मराठी सन्केत स्थळे

अनिवासि's picture
अनिवासि in जनातलं, मनातलं
6 Jul 2012 - 10:09 pm

उद्या (७ july) येथील मडळात साहित्तीक गप्पान्चा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात इ सहित्याबद्दल काही बोलणार आहे. मिपा वरील 'एक पत्रकथा' ह्या कथेचा सन्दर्भ गप्पाच्या सम्बधित परिपत्रिकात केलाच आहे व त्यतुन मिपा व इतर स्थळान्ची ओळख करुन देणार आहे. त्यासाठी गूगल वर शोध करताना, मिपा, उपक्रम इ. चर्चा करणारी स्थळे सापडली नाहीत.
भारतीय वेळेप्रमाणे उद्या दुपारी १२-१ पर्यन्त कोणी अशा तर्‍हेची सध्या कार्यरत असलेली स्थळे सुचवलि तर त्याचा मला उपयोग होइल.

धन्यवाद
अनिवासी

( अजुन अनुस्वाराचे तन्त्र जमत नाही- क्षमस्व!)

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

6 Jul 2012 - 10:13 pm | श्रीरंग_जोशी
चौकटराजा's picture

6 Jul 2012 - 10:13 pm | चौकटराजा

विकी पेडेयावर मोठी यादी आहे .

श्रीरंग_जोशी's picture

6 Jul 2012 - 10:36 pm | श्रीरंग_जोशी

www.marathisite.com/list-of-marathi-websites

टीप: मी बघू शकलेलो नाही कारण हापिसात तो चक्क चक्क प्रतिबंधित आहे. गुगलून पाहिले म्हणून दुवा मिळाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2012 - 10:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाव, मी मराठी, मायबोली आणि मराठीविकि या संकेतस्थळांची आपापल्या वैशिष्ट्यांसह ओळख करुन द्या.

मराठीतल्या उत्तमातल्या उत्तम संकेतस्थळाची नावं आता आपल्याला सांगितली आहेच. आता संस्थळावरील साहित्याबद्दल माझं व्यक्तिगत मत असं, की संकेतस्थळावरील ई -लेखांना अजून 'साहित्य' आणि 'साहित्यिक' म्हणुन दर्जा लाभला आहे काय, तर माझं उत्तर नाही. हौशी लेखकांच्या कविता, काही गझला, काही कथा मांडणी, काही आत्मनिवेदनवजा लेखन, आणि काही प्रवासवर्णने म्हणजे उत्तम ई-साहित्य निर्मिती झाली असे म्हणता येणार नाही. काहींचे लेखन दमदार असेल पण असे लिहिणारे बोटावर मोजता येतील इतकेच असतील, असे सांगायला विसरु नका. एकच लेखन आपल्या ब्लॉगवर आणि सतरा संकेतस्थळांवर टाकणार्‍या लेखकाचं लेखन सतरा ठिकाणच्या वाचकांना वाचायला मिळत असेल पण अशा वेळी सतरा संकेतस्थळांकडून वैविध्यपूर्ण लेखनाची अपेक्षा करणे थोडं धाडसाचं काम आहे, असं म्हणायला विसरु नका.

साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे एक मराठी साहित्याच्या बाबतीत एक चोथा झालेले वाक्य असलं तरी आता असं 'सह येणं' मराठी संकेतस्थळावरील लेखनात दिसते का ? अतिउच्चभ्रू ते तळागाळातील अशा सर्व हौशी लेखक वाचकांचा गोतावळा संकेतस्थळावर दिसत असला तरी अजूनही सर्वच थरातील आणि क्षेत्रातील मराठी माणूस सर्वच संकेतस्थळावर पोहचलेला नाही, त्यामुळे अजूनही आपल्या आजूबाजूच्या घडामोडी अशा ई-लेखनातून संकेतस्थळावर येते काय तर 'नाहीच' असे माझे उत्तर आहे.

ग्रामीण, दलित,आदिवासी,स्त्रीवादी, मानवतावादी, अभिजनवादी अमुक अमुक-धमुक धमुक साहित्यप्रवाहांची आणि त्यातल्या प्रकारांची चर्चा जाऊन आता एखादं 'जालसाहित्य' आणि त्याचे सक्षम असे विविध लेखन प्रकार, सक्षम लेखनाची परंपरा किंवा प्रवाहांची चर्चा कुठे जाणवते का तर त्याचेही उत्तर नाहीच असे आहे. छापील लेखन करणार्‍यांना आता संकेतस्थळांवर लिहिण्याचा मोह होत आहे, म्हणजे त्यांनीही इथे आपली लेखन प्रतिभाच दाखवायची असेल तर संकेतस्थळावर लेखक म्हणून जन्म घेतलेल्यांनी कुठे लिहावे ? जे लिहिलं जातं त्याचा दर्जा काय अशा विविध गोष्टींवर तुमच्या साहित्य मंडळात चर्चा करा. ई-लेखनाचे प्रयोजन काय त्याचीही चर्चा करा. ई-लेखकांनी मराठी भाषेला काही नवे शब्द दिलेत त्यावरही चर्चा करा. मराठी संकेतस्थळे अजूनही बाल्यावस्थेतच आहे, असे म्हणून भविष्यात उत्तमातल्या उत्तम लेखक मंडळींची ओळख मिपा आणि तत्त्सम मराठी संकेतस्थळावर होईल असा आशावाद संकेतस्थळांच्या लेखनीबद्दल व्यक्त करा. असो.

>>>> अजुन अनुस्वाराचे तन्त्र जमत नाही- क्षमस्व!

संकेतस्थळावरील शुद्ध लेखनावरही चर्चा करा. उत्तम दर्जाचा शब्दचिकित्सक लेखक-प्रतिसाद लिहिणार्‍यांना, लाभलेला नाही. शंतनु आणि ओंकार जोशींनी मराठी शब्दचिकित्सक दिला त्याचा तरी किती वापर करतात त्याबद्दलही मुद्दा चर्चेला घ्या.

आणि काही उत्तम मुद्दे आपल्या साहित्यमंडळाच्या चर्चेत आले तर इथे लिहा, तितकीच माझी ई-लेखकांच्या लेखणीबद्दलची जाणीव समृद्ध होईल. असो.

-दिलीप बिरुटे

सुधीर's picture

6 Jul 2012 - 11:16 pm | सुधीर

तुमचे प्रतिसाद नेहमी संयत, माहितीपूर्ण आणि विशेष म्हणजे नवख्यासही उपयोगी पडतील असेच असतात! (प्राध्यापक आणि डॉ. असे दोन्ही टच असतात.)

तुमचा हाही प्रतिसाद आवडला. भविष्यात (नक्की कधी ते सांगता नाही यायचं. साधारण पुढल्या दशकात? ) समाजातल्या सर्वच (निदान बहुतांश) थरातल्या लोकांपर्यंत संकेतस्थळं पोहोचतील अशी आशा आहे.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2012 - 12:34 am | श्रीरंग_जोशी

माझ्यामते या नव्या युगाच्या इ साहित्याचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे वेग. आजूबाजूच्या घडामोडींवर काही तासांत काय काही मिनिटांत लेखन प्रकाशित होत असते अन विषयानुसार प्रतिक्रियांचा धो धो अथवा रिमझीम पाऊस पडू लागतो. अर्थातच या वेगामुळे दर्जाशी तडजोड होते पण कधी कधी सुखद धक्के ही मिळतात.

बऱ्याच वेळा नकोशी वाटणारी बाब म्हणजे गंभीर विषयावर विनोदी अन विनोदी विषयावर गंभीर चर्चा घडते. पण काही गोष्टींना इलाज नसतो.

शुद्धलेखनाबाबत व व्याकरणाबाबत मुळातच संवेदना कमी होत चालली आहे पण मराठी संस्थळांमुळे मराठीत भर भरून वाचन लेखन तर होत आहे.

धागाकर्त्यास आवाहन - हा कार्यक्रम पार पडल्यावर त्याविषयी या धाग्यावर सविस्तर लिहावे. मूळ धाग्यात कार्यक्रम कुठल्या शहरात होणार आहे ते लिहायला हवे होते म्हणजे जवळपासचा मिपाकर अथवा मिपावाचक अथवा कुणा मिपाकराचा मित्र / मैत्रीण देखील उपस्थित राहू शकले असते.

टंकलेखनाबाबत मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे.

बॅटमॅन's picture

7 Jul 2012 - 1:00 am | बॅटमॅन

मस्त सारांश प्राडॉ.

मन१'s picture

7 Jul 2012 - 10:30 am | मन१

मराठी आंजाचा संक्षिप्त आढावा आवडला. पण जालावरती प्रामुख्याने हौशी पब्लिकच लिहितं हे सांगायची खरे तर गरजही वाटू नये. इथे लिहून फार मोठी साहित्यसेवा आपण करतोय असे वाटणारा कुणी माझ्या तरी पाहण्यात नाही.
पण "हे" पुरेसे नाही म्हटल्यावर "अजून काय हवे" ह्याची जी दिशा सांगितलीत, ती झकासच. वैविध्य हवेच. अर्थातच ते नजिकच्या भविष्यात येइलसे वाटत नाही. जालावर जे उप्लब्ध आहे ते बरेच चांगले आहे, पण मर्यादित आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jul 2012 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा

Skype Emoticons कार्यक्रमास शुभेच्छा Skype Emoticons

बॅटमॅन's picture

7 Jul 2012 - 1:05 am | बॅटमॅन

सहज एक प्रश्नः मिपासारखी संस्थळे अन्य भारतीय भाषांमध्येदेखीलअसतीलच,, त्यांचा या साहित्यिक गप्पांमध्ये काही उहापोह केला जाणार आहे का? की चर्चा बाय अँड लार्ज मराठी साहित्याविषयीच असणार आहे? माझे स्वतःचे मत असे आहे की अशी संस्थळे खूप मॅच्युअर अशा अमॅच्युअर साहित्यिकांचे आगार आहे. जर मराठी व अन्य भाषांतील अशा संस्थळांचा तौलनिकरीत्या थोडा जरी आढावा घेतला तरी ते खूप रोचक ठरेल.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2012 - 1:16 am | श्रीरंग_जोशी

>> की अशी संस्थळे खूप मॅच्युअर अशा अमॅच्युअर साहित्यिकांचे आगार आहे.
हे कृपया सोप्या भाषेत समजावून सांगाल का?

बादवे - यासाठी मराठीत प्रगल्भ किंवा परिपक्व या शब्दांचा वापर करता येईल.

शुचि's picture

7 Jul 2012 - 1:47 am | शुचि

अमॅचुअर = हौशी

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2012 - 2:00 am | श्रीरंग_जोशी

मॅचुअर व अमॅचुअर एकानंतर एक वापरल्यामुळे माझा गोंधळ झाला...

अन्या दातार's picture

7 Jul 2012 - 5:57 am | अन्या दातार

बिरुटे सरांशी सहमत आहे.
अवांतर:
आजोबा, ते जरा लंडन ऒलिंपिकबद्दल लिहा ना!

चौकटराजा's picture

7 Jul 2012 - 12:15 pm | चौकटराजा

अन्न वस्त्र निवारा माणसाच्या " शारीरिक गरजा .प्रेम कौतुक व मनोरंजन या त्याच्या मानसिक गरजा.
मनोरंजनाचे जे अनेक पोटभाग आहेत त्या कला, क्रीडा, ज्ञानानंद ,आस्वाद, तंत्र ई अगणित पोटभाग आहेत. भाषेचे संवर्धन , आकलन हा त्यातील एक महत्वाचा भाग असतो. या सर्वानाच भल्याबुर्‍या स्वरूपात जवळ घेणारे ठिकाण म्हणजे जालस्थळ. इतर माध्यमापेक्षा हे मुक्त असल्याने.ते सामान्य माणसाला जवळचे वाटते. उदा. वर्मानपत्राच्या आयडियलॉजी विरोधी विचार आज देखील छापला जात नाही. तो सामान्य माणसाला जालावर व्यक्त करता येतो. जाल हे म्ह्टले तर अलिबाबाची गुहा म्ह्टले तर स्क्रॅपयार्ड ! ज्याला जे हवे आहे ते त्याने घ्यावे.काही वेळा अडगळीत सुद्धा काही उपयुक्त सापडून जाते. दर्जाचे म्हणाल तर अनेक गाजलेल्या वृत्तपत्रात टुकार लिखाणही छापून येते की.

अनिवासि's picture

8 Jul 2012 - 11:33 pm | अनिवासि

सर्वप्रथम प्रतिसाद दिलेल्या सर्वाना मनापासुन धन्यवाद . शनिवारचा कार्यक्रम झाला पण मनासारखा नाही. कार्यक्रम ठरवताना Wimbeldon Ladies Final चा विसर पडला होता. त्यात सकाळपासून वेधशाळेकडून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात होती आणि जणू काही हे कमी म्हणून मंडळाच्या जवळच्या रस्त्यावर एक गंभीर अपघात होऊन वाहतूक ठप्प झाली होती. १०-१५ मिनिटाच्या प्रवासास तासाच्या वर! परिणाम :: फारच कमी हजेरी.
आता गप्पांबद्दल:
श्रीरंग _ जोशी : कार्यक्रम लंडन मध्ये होता आणि बरीच प्रसिद्धी दिलेली होती.
आपण दिलेल्या दुव्याबरोबर इतर काही घालून एक यादी बनवली व ती सर्वाना दिली. तुमचे इतर विचारही विचार करावयास लावणारे आहेत. सर्व संस्थळे अजून बघावयास वेळ झाला नाही पण लवकरच बघेन.
प्रा. डॉ. बिरूटे: आपल्या प्रतिसादाबद्दल काय लिहू? वरील प्रतिसादात सर्व आलेच आहे. मनापासून आभारी आहे. आपल्या प्रतिसादाच्या प्रती लोकांना तर दिल्याच पण संपूर्ण प्रतिसाद सभेपुढे वाचला.
सविस्तरपणे परत कधीतरी लिहीन पण असाच लोभ ठेवा.
आता ह्या आमच्या उपक्रमाविषयी: लंडनचे मंडळ नेहमीच काही न काही कार्यक्रम अनेक वर्षे करत आहे पण बहुतेक सर्व करमणुकीचे. अनेक वर्षापुर्वी पुण्यात majestic गप्पा ऐकल्या आणि असेच काहीतरी करावे असे सुचविले. नेहमीप्रमाणे 'तुम्ही सुचविले तुम्हीच करा' असे झाले- आणि गेले १०-१५ वर्षे जमेल तेव्हा हा कार्यक्रम होतो. मलाच हौस ( किवा दुसरा शब्द वापरला तरी चालेल...) म्हणून आतापार्यंत ७/८ कार्यक्रम झालेत. काही वेळा मान्यवर अतिथी होते तर बरेच वेळा स्थानिक. सर्वसाधारण हजेरी ५० च्या आसपास. पु लं च्या पहिल्या स्मरणदिनी जवळ जवळपास१५०/२०० लोक हजार होते. तो एक संस्मरणीय कार्यक्रम झाला होता.
हेतू हा की साहित्याबद्दल आवड असणार्या लोकांनी एकत्र येऊन विचारांची देवाण- घेवाण करावी. त्याप्रमाणे ह्यावेळेसही काही वाचकांनी त्यांना आवडलेल्या काही साहित्यकृती वाचून दाखवल्या. नंतर नवीन प्रकाशित झालेल्या काही मराठी पुस्तकांच्या ओळखी करून देण्यात आल्या. त्यात , परचुरे प्रकाशनाची दोन पु लं वरची पुस्तके, सौ.माधुरी सप्रे ह्यांचे 'कर्ण' महापुरुष की खलपुरूष?, वैशाली करमरकर ह्यांचे संसकृतीरंग ह्यांचा समावेश होता. केवल पैगणकर ह्या एका सभासादाचे दोन इंग्लिश काव्यसंग्रह येथे प्रकाशित झाले आहेत ते स्वत: हजर होते.त्यांची ओळख करून दिल्यावर दोन कवितांचे वाचन झाले. पु लं च्या परचुरे प्रकाशित 'जीवन त्यांना कळले हो ' ह्या पुस्तकात माझा एक लेख आहे तोही मी वाचून दाखवला.
शेवटी सभा ई साहित्याकडे वळली. वेणू ह्यांच्या ‘एक पत्रकथा’ ह्या कथेबद्दल लोकाना कळविले होते पण अनेकांना ती बघता आली नव्हती म्हणून तिचा थोडक्यात परिचय ( शेवट न सांगता) करून दीला त्यावर अर्थातच जास्त चर्चा झाली नाही पण त्याच्या काही प्रती सभासद घेऊन गेले व मी फोन येण्याची वाट पहात आहे. एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ई साहित्य आणि मराठी संस्थळे ह्या बद्दल फारशी माहिती लोकांना दिडली नाही. त्यामुळे त्यावर चर्चा झाली. शेवटी सभा ई साहित्याकडे वळली. वेणू ह्यांच्या ‘एक पत्रकथा’ ह्या कथेबद्दल लोकाना कळविले होते पण अनेकांना ती बघता आली नव्हती म्हणून तिचा थोडक्यात परिचय ( शेवट न सांगता) करून दीला त्यावर अर्थातच जास्त चर्चा झाली नाही पण त्याच्या काही प्रती सभासद घेऊन गेले व मी फोन येण्याची वाट पहात आहे. एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ई साहित्य आणि मराठी संस्थळे ह्या बद्दल फारशी माहिती लोकांना दिडली नाही. त्यामुळे त्यावर चर्चा झाली. शेवटी सभा ई साहित्याकडे वळली. वेणू ह्यांच्या 'एक पत्रकथा' ह्या कथेबद्दल लोकाना कळविले होते पण अनेकांना ती बघता आली नव्हती म्हणून तिचा थोडक्यात परिचय ( शेवट न सांगता) करून दीला त्यावर अर्थातच जास्त चर्चा झाली नाही पण त्याच्या काही प्रती सभासद घेऊन गेले व मी फोन येण्याची वाट पहात आहे. एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ई साहित्य आणि मराठी संस्थळे ह्या बद्दल फारशी माहिती लोकांना दिसली नाही. त्यामुळे त्यावर चर्चा झाली.
प्रा. बिरूटे ह्यांच्या प्रतिसादातील ‘साहित्य मंडळ’ हा शब्द/ संकल्पना सर्वांना आवडली व ह्या गप्पांचे रुपांतर साहित्य मंडळात होण्याची शक्यता आहे!!!!!
खूप खूप लिहिण्यासारखे आहे आहे- परत केंव्हा तरी!
By the way- अन्या_ दातार-- मला ऑलिंपिकमध्ये फारच कमी स्वारस्य आहे त्यामुळे मी लिहिले तरी ते वर्तमानपत्रातील वाचूनच लिहीणार.! क्षमस्व! मी वयाने जरी मोठा असलो तरी घरातले / मित्र वगैरे मला काका च म्हणतात. फक्त माझी नातवंडेच ‘आजोबा ‘ म्हणतात. ते एक खास नातेसंबंध दाखवणारे गोड संभोधन आहे-
असो- परत एकदा धन्यवाद.

.

श्रीरंग_जोशी's picture

9 Jul 2012 - 12:47 am | श्रीरंग_जोशी

प्रथम आपल्या या उपक्रमाबद्दल आपले मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

याविषयी या व्यासपीठावर माहिती दिल्याबद्दल अनेक आभार. त्यापासून आम्हाला आमच्या स्थळी असे काही करता येईल यासाठी प्रेरणा मिळाली आहे.