गीत -संगीत- पाऊस पाऊस

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
7 Jun 2012 - 6:59 pm

उन्हाच्या झळा धरतीला, आसमंताला अन आपल्याला सर्वाना नकोनकोसे करून सोडतात. " ओहोट कधी घे‍ईल हा तीव्र उन्हाळा दे‍ईल कधी पाणकळा सुख जिवाला " अशी तगमग मग लागून रहाते. देवाजीने करुणा केली अशी आकाशातील बापाची मग कृपा होते व मग नभ मेघानी आक्रमिले तारांगण सर्वही व्यापुनी आले असा साक्षात्कार अस्मानातून चहूबाजूनी होउ लागतो. मग कवि लिहून जातात " भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे... ज्येष्ठ आषाढात मेघांची दाटी कडाडे चपला होतसे वृष्टी , घालाया सृष्टीला मंगल स्नान पूर अमृताचा सांडे वरून "

विरहाग्नीत होरपळणार्‍या जीवांचे मग काही विचारूच नका. बरखा रानी जरा जमके बरसो , मेरा दिलवर जा ना पाये झूमकर बरसो अशी " त्या" ची मागणी असते तर बरसो रे हाय रे बदरवा बरसो रे अशी " ति" ची पुकार असते. रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात प्रियाविण उदास वाटे रात असा भाव एखादीच्या मनात खोलवर दाटून येतो. तर एखादी ची काही व्यथा बिथा नसते ती म्हणते ओ ओ ओ सजना बरखा बहार आयी रसकी फुहार लायी अखियोंमे प्यार लायी... श्रावणातला पाउस हा तर कवि लोकांचा लाडका विषय ! पण एक कवि म्हणतो सावन आये या ना आये जिया जब झुमे सावन है , तार मिले जब दिलसे दिलके वही समय मन भावन है . पण बरेचसे श्रावणातल्या पावसाने मस्त होतात, मत्त होतात म्हणतात " बदरा.... हाये..... आया सावन झुमके नाहीतर सावनकी आयी बहार रे .आपले लाडके कवि पाडगावकर इतके भारावून जातात की काळ्या मेघातून पाउस पडण्याऐवजी त्यांच्या कवितेत येते " श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीमधारा " मदन मोहन सारख्या क्लासिकांच्या रचनेत येते " छायी बरखा बहार पडे अंगना फुहार सैंया आके गले मिल जा मिल जा " तर रोशनजी तर्ज बनवितात " छा गये बादल नील गगनपर घुल गया कजरा सांज भई " कधी रोशनजी गौड मल्हाराची मांडामांड करतात " गरजत बरसत सावन आयो रे लायो ना संगमे हमरे बिछाडे बलमवा . मग पंचमदा मी का मागे राहू असे म्हणत धुन बनवितो शायर म्हणतो " रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन भीगी आज इस मोसममे लगे दिलकी ये अगन " भप्पी दा आपल्या खास ठेक्यात " टिप टिप टिप टिप बारीश शूरू हो गयी तो माने या ना माने मेरी हो गयी असे एमजी एम च्या डान्सिंग इन रेन चे रुपांतर करतो. तर एल पी हाय हाय ये मजबूरी ...ये मौसम य दूरी.... मेरा लाखोंका सावन जाये रे अशी सुरांची बरसात करतात्. मेघा रे बोले मेघ बोले अशी मौसिकी उषा खन्ना घेऊन येतात.

मराठी गीतात , नाट्यगीतात ही पाऊस मागे नाही. सावन घन गरजे बजावे मधुर मधुर मलल्हार बजावे असे नाट्यपूर्ण रूप पावसाचे दिसते तर ओ हो सो नभ उतरू आलं.... अंग झिम्माड झालं असे महानोर लोकगीताच्या बाजात लिहून जातात. रितू पावसाचे सोळा .. झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची सर येते माझ्यात " असे नवे रूप घेऊन सरी येत रहातात.

कधी पावसाळी रात्री आपण एकटेच असतो. आपल्या जोडीला जसराजजी असतात . मेघ रागातील बरखा रितू आयी गाऊन ते आपल्याला सुरांच्या पावसात भिजवितात तोच घन गम्भीर आवाजात पुढे मिया मल्हारातील एकतालातील नखरेल बंदिश पं भीमसेनजी घेऊन येतात झुम्म अत झुम्म ..... आयी बदरिया... धीन धीन धा त्रक तू ना नाना मुळेंचा तबला व मप निध नि नि सा ची संगति व भीमाण्णां चा दिव्यस्पर्शी आवाज आपल्याला सातव्या स्वर्गापार घेऊन जातात .

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

तर्री's picture

7 Jun 2012 - 8:06 pm | तर्री

श्रावणात घन निळा बरसला ऐकताना ज्यांची आठवण होते ते खळे काका नाहीत ही हुरहूर.

पैसा's picture

7 Jun 2012 - 8:11 pm | पैसा

कलेक्शन आवडलं. त्यांच्या लिंका दिल्या असत्यात तर आणखी छान झालं असतं!

चित्रगुप्त's picture

7 Jun 2012 - 10:46 pm | चित्रगुप्त

कुमारजी:
ऐसन कैसन, बरसत बरखा...
http://www.youtube.com/watch?v=bTRXRCgb8rs

रितु बरखा आयी... घन गरजे...
http://www.youtube.com/watch?v=E38MRuJJu4Q

घन गरजे बरखा आयी...
http://www.youtube.com/watch?v=ONdBVMiug2s

रितु आयी बोले मोरा रे...

आणखीही आहेत, आत्ता आठवत नाहीत...

अशोक पतिल's picture

7 Jun 2012 - 11:07 pm | अशोक पतिल

काही खूप छान गिते,

रिमझिम के गीत सावन गाये.....

रिम झिम गिरे सावन.... ( लता ताइच्य आवाजातील सोलो गाणे , मंजिल...) हे गित अस्सल पावसात शुट केले आहे.

चौकटराजा साहेब, एकदम रिदमीक झाला आहे लेख. वा छान मस्त

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2012 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार

चौराकाका म्हणजे ज्ञानाची खाण आहे अगदी.

तद्दन फालतू लिखाण आणि पांढर्‍यावरती काळे करणारे आता हे लिखाण बघून काहितरी तरी चार बर्‍या गोष्टी शिकतील अशी अपेक्षा आहे.

तिमा's picture

8 Jun 2012 - 6:15 pm | तिमा

' सारकॅस्टिक' हा शब्द सार काड्या = स्टिक यावरुन आला काहो ?