एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..
एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात..
प्रतिक्रिया
21 Jun 2008 - 2:20 pm | II राजे II (not verified)
ही कविता तुमची आहे काय... ???
नाही कोठे तरी वाचली आहे आधी !!
नसेल तर.. तात्या.. ला सांगा !
राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
21 Jun 2008 - 7:15 pm | मिसळपाव
संदिप खरेच्या कवितांच्या वळणासारखी हि कविता आहे छान.
संतोष, तुझी असली मुळात तर तुझं कौतुक. तुझी नसली तर कुणाचं कौतुक करू ते सांग.
21 Jun 2008 - 7:31 pm | श्रीयुत संतोष जोशी
नाही , माझी नाही. माझ्या वाचनात आली , आवडली , म्हणुन शेअर केली.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.