राजमुंद्री--एक नयनरम्य ठिकाण
आपल्या भारतात अनेक पाहण्यासारखी स्थळे आहेत.त्यातील हे एक आहे.आंध्र प्रदेशात एन्.एच.५ ह्या महामार्गापासून जवळच आहे.गोदावरी नदीच्या कांठावर वसलेले अत्यंत देखणे असे हे गाव.जिल्हा-पूर्व गो दावरीं. नाशिकपासून निघालेल्या गोदावरीचे पात्र येथे इतके भव्य होते की जणू समुद्रच! नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी.संपूर्ण प्रांत हिच्या पाण्याने सुजलाम सुफलाम झाला आहे.घाठावर अनेक सुंदर देवळे,एक पांडुरंगाचेही देउळ आहे.तिथेच कोटी शिवलिंगावर रोज संध्याकाळी कारंज्यातून अभिशेक केला जातो.ते द्रुश्य बघण्यासारखे असते.गोदावरीवर वरुन रोड व खालून रेल्वे पूल बांधला आहे. हा आशियातील दुसरा सर्वात लांबीचा पूल आहे्. हे गाव निसर्गाने देखणे केले आहे.जिकडे-तिकडे हिरवेगार! नारळाची झाडेच झाडे!सगळीकडे भाताची रोपे सळसळणारी.येथील केळीहि फारच रुचकर.गावातील रस्ते पक्क्या बांधणीचे.रस्त्यांची दुर्दशा नाही.गावात अनेक जागी देवळे.लोक देवभक्त व पापभीरू ,आतिथ्यशील. आनंद रिजन्सी आणि रिव्हर बे ही दोन होटेल्स पंचतारांकित.येथून नदीत सफर करता येते.सुती कापडाची मोठी बाजारपेठ .अनेक मारवाडींची वस्ती.थोडक्यात हे तेलगू कोंकण आहें. निसर्गाने ह्या गावावर आपला वरदहस्त ठेवला आहें .
प्रतिक्रिया
20 Jun 2008 - 1:46 pm | अमेयहसमनीस
सुरेख लेख आहे. आवडला. एकदा जावून आले पहीजे.
20 Jun 2008 - 2:54 pm | शेखर
वैशाली,
खुप चांगली माहिती दिली आहे. पण लिहीताना हात आखडता घेतला असे वाटते.
शेखर.
अवांतरः वहिदा रेहमान व जयाप्रदा ह्या राजमुंद्रीच्या..
20 Jun 2008 - 3:04 pm | सहज
खुपच त्रोटक माहीती आहे पण एका वेगळ्या स्थळाची माहीती मिळाली त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
ही जागा, कसे जायचे [महाराष्ट्रातुन इ.] , किती दिवस मुक्काम का फक्त विकएन्ड सहल, फोटो, व तिथे उपलब्ध असलेल्या लोकल टुर्स, जमल्यास खर्चाचा अंदाज आदी माहीती दिल्यास मिपाकरांना सहलीला एक रेडिमेड पर्याय उपलब्ध असेल.
तुम्ही हाच लेख अजुन विस्तारपुर्वक लिहा व सरपंच किंवा विसोबा खेचर यांना पाठवा. ते नक्की बदल करतील.
20 Jun 2008 - 3:22 pm | मनस्वी
सहमत
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
20 Jun 2008 - 6:17 pm | प्राजु
आणखी सविस्तर माहीती आणि फोटो दिले असतेत तर आवडले असते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jun 2008 - 8:38 pm | अन्या दातार
राजमुंद्री हे गाव मी आतून कधी पाहिले नाही, पण प्रवासात हे शहर अनेकदा पास झाले आहे.(रेल्वे या पुलावरुन जात असे.) खाली प्रचंड पाणी असताना आणि आजिबात पाणी नसताना गोदावरीच्या मोठ्या पात्राचा आवाका लक्षात येतो.
असो.
रेल्वे प्रवासः
राजमुंद्रीला रेल्वे पुणे, मुंबईतून सोयीची पडते. कोणार्क एक्सप्रेस ही त्याकरता उत्तम.जर वेळ वगैरे बदलली नसेल तर सकाळी ब्रेकफास्टला आपण तिथे पोहोचतो.
औरंगाबाद वगैरे शहरातूनही विशाखापट्टणमकडे जाणारी कुठलीशी एक्सप्रेस आहे, तीही राजमुंद्रीला थांबते.
रेल्वेच्या प्रवासात तुम्हाला रसाळ ताडफळे चाखायला मिळतील. त्या चवीला तोड नाही.
बस प्रवासः
सोलापूर हे बस प्रवासासाठी अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. सोलापूरहून विजयवाडाला जाणारी बस पकडून विजयवाडा गाठावे. विजयवाडा हे बहुदा सर्वात मोठे बस स्टँड आहे. तिथून राजमुंद्रीला बर्याच बसेस आहेत.
अवांतरः विजयवाडा सारखी स्वच्छता जर महाराष्ट्रातील बसस्टँडवर ठेवली तर रा.प. म्.ला नक्कीच आणखी फायदा होईल.
21 Jun 2008 - 10:11 am | वैशाली हसमनीस
लिहीताना हात खरोखरच आखडल्यामुळे लेख लहान झाला आहे.भाग२ लिहीण्याचा प्रयत्न करीन.धन्यवाद.