पैसा

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
22 Jun 2012 - 11:46 am

श्वासात अडकला पैसा अन पैशात अडकला श्वास;
श्वासाने सार्थक पैसा की पैशाने चाले श्वास?

स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारलाये आणि स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोधारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही.

एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आचरणात आणता येईल असं उत्तर माझ्याकडे आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळते पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे.

तर पहिली गोष्ट - स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे कारण असंय की प्रत्येकानं आपल्याकडे असलेल्या पैशाचं `रेव्हेन्यू आणि कॅपिटल' असं विभाजन केलंय. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीती नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित!

कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका `भांडवली पैसा' हवा की त्यातून मिळणार्‍या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी!

मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्मी असंच चालू राहील!

मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं.

हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार गोष्टी आपसूक घडतात:

एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा `वापरणं' म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.

दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.

तीन, तुमच्या वागण्यात सहजच एक बिनधास्तपणा येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत असं हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात मधे न येता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!

चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत आणि पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात येतं. पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहोत; आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.

पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही.

इथे मला अजून एक गैरसमज दूर करावासा वाटतो, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झालीये. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे. हा गैरसमज दूर होता क्षणी पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते!

मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं!

माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!

अर्थव्यवहारप्रकटन

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

25 Jun 2012 - 2:33 pm | संजय क्षीरसागर

>मला पीएसथ्री गेमिंग सिस्टीम दिसली. मी पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडलो. ती २३००० ची आहे आणि नंतर त्याचा प्रत्येक गेम २ ते ३ हजारचा आहे असं समजलं.

पी एसथ्री घेऊन टाकावा ? कल को मारो गोली? असं का आणि काही?

= मी वीणाला प्रतिसाद देताना म्हटलय की आपल्या स्वच्छंदाच्या कल्पना परावलंबी आहेत.

मला गेमिंग सिस्टीम काय असते माहिती नाही पण `नंतर त्याचा प्रत्येक गेम २ ते ३ हजारचा आहे असं समजलं' याचा अर्थ तुम्ही दुसर्‍यावर अवलंबून राहणार, तुमची स्वतःची ग्रोथ होणार नाही.

गेमींग सॉफ्टवेअर बनवणं हे माझं स्वप्न असेल, अफलातून गेम्स बनविन अशी माझी आंतरिक इच्छा असेल आणि त्या अभ्यासासाठी जर ती सिस्टम घेणार असीन तर माझ्या अयुष्याची दिशाच बदलेल मग तेवीस हजार विषेश नाहीत, मी माझ्या जीवनाचा रंग बदलतोय.

पण घेतानाच धसका वाटतो कारण तुमचा इंटरेस्ट पहिला गेम खेळताखेळताच संपू शकतो हे तुम्हाला माहिती आहे, मग ती सिस्टम घेण्यात अर्थ नाही, खेळावस वाटेल तेव्हा गेमिंग फॅसिलिटी असेल तिथे जाऊन मनसोक्त खेळणं योग्य होईल.

पोहायचय तर घरात स्विमींग पूल कशाला?

> पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून पाहणं आणि आधार म्हणून पाहणं या काही विरुद्धार्थी गोष्टी नव्हेत. "उपयोगी वस्तू" ही कोणत्या क्षणी "गरजेत" रुपांतरित होईल हे सांगता येत नाही. उदा. अन्न या प्रकाराकडे उपयोगी वस्तू म्हणून पाहिलं किंवा गरजेची वस्तू किंवा आधार म्हणून पाहिलं तरी त्यावर आपण अवलंबून नाही असं म्हणणं धाडसाचंच आहे.

= आधार आणि अवलंबून राहणं एकच आहे पण उपयुक्तता ही सर्वस्वी भिन्न गोष्ट आहे.

अन्न काय आणि पैसा काय दोन्ही बाबतीत ते आगदी तंतोतंत सारखच आहे. आयुष्यभर जेवायला लागणार म्हणून मी आजच सगळं जेवत नाही भले उद्या जेवायला मिळेल की नाही हा माझा आजचा आणिनेहमीचा अत्यंत वॅलिड प्रश्न आहे.

पैश्याचं आगदी तसंच आहे पण तो वारेमाप साठवता येतो, तिथे फिजिकल लिमीटेशन नाही म्हणून आपण तसा विचार करत नाही पण तसाच विचार करा इतकंच सांगतोय.

>पैसा समोर असलेल्या कारणासाठी "योग्य प्रकारे वापरणं" यातल्या "योग्य प्रकारे" या निकषात फारच जनरलायझेशन आहे

= हे प्रतिसादाच्या पहिल्या भागात आलय.

>मी वस्तुस्थिती आहे तसाच पैसा ही देखील वस्तुस्थिती असलेली संकल्पना आहे.

= तुम्ही प्रथम आहात आणि तुमचं असणं निव्वळ पैश्यावर अवलंबून नाही (श्वासावर ते अत्यंत मोठ्याप्रमाणावर अवलंबून आहे पण ते आपल्याला जाणवत नाही). पैसा ही तुमचं जगणं सोयीचं व्हावं म्हणून निर्माण केलेली कल्पना आहे पण तुम्ही स्वतः कल्पना नाही हा फरक कायमचा लक्षात ठेवला की पैश्याचं अवास्तव डायमेंशन योग्य प्रपोर्शन मधे येतं.

तुझ्या अत्यंत विधायक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!

प्रास's picture

25 Jun 2012 - 12:41 pm | प्रास

गविज् बॅक, आय से.....

छान निरुपण प्रयत्न. अर्थात संजयजी यावर अधिक विस्तृतपणे लिहीतीलच.

आज छान जेवलोय, संध्याकाळचं संध्याकाळचं संध्याकाळी......

प्रभाकर पेठकर's picture

25 Jun 2012 - 1:25 pm | प्रभाकर पेठकर

श्री. गवि साहेब,

'गरज' आणि 'हव्यास' ह्यात फरक करता आला पाहिजे. आणि तो आवश्यक आहे असे मत मी माझ्या एका प्रतिसादात मांडले आहे.

तसेच, प्रत्येकाची 'गरज' स्थल, काल, आर्थिकपरिस्थिती इत्यादी नुसार बदलते. थंड प्रदेशात एसीची गरज नसते पण आखातासारख्या उष्ण प्रदेशात ती 'गरज' असते. चैन नाही. कालानुरुप गरजा बदलतात. पूर्वी माणसे जंगलातून लाकडे तोडून आणून स्वयंपाक करायची, आज कुकींग गॅस ही 'गरज' बनली आहे. तर आर्थिक परिस्थितीनुसारही गरजा बदलतात. झोपडीत राहण्यार्‍याला अंग झाकण्यापुरते कपडे पुरतात तर ज्याची ऐपत आहे त्याला कपड्याच्या ४ जोड्या जास्त लागतात.

पैशाचा 'हव्यास' नसावा, आवश्यकते इतका पैसा जरूर कमवावा/साठवावा. मग आयुष्यात तुम्ही पहिले आहात, पैसा दुय्यम आहे, आजचा क्षण खरा, 'उद्या' ही कल्पना आहे, अस्तित्व म्हणजे काय?, काल हा भूतकाळ आहे वगैरे वगैरे भरल्यापोटीचे शब्दच्छल आहेत.

पैशा अभावी मुलींचे लग्न न होणं ही काय समस्या असते ते ज्यांच्या मुलींच वय वाढतं आहे त्यांना माहित असते, इस्पितळात मरणाच्या घटका मोजणारा स्वकिय असला की समजतं पैशाचं महत्त्व. के.ई.एम. मध्ये माझे वडिल अ‍ॅडमिट असताना त्याच वॉर्डातली एक १७-१८ वर्षाची मुलगी वारली. तिचे आई-वडील खेडेगावातून आले होते. इस्पितळातच राहायचे, तिथेच आंघोळ करायचे, दोन जोड्या धुवून धवून वापरायचे, पदरचे पैशे संपत आले तेंव्हा मुलीच्या उपचारासाठी (औषधांसाठी) पैसे पुरावेत म्हणून तो खेडूत आणि त्याची पत्नी चहात पाव बुडवून 'जेवत' होते, कधी कधी तर नुसता कोरडा पाव आणि वरून घटाघटा पाणी प्यायचे. स्वाभिमानी होते. कोणी दिले काही खायला तर विनम्रतेने नाकारायचे. त्यांची मुलगी गेली तेंव्हा तिचे प्रेत त्यांना गावी न्यायचे होते पण वाहन करायला पैसे नव्हते. मुंबईसारख्या अक्राळविक्राळ शहरात कोणी ओळखिचं नाही. अत्यंत दु:खी कष्टी अशा त्या जीवाने (बापाने) पोटच्या पोरीचे प्रेत गावी न्यायला हवे म्हणून सर्वासमोर आपला फाटका रुमाल पसरला. डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होतं. मुलगी गेल्याचं दु:ख होतंच. चारलोकात गरीबी उघडी पडली हे दु:खही जोडीला होतं. सर्वांनी मदत केली. आल्या प्रसंगासाठी थोडाफार पैसा उभा राहिला पण त्या मानी माणसाला सर्व अनोळखी माणसांसमोर रुमाल पसरावा लागला. त्या रुमालावर पडणार्‍या प्रत्येक नाण्या/नोटे बरोबर त्या मातापित्यांच्या डोळ्यातून अश्रू घळघळा वाहात होते. लोकांच्या नजरेला नजर न देऊ शकणार्‍या त्या गरीबाचे जोडलेले, थरथरणारे हात आणि गदगदणारे कृश शरीर नजरेसमोरून हटत नाही. गविसाहेब, आजही त्या दृष्याच्या आठवणीने माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्या माणसाला काय सांगणार आपण? काल भूतकाळ होता, आजचा क्षण सत्य आहे आणि भविष्य ही नुसती कल्पना आहे?

पैसा हे सर्वस्व नसलं तरी पैशाची ताकद नाकारून चालणारच नाही. पैशा मागे धावू नका, पैशापेक्षा आनंद, स्वच्छंद जीवन महत्त्वाचे आहे (स्वतःला) सांगण्या आधी पुरेशा पैशांची सोय करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तेवढी सोय होई पर्यंत त्या मागे धावावेच लागते. एकदा तेवढे जमले की स्वच्छंद आनंद लुटा नं! कोणी नाही म्हंटलय? कोणाला आवडणार नाही?

आणि ही व्यक्तिगत शेरेबाजी आहे हे निदर्शनास आणून देतो.

इतर सर्व प्रतिसाद `वर्तमानात असलेली काल्पनिक भयभीतता दर्शवते' हे मानवी मनाच्या अत्यंत सखोल अभ्यासावरुन कोणत्याही प्रकारे व्यक्तीगत रोख न ठेवता नमूद करतो.

प्रभाकर पेठकर's picture

25 Jun 2012 - 2:43 pm | प्रभाकर पेठकर

आयुष्यात तुम्ही पहिले आहात, पैसा दुय्यम आहे, आजचा क्षण खरा, 'उद्या' ही कल्पना आहे, अस्तित्व म्हणजे काय?, काल हा भूतकाळ आहे वगैरे वगैरे भरल्यापोटीचे शब्दच्छल आहेत.

ह्या शब्दांना दुषणं दिली आहेत तुम्हाला नाही. आणि असेही तुम्हाला ते व्यक्तिगत वाटले असेल तर हरकत नाही सुरुवात तुम्हीच केली आहे.

ही वस्तुस्थिती पुन्हा नम्रपणे नमूद करतो,

शिवाय शब्दांना पोट नसते त्यामुळे भरल्यापोटी हा व्यक्तीनिर्देश आहे असे सुचवतो

उदय's picture

17 Mar 2017 - 9:45 am | उदय

पेठकरकाकांशी सहमत.
व्यक्तिगत शेरेबाजी हा कांगावा बघून गंमत वाटली.

प्रभाकर पेठकर's picture

25 Jun 2012 - 3:54 pm | प्रभाकर पेठकर

माझा वेळ वाया जाऊ नये म्हणून, श्री. संजय क्षीरसागर ह्यांच्या कोणत्याही प्रतिसादांचे वाचन आणि प्रत्युत्तर मी थांबविले आहे.

योगप्रभू's picture

25 Jun 2012 - 5:57 pm | योगप्रभू

संजय क्षीरसागर व प्रभाकर पेठकर यांच्यातील हे वाक्युद्ध निश्चितच दुर्दैवी आहे.

पेठकरजी! आपण एक अनुभवी व्यावसायिक आहात आणि उद्योजकीय अर्थव्यवस्थापन हे थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल मार्गाने करत आहात त्यामुळे खरे तर आपले माहितीपूर्ण प्रतिसाद येथे अपेक्षित होते. इथली चर्चा उत्सुकतेने वाचणारा एक मिपाकर इतक्याच नात्याने मी सांगू इच्छितो (आपल्या वयाचा आदर आहे, पण वस्तुस्थितीही डावलता येत नाही), की 'ज्यांना हा धागा वाचनमात्र व्हावा, असे वाटते त्यांनी हात वर करावा,' हे आपले वाक्य खरोखर अप्रस्तुत होते. या धाग्यावर श्री. क्लिंटन यांच्यासारख्या अभ्यासू सदस्यांचे प्रतिसाद वाचायला मिळावेत, यासाठी मी टपून बसलोय :) (क्लिंटन यांच्या उल्लेखाचे कारण ते रिस्क मॅनेजमेंट विषयातील व्यावसायिक आहेत आणि 'पैसा व जोखीम' यातील नातेसंबंध उलगडतील.)

संजय! तुम्ही वैयक्तिक प्रत्युत्तरांमध्ये गुंतण्यापेक्षा तसेच 'माझ्या चाहत्यांसाठी' असे हास्यास्पद शब्दप्रयोग करण्यापेक्षा मुद्याला धरुन राहावेत, असे वाटते.

अर्धवटराव's picture

25 Jun 2012 - 10:16 pm | अर्धवटराव

आपली शिष्टाई सफल होवो :)

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

25 Jun 2012 - 11:10 pm | संजय क्षीरसागर

मधे चार-पाच तास माझं मशिन बंद होतं म्हणून लगेच प्रतिसाद देऊ शकलो नाही.

पेठकर सरांची अनुमती असेल तर माझे, त्यांचे आणि त्यासंबधित असलेले सदस्यांचे सर्व प्रतिसाद अप्रकाशित केले जावेत अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो

लेख आणि प्रतिसाद वाचते आहे. दोन्ही इंटरेस्टिंग आहे.
मला या दोन ओळी आवडल्या.
१) श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे.
२) आयुष्याच रुटीन होऊ देऊ नका, एकच दिवस पुन्हापुन्हा जगू नका

एक मजेशीर प्रसंगा डोळ्यासमोर आला, रोज मुलाला सांगत असते की कैडबरी चा एकाच टुकड़ा आज खा, उरलेला उद्या नाहीतर दात किडतिल. जर त्याला हा लेख कलू शकला असता तर म्हणाला असता, की आजच दे सगळी कैडबरी उद्या ची चिंता करू नको :प

"आणि रात्र शनिवार करा म्हणजे भोगाल तेव्हा मनसोक्त भोगा, उद्याची चिंता करु नका कारण उद्या कधी येत नाही."

=> हा दृष्टीकोन मला फारसा व्यवहारी वाटत नाही. कदाचित याची पुढील कारण असू शकतील.
१. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला उद्या यायची सवय झालीये :).
२. माझ्या ओळखीतल्या लोकांपैकी ९०-९५% लोकांच्या आयुष्यात ६०-७० वर्षा पर्यंत रोज उद्या आलाय :प. फारच कमी लोक अकाली गेलेत. त्यामुळे कदाचित धरून चालल्ये कि मला पण ६०-७० वर्ष पर्यंत उद्या ला तोंड द्यावा लागणार आहे.

असो, माझ्यासाठी महत्वाच म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन वाचायला मिळाला आणि तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे हा दृष्टीकोन तुमचं आयुष्य सुखी बनवतोय.

संजय क्षीरसागर's picture

26 Jun 2012 - 5:21 pm | संजय क्षीरसागर

मुद्दा असाय, मी आज साठ वर्षाचा नाही त्यामुळे साठ ही आज माझ्यासाठी कल्पना आहे, त्या कल्पनेनं आज वाया घालवण्यात अर्थ नाही. जेव्हा साठ झालो हे कळेल तेव्हाही तो कोणता तरी `आजच असेल' आणि त्या दिवशी ही मी उद्याची काळजी न करता त्या आजमधेच जगत असेन कारण तो माझा स्वभाव बनलेला असेल.

या विरुद्ध परिस्थिती भविष्यकालीन योजना करणार्‍याची असेल. तुम्हीही आज साठ नाही पण साठीची चिंता करत तुम्ही ती सोय आज लावताय. जेव्हा तुम्ही खरंच साठ व्हाल त्या वेळी तुम्हाला सत्तरची दारुण परिस्थिती चिंताग्रस्त करेल कारण त्या दिवशी देखील तुम्ही पुढची योजना करत असाल! कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही, लोक नाराज होतायत कारण त्यांच्या धारणांना शह बसतोय.

तुम्ही फक्त मी जे लिहिलय ते शांतपणे वाचा, एकेका वाक्याची मजा घ्या, लगेच विरोधी विचारांच काहूर मनात उठू देऊ नका. मी शब्दखेळ करत नाहीये, या सहज आणि सोप्या संकल्पनांना जबरदस्त अध्यात्मिक आधार आहे कारण मुळात काल हा भास आहे त्यामुळे `काल किंवा उद्या' असं काही नाही; एवढच नाही तर आज सुद्धा थोडी विस्तृत कल्पना आहे, फक्त `आता' आहे. हा `आता' ही एकमेव अचल स्थिती कायम आहे त्यामुळे कृष्णानं स्वतःला सनातन वर्तमान म्हटलय!

बॅटमॅन's picture

26 Jun 2012 - 5:55 pm | बॅटमॅन

साठ ही आज कुणासाठी कल्पना असली तरि साठी बुद्धी नाठी ही अख्ख्या जगासाठी रिअ‍ॅलिटी आहे.

बाकी प्रतिपादिलेली धारणा झीनोच्या पॅराडॉक्सच्याच मार्गाने जाणार अशी दाट शंका आहे.

आयुष्याचा मोठा भाग स्थिरस्थावर होण्यात जातो आणि स्थैर्य आल्यावर मग भोगायचं तेव्हा वृद्धापकाळाच्या योजना करण्यात वेळ जातो, आता जरा उसंत मिळेल म्हणेपर्यंत साठी येते!

रणजित चितळे's picture

27 Jun 2012 - 2:25 pm | रणजित चितळे

आपले लेख सहसा चुकवत नाही. हे कसे निसटले ते कळले नाही. वाचून काढले. विचार पटले.