ओळख

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in जनातलं, मनातलं
21 Jun 2008 - 11:58 am

नमस्कार्,खादाड लोक हो
" मिपा " च्या सर्व सभासदांना माझा नमस्कार. आणि मालकांना सुद्धा . बरं का!
मी संतोष जोशी
श्री स्थानक येथे रहातो.लोकांना पोटभर जेऊ घालणे हा व्यवसाय.गेले तीन पिढ्या हा व्यवसाय अव्याहतपणे चालु आहे.(मी तिसरा)
मालक (तात्या) आमचे मित्र आहेत. तशी मैत्री कट्ट्यावरची म्हणजे विचारांची , पण खाणे आणि पिणे यातील आवडीही सारख्या आहेत
हे समजल्यावर जास्त घट्ट झाली.
व्यवसाय तर आहेच पण लोकांना रुचेल ते खाऊ घालणे हा छंद.
त्यामुळे सामिष की निरामिष हा तुच्छ प्रश्न कधीच आडवा येत नाही.
आपणा सर्वांशी मैत्री करायला आवडेल .
पाहूया !! कधी भेटीचा योग येतो ते...

वावरसद्भावना

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

21 Jun 2008 - 12:02 pm | अमोल केळकर

स्वागत संतोष साहेब -
श्री स्थानक कुठे आहे?

श्रीयुत संतोष जोशी's picture

21 Jun 2008 - 12:15 pm | श्रीयुत संतोष जोशी

श्री स्थानक म्हणजे ठाणे

आज पुण्यात कट्टा आहे..येताय का? सगळे भेटतील

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

श्रीयुत संतोष जोशी's picture

21 Jun 2008 - 12:19 pm | श्रीयुत संतोष जोशी

आज जरा जास्तच काम आहे . पुढील कट्टयाला नक्की जमवू.

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 2:23 pm | विसोबा खेचर

संतोषशेठ,

मिसळपाव परिवारात तुझं सहर्ष स्वागत...

लोकहो,

विशेष सांगायचं म्हणजे संतोषच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून मंगल कार्यालयाचा व्यवसाय चालत आलेला आहे. संतोषचे आजोबा छबूनाना जोशी हे आमच्या ठाण्यातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व. गेली अनेक वर्ष ठाण्या-मुंबईतल्या आणि आसपासच्या परिसरातल्या अनेक मंगलकार्यात जोशी कुटुंबियांनी लोकांना वाजवी दरात अगदी चवीचवीने अन् पोटभर जेवू घातलं आहे.

व्यवसायच असल्यामुळे त्याच्या ठाण्यातल्या लक्ष्मी-केशव मंगल कार्यालयात नेहमीच लग्नामुंजीसारखी कार्ये सुरू असतात. जर एखाद दिवशी एखाद्या कार्यात साजूक तुपातल्या जिलेबीचा मेनू असेल तर संतोषचा मला 'तात्या, येऊन जा रे. खास तुझ्याकरता जिलब्या वेगळ्या काढून ठेवलेल्या आहेत!' असा हमखास फोन येणार! :)

श्रीखंडाचा डबा तर मी मागेन तेव्हा मला मिळतो! ;)

असो...

आजतागायत मंगल कार्यालय व्यवसायातले अनेक बरेवाईट अनुभव संतोषच्या गाठीशी आहेत ते त्याने मिपाकरांशी शेअर करावेत अशी त्याला विनंती...

आपला,
(संतोषच्या मुदपाकखान्यात डायरेक्ट वशीला असलेला!) तात्या.