श्री क्षेत्र हरिहरेश्वर-दक्षिण काशी-१

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in भटकंती
26 May 2012 - 1:17 pm

हरिहरेश्वर हे माझं अजोळ.आणी त्याच्या अठवणी मी मागच्या दोन भागात इथे लिहिल्या आहेत. :-)

http://www.misalpav.com/node/21739 भाग-१

http://www.misalpav.com/node/21740 भाग-२

आता हे हरिहरेश्वर आणी काळभैरव यांचं सचित्र दर्शन.लहानपणी सुट्टीचा मे महिना,मी हरेश्वरला निव्वळ धुमाकुळ करण्यात घालवायचो,मग बरेचदा त्यात आज्जीपण मावशिला/आइला म्हणायची,देवळाशी जाऊन आलात का..? अता आंम्ही बंद्रावरुन हिंडता हिंडता/वहात वहात किती वेळा देवळाला जाऊन लागलो,याला गणति नसायची.पण तेच आइ/मावशी यांच्या बरोबर जायचं म्हटलं,की वेगळीच मजा असायची. तिकडे काहितरी खादाडी करायला मिळेल हे मुख्य आकर्षण!आणी काळभैरवाच्या देवळात कळे लाऊन कुणाचं भूत बीत उतरवत असतील,तर ते पहाण्याचं रम्य ;-) गूढ आकर्षण...! अता मी हरेश्वरला गेलो तर बर्‍याचदा देवळाकडे फिरकत सुद्धा नाही...! ती आस किंवा ओढ राहिली नसावी कदाचित.पण तरिही मला या दोन्ही देवळां विषयी मनामधे ममत्व मात्र नक्की आहे. कारण तिथे होणारे उत्सव यात्रा आणी देऊळभागाचं होणारं ''नाटक''-प्रतिवार्षिक..! हेही सगळं जुन्या अठवणींमध्ये रजिस्टर झालेलं आहेच.आता तर हरिहरेश्वर हे केवळ धार्मिक क्षेत्र न रहाता एक पर्यटन केंद्र झालेलं आहे. तेंव्हा बघुया एक सचित्र झलक,आधी मंदिर परिसराची आणी नंतर प्रदक्षिणातीर्थ मार्गाची :-)

प्रवेशद्वार...

ही दोन्ही देवळांच्या प्रांगणात प्रवेश होण्यापूर्वी लावलेली तोफ...म्हण्जे पूर्वी धर्मशाळेच्या आजुबाजुला कुठेशी पडुन होती..अता इथे नीट स्थानापन्न केलीये.

दीपमाळ..

ही क्षेत्राची संक्षिप्त माहिती..

दोन्ही देवळं आणी सभामंडप...

हे कालभैरवाचे द्वार-लाकुड/नक्षीकाम आत बाहेर तसच रेखिव आहे...




या आतल्या घंटा.. यातल्या लाकडाचा लोलक असलेल्या घंटेचा आवाज लय भारी येतो,अजुनही मी आत गेलो,तर आमची पहिली घंटा हीच असते... :-)

आता ह्यो खांब...लहानपणी आईबरोबर जायचो,तेंव्हा बरेचदा कुणितरी या खांबाला अंगात येऊन चिटकलेलं बघायचो.आई म्हणायची ''बाधा'' उतरवतायत. मी पण भयंकर मस्ती करतो,म्हणुन मलाही चिकटवलं पाहिजे-असं तिचं मत होतं. मी तिच्या नकळत बरेचदा खांबाला चिकटून पाहिलंही..पण मला एकदाही खांबानी धरलं नाही ;-) तो आत् -म्यास काय धरणार? ;-)

या काळभैरवाच्या मूर्ती..


त्यांना कळेबिळे लाऊन वर चंदनाची पुजा झाली कि त्या अश्या दिसतात...

अता हे हरेश्वराच द्वार-

आत गेल्यावर डावि/उजविकडे गरुड/नंदि/गणपति यांचं दर्शन होतं



पुढे हे कासव आणी आजुबाजुला जयविजय आहेत...

अता कासव आणी जय विजय कशाला..? शंकराच्या देवळात..!

तर खाली येथे मूळ स्थानी शंकर पार्वती बरोबरच ब्रम्हा/विष्णू पण आहेत... आणी वैशिष्ठ्य म्हणजे हे सगळेच लिंगरुपानी प्रतिष्ठित आहेत.

हा मंदिराचा कळस(आतला) आतिल बाजुनी...

आणी हा तोच(आतला) बाहेरिल बाजुनी....

अता हे दगडी खांब...



आणी ही भलिमोठ्ठी दगडी सहाण...

अता हे सगळे फोटो घेऊन मी बाहेर आलो..आणी तरी काहितरी राहिल्यासारखं वाटत होतं..ते म्हणजे मंदिराच्या मागुन प्रदक्षिणा मार्गाकडे(तीर्थाकडे) जाताना ही जुनी धर्मशाळा लागते... तीच राहिली होती

तर हा आहे सगळा मंदिर परिसर...

एवढे सगळे फोटो काढून झाल्यावर, जरा थकवा घालवायला चहा घेतला आणी तडक निघालो.. तो प्रदक्षिणा मार्गाकडे...

क्रमशः....

चला प्रदक्षिणा मार्गावर... http://www.misalpav.com/node/21823

प्रतिक्रिया

इष्टुर फाकडा's picture

26 May 2012 - 2:52 pm | इष्टुर फाकडा

शाळेच्या सहलीमधल्या आठवणी ताज्या झाल्या :)
पुभाप्र !

अजातशत्रु's picture

26 May 2012 - 3:13 pm | अजातशत्रु

फोटो क्र. चार या फोटोतील संक्षिप्त माहिती दिलेल्या शिलालेखात शेवटच्या ओळी का पुसल्या आहेत?
सदर मजकुर काय आहे कळेल का?

अत्रुप्त आत्मा's picture

26 May 2012 - 7:19 pm | अत्रुप्त आत्मा

@सदर मजकुर काय आहे कळेल का? >>> काळभैरव>हरिहरेश्वर>काळभैरव अशी पूर्वी दर्शन घेण्याची प्रथा होती.. नंतर फक्त उपरोक्त लिखिताप्रमाणे ती राहिली,म्हणुन बदल करण्यासाठी केलेली ती खाडाखोड आहे... या बदलामागचे,तसेच पूर्वी चालू असलेल्या प्रथे मागचे कारण मला ठाऊक नाही.

हे गांभिर्याने घ्यायचं. मजा नाही.

काळभैरव>हरिहरेश्वर>काळभैरव अशी पूर्वी दर्शन घेण्याची प्रथा होती

तृप्त होशील.

कवितानागेश's picture

26 May 2012 - 4:10 pm | कवितानागेश

अता कासव आणी जय विजय कशाला..? शंकराच्या देवळात..!>
हरी आणि हर दोघे आहेत ना आतमध्ये?

प्रचेतस's picture

26 May 2012 - 5:37 pm | प्रचेतस

वा बुवा वा.

एकदम मस्त वृत्तांत आणि फोटो.

हरिहरेश्वर मंदिरातले फोटो काढायला खास परवानगी घेतली होती काय?

मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे. मला तेथे फोटू काढू दिले नव्हते. :(

माऊशी सहमत.
हरी आणि हराचं देऊळ असल्याने जय विजय आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

26 May 2012 - 6:46 pm | अत्रुप्त आत्मा

वल्ली>>>मला परवानगी होती.@हरी आणि हर दोघे आहेत ना आतमध्ये? >>> माऊ- शंकर पार्वती बरोबर ब्रम्हा विष्णू असल्याचं,त्याच फोटोखाली मी(ही)नमूद केलय हो!

सुहास झेले's picture

26 May 2012 - 6:16 pm | सुहास झेले

व्वा छान... घरबसल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वराचे दर्शन झाले :) :)

योगप्रभू's picture

26 May 2012 - 9:01 pm | योगप्रभू

हरिहरेश्वरचा कालभैरव हे जागृत देवस्थान आहे. कोकणात असेच दुसरे कालभैरवाचे जागृत स्थान रत्नागिरीजवळ खारेपाटण येथे आहे. हरेश्वर हे समस्त पेशव्यांचे (भट घराणे) श्रद्धास्थान. पेशवे स्वतःला मामले दंडाराजपुरीचे पाटील असे म्हणवून घेत असत. वाड्यांसाठी जागा खरेदी करताना कागदोपत्री पेशव्यांचा हुद्दा वरीलप्रमाणे नोंदवला जाई. पाटील या नात्याने दंडाराजपुरी मामलतीतील देवस्थानांकडे पेशव्यांचे बारीक लक्ष असे.

हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा रमणीय आहे, पण धोकादायक व बेभरवशाचाही आहे. देवळामागच्या टेकडीला प्रदक्षिणा घालताना जो समुद्र दिसतो तो केवळ अप्रतिम. एखादा फोटो हवा होता.

मृगनयनी's picture

26 May 2012 - 9:13 pm | मृगनयनी

थॅन्क्स अ.आ. ... शाळेत असताना २ दा, आणि नतर २ वर्षांपूर्वी एकदा असे तीनदा हरीहरेश्वरला जाणे झाले. पूर्वीपेक्षा खूप डेवलप झालंय हरिहरेश्वर .. आणि गर्दीपण वाढलीये...

फोटो मस्त आलेत!... खूप आठवणी जाग्या झाल्या!!! :) :)

दोन्ही मन्दिरांमध्ये खूपच प्रसन्न वाटते... या मन्दिरांच्या अलिकडे आय थिन्क एक जुने बहुधा देवीचे (किन्वा गणपतीचे) उपमन्दिर आहे...काळ्या पाषाणात तिची / त्याची मूर्ती आहे...आणि केशरी कलरचे लेपन केलेले आहे... आसपास रूईची झाडे आहेत..

पण एक गोष्ट मात्र तिन्ही वेळेस घडली, की कालभैरवाच्या मन्दिरात जाताना खूप डोळे भरून यायचे.. आणि खूप भक्तिभाव वगैरे अचानक वाटायला लागायचे.... कश्याची तरी प्रचंड ओढ लागल्यासारखे वाटायचे..... बास्स... बाहेर समुद्रावर वगैरे.. नेहमीसारखं फिलिन्ग!!.. इट्स अमेझिन्ग!!!..

समुद्राचे, खडकांचे फोटो तर तुम्ही द्यालच!.. ते पाहण्यासाठी प्रचन्ड उत्सुक्क्क!!!!! :) :)

पार्टनर's picture

27 May 2012 - 3:10 pm | पार्टनर

दक्षिण काशी नक्की कोणती ?

मी 'दक्षिण काशी' हेच नाव कर्नाटक आणि आंध्र मधील दोन वेगवेगळ्या ठिकाणांबद्दलही ऐकले आहे.

तुम्हाला काही माहिती असल्यास जरूर कळवा.

-पार्टनर

llपुण्याचे पेशवेll's picture

28 May 2012 - 9:40 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत . दक्षिण काशी हे नाव मी नाशिकचे दुसरे नाव, पैठणचे दुसरे नाव म्हणूनही ऐकले आहे.

हारुन शेख's picture

28 May 2012 - 9:34 pm | हारुन शेख

दक्षिण काशी हे नाशिकच ! लहानपणापासून ऐकत आलोय ! भाषणांमध्ये, लेखांमध्ये, शाळेत मास्तरांकडून आणि गंगाघाटावर तर तसे श्लोक वाचल्याचं पण आठवतं ! एका भटजींकडून अशी चूक अब्रम्हण्यं !

बाकी "तीर्थं परं किं ? -- स्वमनो विशुद्धं " वर आमचा जास्त विश्वास आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रचेतस's picture

29 May 2012 - 8:41 am | प्रचेतस

नाशिकला दक्षिण काशी म्हणत नाहीत.

हरिहरेश्वर आणि वाई या दोन स्थळांना दक्षिण काशी असे बरेच वेळा म्हटले जाते ते तिथे असणार्‍या प्राचीन शिवमंदिरांवरून. हरिहरेश्वरला पिंडदान केल्यास मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात तर वाईला काशी विश्वेश्वराचे मंदिरच आहे.

नाशिक हे ओळखले जाते ते राममंदिरामुळे. त्यामुळे दक्षिण काशी असे नाशिकला संबोधणे चुकीचे आहे.

कपिलमुनी's picture

29 May 2012 - 3:29 pm | कपिलमुनी

कालाहस्ती मंदीर , गोकर्ण महबळेश्वर , वाई , हरिहरेश्वर, नाशिक , पैठण या सर्व ठिकांणांना दक्षिण काशी असे म्हणत असतात ..

पण याला लोकांनी म्हणले आहे कि पुराणांमध्ये काही आधार आहे ??

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jun 2012 - 9:16 am | अत्रुप्त आत्मा

हरिहरेश्वर दक्षिण काशी कसे..? वल्लींनी योग्य उत्तर दिले आहे...

ज्यांना धार्मिक संदर्भ हवे असतील.त्यांनी स्कंद पुराण वाचावे.

@हारुन शेख-'' एका भटजींकडून अशी चूक अब्रम्हण्यं !'' >>> मी भटजी आहे...इतिहास अभ्यासक नव्हे हो महाशय..!(आणी एकतर मी भटजी म्हणुन हे लेखन केलेलच नाही... असो..!) देवळारावळांचे इतिहास माहित असायची जबाबदारी फारतर ''तिथल्या काम करणार्‍या'' स्थानिक पुरोहितांवर हवी तर टाकावी,किंवा अपेक्षा करावी...

भरत कुलकर्णी's picture

27 May 2012 - 10:20 pm | भरत कुलकर्णी

सुंदर

पैसा's picture

28 May 2012 - 9:15 pm | पैसा

छान फोटो! बाकीच्या सफरीचा वृत्तांत कधी?

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2012 - 9:58 am | प्रभाकर पेठकर

हरिहरेश्वराचे सचित्र वर्णन त्या तिर्थक्षेत्राची ओढ वाढविणारे आहे.

पण लेखन कार्यात हात आखडता घेतल्याचे जाणवते आहे. लेख लवकर प्रदर्शित करण्याची घाई की लिखाणाचा आळस?

पिंडदानापूर्वी हरिहरेश्वरला एक भेट नक्की दिली पाहिजे.