पागोळी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
6 Jun 2012 - 10:20 am

घन; वेस ओलांडून
आला सोनियाचा सण
धुळवड आकाशात
ऊर घगर भरून
झरे रेशमाचं पोत
सारे दारूण झाकून
रोमरोम शहारून
गाई अंकुरात धून

थेंब थेंब फुटे वाळा
वारा शकून पिऊन
झिंग ओलेत्या मेघाची
सय सय उधाणून
सरे चातकाचे ऋण
मोर माना उंचावून
भिजलेल्या अंगणात
मन पागोळी होऊन

.........................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

सुरेख.
आज सकाळीच पावसात चिंब भिजून हापिसला आलोय.

मस्त ...वाचताना एक छानशी लहर उठुन गेली मनात
जणु भावनेला कुणीतरी शब्दांच कोंदन करुन ओळीत सजवतय
शब्दा शब्दावर अर्थाचा जो पागोटा आहे ,त्यान तो असा सावरलाय
की वाटल मोत्यांची माळ नाजुक गळ्याचा श्रुंगार बनन्यासाठी आसुसली आहे ..
मस्त ..मस्त ..मस्त ...

गणेशा's picture

6 Jun 2012 - 2:20 pm | गणेशा

झिंग ओलेत्या मेघाची
सय सय उधाणून
सरे चातकाचे ऋण
मोर माना उंचावून

कविता खुप आवडली...

लिहित रहा... वाचत आहे