'टाळी'बाज

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
20 Jun 2008 - 3:29 pm

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुंदर गझल टाळीबाजकाल ही नव्हती अशी मग आज का?सर्व अंगाला सुटावी खाज का?मी कुठे दिसतो दिखाऊ, बायकीलोक मज म्हणतात 'टाळी'बाज का?बातम्यांमध्ये सदा आहेच मीवाटते याची तुम्हाला लाज का?सायबाचा, ईश्वराचा लागतोबायकोचा लागतो अंदाज का?दूर केल्यावर जरा कळले मला -चेहऱ्यावर मेकपी कोलाज का?नीट होते, यायची ती तोवरीनेमके अत्ताच फाटे काज का? धाड, ढमढम, टार, टमटम, सारखे... "केशवा" येतात हे आवाज का?

विडंबन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

20 Jun 2008 - 5:44 pm | प्राजु

बरेच दिवसांनी 'केश्या'श्टाईल विडंबन वाचले.. मजा आली वाचून.
सध्या कारखाना बंद आहे का विडंबनांचा?? बराच उशिर केलात राव.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रियाली's picture

20 Jun 2008 - 5:50 pm | प्रियाली

मी कुठे दिसतो दिखाऊ, बायकी
लोक मज म्हणतात 'टाळी'बाज का?

काय डोकं चालतं बाकी! :))

बर्‍याच दिवसांनी विडंबन वाचले.

चतुरंग's picture

20 Jun 2008 - 5:52 pm | चतुरंग

मस्त विडंबन!
वेगळीच टाळी वाजलेली आवडली! ;)

चतुरंग

वरदा's picture

20 Jun 2008 - 7:23 pm | वरदा

बरेच दिवसांनी 'केश्या'श्टाईल विडंबन वाचले.. मजा आली वाचून.

हेच म्हणते....

लिखाळ's picture

21 Jun 2008 - 2:57 am | लिखाळ

मस्तच.. वेगळेच विडंबन.. कसे काय सुचते बुवा !!!
--लिखाळ.

केशवसुमार's picture

23 Jun 2008 - 12:16 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार