(एखाद्या नवोदित लेखकाचा टांगणीला लागतो जीव)

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
16 Jun 2012 - 6:14 am

प्रिय मिपाकरांनो,
अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो. त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर मिपावरील त्या नवोदीत लेखकांची आकृती उभी राहते. जुन्या खोंडांच्या एका प्रतिसादासाठी त्यांच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, त्यासाठी झालेली त्यांच्या जिवाची तगमग, त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
जुन्या मिपाकरांच्या लेखांवर तुम्ही अगदी मिटक्या मारून प्रतिसादावर प्रतिसाद देता, पण नवोदीत लेखकांना फाट्यावर मारता. तुमच्या एका उत्तेजनात्मक प्रतिसादासाठी त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो त्याचे काय?
मी काही 'जुन्या मिपाकरांचे लेख हेच कसदार, नवोदीत लेखकांचे हिणकस की उलट' ह्या वादात पडणार नाही. पण मनाला जे वाटते ते सांगितले. आता काय योग्य काय अयोग्य हे ज्याने त्याने ठरवावे.

मनास वाटले ते थोडक्यांत लिहून थांबतो आहे.

-
एक नवोदीत लेखक
(आमची प्रेरणा)

विडंबनवाद

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2012 - 6:24 am | अत्रुप्त आत्मा

:-D मेलो मेलो :-D
आज काय खरं नाय बा !
ह-ल्ली च एक असा लेख वाचनात आलावता. ;-)

श्रीरंग_जोशी's picture

16 Jun 2012 - 6:26 am | श्रीरंग_जोशी

अहो मिपावरील नव्या सदस्यांच्या अंगी मिपा बाणा (अंगावर आले तर शिंगावर घ्या) यावा यासाठीचे ते विशेष प्रयत्न आहेत असे आम्ही मानतो.

अच्छा !! म्हणजे मिपाचे सगळेच नवसदस्य 'बाणेदार' होत आहेत तर !!

सोदाहरण स्पष्ट करा... व्हिडो असल्यास .... नको. नुसतं लिहाच.

बॅटमॅन's picture

18 Jun 2012 - 3:23 pm | बॅटमॅन

आपली बोली आपला बाणा ;) :D :P

५० फक्त's picture

16 Jun 2012 - 7:30 am | ५० फक्त

मग नवोदित लेखकांनी इथं येण्यापुर्वी कंपुप्रवेशाची प्रवेश परीक्षा देउन उत्तीर्ण होउन यावे, हाकानाका.

जेनी...'s picture

16 Jun 2012 - 10:32 am | जेनी...

५० +१
;)

प्यारे१'s picture

16 Jun 2012 - 10:40 am | प्यारे१

+१ बद्दल आक्षेप. ;)

०.५ किंवा १.५ हवं.

(-)१.५ प्यारे १

१०० टक्के सहमत.
कंपुबाजिच्या राजकारणामुळे अनेक चांगले लेखक अन्य संकेत्स्थळांकडे वळ्तायत.कधि कधि कंपुबाजिमुळे एखादा फालतु लेखहि शम्भरी गाठतो.

मराठमोळा's picture

16 Jun 2012 - 7:47 am | मराठमोळा

खरं आहे सोत्रि..
काय करायचं या नानाचं आणि जुन्या खोडांचं..... यक्षप्रश्न आहे बुवा :)

श्रीरंग_जोशी's picture

16 Jun 2012 - 8:26 am | श्रीरंग_जोशी

मिपा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मी फार पूर्वी अर्ज केला होता. परंतु काही कारणांनी तो प्रशासकांनी स्वीकृत केला नाही. कदाचित त्यांच्या पात्रतेच्या निकषांत मी बसलो नसेन.

शालेय बाळकडू मनोगताच्या शाळेत मिळाले होतेच मग तेथेच अधिक धडे गिरवले. काही महिन्यांपूर्वी मिपा महाविद्यालयात पुन्हा अर्ज केला.

या खेपेस मात्र सहजपणे मिळाला. जसे १२ वीत कमी गुण मिळाल्याने अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळत नाही. अन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी अभासक्रमातील नापास विद्यार्थ्यांमुळे वरील वर्षाला सहज प्रवेश मिळतो तसे काहीसे झाले.

मिपा प्राचार्यांनी (प्रशासकांनी) दिलेल्या संधीबाबत मी सदैव त्यांचा ऋणी राहीन व परा गुरुजींचा एक आदर्श विद्यार्थी होऊन दाखवेन...

नवोदित लेखकापेक्षाही आम्हा नवकवींची अवस्था जास्त दारूण आहे हो सोत्री अण्णा. ही जुनी खोंडं नवोदित लेखकाच्या धाग्यांवर प्रतिसाद देणार नाहीत पण आम्हा नवकवींच्या धाग्यांवर मात्र झुंडीनं हल्ला करणार, नवकवींचं जगणं मुश्किल करणार, ट्यार्पी नको पण प्रतिसाद आवर अशी अवस्था होणार.
अहो आता तुम्हाला काय सांगायचे.

--
एक नवकवी.

राजेश घासकडवी's picture

16 Jun 2012 - 8:30 am | राजेश घासकडवी

लेख अंमळ विनोदी आहे. पण,

...त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.

या वाक्याबद्दल डब्बल ऑब्जेक्शन. पहिल्या प्रथम तुम्ही सं. मं. ला क्रूरकर्मा म्हणत आहात. असं म्हणणं योग्य नाही. तुम्ही आधिकारिक धोरणं वाचली नाहीत का? दुसरी चूक म्हणजे नव्यांपेक्षा तुम्ही, परा, सुनील वगैरे जुन्या खोंडांचेच धागे उडलेले मी पाहिले आहेत.

छोटा डॉन's picture

16 Jun 2012 - 11:37 am | छोटा डॉन

>>लेख अंमळ विनोदी आहे.
संपुर्ण सहमती, आजकाल गुर्जींशी सहमत व्हायची वेळ फार कमी वेळा येते त्यामुळे इथे मी कुतकृत्य झालो आहे अक्षरश:

>>दुसरी चूक म्हणजे नव्यांपेक्षा तुम्ही, परा, सुनील वगैरे जुन्या खोंडांचेच धागे उडलेले मी पाहिले आहेत.
होय !
इनफॅक्ट मी गुर्जींसारख्या जालमहर्षींचे धागे उडताना पाहिले आहेत, आता बोला. ;)

- छोटा डॉन

मला यात कुठेच विनोद नाइ दिसत ...
कि बळेच हसायचं....???
टोचर्‍या सत्याला विनोदाची शाल पांघरायची, ओढुनतानुन चेहेर्‍यावर खळखळाटी हास्य आनायचं
आणी " मेलो , वारल्या गेलो , आता फुटलो " असल्या प्रतिसादांचे नारळ धाग्याला सप्रेम (?). भेट द्यायचे.
त्यापेक्षा सत्याला सत्य समजुनच त्याचा सत्कार करावा ...

प्यारे१'s picture

16 Jun 2012 - 10:04 am | प्यारे१

ठीकच.

लेखनप्रेरणेमागची 'प्रेरणा' कुणाची हे समजले तर जास्त बरे होईल.

सोत्रि's picture

16 Jun 2012 - 1:56 pm | सोत्रि

लेखनप्रेरणेमागची 'प्रेरणा' कुणाची हे समजले तर जास्त बरे होईल.

शॉ वॉलेसची रॉयल चॅलेंज (एक खंबा ३ जणांत) ;)

- (प्रेरणादायी) सोकाजी

जोयबोय's picture

16 Jun 2012 - 10:10 am | जोयबोय

आपण असे हतबल होउ नका. प्रत्येक जण कधी ना ़कधी नवोदित होता. ह्या जुन्या खोंडांना काय घाबरायचे. तुमचे सृजन चालु द्या.

अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो. त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर मिपावरील त्या नवोदीत लेखकांची आकृती उभी राहते. जुन्या खोंडांच्या एका प्रतिसादासाठी त्यांच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, त्यासाठी झालेली त्यांच्या जिवाची तगमग, त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.

तुमच्या म्हणजे नक्की कुणाकुणाच्या डोळ्यांसमोर उभे राहते??? :-D

श्रीरंग_जोशी's picture

16 Jun 2012 - 10:24 am | श्रीरंग_जोशी

त्यांची मिपावरील सेवाज्येष्ठता लक्षात घेता कुणाचीही यास हरकत नसावी...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Jun 2012 - 10:37 am | विश्वनाथ मेहेंदळे

काय सोत्री, वेळ जात नाही का हल्ली ?? एखादे छानसे मॉकटेल देऊन सोडा की हो. हे निरर्थक धागे काढून काय मिळते आहे ?
(तुम्ही इगो इश्यू न करता मुद्दा समजून घ्याल हे माहीत आहे म्हणून मुद्दाम स्पष्ट लिहितो आहे)

सोत्री साहेब, अस जुन्या लोकाना खोड म्हणण बर नाही. खर ते आपले अमुल्य विचार प्रकट करत असतात. बहुमोल सल्ले देत असतात. त्या सल्ल्यांचा लिखाणात उपयोगही होतो. आणी तसही नवे काय जुन काय तुमच्या सारख्या मायबाप जाणकार वाचक हा ईथे आहे मग काय नविन काय किंवा जुने काय लेखक व कवी येथे येतच राहतात. आता काही जुनी लोक नव्या लोकांच्या लेखावर किंवा कवितेवर कंपुबाजी करुन हल्ले करत असतीलही त्याला काय करणार आपण एकच लक्ष्यात ठेवा हत्ती व कुत्रे ह्यांची म्हण. त्यांमुळे ह्या गोष्टिंकडे लक्ष न देणे चांगले.

तुमच्या लेखांचा पंखा
निश.

(मी लोकांच्या वाटेला कधीच जात नाही पण माझी वाट कोणी अडवली तर मग मी मदमस्त हत्ती सारखा वाट अडवण्यार्‍याला उडवुन लावतो.)

नाना चेंगट's picture

16 Jun 2012 - 11:20 am | नाना चेंगट

लेखातील पहिले वाक्य वाचले.

>>>अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो

बाब्बॉ !! लगेच प्रेषक आणि वेळ पाहिली.

>>>प्रेषक सोत्रि Sat, 16/06/2012 - 06:14

सक्काळी सक्काळीच ? खुलासा झाला.

:)

किती चेष्टा करावी सोत्रि? ऑ !!

अच्रत बाव्लत !! :)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2012 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार

आपली फेणीची बाटली आमच्याकडे जमा झालेली आहे.

तेंव्हा धागा परत घेताय, का कसे ?

त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते.

च्यायला मग ज्यांना आम्ही 'जुनी खोंडे' समजतो त्यांना काय म्हणावे ?

नाना चेंगट's picture

16 Jun 2012 - 11:48 am | नाना चेंगट

>>च्यायला मग ज्यांना आम्ही 'जुनी खोंडे' समजतो त्यांना काय म्हणावे ?

त्यांना वैदिक खोंड म्हणावे काय?

छोटा डॉन's picture

16 Jun 2012 - 11:50 am | छोटा डॉन

असे म्हणणे हा नान्याचा खोडसाळपणा आहे इतकेच म्हणतो.
असहमत आहेच, इनफॅक्ट असहमत होण्यासाठीच मी आंतरजालावर येतो.

- छोटा डॉन

रमताराम's picture

16 Jun 2012 - 11:51 am | रमताराम

अरे तू म्हणतोस ती (यात माझेही नाव घालतोस की काय असा पूर्वीपासून संशय आहे मला) प्राचीन खोंडे असावीत. तुझ्यासाठी तू 'नव-प्राचीन' किंवा 'नव-वृद्ध' खोंड अशी क्याटेगरी करावी लागेल बहुधा.

(फेणीमधे आमचाही हिस्सा मान्य केलात तर प्रतिसाद मागे घेण्याचा अवश्य विचार करू.)

(मी असा कसा, असा कसा, जुना की नवा?) रमताराम

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2012 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

नान्या व ररा ह्यांच्याशी किंचित सहमत व असहमत.

कोणाचे नाव कोणत्या पुराणात अथवा वेदात आले आहे त्या वरुन त्यांचा कालखंड व उपाधी शोधावी असे सुचवावेसे वाटते.

प्राणिनी

प्रीत-मोहर's picture

16 Jun 2012 - 8:19 pm | प्रीत-मोहर

सोत्रि अण्णा खव चेकवणे प्लीज.

jaypal's picture

16 Jun 2012 - 6:19 pm | jaypal

आपापली नाडी तपासुन घ्यावी आणि 'परा" मानसशास्त्राचा आभ्यास वाढवावा हे उत्तम

विजुभाऊ's picture

16 Jun 2012 - 6:23 pm | विजुभाऊ

नान्या ररा आणि परा ह्यांच्याशी किंचित सहमत व असहमत.
कोण वैदीक कोण नादीक कोण हे कसे ठरवणार?
अवांतर पण महत्वाचे: जुनी खोडं की जुनी खोंडं? किती अनुस्वार द्यायचे?
पराला खोड म्हणावे की खोंड?

रमताराम's picture

16 Jun 2012 - 8:01 pm | रमताराम

पराला खोड म्हणावे की खोंड?
सोप्पय. जो वागतो तो खोंड नि जे वागतो ती खोड. (हाणतंय परा आता.)
( 'वार्‍यावरची वरात' आठवा: जो वाजिवतो तो कदम आनि ज्ये वाजिवतो ते र्‍हिदम. ;) )

अविनाशकुलकर्णी's picture

16 Jun 2012 - 9:38 pm | अविनाशकुलकर्णी

तुम्हाला वाटते म्हणुन नानाचे लेख दमदार.
व पराचे प्रतिसाद अस्वथ करणारे हे अमान्य.

शिल्पा ब's picture

17 Jun 2012 - 12:42 am | शिल्पा ब

हे अजिबात खरं नाही. असे लेखकु हे लांब लांब प्रतिसाद (जवळ जवळ प्रत्येक धाग्यावर) देउन स्वतःच स्वत:ला विचारजंत बनण्यासाठी उत्तेजन देताना पाहीलेलं आहे हे नम्रपणे नमुद करु इच्छिते. ( आता प्रतिसाद लांब लचक असले तरी अर्थपुर्ण असतात असं नव्हे.

आणि एक राहीलंचः आपल्या लेखांवर कोणी अन कशा प्रतिक्रीया द्याव्यात याची मागणी करणारे महाभाग सुद्धा आहेतच. अन लोकांनी फाट्यावर मारल्यावर वैयक्तीक होउन थयथयाट करतात हे मजेशीर.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jun 2012 - 12:34 am | निनाद मुक्काम प...

काय लिहिले आहे ह्यापेक्षा कोणी लिहिले आहे ह्यावरून प्रतिसादांचा ओघ सुरु होतो.

आपल्या वयक्तिक आयुष्यातील समस्यांचा परिपाक म्हणूनच की काय अनेक लेखांवर
वैचारिक अल्सर ,झाल्यासारख्या प्रतिसाद देऊन किंबहुना तेच आपले वैशिष्टे बनविणारे सुद्धा येथे आहेच की

जेनी...'s picture

17 Jun 2012 - 1:07 am | जेनी...

निनाद शी सहमत...
एखादा लेखक प्रसिद्ध असेल तर मग त्याच्या लेखावर तुमचा फॅन वैग्रे
असलं काहितरि चिकटवल जातं ....
बर्‍याचदा कितीहि नावाजलेला लेखक असो , पण त्याच्या बर्‍याच
गोश्टी पटत नाहित ... पण असं लिहायची हिम्मत होत नाहि..
नाहितर ह्यांचा कंपू तयारच अस्तो हल्ला चढवायला...

शिल्पा ब's picture

17 Jun 2012 - 1:41 am | शिल्पा ब

अहो म्याडम, हे मिपा आहे. एखादा विचार पटत नसेल तर तसं खणकाउन सांगायचं बिनधास्त. जे फॅन आहेत ते लिहितील तसं. अन समजा केवळ तुम्हाला आवडलं नाही असं तुम्ही लिहिल्याने जर कोणी हल्ला बिल्ला करत असेल तर संपादक मंडळ आहेच. रेवती आज्जी संपादीका आहेत असं ऐकुन आहे.