याय्य समजल्या जातात त्यामुळे रूपकंवर, गुवाहाटीसारख्या गोष्टींना सहज वाचा फुटते, समाजातून अशा (अपवादाने दिसणार्‍या) कृत्यांचा निषेधच होतो.

स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाचेही अनेक स्तर आहेत याबद्दलही आता चर्चा होतात. वर उल्लेख केलेल्या गोष्टी समाजाने सरसकट नाकारलेल्या आहेत. समाजाचा एक हिस्सा या गोष्टी सर्रास करत असला तरीही हुंडा, हुंडाबळी हे कायदाबाह्य प्रकार आजही होत असले तरी त्याबद्दल समाजात वाढती नाराजी आहे. स्त्रीभ्रूणहत्येबद्दलही हेच म्हणता येईल.

समाजाच्या दुसर्‍या एका हिश्श्यात योनीशुचिता वगैरे "गया-गुजर्‍या", पुराणमतवादी कल्पना असल्याचंही मत आहे. करियर म्हणून, स्वतःला एक व्यक्ती म्हणून प्रस्थापित करण्यासाठी नोकरी, व्यवसाय करणार्‍या स्त्रिया 'आपल्यातल्याच' समजणार्‍या समाजात बाईच्या आयुष्याची इतिकर्तव्यता लग्नात नाही, अशा प्रकारचे विचार अगदी सहज दिसून येतात. मध्यमवर्गात बर्‍यापैकी खप असणार्‍या लोकप्रभा*मधेही योनीशुचितेच्या नावाने शंख करणारं लेखन दिसतं.

गुवाहाटीच्या प्रकारातल्या दोषींबद्दल चीड येणं, आजच्या काळाचा विचार करता सहाजिकच आहे. ही टवाळी त्या घटनेसंदर्भात नाही. या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा साप सोडून भुई धोपटत आपली संस्कृती इतरांवर लादू पहाणार्‍या वृत्ती दिसत राहिल्या त्याचा निषेध करणारी ही टवाळी आहे. "छेड न काढली गेलेली मुलगी" मिळणं कठीण आहे आणि हे वास्तव कटू आहे हे आपण सहज स्वीकारतो. त्याचबरोबर कसे कपडे घाल, घालू नको असल्या प्रकारच्या सूचना देणारे लोकं भेटलेले नाहीत अशी मुलगी भेटणंही कठीण आहे. अनेक मुली आपल्याला काय हवं तेच करतात पण सत्ता गाजवण्यासाठी मुलींचा वापर करणार्‍या प्रवृत्तींचा अजूनही म्हणावा तसा निषेध होत नाही.

*या साप्ताहिकाबद्दल माझं व्यक्तिगत मत थोर नाही. स्त्रीमुक्तीच्या नावाखाली जे छापतात त्यातही काही वेळा अर्धवट समजूतीवर आधारित, वैद्यकीय सत्याचा अपलाप करणारं लिहीलेलं असतं.

अदिती जी, तुमच म्हणण खरच योग्य आहे.
पण माझ म्हणण हेच आहे की एका बाजुला समाज अतिशय प्रगत होत आहे. त्यात स्त्रिया खरच आघाडीवर आहेत. त्या स्वताची प्रगती प्रत्येक क्षेत्रात अतिशय प्रभावी पणे करत आहेत.
पण त्याच वेळी त्यांच्या बाबतीत होणार्‍या अन्यायात वाढही होत आहेत. पोलिसांकडे येणार्‍या पिडित स्त्रियांच्या तक्रारी ह्या १० पैकी एक असतात वइतर ९ तक्रारी ह्या पोलिसांकडे येतच नाहीत त्या भीती पोटी केल्या जातच नाही. पिडीत महीला ही न्यायाविनाच रहाते. त्यामुळे जर अश्या तक्रारी जर पोलिसांकडे नोंद झाल्या तर मी जे म्हणालो की स्त्रियांवरील अन्यायात वाढ झाली आहे ह्याची सत्यता दिसुन येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2012 - 10:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अजूनही मुली-स्त्रियांवर अत्याचार होत नाहीत असं माझं म्हणणं अजिबात नाही. फक्त कोणे-एके-काळी कसं सगळं छान-छान होतं आणि आता परिस्थिती खराब होत आहे असं नसून आता परिस्थिती सुधारते आहे. स्त्रियांवर अत्याचार होतात हे मुळात मान्य केलं जात आहे, हे अत्याचार होऊ नयेत, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी कायदे, न्यायव्यवस्था, पोलिस आहेत आणि दुसर्‍या बाजूने समकालीन लेखकांच्या ललित लिखाणामधेही याचं पुरेपूर चित्रण दिसतं, वैचारिक लेखनात याचा मूलगामी शोध घेण्याचा प्रयत्न होतो.

बायका चार भिंतींबाहेर पडू शकत नसत तेव्हा याच्यापैकी काहीही नव्हतं. आज स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होतात हे अनेक पुरूषही मान्य करतात. याचा अर्थ त्या अन्याय-अत्याचाराची तीव्रता कमी झाली आहे, होते आहे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Jul 2012 - 4:43 pm | पुण्याचे वटवाघूळ

विक्षिप्त्_अदिती, लेख आवडला असेच लिहित जा.

सुनील's picture

20 Jul 2012 - 9:16 pm | सुनील

तिरकस लेखन आवडले. अर्थात, वर श्रामो म्हणतात त्याप्रमाने, लेखन अजूनही कसदार करता आले असते.

अवांतर - वर तुम्ही दिलेली पब्लिक ह्या शब्दाची व्युत्पत्ती रोचक! मी त्याला ग्रीकोत्पन्न मानीत होतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Jul 2012 - 9:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतर - वर तुम्ही दिलेली पब्लिक ह्या शब्दाची व्युत्पत्ती रोचक! मी त्याला ग्रीकोत्पन्न मानीत होतो.

तेही शक्य आहे.

ब्रिटीश समाजाच्या तोंड न उघडण्याबद्दल फार लिहायला नको. पबमधे जाऊन हे लोकं तोंड उघडतात, लीक होतात म्हणून पब्लिक असं मी ऐकलेलं आहे. इंग्लिश भाषेत जी काय महान सरमिसळ आहे आणि ब्रिटीशांची तिरकस विनोदबुद्धी हे दोन्ही पहाता असे रोचक किस्से मागाहूनही तयार झाले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

स्मिता.'s picture

20 Jul 2012 - 9:21 pm | स्मिता.

तिरकस शब्दात लिहिलेला लेख आवडला. एक चिलखत माझ्याकरताही मागवून घ्यावे म्हणते.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

20 Jul 2012 - 11:49 pm | मनोज श्रीनिवास जोशी

मला तरी हा असहाय विनोद/ विपर्यास वाटला .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jul 2012 - 3:07 am | निनाद मुक्काम प...

आपल्या देशात दलित महिलेची गावात नग्न धिंड निघते तेथे ( अधून मधून ) पब मधील हा प्रकार अगदीच किरकोळ
ह्यामुळे अशीच अजून घटना आठवली

आपल्या कडे अमेरिकन नागरिकांची हत्या करणाऱ्या नराधम लादेन ला क्रूरकर्मा म्हणून भारतीय प्रसारमाध्यमे बोंबाबोंब करतात.मात्र व त्याच्याहून जास्त बळी घेणारा रणवीर सेनेच्या प्रमुखाच्या हत्येच्या बातमीवर चर्चा सत्रे झडत नाहीत.

अन्याय कोणावर झाला ह्यावर आजकाल बरेच काही अवलंबून असते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2012 - 4:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या कडे अमेरिकन नागरिकांची हत्या करणाऱ्या नराधम लादेन ला क्रूरकर्मा म्हणून भारतीय प्रसारमाध्यमे बोंबाबोंब करतात.मात्र व त्याच्याहून जास्त बळी घेणारा रणवीर सेनेच्या प्रमुखाच्या हत्येच्या बातमीवर चर्चा सत्रे झडत नाहीत.
अन्याय कोणावर झाला ह्यावर आजकाल बरेच काही अवलंबून असते.

हे निरीक्षण बर्‍यापैकी पटलं तरी प्रतिसादाचा पूर्वार्ध पटला नाही. अशा प्रकारे वैतागून फार काही साध्य होणार नाही.

कोणाच्यातरी पोटाला दोन वेळचं पुरेसं मिळत नाही म्हणून दुसर्‍याची उच्च कोलेस्टेरॉलची तक्रार अप्रामाणिक समजावी का? एखाद्याचा औषधोपचाराअभावी मृत्यु होतो म्हणून सचिन तेंडूलकरच्या टेनिस एल्बोची तक्रार सोडवायची नाही का?

शिल्पा ब's picture

21 Jul 2012 - 9:39 am | शिल्पा ब

हॅ हॅ हॅ
सौ चुहे खाके बिल्ली चली हजको!!

काय हो जर्मनीवाले, मागे काही धाग्यांवर तुम्ही जे घाणेरडे आरोप करणारे प्रतिसाद दिले होते तेसुद्धा या असल्या मेंटॅलिटीत येतात का हो?

नै मुद्द्याचा प्रतिवाद करता आला नाही की बौद्धिक लायकी दाखवणे अन समोर असेल तर अंगावर हात टाकणे वेगळं नाही..

बाकी शहामृगी लेख अन प्रतिसाद वाचुन अंमळ करमणुकच होतेय दुसरं काही नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jul 2012 - 2:56 pm | निनाद मुक्काम प...

ब ताई नेहमीच वैचारिक अल्सर युक्त प्रतिसादांचे शिंतोडे आपण येथे उडवत असतात. कधीतरी आपण जे लिहितोय त्याचा समोरच्या व्यक्ती वर काय परिणाम होतो व त्याला काय वाटते ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? किंबहुना असा विचार करावासा वाटतो का ?
माझे प्रतिसाद तुम्हाला मनापासून झोंबले म्हणूनच येथे तुम्ही त्याचा येथे उल्लेख केला. तसेच इतरांचे तुमच्या बाबत होते. माझे मिपावरील दहा प्रतिसाद व तुमचे प्रतिसाद ह्यांच्यात तुलनात्मक फरक आपण व इतर कोणीही करावा म्हणजे माझे म्हणणे ...........

आणि तुम्हाला माझे प्रतिसाद घाणेरडे वाटले ह्याला माझा इलाज नाही. दृष्टी तशी सृष्टी.
म्हणूनच मी तुम्हास नम्र निवेदन केले होते की तुम्ही तुमच्या जगात सुखी रहा. नी मी माझ्या. मिपावर आपण समांतर रेषांप्रमाणे सारखे आयुष्य जगू शकतो. माझे बहुतांशी प्रतिसाद हे वैयक्तिक नसतात किंवा कंपू-बाजी च्या धर्मास जागून प्लस १ सारखे नसतात. समस्त मिसळपाव परिवार माझा एक मोठा कंपू आहे.

ह्या धाग्यावर अवांतर केल्याबद्दल आभार.

ह्या विषयावर माझा हा शेवटचा प्रतिसाद. आता मी मूळ विषयाकडे वळतो.

मुंबईतील उच्चभ्रू पब्स मधून मी माझी व्यावसायिक कारकिर्द सुरु केली म्हणून अधिकार वाणीने सांगू शकतो. की आपल्याकडे पब म्हणजे खूपवेळा पिकू अप कॉर्नर व अमली पदार्थ विनासायास खरेदीविक्रीचे केंद्र म्हणून विकसित झाली आहेत. आम्हाला अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेतून अमली पदार्थांच्या विषयी कार्यशाळा आयोजित करून पोलिसांना अश्या घटने संबंधी सूचित करण्यास सांगितले होते. मात्र बड्या धेंडांची खबर देऊन नंतर स्वतःची कबर कोण खोडून घेणार हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर होतात.

कोणाच्यातरी पोटाला दोन वेळचं पुरेसं मिळत नाही म्हणून दुसऱ्याची उच्च कोलेस्टेरॉलची तक्रार अप्रामाणिक समजावी का? हे पटले.
मात्र चित्रगुप्त म्हणतात तसे प्रगत देशांमध्ये सुद्धा अश्याच धर्तीच्या समस्या आहेतच. ह्या मोर्च्याला सुरुवात प्रगत देशामध्ये झाली. भारतात नुकत्याच घडलेल्या घटनेची अनेक अंगाने विचार करावयास प्रवृत्त करणारी आहे.
पुण्यात एका पब चे रचना करण्यासाठी दोन आठवडे गेलो असता तेथे आम्ही ज्या परप्रांतीय ( पण ईशान्य भारतातील मुली भरती केल्या होत्या) त्यांनी
आम्ही ड्रग्स घेतो का ? पुण्यात कोठे व कसे ड्रग्स मिळतात ह्याची माहिती दिली. व एवढेच नाही तर ह्या पब मध्ये येणाऱ्या तरुण वर्गास अमली दुनियेत कसे ओढायचे व आपली बाजारपेठ कशी निर्माण करायची ह्याची परिपूर्ण योजना त्यांच्याकडे तयार होती. किरण बेदींच्या आत्मचरित्रात ईशान्य भारतातील तरुण वर्ग अमली पदार्थ व एड्स च्या जाळ्यात कसा अडकला आहे ह्याची सविस्तर माहिती दिली आहे. आज माझ्या काही नेपाळी मित्राकडून तेथे अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे कळले. तेव्हा तेथे घडणाऱ्या गोष्टी मागील अन्वयार्थ लावणे गरजेचे आहे.

मुंबईत अश्या रेव्सं पार्टी रोजच होतात.( एकदा एक नामवंत टीवी अभिनेत्री अशीच नशेत चूर होती. तिला तिच्या गाडीपर्यंत मी सोडले तेव्हा ती म्हणाली. "चल माझ्या घरी तेथे भरपूर स्टफ आहे. मज्जा करुया" . तिच्या वाहनचालकाला तिला घरी न्यायला सांगून मी माघारी परतलो. भारतात सिंगापूर ,आखाती देशासारखे अमली पदार्थांच्या तस्करी विरुद्ध कडक कायदे म्हणजे फाशीची शिक्षा सारखे कायदे केले पाहिजे असे मला वाटते.

चित्रगुप्त's picture

21 Jul 2012 - 3:13 pm | चित्रगुप्त

पब आणि ड्रग्सचे हे नाते मला तरी ठाऊक नव्हते, परंतु तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे तर मुलींना काय वा मुलांना काय, पब मधे खरोखर गेले न पाहिजे. (बहुसंख्य मराठी मुले जात नसतील, अशी आशा करतो) पंधरा-सोळा वर्षांची मुलगी पबमधे वाढदिवसासाठी जाणे मला तरी अनाकलनीय वाटते, बुरसटलेल्या विचारांचा म्हणा हवे तर. पण सुरक्षिततेसाठी अश्या गोष्टींपासून दूर रहाणेच बरे. बलात्कार वगैरे घटना अपवादात्मक म्हटल्या, तरी ड्रग्सचे व्यसन लागणे सहजशक्य आहे, किंबहुना निनाद म्हणतात, त्याप्रमाणे तो एक सुनियोजित धंदाच आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jul 2012 - 3:49 pm | निनाद मुक्काम प...

मुंबईत पब्स म्हणजे अगदीच काही वाईट असा प्रकार मी म्हणत नाही आहे.
ड्रग्स चा हा सुनियोजित धंदा आहे हे खरे आहे मात्र
हे सर्व प्रकार माहीत असतील तर मग पब्स मध्ये जाण्यास काहीच हरकत नाही.
हा एक चांगला विरंगुळा आहे.
प्रचंड महसूल बुडवून व २४ तास जगते शहर ही संकल्पना मोडीत काढत
पोलिसांनी ह्याच कारणास्तव पब व इतर रात्रीची विरंगुळा आणि इतर प्रौढ मनोरंजनाची ठिकाणे रात्री लवकर बंद करत आहेत.
मु मो रॉक्स
सध्या मुंबईत पब्स रात्रीचे लवकर बंद करत आहेत.
आमच्या वेळी फायर अंड आईस चे घोष वाक्य आठवते.
सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी आम्ही मावळतो.
वो भी क्या दिन थे
वयाच्या २० व्या वर्षी पंचतारांकित दुनिया मस्त अनुभव होता.
त्या बद्दल परत कधीतरी सविस्तर पणे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2012 - 11:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पबमधे जाणारे सगळेच लोकं अंमली पदार्थांचे सेवन करतात किंवा ईशान्य भारतातले सगळेच लोकं अंमली पदार्थांच्या धंद्यात आहेत असं तुमचं म्हणणं नसावं अशी आशा आहे.

कारण या "नियमांना" असणारे काही अपवाद माझ्या ओळखीचे आहेत.

शिल्पा ब's picture

21 Jul 2012 - 11:12 pm | शिल्पा ब

<<<माझे प्रतिसाद तुम्हाला मनापासून झोंबले म्हणूनच येथे तुम्ही त्याचा येथे उल्लेख केला.आणि तुम्हाला माझे प्रतिसाद घाणेरडे वाटले ह्याला माझा इलाज नाही. दृष्टी तशी सृष्टी.

अहो रडारडबाज, तुम्ही काय बौद्धिक दाखवलंत ते रेवती अन इ. संपादकांनीसुद्धा वाचलंय, त्याचे स्क्रीनशॉट्स आहेत. बाकी अल्सर युक्त शिंतोडे वगैरे नेहमीचं गरळ चालु ठेवा. तेवढीच करमणुक.

अन हो, <<<कधीतरी आपण जे लिहितोय त्याचा समोरच्या व्यक्ती वर काय परिणाम होतो व त्याला काय वाटते ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?

याबाबतीत त्या "परा यांची शुक शुक ची म्हण आठवतेय का? नसेल तर परा यांना विचारा अशी नम्र विनंती" " बाकी आम्ही फक्त तुमचे फोटो पहायची इच्छा नाही असं म्हंटल्याने तुमच्या कमकुवत मनावर अगदी खोलच परीणाम झालेला दिसतोय. पार अगदी आमच्या ब्लॉगवरच्या पोस्ट वाचुन काडीचीही माहीती नसताना "आम्हाला कसं सगळ्ळं सगळ्ळं माहीती असतं" च्या नेहमीच्या चालीवरचे प्रतिसाद वाचुन तुमची कीव येणं सुद्धा कमीच वाटलं.

<<समस्त मिसळपाव परिवार माझा एक

मोठा कंपू आहे. वर हे आणी !! बाकी कंपुबाजी कंपुबाजी करुन भुई धोपटणे चालुद्या. तुम्ही विद्वान आहात हे आम्हाला माहीती आहे.

आता मुख्य विषयाकडे - पब (डान्स क्लब )व्हायच्या आधी अंमली पदार्थ, पिकअप या समस्या नव्हत्या अन पब आल्यावरच चालु झाल्या वाटतं. लोकांचं सामान्यज्ञान भारीच हो!

चित्रगुप्त's picture

21 Jul 2012 - 11:02 am | चित्रगुप्त

अमेरिका आणि युरोपमधे स्त्रियांवरील हिंसक अत्याचाराचे गुन्हे भरपूर होत असतात, असे ऐकून आहे, तरी यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
फ्रान्समधील सरकारी कायदा विभागात नोकरी करणार्‍या एका मित्राचे कामच हे आहे की अश्या पीडित स्त्रियांना तातडीची मदत देणे, आणि त्यांना कायद्याचे संरक्षण देणे. तो नेहमी त्याच्या कामात अतिशय व्यस्त असतो. वरकरणी सुरक्षित दिसणार्‍या समाजात सुद्धा असे काही घडत असेल यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2012 - 10:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अमेरिकेतल्या लैंगिक गुन्ह्यांबद्दल काही सांख्यिकी विदा इथे मिळाला. त्यातला काही "रोचक" विदा:

  • Approximately 2/3 of assaults are committed by someone known to the victim
  • 38% of rapists are a friend or acquaintance

आतल्या एका दुव्यात अधिक रोचक माहितीही आहे. इतरही विदा तिथे आहे.

युकेसंदर्भात अशा प्रकारची माहिती इथे सापडली.

मधे कुठेतरी वाचनात आलं होतं, शुद्धीत असणार्‍या, सामान्य स्त्रीवर एकटा पुरूष बलात्कार करू शकत नाही/ करणं कठीण असतं. (संदर्भ चटकन मिळत नाहीये, सापडल्यावर देते.) शिक्षण, सामाजिक-आर्थिक स्थान, या गोष्टींचा लैंगिक गुन्ह्यांशी असणारा संबंध याबद्दल थोडं गुगल+वाचन करत आहे. कदाचित त्यातून काही उपयुक्त माहिती मिळेल.

वरकरणी सुरक्षित दिसणार्‍या समाजात सुद्धा असे काही घडत असेल यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते.

खेदाने हो असं म्हणावंसं वाटतंय. परंपरेने स्त्रीला देव समजा नाहीतर निम्न प्रतीची व्यक्ती अत्याचार होतातच. "अजा पुत्रं बलिं दद्यात ..." ही मानसिकता बदलण्याला पर्याय नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Jul 2012 - 3:00 pm | निनाद मुक्काम प...

अदिती
मुंबईत पब्स म्हणजे अगदीच काही वाईट असा प्रकार मी म्हणत नाही आहे. ड्रग्स चा हा सुनियोजित धंदा आहे हे खरे आहे मात्र हे सर्व प्रकार माहीत असतील तर मग पब्स मध्ये जाण्यास काहीच हरकत नाही. हा एक चांगला विरंगुळा आहे. हे माझ्या आधीच्या प्रतिसादात मी आधीच म्हटले आहे.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चांगले वाईट अनुभव येतात. हे चालायचे, पण ह्या सर्व गोष्टींचा मी उल्लेख ह्या साठी केला की ईशान्य भारतातील घडलेल्या घटनेचा आपण येथून जेव्हा निषेध करतो. तेव्हा तेथे सध्या काय परिस्थिती आहे व इतर अनेक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

माझ्या व्यवसायामुळे मुंबईत माझे ईशान्य भारतातील अनेक मित्र होते. एड्स व अमली पदार्थ ह्यांच्या विळखा ह्या राज्यांना पडला आहे. नक्षलवाद तोही लाल माकडांकडून तेथे पसरवला जात आहे. तुम्ही भारतीय दिसत नाहीत आमच्या सारखे दिसतात असे एका चिनी पत्रकाराने तेथील कॉलेजात सांगितले होते. इति माझा मित्र
तेव्हा तेथील युवा वर्गावर कोणती विचारधारा लादली जात आहे. किंवा तेथे सध्या राजकीय परिस्थिती काय आहे ह्याबाबत आपण येथून काहीच मत व्यक्त करू शकत नाही. तेव्हा म्हणणे एवढेच की तेथील घटनेकडे महिला , व्यक्ती स्वातंत्र्य , किंवा संस्कृती रक्षक ह्यांचा बडगा एवढ्याच भूमिकेतून पाहू नये.

आज दुर्दैवाने ईशान्य भारतातील मुलींची प्रतिमा कोलकाता किंवा दिल्ली येथे चांगली नाही आहे. चक दे इंडिया मध्ये सर्व मुलींच्या घोळक्यातून फक्त ईशान्य भारतातील मुलींना छेडले जाते.
किंवा चक दे इंडिया च्या ह्या अप्रकाशित दृश्यात मूळ क्लिप च्या ६.५२ वर असेच दिसून येते.

सांगण्याचा मथितार्थ एवढाच की सगळ्याच ईशान्य भारतातील मुली काही तश्या नसतात हे वाक्य जेवढे खरे तेवढेच त्यांची प्रतिमा अशी होण्यास बहुसंख्य मुलीबद्दल चे अनुभव कारणीभूत आहे. मुंबईत बड्या कॉलेजात परप्रांतीय मुलींना उंची जीवन शैलीची भूरळ पडल्याने त्यांना अनैतिक वर्तन किंवा अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढणारे कितीतरी पहिले आहेत. तेव्हा जेव्हा एखादी अशी घटना घडते तेव्हा त्या संधर्भात त्या घटनेचे अनेक कंगोरे असतात . त्या घटनेकडे सर्व बाजूंनी विचार करून अभिव्यक्त झाले पाहिजे असे मला वाटते.

सध्या मुंबईत पोलिसांची पब्स वर वक्र दृष्टी किंवा अनेक धाडी पडून सुद्धा न थांबणारे रेव्ह्स पार्टीचे सत्र व त्यातील प्रतिष्ठित लोकांची अपत्ये ह्या सर्व गोष्टी नजरेआड करता येत नाही.