घरातल्या भिंतींना...

झंम्प्या's picture
झंम्प्या in जे न देखे रवी...
10 Jul 2012 - 1:22 pm

बर्याच वेळा आपल्या घरातील लहानगे भिंती रंगवतात... त्या रंगवेल्या भिंतींचा कौतुकही कोणाला एवढ नसत किवा त्या कोणाला खराबही वाटत नाही, पण काळाच्या ओघात त्या भिंतींना नवीन रंग दिले जातात आणि त्या नक्षी रंगाच्या पडद्या आड लपल्या जातात...
थोडासा प्रयत्न ह्या आठवणी चाळण्याचा... आणि मनाच्या कोपर्यात जिवंत ठेवण्याचा...

घरातल्या भिंतींना आता नवीन रंग दिलाय...
त्याच्यामागे एक काळ झाकला गेलाय...

समोरची हि मोठ्ठी भिंत... छान निळ्या रंगात रंगून उभी..
पण त्या वरच्या सगळ्या आठवणी दडल्यात तिच्या गर्भी...

आठवत्यात त्या पुसटशा खुणा..
जरी आठवनीनचा अल्बम झालाय जुना...

सोनुल्याने माझ्या रंगवलेली ती पूर्ण भिंत...
ज्याची कोणासही कधी वाटली नाही खंत...

भिंतीवर बर्याच काढलेल्या त्याने नक्षी
त्यातल्या बहुतेकांना तो म्हणायचा पक्षी..

जरी कितीही विचित्र वाटली ती नक्षी
भाबडेपणाची त्याच्या होती ती साक्षी

बराच वेळ तो एकाच जागी गिरवत बसायचा
त्याच्या आकाराकडे बघून मग एकटाच हसायचा...

नखांनी खरडून खरडून तो रंग काढायचा
कोणाचं लक्ष नाही बघून हळूच तोंडात टाकायचा.

ह्या पूर्ण भिंतीवर तो रेल्वेचे रूळ काढायचा
हातानेच मग त्यावर तो रेल्वे पळवायचा

कधी लाल रंगाने रेष ओढायचा
त्यावरच निल्याने दुसरी काढायचा

भले मोठे जाले झालेले त्या रेषांचे
मोठा घर वाटायचा ते कोशांचे

बाळाच आता भाबडेपणा गेला
माझ्यापेक्षाही आता तो मोठा झाला

रंगलेल्या भिंतीवर बर्याचवेळा रंग दिला
त्या रंगांबरोबर त्याचा तो भाबडेपणा पुसत गेला

कधी कधी मग भिंतीकडे पाहताना सगळे आकार आठवतो
आणि रंगलेल्या भिंतीवर ते डोळ्यानेच रंगू पाहतो

शांतरसकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2012 - 1:37 pm | अत्रुप्त आत्मा

नॉस्टॅलजिक केलत राव एकदम...फार मस्त लिहिलयत... :-)

झंम्प्या साहेब, नितांत सुंदर कविता आहे.

५० फक्त's picture

10 Jul 2012 - 5:13 pm | ५० फक्त

लई भारी कविता, एगझॅक्टली सध्या या भाबडेपणावरच सध्या फिदा आहे, अगदी भाड्याच्या घरात राहुन मालक बोंब मारेल याची काळजी न करता.

मन हरवुन गेल तुअम्च्या ओळीत. फार अवघड ही वास्तल्य भावना . कुठ गुंतुन राहील काय नेम नाही. मी माझ्या पिल्ल्याची एक एव्हढीशी जॅक्युटली (जॅकेट हो) जपुअन ठेवलीय. फार गोड दिसायचा ते घातल की. अन कन्यारत्न घुंची म्हणतात ना ते घालुअन अशी रांगत यायची ना? मी बाकि कुणीही वापरत नसताना स्वतः शिवली होती तिच्यासाठी. अजुनही आहे. नंतर नम्तर एक कोपरा चघळायची सवय लागल्यान त्याचा कलर गेलाय.
खुप छान लिहिल आहे.

हि कविता वाचल्या वर घरातल्या भिंती रंगवता येनार नाही.... मस्त , एकदम भावस्पर्षी कविता.

पक पक पक's picture

11 Jul 2012 - 9:44 pm | पक पक पक

झक्कास कविता..... :) खुप खुप आवड्ली आहे...

चैतन्य दीक्षित's picture

12 Jul 2012 - 4:32 pm | चैतन्य दीक्षित

कविता आवडली.
मनापासून लिहिलेली वाटली.
अजून लिहा.

आंबोळी's picture

13 Jul 2012 - 11:14 pm | आंबोळी

त्या रंगांबरोबर त्याचा तो भाबडेपणा पुसत गेला
झंप्या लेका तु असले काही लिहू शकतोस यावर विश्वासच बसत नाही....
इतके दिवस मी तुला कुणा प्रथीतयश माणसाचा ड्युआयडी समजत होतो...

अवांतरः सध्या पोराने (वय वर्ष ५ ) रंगाने/पेन्सिलीने गिरगटलेल्या भिंतींच्या घराचा मालक आहे मी. बायको घर रंगवून घेउया म्हणतीय पण हे वैभव पदरचे पैसे घालवून नष्ट करायची हिम्मत होत नाहीये.... तुझ्या कवितेमुळे आधीच चित्रविचित्र असलेले ते भिंतीवरचे आकार मला आजूनच सुंदर दिसायला लागलेत....
धन्यवाद!

झंम्प्या's picture

19 Jul 2012 - 4:53 pm | झंम्प्या

मलाच कळाल नाही की कस काय कागदावर उतरल हे सगळ. :)

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2012 - 1:34 pm | प्रभाकर पेठकर

मस्त कविता. असा विचारही कधी कोणी क्वचित करीत असेल. खुप आवडली.

एक बदल सुचवू इच्छितो..

घरातल्या भिंतींना आता नवीन रंग दिलाय...
त्याच्यामागे एक काळ झाकला गेलाय...

ह्यातील 'काळ' हा शब्द खटकतो. त्या ऐवजी 'विश्व' शब्द जास्त योग्य वाटेल.

घरातल्या भिंतींना आता नवीन रंग दिलाआहे...
पण, त्या मागे एक विश्व दडलेले आहे...

ती चित्रकला/नक्षीकाम जे आहे ते त्या मुलाचे 'भावविश्व' आहे. 'काळ' हा शब्द रुक्ष 'कालखंड' दर्शवितो तर 'विश्व' हा शब्द, भावभावनांचे रंगीबेरंगी चित्र उभे करतो.

पैसा's picture

19 Jul 2012 - 7:44 pm | पैसा

मस्त कविता!