गेल्या भागात http://www.misalpav.com/node/21763 आपण प्रदक्षिणा मार्गापर्यंत आलो होतो.
अता इथुन पुढे प्रदक्षिणा मार्गावरचे निरनिराळे फोटो आणी काही व्हिडिओ पाहु.
हरिहरेश्वर क्षेत्रातील या दोन्ही मंदिरांइतकच महत्व या तीर्थ प्रदक्षिणेला आहे.
पायर्यांनी चढायला सुरवात केली की अगदी कित्तिही दमल्या सारखं वाटत असलं तरी सारखं उजव्या बाजुनी झाडापेडांमधुन हरिहरेश्वरच्या दूरवर पसरलेल्या समुद्र किनार्याचं दर्शन सदोदित होत असतं.बहुसंख्य पर्यटकांचा वेळ प्रदक्षिणा मार्गावर जास्त का जातो(फोटो काढण्यात) त्याचं कारण हे सतत घडणारं समुद्र किनार्याचं दर्शन.
डोंगरामधुन तिर्थाकडे जाणारी ही वाट तशी चटकन संपणारी आहे. आणी पायर्या संपुन आपल्याला समोर एक मोडका बाक दिसु लागला
की समजावं...अता त्या बाकासमोरुन निसर्गाचं एक असं भव्य दर्शन आपल्याला घडणार आहे,की आपला यापूर्वीचा सगळा म्हणजे एकंदरित सगळाच थकवा निघुन जावा.
या खाली गायत्री तीर्थाकडे जाणार्या पायर्या/बाजुचे महाकाय डोंगर /आणी समोर अथांग सागर....
मी लहानपणा पासुन या पायर्यांकडुन दिसणारं हे दृष्य अनंतवेळा पाहिलं आहे. आणी यापुढे कित्तिही वेळा पाहिलं तरी दरवेळी वेगळी समाधी लागणार हे निश्चित. विषेशतः समोरच्या सागराचा अथांगपणा मनावर असा काही विशेष परिणाम करुन जातो,की मला खालच्या ओळींच प्रयोजन अश्या ठिकाणीही तंतोतंत लागू वाटायला लागतं...
''अनादी मी..अनंत मी..अवध्य मी भला।मारिल रिपु जगती असा कवण जन्मला॥''
कोजागिरि पौर्णिमेच्या इथल्या निसर्ग आणी समुद्राच्या वेगवेगळ्या भावावस्था टिपायला कॅमेराही कमी वाटायला लागतो, कोजागिरिला रात्री इकडे असणं,म्हणजे माझ्या दृष्टिने तर बेहोषिच.
पायर्यांवरुन खाली उतरता उतरता आपण मागे /वर असणार्या या महाकाय डोंगरांकडे नजर टाकली तर सॉल्लिड थरार वाटतो.
हे कडेचे डोंगर पहाताना आव्हानात्मक वाटतात ते आपल्याला...पण मी अनेकदा या खालच्या फोटोतल्या डोंगर कडेनी अगदी अशक्य वाटणार्या ठिकाणी शेळ्यांना निवांतपणे हिरवा पाला खाताना पाहिलं आहे.
खाली आल्यावर एक वेगळाच चमत्कार दिसला,मी पुर्वी कधिह्ही न पाहिलेली ही एक जुनी मूर्ती इकडे कुणितरी आणुन टाकलेली दिसली...
तीर्थाजवळ गेलो आणी नेहमीप्रमाणे पहिलं स्वागत या खेकड्सेनेनी केलं.
आणी हिच ती ''तीर्थ'' असं म्हटली जाणारी जागा...
नेमका अगदी भरती सुरु होत असतांना गेलेलो असल्यानी हा फोटो घेता आला, नायतर ज्या दगडावर उभं ठाकुन हा फोटो काढला,त्याच्या डोक्यावरुन धडकुन,,,लाटा पहिल्या पायरि पर्यंत येत असतात...येवढा समुद्र भरतीच्या वेळेस इथे खवळलेला असतो.
अता भरती लागायला सुरवात होत असताना,पाणी इथे कसं जोरदार घुसतय ते पहा म्हणजे,पूर्ण भरती लागल्यावरचा अंदाज येइल.. :-)
अता हे दृष्य थोडं डाव्या अंगानी...
हाय कि नै भारि येकदम...! पण हो..! एक सावधानतेचा इशाराही देऊन ठेवायला हवा...वर पाहिलेल्या चित्रणातील त्या चौकोनी खड्ड्यालाच (गायत्री का सावित्री..मलाही नीट ठाऊक नाही..क्षमस्व!) तीर्थ म्हणतात. हे संगण्याचं कारण असं की या खड्यात(तीर्थात) स्नान केल्यानी ''पातक नाहिशी होतात'' वगैरे स्वरुपाच्या अनेक श्रद्धा आहेत, पण या पायीच दरवर्षी किमान पाच दहा जणं तरी जीव गमावतात...कारण तीथे आधी अलिकडे बसुन,''काहि होत नाही,जाऊ या थोडं पुढे,,,एकदा लाट डोक्यावरुन गेली कि झा...लं'' असं वाटवुन घेत,लोक बसल्या/बसल्या दगडांना धरत/धरत पुढे सरकतात...पण खड्याच्या मध्यावरच पुढे चांगला तिन पुरुष खोल डोह आहे, त्यात न कळत कसे आणी केंव्हा जाऊन पडतात ते त्यांचं त्यांना कळत नाही,नंतर काय होतं याचं वर्णन इथे करू नये...पण तरिही करतो...त्या डोहात पडल्यावर एकदम खाली जोरात अपटल्यावर हाडं मोडल्या सारखी अवस्था होते, शरिर तर लाटांच्या जोरदार मार्यामधे,कडेच्या कालवं लागलेल्या दगडांवर घासुन असं काही खलास होतं,,,की किसणीवर कैरी किसलेल्या नंतर जी बाठ उरते तशी हाडं बाहेर येतात...कारण लाटांचा फोर्सच तेवढा खतरनाक असतो...(मी लहानपणी तीर्थावर याच कारणानी जीव गेलेले त्या अवस्थेतले मृतदेह पाहिलेले आहेत :-( ...) या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणेच पूर्वसुचना देवळापसुन अन्यत्र लावलेल्या आहेत. इतरही (स्थानिक) सांगत असतात... पण आपल्याला जमेल.. या नादात काहि श्रद्धाळू व काहि थ्रिलर जातात,,, आणी यातल्या काहिंना पुढे पुढे जाण्याच्या ओढिमुळे, तसला अनुभव घ्यावा लागतो...(आजही हे प्रमाण १० टक्के आहे..)
असो... हे थोडसं अत्यावश्यक विषयांतर झालं,,पण संपूर्ण प्रदक्षिणा मारताना ही एक जागा सोडली तर अन्य भिण्या सारखं कहिच नाहिये... अता हा एक डोंगारातला गोड पाणी येणारा नैसर्गिक चमत्कार...
अर्थातच हे क्षेत्र असल्यामुळे यालाही गायत्री तीर्थ असं नाव आहेच.
तिथुन बाहेर येतांना,हे दोन पथ्थर ;-) असे आमने सामने (आलेले) दिसतात.लहानपणी मी यांना वाघ/सिंव्हाचं आमने /सामने आलेलं तोंड म्हणायचो.यावेळी मनात माझं आणी वल्लीचं नाव आलं ;-)
पुढे एका खडकावर हे समाधी घेतलेले खेकडोजी घावले...
मग त्यांना आंम्ही जरा ''पोज'' मधे उभे लावले... ;-)
मी तिसर्या फोटुत त्याची एक न्याचरल स्मायली करायला गेलो...तर नेमका तो ''मेला'' तुटलाच! ;-)
प्रदक्षिणा मार्गावर काहि ठिकाणी चालताना मात्र जपुन चालावं लागतं,खाली असणारं हे असं शेवाळं बचकन पाय सरकवू शकतं
आपण तिथल्या समुद्राच्या लाटांमुळे झालेले दगडांचे विविध आकार पहायला पटापट पुढे सरकतो..पण हे शेवाळं बुदुक्कन पाण्यातही पाडू शकतं
याच ठिकाणी पुढे तयार झालेला हा प्राणी पहा... धार्मिकांसाठी गाय/कामधेनू... आमच्यासाठी मोठ्ठं कासवं/पाण्यातला बसलेला डायनॉसॉर किंवा ऊंटही ;-)
अता हा दोन कातळाच्या मधे अखंड भरलेला खडकाचा एक प्रकार ...दुधाची धार टाकल्या सारखा..!
या व्यतिरिक्त संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर लाटांच्या प्रतापामुळे डोंगराला ही अशी भलीमोठ्ठी भगदाडं/ जाळीदार खड्डे पडलेले दिसतात...
आणी हे खडकांचे गमतिशिर दिसणारे अवशेष...
अता हा इकडुन पाहिला तर बेडुक...
आणी तिकडुन पाहिला तर नागाचा फणा ...
दक्षिण काशी असं महत्व असल्यामुळे तीर्थश्राद्धांचे कार्यक्रम /दशक्रीया/पुत्तल दहन असेही कार्यक्रम प्रदक्षिणेच्या शेवटच्या टप्यात ग्रामपुरोहितांहस्ते घडताना दिसतात...
आणी हा सर्वत्र कायम हजर असणारा... आपला--- प...रा...चा कावळा ;-)
जाता जाता पुन्हा प्रदक्षिणामर्गावर घेतलेले दर्याच्या लाटांच्या अखंड खेळाचे दोन शो पाहू...
तर असं आहे हे क्षेत्र... हरि-हरेश्वर आणी त्याचा प्रदक्षिणा मार्ग परिसर... :-)
प्रतिक्रिया
1 Jun 2012 - 7:26 pm | मी-सौरभ
गुर्जी,
मस्त मस्त मस्त!!
1 Jun 2012 - 8:10 pm | यकु
अप्रतिम फोटो आणि वर्णन.
प्रत्यक्ष तिथे फिरुन आल्यासारखं.
1 Jun 2012 - 8:28 pm | स्मिता.
सुंदर फोटो. समुद्राचा व्हिडो पण आवडला.
1 Jun 2012 - 8:34 pm | गणपा
स्पावड्याच्या शिकवणीचा बराच वापर केलात की काय भटोबा?
1 Jun 2012 - 9:29 pm | अत्रुप्त आत्मा
छे हो आमचं कुठचं तेवढं भाग्य...? शिकता येण्याचं...!
जसे काढले तसेच लावलेत फोटो आणी व्हिडिओ. :-)
1 Jun 2012 - 10:26 pm | योगप्रभू
वा गुरुजी,
फोटोंनी आनंद दिला. धन्यवाद.
1 Jun 2012 - 11:15 pm | पैसा
आणि वर्णन सुद्धा! आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा भरती नव्हती तरी समुद्रात जायचं धाडस झालं नव्हतं! :(
2 Jun 2012 - 9:44 am | प्रचेतस
छान फोटो आणि माहिती बुवा,
हरीहरेश्वराचा प्रदक्षिणा मार्ग म्हणजे निसर्गाचा अद्वितीय चमत्कारच आहे. लाटा खडकांवर आपटून आपटून अतिशय विलोभनीय आकार तयार झालेले आहेत.
रौद्र सौंदर्य म्हणजे काय ते तिथे गेल्यावरच समजतं.
2 Jun 2012 - 11:08 am | जागु
वा. सुंदर फोटो.
तो प्राणी उंटासारखाच दिसतोय.
2 Jun 2012 - 2:06 pm | गोंधळी
हरीहरेश्वरला दोनदा भेट देन्यात आली आहे पण वेगल्या कारणासाठी
2 Jun 2012 - 6:56 pm | कान्होबा
निव्वळ अप्रतिम वादच नाही.
3 Jun 2012 - 10:26 am | अर्धवटराव
अजब मुर्खपणा आहे... जर ती जागा एचढी जीवघेणी आहे तर ते तीर्थ वगैरे काहि नसल्याचं डिक्लेअर करुन टाकावं ना कोणी जाणारच नाहि तिथे... धोक्याचे इशारे जागोजागी लाऊन ठेवावे... जमल्यास तो तीन पुरुष खोल खड्डा दगडांनी बुझवावा... कसली वाट बघतय मंदीर प्रशासन?
अर्धवटराव
5 Jun 2012 - 8:42 pm | अत्रुप्त आत्मा
@जमल्यास तो तीन पुरुष खोल खड्डा >>> बरं बरं साहेब... आपली सुचना मंदिर समितिकडे पाठवतो. :-)
5 Jun 2012 - 9:15 pm | अर्धवटराव
आणि खड्डा बुझल्यावर सांगा म्हणावं... एखादं तीर्थाटनाचं पुण्य पदरी पादुन घ्यावं म्हणतो :D
अर्धवटराव
5 Jun 2012 - 9:20 pm | अत्रुप्त आत्मा
@खड्डा बुझल्यावर सांगा म्हणावं..>>> तुम्ही असेच तिथे जा... तुंम्हाला बघुनच खड्डा- बुजेल...! :-p
5 Jun 2012 - 9:38 pm | अर्धवटराव
म्हणुन म्हणतो... उगाच तीर्थक्षेत्रांच्या बाबतीत शहाणपणा करु नये.. नाहि तर अशे बुच लागतात
अर्धवटराव
5 Jun 2012 - 9:26 pm | सूड
तुम्हाला पाडून घेतो म्हणायचंय का ?
5 Jun 2012 - 9:36 pm | अर्धवटराव
तरी बरं, कि प्रतिक्रियेला प्रिव्ह्यु ची सोय आहे...
अर्धवटराव
5 Jun 2012 - 10:10 pm | मृगनयनी
जबराट!!!... लय भारी!!!!... मस्त!!!.. :)
अ.आ.. जी... तो 'बॉम्बे'मधला तू ही रे' गाण्याच्या वेळेस 'अरविन्दनस्वामी' बसलेला खडक कुठला आहे?.. मागच्या वेळी एका गाईडाने आम्हाला तो दाखविला होता..... आणि त्याची "मनि" त्याला ज्या मार्गाने भेटायला आली.. तो हा प्रदक्षिणेचाच मार्ग आहे का? :)