आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुंदर गझल टाळीबाजकाल ही नव्हती अशी मग आज का?सर्व अंगाला सुटावी खाज का?मी कुठे दिसतो दिखाऊ, बायकीलोक मज म्हणतात 'टाळी'बाज का?बातम्यांमध्ये सदा आहेच मीवाटते याची तुम्हाला लाज का?सायबाचा, ईश्वराचा लागतोबायकोचा लागतो अंदाज का?दूर केल्यावर जरा कळले मला -चेहऱ्यावर मेकपी कोलाज का?नीट होते, यायची ती तोवरीनेमके अत्ताच फाटे काज का? धाड, ढमढम, टार, टमटम, सारखे... "केशवा" येतात हे आवाज का?
प्रतिक्रिया
20 Jun 2008 - 5:44 pm | प्राजु
बरेच दिवसांनी 'केश्या'श्टाईल विडंबन वाचले.. मजा आली वाचून.
सध्या कारखाना बंद आहे का विडंबनांचा?? बराच उशिर केलात राव.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jun 2008 - 5:50 pm | प्रियाली
काय डोकं चालतं बाकी! :))
बर्याच दिवसांनी विडंबन वाचले.
20 Jun 2008 - 5:52 pm | चतुरंग
मस्त विडंबन!
वेगळीच टाळी वाजलेली आवडली! ;)
चतुरंग
20 Jun 2008 - 7:23 pm | वरदा
बरेच दिवसांनी 'केश्या'श्टाईल विडंबन वाचले.. मजा आली वाचून.
हेच म्हणते....
21 Jun 2008 - 2:57 am | लिखाळ
मस्तच.. वेगळेच विडंबन.. कसे काय सुचते बुवा !!!
--लिखाळ.
23 Jun 2008 - 12:16 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार