दातांची व्यथा

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
20 Jun 2008 - 10:40 pm

एकदा जिभली बोले दातांस
मी अशी (बिचारी) एकटी
तुम्ही मात्र आहांत पुरे बत्तीस

मला नाही हाड न काड
मी आहे स्नायूचागोळा
चुकून फिरले ईकडे तिकडे
तुम्ही करता माझा चोळामोळा
करिती ते (लोक) तुमचा उपयोग
म्हणती बोललो आम्ही जिभ "चाऊन"

ऐकून हे जिभलीचे संभाषण
दातं म्हणती तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला

बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
म्हणती ते (लोक) वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

कविता

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

21 Jun 2008 - 4:13 am | अरुण मनोहर

मजेदार आहे. लोकांना समजेल अशी वटवट करण्यासाठी जीभ आणि दात ह्यांची टीम जरूरी असते. नसल्यास बोबडकांद्याचे कोण ऍकणार?
म्हणूनच रागावून लोक जसे म्हणतात
"कां पाडू ती बत्तिशी?" तसेच कधी जास्त झाले की
"जीभ उपटून हातात देईल" असेही म्हणतात!

कौस्तुभ's picture

21 Jun 2008 - 10:29 am | कौस्तुभ

मजा आली, कवीता छान आहे!

विसोबा खेचर's picture

22 Jun 2008 - 9:08 am | विसोबा खेचर

म्हणती ते (लोक) वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?

हे मात्र खरं! :)