स्थलान्तर करणार्‍या पक्षाला....

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
28 Jun 2012 - 3:34 am

खाली अथांग पाणी, निळाई संपत कोठे आहे?
थकल्या पंखाच्या पाखरा, सांग तुझे घर कोठे आहे?

समोरचा पाहतो दूरवर, मागचे शिस्तीने रांगी
कुठे कधी दिसणार धरित्री, प्रश्न मनीचे मोठे आहे

विसरलो केव्हा निघालो, केव्हा टिपिले दाणे
चारा हवेचा फक्त खाउनी पिळवटलेली पोटे आहे

वादळ वारे घेरुनि येता, विसकटल्या की रांगा
थकलेले जीव विसावतिल, आशा ही का खोटी आहे?

जे सोडले मागे ते की, जिथे चाललो ते घर अपुले?
धैयाच्या तव निष्ठेपुढती, शंका वादळ छोटे आहे

निशा पसरली, तिला डावलुनि, येई अरूण उदया
किरणगर्भी मेघाहाती आमंत्रणाचे लखोटे आहे

आता कळले असेल तुजला, नवीन घर ते कोठे आहे,
थकल्या पंखाच्या पाखरा, सांग तुझे घर कोठे आहे?
सांग तुझे घर कोठे आहे?

कवितादेशांतर

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

28 Jun 2012 - 11:33 am | श्रीरंग_जोशी

पोटापाण्यासाठी भटकणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या भावनांना साद घालणारी कविता...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jun 2012 - 12:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर रचना...

मदनबाण's picture

28 Jun 2012 - 12:10 pm | मदनबाण

मस्त !

अमितसांगली's picture

28 Jun 2012 - 12:26 pm | अमितसांगली

मस्त जमलीय...