आताच पाहिलेल्या वेबकास्टनुसार 'सर्न' मधील एलेचसी (लार्ज हेड्रॉन कोलायडर) उपकरणाच्या आधारे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर जगातील भौतिक शास्त्रज्ञांना १९६० सालापासून आजवर हुलकावणी देणारा 'हिग्ज बोसॉन' हा अनुमानित मूळकण (प्रायमरी पार्टीकल) सापडला असावा असा कयास व्यक्त केला गेलेला आहे. तो हिग्ज बोसॉनच असावा याबाबत ऍटलस आणि सीएमएस नामक दोन वेगवेगळ्या संशोधनकर्त्या टीम्सचे एकमत झालेले आहे. पण हा नक्की कोणता हिग्ज बोसॉन आहे? हिग्ज बोसॉन्स ही एक कणमालिका आहे तरी कशी? या प्रश्नांवर संशोधन करण्याचा मानस या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.
विश्वाबद्दल मानवाला असलेल्या माहितीत आणखी थोडी भर घातल्याबद्दल शास्त्रज्ञांचे आभार.
या महत्त्वाच्या संशोधनाबद्दल सर्नशी संबंधित असलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
'ईशकण' (गॉड पार्टिकल) हे नाव प्रसिद्धी माध्यमांनी बहाल केल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात या कणाविषयी उत्सुकता निर्माण झाली असली तरी त्याचा ईश्वराशी कोणताही संबंध नाही. हे नाव केवळ त्याच्या 'हितंच हाय पर दिसत नाय' या (ईश्वरसदृश) गुणधर्मामुळे मिळाले आहे. कदाचित त्याला 'गॉड्डॅम' पार्टिकल ('इश्श्यकण' ? ) असेही नाव चालले असते असे विकीतली माहिती सांगते.
इथे असलेले तज्ञ या कणाबद्दल आणखी माहिती सांगतीलच. पण तोवर सर्वसामान्यांना समजेल अशी ही माहिती -
ही संशोधक परिषद सर्न यथे सुरू असता दिसलेले काही क्षण-
सीएमएस आणि ऍटलास टीमच्या निरीक्षणाचे एकत्रीकरण
घोषणा
एक्सपेरीमेंटल फिजिसिस्टचे (प्रयोगकर्त्या भौतिक शास्त्रज्ञांचे) अभिनंदन करताना स्वतः पीटर हिग्ज
आपल्या जीवनकालातच अनुमानित बोसॉन सापडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पीटर हिग्ज
प्रतिक्रिया
4 Jul 2012 - 4:46 pm | अत्रुप्त आत्मा
अजुन एक शोध लागला... अभिनंदन
4 Jul 2012 - 4:46 pm | आबा
सर्न च्या बुलेटीन मधला लेख
4 Jul 2012 - 4:52 pm | sagarpdy
सोप्या भाषेत माहितीसाठी हे पण पहा
4 Jul 2012 - 5:07 pm | प्रचेतस
धन्स विसुनाना.
विश्वातील अनेक रहस्ये आता उलगडतील असे म्हणायला आता हरकत नाही.
4 Jul 2012 - 5:10 pm | चौकटराजा
१९६९ च्या एका रात्री दोन वाजता जागा होतो. मानवाने आपले ऐतिहासिक पाउल चन्द्रावर ठेवले.तो क्षण अजूनही आठवतो.नील आर्मस्ट्राँग यानी आणलेले चांद्र अश्म अगदी तीन फुटावरून पहाण्याचे भाग्य ही त्यानंतर मला पुणे येथे इस्स्टीटुट ऑफ इंजेनियर्स च्या जागेत मिळाले. ही " इशकणां" ची बातमी आज दुपारी पाहिली. हे भाग्य त्याच मालिकेतील समजू काय ?
5 Jul 2012 - 8:15 am | बहुगुणी
धन्यवाद!
अदितीसारखे तज्ञ यात माहितीपूर्ण भर घालतील या अपेक्षेने या धाग्याकडे लक्ष ठेवणार आहे.
फक्त या कणाला बोसॉन का म्हणतात याचा विकिपेडियावरील हिग्ज-बोसॉन पार्टिकल विषयीच्या माहितीत सरळ स्पष्ट उल्लेख नाही हे खटकलं, पण विकीवरच इतरत्र असलेल्या बोसॉनच्या माहितीत हा उल्लेख आहे. [बर्याच ठिकाणी हे नाव Higgs-boson असं लिहिलं जातं, b captalize न करता...... हिग्ज म्हणजे पीटर हिग्ज हा शास्त्रज्ञ, जो हयात असून या शोधसभेत उपस्थित होता; पण ...]
आपणा भारतीयांना अभिमानाची गोष्ट आहे की त्या Boson च्या मागे आहे ती Bose-Einstein Condensate ची थिअरी, आणि बोस म्हणजे प्रा. सत्येन्द्रनाथ बोस.
5 Jul 2012 - 10:21 pm | आनंदी गोपाळ
हिग्ज यांनी बोसॉन असे नांव दिलेला कण. असेच आहे ते.
(पेप्रात वाचूण आनंदी) गोपाळ
4 Jul 2012 - 9:54 pm | श्रावण मोडक
गॉड्स पार्टिकल या न्यायाने ईशकण हे ठीक. पण ब्रह्मकण हा शब्द अधिक उचित ठरावा. भाषातज्ज्ञ अधिक सांगतीलच. :-)
5 Jul 2012 - 10:54 am | विसुनाना
ह.घ्या. (असे वेगळे लिहावे लागते हे दुर्दैव आहे.)
मोडकांनी भाषातज्ञांवर जबाबदारी ढकलू नये ही आग्रहाची विनंती. भाषातज्ञ ती घेणार नाहीत. :)
कारण-
ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण (किंवा ब्राह्मण ब्रह्म जाणतो) अशा न्यायाने - या ईशकणाला जर ब्रह्मकण म्हटले तर या हिग्ज बोसॉनला जाणणारे सर्व शास्त्रज्ञ ब्राह्मण आहेत असे श्री. मोडक महाशयांना सुचवायचे आहे अशी खात्री पटली. ;)
5 Jul 2012 - 12:10 pm | बिपिन कार्यकर्ते
अगदी अगदी! शेवटी ते ही ब्राह्मणच! ;)
5 Jul 2012 - 7:32 am | नगरीनिरंजन
माहिती छान.
पण अजून माहिती कोणी देऊ शकले तर उत्तम. विशेषतः याला क्रांतिकारी शोध का म्हणतात? अशी कोणती क्रांती आमच्या-तुमच्या आयुष्यात या शोधाने होणार आहे ते कळले तर तयार राहायला बरं पडेल.
5 Jul 2012 - 7:47 am | अर्धवटराव
जर युद्धखोर राष्ट्रे तलवारी म्यान करुन २५ वर्षे शांत बसले तर या शोधीत कणांच्या आधारे आपण मानवनिर्मीत भौतीकी नियम वापरुन कस्टमाइझ्ड विश्व बनवु शकु. ( आणि मग नो मोअर सास बहु सिरियल किंवा बार्बी डॉल अॅण्ड क्रिकेट :) आपण निर्माण केलेल्या विश्वाशी खेळा आणि मनोरंजन करा )
अर्धवटराव
5 Jul 2012 - 8:03 am | नगरीनिरंजन
म्हणजे जसं नदीतून वाळू उपसून घरं बांधतो आपण तसं का?
आँ? मनोरंजनासाठी चाललंय का हे सगळं?
5 Jul 2012 - 8:15 am | अर्धवटराव
अगदी नदीतुन वाळु उपसुन घर बांधावं तसं. आणि किती प्रकारची घरं असावी... याला लिमीट नाहि. काहि ठिकाणी चुंबकीय क्षेत्रात वीजवाहक धारु फिरवला तर वीज निर्माण व्हायच्या ऐवजी उष्णता निर्माण होईल... कुठे भारवाही कणांपासुन अणु बनवण्यापेक्षा ध्वनी लहरेंतुन ते बनतील. तिथे सूर्याच्या किरणांनी तहान भागेल आणि वाळुची शेती करावी लागेल :)
>>आँ? मनोरंजनासाठी चाललंय का हे सगळं?
-- हे सगळं म्हणजे काय.. अहो सर्वकाहि मनोरंजनासाठीच चाललय. मग हे तरी त्यातुन कसं सुटेल ?
अर्धवटराव
5 Jul 2012 - 10:14 pm | आनंदी गोपाळ
सगळे काही मनोरंजनासाठीच चालेले खेळ आहेत हो..
"लीला"
परमेश्वरही लीलाच करतो आहे ना?
म्हणजे काय? खेळ. तो खेळतो. आपल्याला बनवतो. आपण नवा खेळ मांडायच्या स्टेजपर्यंत उत्क्रांत होऊ शकतो ना?
5 Jul 2012 - 10:32 pm | अर्धवटराव
आपण ऑलरेडी तेव्हढे उत्क्रांत आहोत.
अर्धवटराव
5 Jul 2012 - 1:22 pm | नाना चेंगट
>>>जर युद्धखोर राष्ट्रे तलवारी म्यान करुन २५ वर्षे शांत बसले तर या शोधीत कणांच्या आधारे आपण मानवनिर्मीत भौतीकी नियम वापरुन कस्टमाइझ्ड विश्व बनवु शकु.
अधोरेखित शब्द मजेशीर :)
>>>>( आणि मग नो मोअर सास बहु सिरियल किंवा बार्बी डॉल अॅण्ड क्रिकेट आपण निर्माण केलेल्या विश्वाशी खेळा आणि मनोरंजन करा )
<विनायकप्रभुमोड>पँट्च्या खिशात हात घालून निवांत उभे राहिले तरी बरेच मनोरंजन होते < / विनायकप्रभुमोड>
5 Jul 2012 - 7:12 pm | अर्धवटराव
मास्तरांची कल्पकता आणि नान्याची चेंगटगिरी तशिही सर्व ईशकणांना पुरुन उरणारी आहे :P
अर्धवटराव
5 Jul 2012 - 1:59 pm | कवितानागेश
आपण निर्माण केलेल्या विश्वाशी खेळा आणि मनोरंजन करा >
म्हंजे फार्मव्हिले का? :P
5 Jul 2012 - 2:03 pm | बॅटमॅन
खल्लास प्रतिसाद मौतै!!!
5 Jul 2012 - 6:28 pm | अत्रुप्त आत्मा
@म्हंजे फार्मव्हिले का? Tongue >>>
@खल्लास प्रतिसाद मौतै!!! >>> ++++++११११११
5 Jul 2012 - 7:16 pm | अर्धवटराव
ते म्हणजे
पौराणिक विमाने आणि वैज्ञनीक पतंग बनवा आणि कलादालन/पाककृती सदरात काथ्याकुट करा :P
अवांतरः
>> आजचा सुविचारः अंडे खा, सेक्सी व्हा!
-- फुटलो (अंड्यासारखा नाहि बरं)
अर्धवटराव
5 Jul 2012 - 8:25 am | शिल्पा ब
शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन.
नेमकं काय शोधलंय अन त्याने काय होणार हे अज्जिबात समजलं नाही पण जगाचं भलं होणार असेल तर चांगलंच आहे.
5 Jul 2012 - 9:22 am | रमताराम
विश्वनिर्मितीचे कोडे यातून उकलण्यास मदत करणारा हा कण एका प्रकारे - निदान जड विश्वातून - देव या 'संकल्पने'ला तिलांजली देण्याच्या दिशेने नेणारा आहे म्हणजे याला 'सैतान' कण म्हणायला हवे, देवकण कुठला हा.
5 Jul 2012 - 10:51 am | llपुण्याचे पेशवेll
विश्वनिर्मितीचे कोडे यातून उकलण्यास मदत करणारा हा कण एका प्रकारे - निदान जड विश्वातून - देव या 'संकल्पने'ला तिलांजली देण्याच्या दिशेने नेणारा आहे म्हणजे याला 'सैतान' कण म्हणायला हवे, देवकण कुठला हा.
वा फारच छान भाबडा आशावाद आहे हा. :)
5 Jul 2012 - 1:21 pm | नाना चेंगट
आशावाद हा नेहमी भाबडाच असतो, असे आमचे आंजावरचे विचारवंत मित्र म्हणतात.
5 Jul 2012 - 4:36 pm | रमताराम
एरवी देव आहे असं कोणी ठामपणे म्हटलं असतं?
(चला धाग्याला आता काश्मीरला जायला हरकत नसावी.)
5 Jul 2012 - 5:49 pm | नाना चेंगट
एरवी देव नाही असं कोणी ठामपणे म्हटलं असतं?
(चला धाग्याला आता जम्मू सुद्धा सामील झाले)
5 Jul 2012 - 11:37 am | श्रावण मोडक
मला वाटायचं की सैतान हीही भ्रामक कल्पना आहे. ;-)
5 Jul 2012 - 4:34 pm | रमताराम
तुम्हाला नि पुप्याला भेटण्यापूर्वी माझाही असाच गैरसमज होता...... दूर झाला.
5 Jul 2012 - 5:32 pm | श्रावण मोडक
म्हणूनच मी तरी तुला देव मानतो बॉ... ;-)
5 Jul 2012 - 8:39 pm | रमताराम
म्हणजे तुम्हीही आता माझं देऊळ बांधून आपलं हार-फुलांचं नि अध्यात्माचं - या देवाचा सोल एजंट म्हणून - दुकान चालवणार तर. पहिल्यापासून हुशार होऽ.
6 Jul 2012 - 4:53 pm | नाना चेंगट
आरतीची सोय आधीच झाली आहे ;)
7 Jul 2012 - 12:56 pm | रणजित चितळे
चला आता देव नाही असे सांगत फिरता येईल. (असाच प्रतिसाद कोठे तरी दिला आहे. परत देतो आहे कारण विषय तोच आहे)
5 Jul 2012 - 1:40 pm | परिकथेतील राजकुमार
विशेष कौतुक वाटले नाही.
मिपावरच्या काही लेखकूंना हा शोध 'शब्दकणां'च्या रुपाने आधीच लागलेला आहे. हे शब्दकण दर दिवशी स्वतःपासून अनेक शब्दांकणांची निर्मीती करतात आणि ते मिपाकरांच्या डोक्यावरती आदळतात.
5 Jul 2012 - 4:47 pm | बॅटमॅन
एल एच सी (लार्ज हॅड्रॉन कोलायडर) प्रमाणे मिपादेखील *एल जी सी आहे असेच ना?
*= लार्ज जिलेबी सेंटर.
5 Jul 2012 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विज्ञानाचा साह्याने सृष्टीची उकल होण्याच्या दृष्टीने शोधलेला कण आणि अशा कणांच्या बाबतीत मूलभूत संशोधन करणार्या विविध शास्त्रज्ञांबरोबर सत्येंद्रनाथ बोस यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहेच.
बाकी, कोणत्या कणापासून विश्वाची निर्मिती झाली. आणि कोणते अणू चे विघटन होते, होत नाही. कोणत्या अणूंचा स्फोट केल्यावर कशाची निर्मिती होते वगैरे काही कळत नाही. विश्वनिर्मितीचा शोध विज्ञानाने लावावा नाही तर ईश्वरवाद्यांनी, पण कोणीतरी या निर्मितीमागच्या शक्तीची भेट घडवून आणावी, इतकीच आपली इच्छा आहे.
-दिलीप बिरुटे
5 Jul 2012 - 4:29 pm | परिकथेतील राजकुमार
नानबा, अरे आपली ती डबल बॅरल आण रे.
5 Jul 2012 - 4:42 pm | विनायक प्रभू
साल्या परा मला विसरलास का?
लक्षात ठेवीन.
5 Jul 2012 - 7:25 pm | परिकथेतील राजकुमार
आता ह्या गादीवरच्या कुस्तीच्या वयात, तुम्हाला कुठे कुस्ती खेळायला न्यायचे लाल मातीत ? म्हणून हाक नाही मारली प्रभुदेवा.
6 Jul 2012 - 11:40 am | विनायक प्रभू
परा, वयाबाबतीत बोलायचे काम नाही हां.
विइश्ठ कणाबाबतीत आपली पि.य्च.डी. आहे.
5 Jul 2012 - 5:51 pm | नाना चेंगट
जाऊ दे रे ! आपला माणूस आहे... सांजच्याला आणु त्याला भेटवून धर्मक्षेत्रे कावेरीक्षेत्रे मधे ;)
5 Jul 2012 - 4:24 pm | मराठमोळा
सापडला का एकदाचा.. बर बर..
चालु द्या.
5 Jul 2012 - 11:02 pm | गोंधळी
युरेका युरेका युरेका युरेका युरेका
hey GOD pls help these people to discover the truth of world.
---------------------------------
GOD भक्त.
6 Jul 2012 - 11:26 am | प्यारे१
>>>युरेका युरेका युरेका युरेका युरेका
हो हो हो ह्हो...हो!
ओ गोंधळी,
कापडं घाला आदी... :P
'तसंच' पळू नगा.
कायदं बदलल्यात आता! ;)
6 Jul 2012 - 11:36 am | रमताराम
=)).
आता देवाच्या व्रताच्या नावावर चालतं म्हणा कपड्याविना प्रदक्षिणा वैग्रे घालणं. एरवी पाप वा अश्लील असलेले कृत्य देवाच्या नावावर पावन होऊन जाते. परिसस्पर्श म्हणतात तो हाच हो.
6 Jul 2012 - 11:40 am | प्यारे१
रम-ता-रमचा स्पर्श अद्भुतच असणार ना? ;)
(सं-दर्भ : वरचा तुमचाच 'क्लेम' )
6 Jul 2012 - 3:27 pm | गोंधळी
प्यरे१ जी भावना को समझो म्हण्जे कपड्यांचा प्रोब्लेम येणार नाही.
(आता ही भावना कोण असे विचरु नका)
6 Jul 2012 - 10:05 pm | Nile
6 Jul 2012 - 10:29 pm | अर्धवटराव
I almost learned to pretend that I have a Boson Candy ;)
अर्धवटराव
7 Jul 2012 - 3:08 pm | अविनाशकुलकर्णी
7 Jul 2012 - 3:40 pm | विसुनाना
“Physicists do not need mysticism and mystics do not need physics, but humanity needs both." - Dr. Capra