बुवांचा जन्म

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
1 Jun 2012 - 1:27 am

एका वाचनमात्र मिपासदस्याकडून इमेलवर मिळालेली कथा. त्यांच्या परवानगीने प्रसिद्ध करत आहे.
प्रेरणा/मूळ कथा: भुताचा जन्म. लेखक - द. मा. मिरासदार

-------------------------

गेले चार दिवस भिंतीला तुंबड्या लावत होतो. काय करणार? मी सतत मिपावर पडीक. कामाच्या नावाने बोंब. **वर एक सणसणीत लाथ मारून साहेबांनी हाकलला मला. तेवढीच एक बसली असती तर ठीक पण साहेब भारदस्त त्यांची लाथ
त्यांच्याहून भारदस्त. मी जो कोलमडलो तो थेट डोक्यावर जाऊन पडलो. तेव्हापासूनच थोडासा बदलत चाललो होतो हे लक्षात येत होते. त्यातच देशमुख्याचा फोन आला. देशमुख्या म्हणजे बापमाणूस. नै नै तसा बाप नाही. एकदम थंड डोक्याचा माणूस; आमच्यासारखा डोक्यावर पडलेला नाही. मी त्याला आधीपासूनच मानत होतो.

"उद्या रात्री चांदनीबारवर भेटायला ये." देशमुख्याने सांगितलं तशी मला वाटलं माझी मस्करी करतात की काय? देशमुख्या आणि बार? आम्ही त्यातले नाही...मला वाटलं की देशमुख्या माझी गंमत करतोय पण तो सिरिअस होता. मी येतो म्हणून फोन ठेवला.

बारवर जायचंय या विचारात मला रात्रभर झोप लागली नाही. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मी बारवर जायची पूर्ण तयारी केली. टाइट्ट् जीन्स, लेदर जर्किन, पॉलिश्ड शूज, परफ्यूम लावून मी निघालो आणि चांदनीबार बाहेर देशमुख्याची वाट बघत उभा राहिलो. १५-२० मिनिटांनी देशमुख्या समोर येऊन उभा राहिला तसा मी मनात चरकलो. देशमुख्याचा रंग रापला होता, मिशा वाढल्या होत्या. त्यांना तेल लावून त्याने त्या कुर्रेबाज वळवल्या होत्या. अंगही भरल्यासारखं वाटत होतं. मी त्याच्यासमोर अगदीच किरकोळ भासत होतो.

आम्ही दोघे आत गेलो. पायर्‍या चढताना माझा तोल गेला आणि मी पुन्हा एकदा डोक्यावर आपटलो. डोळ्यासमोर काजवे चमकत होते. देशमुख्याने मला सावरले आणि बुवांच्या अवतारातील देशमुख्याने मला खरे दर्शन दिले. विजेचा लोळ माझ्या
सर्वांगातून वाहत गेला. देशमुख्याच्या रुपात बुवा समोर उभे होते. बुवा कोण? बुवा माझ्या मोबाइलमध्ये बंद आहेत. हे आता माझ्याकडून लिहून घेत आहेत तेच बुवा! मला ज्यांनी बारवर बोलावलं तेच बुवा. आयुष्याची खरी ओळख करून दिली, स्वत्वाची ओळख दिली तेच बुवा! आता माझ्या लक्षात येत होतं... बारवर बोलावून बुवा माझी परीक्षा घेत होते. पण ते तेव्हा मला कळलं नाही. ते कळलं पुढे गुरु पोपटेंद्रनाथ यांच्यामुळे. त्याबद्दल पुढे येईलच...
सध्या माझे डोळे हे लिहिताना भरून आले आहेत. मी अश्रू ढाळतो आहे, नाक वाहतं आहे. थांबा हं!! जरा पुसून घेतो.

आम्ही बारमध्ये घुसलो. देशमुख्याची खूप वट दिसत होती. त्याने दरडावून विचारलं तशी बार बाउन्सर बाजूला सरले. मी लाजत लाजत त्यांना थँक्यू म्हटलं. "घ्यायची का थोडी?" देशमुख्याने विचारलं तशी मी मान डोलावली. देशमुख्याने जाऊन दोन ग्लास लिंबूपाणी आणले. सोबत वेज बर्गरही होता. बुवा माझी परीक्षा घेत होते पण ते मला अडाण्याला तेव्हा जाणवले नाही. मी गुपचूप ग्लास खाली केला. आता मला लागली होती. बुवांनीच मला टॉयलेटचा रस्ता दाखवला. "जपून जा, मी तुझ्या पाठीशी आहे." असा गुरुमंत्र दिला.

मी उरकून बाहेर आलो तशी बारमधली लाइट गेली होती. अंधारात दोन बाया मराठीत बोलत होत्या. मला घरातच असल्यासारखे वाटले. देशमुखबुवांनी मला गाठले. आपल्याला गप्पा मारायला ही जागा उत्तम आहे असे म्हणून बारमधल्या दोन स्टुलांवर आम्ही बसकण मारली. बुवांनी खिशातून बाटली काढली. तिला साफसूफ केली. दोन थेंब बोटावर घेऊन डोळ्यांवर लावले. नस्ती शंका नको. एरंडेल तेलाची बाटली होती. मगासचा बर्गरही तिथेच होता. मी गुपचूप राहून बघत
होतो. तेवढ्यात एक नखरेल ललना समोर उभी राहिली. "इथे बसू नका, तुमच्यासाठी पेश्शल सिटींग अरेंजमेन्ट आहे" असे म्हणत बळेच आम्हाला बारच्या आतल्या अंगाला घेऊन गेली.

तिथे आधीच दोनजण बसले होते. त्यापैकी एकाने काही ऑर्डर द्यायची का असे विचारले तेव्हा देशमुखबुवांनी सोबत आणलेला बर्गर दाखवला आणि एखादा तुकडा त्यांना हवा नको असे विचारले. मला बर्गरचा एक ढलपा तोडून खायला घातला आणि आम्ही गप्पा मारत बसलो. मध्यरात्र उलटून गेली होती. पोपटेंद्रनाथांचा विषय कसा निघाला कोण जाणे पण तेही बारमध्ये हजर होते हे देशमुख्याला माहित होते. देशमुख्या मला त्यांच्या स्टुलापाशी घेऊन गेला. पोपटेंद्रनाथ
परदेशातून भारतात आलेले. तेथे ते राजेंद्रनाथ या कलाकाराची मिमिक्री करत. देशमुख्या आणि गुरूमाऊलींनी खूप गप्पा मारल्या. मी फक्त ऐकत होतो. पहाट होत आली.

पोपटेंद्रनाथांना थोडा कोक हवा होता. कोक म्हणजे कोकाकोला नै कै! बुवा बाबांना गांजा, चरस, भांग लागते ती नशा करण्यासाठी नाही तर प्रेम, करुणा, शांती हे भाव जगात पसरवण्यासाठी. भांगेच्या नशेत असणारा मनुष्य तीच तीच
गोष्ट पुन्हा करतो. गाणं गात असेल तर गाणंच गात राहतो. नाचत असेल तर नाचत राहतो. म्हणून सतत प्रेम करत राहण्यासाठी; चावट माणसांनो थिंक स्ट्रेट, "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" या हेतूने पोपटेंद्रनाथ कोक मागत
होते. आता तुम्ही म्हणाल; हा झंप्या इतकं पुराण का लावतोय? सोप्पं आहे, मलाही कोक हवा होता आणि कोकाकोला नको होता. आता तुम्ही म्हणाल झंपू चांगला आहे, झंपू वाईट आहे, झंपू हाताबाहेर गेला आहे, झंपू ऍडिक्ट आहे.
हू केअर्स? इतरांना फाट्यावर कसे मारायचे त्याचे फुल्ल ट्रेनिंग मी इथेच घेतलं आहे. इथे म्हणजे बारमध्ये नै कै पण मला नाव काय ठेवायचं हा तुमचा प्रॉब्लेम आहे. झंपू म्हणा की झंप्या, माझ्यावर काय झाट परिणाम होत नाही.

हं! तर मी कोक ट्राय करत असताना देशमुख्या दूर उभा होता. सज्जन लेकाचा! त्याला वासानेही चढत असावी. अचानक पोपटेंद्रनाथांची आपली आयडी पुढे केली. त्यावर गुर्जी असे लिहिले होते. मला कळून चुकले. यालाच परकाया प्रवेश
म्हणतात. मी जाम टरकलो. आता पोपटेंद्रनाथांची कित्ती कित्ती रुपं पाहायची याचे गणित सोडवू लागलो.

"चल हे सगळं काय ते मला एक्स्प्लेन कर. नाहीतर गपगुमान माझा शिष्य हो." खरं सांगतो दुसर्‍यांच्या शरीरात का शिरायचे हेच मला कळले नव्हते. मी हात जोडले आणि पाया पडलो. शिष्य होतो म्हणालो. मला असं आढळलं की पूर्ण
शरीरभर, नव्हे माणसाच्या अस्तित्वभर संवेदना निर्माण करु शकणारा शरीरातला एकमेव शक्तीशाली पॉइंट म्हणजे मेंदू. तो जेवढा रिकामा असेल त्याच्या प्रमाणात छोट्या संवेदनाही अधिक जाणवणार. बाकी मग त्यामधून निर्माण होणारी पुढची लफडी आपण मनोविकार दूर करणार्‍या मानसोपचारी डॉक्टरांच्या रुपात समाजात पहातोच. जाऊ द्या, किती ताण त्या मेंदूला. मी टण्णकन उडी मारून गुरूमाऊलींचे पाय पकडले.

मग पोपटेंद्रनाथ मला खोपच्यात घेऊन गेले आणि त्यांनी मला दीक्षा दिली. तिथून परतताना कमनीय बांध्याच्या तीन-चार बाला धुंद होऊन मस्त नाचत होत्या. पोपटेंद्रनाथ म्हणाले, "वाकून नमस्कार कर. त्या बघ रंभा, मेनका आणि उर्वशी. बाई म्हणजे आई."
मी चकीत झालो पण काही न बोलता त्यांना वाकून नमस्कार केला. त्या आपल्याच धुंदीत होत्या. तेवढ्यात देशमुख्या समोर आला. "हा बघ साक्षात् बापूंचा आठवा अवतार." खुद्द पोपटेंद्रनाथांनी देशमुख्याला वाकून नमस्कार केला तसा देशमुख्या सटपटला पण मी त्याचे पाय घट्ट धरून ठेवले. पोपटेंद्रनाथांनी जोरजोरात हवेत हात फिरवून एक अंगठी
काढली आणि माझ्या बोटात चढवली. एक विलक्षण तेज माझ्या चेहर्‍यावर पसरले.

"जा बच्चा! देशमुख बुवांची सेवा करण्यात जन्म व्यतीत कर पण सेवेचा मेवा मिळायला लागला की लग्न कर." पोपटेंद्रनाथ म्हणाले आणि झटक्यात अंग वाकवत नाचणार्‍या रंभा, मेनका, उर्वशींकडे वळले.

"मातांनो या बालकाला थोडी अक्कल द्या. देशाप्रती त्याला त्याची जबाबदारी समजवा. बच्चा! तुझी वेळ येईल तेव्हा वीर्याचा अखेरचा थेंबही दान करून संतती जन्माला घाल." मी वेड्यासारखा पोपटेंद्रनाथांकडे बघत राहिलो. "ए गधड्या तू विकी डोनर पाह्यला नाय काय?" देशमुखबुवांनी तोंड उघडले त्यासरशी मला साक्षात्कार झाला. पोपटेंद्रनाथांच्या जटील वाणीचा किती सुलभ अर्थ देशमुखबुवांनी लावला होता. मी भाग्यवान. साक्षात् बापूंचा आठवा अवतार माझ्यासोबत होता आणि मी त्याला ओळखलं नव्हतं पण आता ते अज्ञानाचे पडदे डोळ्यांवरून हटले होते. मी ढसढसा रडू लागलो.

"देशमुख बुवा. मला तुमच्या चरणी जागा द्या." जगातील किती मोठ्या सत्याचा आज मला उलगडा झाला होता. जगाला हव्या हव्याशा वाटणार्‍या बुवांचा जन्म आज झाला होता.

उपसंहारः आता माझे चांगले चालले आहे. दर बुधवारी देशमुख बुवांचे प्रवचन असते. ते म्हणतात की "आपल्याला काही कळत नाही." पण त्यांना सर्व कळते हे आम्ही भक्तगण जाणून आहोत. प्रवचनकेंद्राबाहेर मी टपरी टाकली आहे. उदबत्त्या, हार, फुले, श्रीफळ. बक्कळ धंदा होतो. त्या लाथमारू सायबाच्या बैलाला...शिवाय बाहेरचे उत्पन्न आहेच.. तेच हो "झंप्या डोनर" झालो ना आता.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

1 Jun 2012 - 1:36 am | दादा कोंडके

मजा आली! :)
गडाबडा लोळून हसलो.

बुवांचा जन्म

गुरुकृपेनं होतोय. आत्ताच नाळ जुळलीय, पोषण सुरु आहे, वेळ भरली की बुवा बाहेर पडतीलच.

अर्धवटराव's picture

1 Jun 2012 - 3:43 am | अर्धवटराव

आई शपथ... कसलं भारी लिवलय.

अर्धवटराव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jun 2012 - 4:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे लिखाण माझं नाही. मी फक्त पोस्टमन आहे. एका वाचनमात्र मिपासदस्याकडून इमेलवर मिळालेली कथा. त्यांच्या परवानगीने प्रसिद्ध करत आहे.

या प्रतिक्रिया सदर लेखक वाचेलच.

कापूसकोन्ड्या's picture

1 Jun 2012 - 8:23 am | कापूसकोन्ड्या

या प्रतिक्रिया सदर लेखक वाचेलच.अशी खात्री आहे म्हणून चे ही प्रतिक्रिया देत आहे. मुळ लेखक जो वाचनमात्र आहे, त्याला सल्ला द्या की, हा लेख खुप छोटा झाला आहे. आत्ता असणार्‍या लेखापेक्षा हा लांबीने कमितकमी दुप्पट तरी हवा होता.
सदर लेखक वाचनमात्र असताना एवढे लिहितो, तर प्रत्यक्ष लेखक झाला तर किती वाचनाचा आनंद मिळेल याच्या नुस्त्या कल्पनेने मी डोक्यावर पडलो की काय असे वाटू लागले आहे.
पु.ले.शु. आणि पु.वा.शु. पण!
पोस्टमन चे काम मात्र झ्याक केलेत हं!

जेनी...'s picture

1 Jun 2012 - 8:28 am | जेनी...

ही ही ही :D

५० फक्त's picture

1 Jun 2012 - 8:48 am | ५० फक्त

लई भारी लिहिलंय,

चला आता वाचनमात्र लेखक शोधणं आलं. ओपना एक्शेल फाईल.

पैसा's picture

1 Jun 2012 - 8:53 am | पैसा

:D
=))
hihi

शिल्पा ब's picture

1 Jun 2012 - 9:49 am | शिल्पा ब

स्मायली खुप गोड आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jun 2012 - 10:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

संपादक मावशी, तेवढी इवलिशी टायपो दुरुस्त करा आणि/किंवा धागाकर्त्याला छोट्या-मोठ्या टायपो दुरूस्त करण्याचे अधिकार द्याल का?

श्रावण, तुमच्याशी बाडीस. :ड

अमितसांगली's picture

1 Jun 2012 - 9:34 am | अमितसांगली

वाचून मेलो...जिवंत झालो आणि प्रतिक्रिया दिली....

कवटी's picture

1 Jun 2012 - 9:35 am | कवटी

_/\_

श्रावण मोडक's picture

1 Jun 2012 - 9:48 am | श्रावण मोडक

नाही जमला. अजून खुमासदार करता असता. साधना कमी पडली.

फोटो ? फोटो पायजेलच

प्यारे१'s picture

1 Jun 2012 - 10:00 am | प्यारे१

>>>बुवांनी खिशातून बाटली काढली. तिला साफसूफ केली. दोन थेंब बोटावर घेऊन डोळ्यांवर लावले. नस्ती शंका नको. एरंडेल तेलाची बाटली होती. <<<

एरंडेल तेलाच्या बाटलीचं काय झालं? बाकी शब्द 'फोडायचा' नाही ना?
बाकी बरेच प्रश्न आहेत. थोडं सबुरीनं घ्यावं म्हणतो.

- सीरियस्ली सीरियस प्यारे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2012 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सदर वाचक मिपाकर लेखकास स.न.वि.वि. प्रतिसाद लिहिण्यास कारण की, आपण वाचनमात्र असूनही आपणास मिपावर लेखन करावं वाटलं याचा खूप आनंद वाटला. डोळे भरुन आले. कोणत्या तरी क्रियेची प्रतिक्रिया उमटणे हे तसं जीवंतपणाचं लक्षण म्हणून आपला पोष्टानं सॉरी कुरीयरनं लेखन पाठविण्याचा प्रयत्न आवडला.

कथा किती जमली असं म्हणाल तर कथा अजिबात जमली नाही. लेखन वाचतांना एक वाचक म्हणून खळखळून आणि हलकंही हसूही आमच्या चेह-यावर फुललं नाही. ”मी अश्रू ढाळतो आहे, नाक वाहतं आहे. थांबा हं!! जरा पुसून घेतो” अशा बालीश वाक्यांवर तर आपली दया आली. नावाला भुताचा जन्म ही प्रेरणा असली तरी लेखनाची मूळ प्रेरणा जी आम्ही वाचक समजत आहोत तीच असल्यामुळे ओढून-ताणून केलेला प्रयत्नात लेखन प्रतिभेचा कस अज्याबात दिसत नाही. वाचकाला खिळवून ठेवणे, कमीत कमी कथा वाचनाची उत्सुकता तरी वाढते का तेही दिसलं नाही.

असो, अजून बर्रच लिहिलं असतं पण आपला उत्साह महत्त्वाचा आहे. अजूनही बर्राच कुरीयरनं माल येईल, अशी अपेक्षा आहे. तेव्हा लिहित राहा. आणि वाचनमात्र वग्रै कै राह्यचं नाही. बिंधास्त वरीजनल नावानं नै तर लॉगीन करुन लिहायचं. कै लागलं सवरलं तर सांगा. आम्हीही आजकाल मिपावर पडिकच आहोत. :)

-दिलीप बिरुटे

सुधीर's picture

1 Jun 2012 - 1:05 pm | सुधीर

कथा किती जमली असं म्हणाल तर कथा अजिबात जमली नाही. लेखन वाचतांना एक वाचक म्हणून खळखळून आणि हलकंही हसूही आमच्या चेह-यावर फुललं नाही.

लेख बिलकूल जमला नाही. जर "वाचनमात्र" लेखकाने स्वतः लिहिला असता, तर ठिक होतं! बरं, लेख न लिहिता स्वतः प्रतिसाद दिला असता तरी चाललं असतं. अकाउंट बनवायला तसा पण कितीसा वेळ लागतो. असो.

प्रीत-मोहर's picture

1 Jun 2012 - 10:26 am | प्रीत-मोहर

मस्त लेख =)))

हहपुवा झाली.

कवितानागेश's picture

1 Jun 2012 - 11:02 am | कवितानागेश

अजून चांगले जमले असते.
पण कदाचित ही माझी जोक्स समजून घ्यायची परिक्षा असावी.
तरिही मला वाचनमात्र सदस्याच्या रुपातल्या ओरिजिनल आय्डीचे दर्शन झाले!
:)

मन१'s picture

1 Jun 2012 - 11:20 am | मन१

चालु द्यात.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2012 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार

वाचनामात्र सदस्याचा अभ्यास अंमळ कमी असला, तरी अभ्यास चालू आहे हे बघून बरे वाटले. अर्थात प्रत्येक विडंबनात / प्रेरणेवरून केलेल्या लेखनात बार, दारु ह्यांचे उल्लेख आल्यास काही निरागस मिपाकरांना यातना होतात ह्याचा अभ्यास लेखकाचा कमी पडलेला आहे.

कथा वाचता वाचता एकदम संपून गेली. पुढच्यावेळी रस्साभाजी करावी.

लेखकाचे आभार, पोस्टमनचे* आभार.

*एक काळ होता जेंव्हा मिपावर प्रत्येक जण मी पोस्टमन नाही अशी खात्री पटवायला धडपडत होता. ;)

(ओक्के आता तू एकदा माझे कौतुक केले होतेस त्याची परतफेड झाली.)

प्रामाणिक प्रतिक्रिया :-
अतिशय घृणास्पद विडंबन करण्याचा प्रयत्न. त्याद्वारे संस्कृतीची देखील खिल्ली उडवण्याच्या क्षीण प्रयत्न. ह्या लेखनाचा आधार घेऊन मिपावरती विनाकारण वातावरण कलुषीत केले जात आहे असा दाट संशय आहे. जुने स्कोर सेटल होत आहेत. तडिपार लोकांच्या ह्या कारवायांची वेळीच दखल घेतली जावी.

नाना चेंगट's picture

1 Jun 2012 - 6:24 pm | नाना चेंगट

>>>अतिशय घृणास्पद विडंबन करण्याचा प्रयत्न. त्याद्वारे संस्कृतीची देखील खिल्ली उडवण्याच्या क्षीण प्रयत्न. ह्या लेखनाचा आधार घेऊन मिपावरती विनाकारण वातावरण कलुषीत केले जात आहे असा दाट संशय आहे. जुने स्कोर सेटल होत आहेत. तडिपार लोकांच्या ह्या कारवायांची वेळीच दखल घेतली जावी.

असल्या अरण्यरुदनाचा काहीही उपयोग होत नाही, होणार नाही हे इतके दिवस मिपावर राहून तुला समजत नाही, हे पाहून तुझा मित्र म्हणून मला वाईट वाटले.

अर्धवटराव's picture

1 Jun 2012 - 9:18 pm | अर्धवटराव

>>प्रामाणिक प्रतिक्रिया :-
अतिशय घृणास्पद विडंबन करण्याचा प्रयत्न. त्याद्वारे संस्कृतीची देखील खिल्ली उडवण्याच्या क्षीण प्रयत्न. ह्या लेखनाचा आधार घेऊन मिपावरती विनाकारण वातावरण कलुषीत केले जात आहे असा दाट संशय आहे. जुने स्कोर सेटल होत आहेत. तडिपार लोकांच्या ह्या कारवायांची वेळीच दखल घेतली जावी.

-- "मेरा नाम जोकर" चा क्लायमॅक्स सीन आठवला. राजुची आई वारली आहे, धर्मेंद्र "शो मस्ट गो ऑन" म्हणुन (दु:खी अंतःकरणाने) राजुला रिंगणात धाडतोय, राजु "माSSSSSS" म्हणुन आक्रोश करतोय, त्याच्या विदुषकाच्या मुखवट्यातुन असंख्य जलधारा वाहाताहेत, त्यातच एक अश्रुंची... आणि पब्लीक गडबडा लोळुन हसताहेत.
ये जींदगी एक सर्कस है बाबु !!!

अर्धवटराव

आदिजोशी's picture

1 Jun 2012 - 12:08 pm | आदिजोशी

अत्यंत भिकार विडंबन. पाहुण्याच्या काठीने साप मारायचा प्रयत्न तर खूपच हीन. अशी रिकामी पोस्टमनगिरी करणार्‍या इतरांना नम्र विनंती की असे लेख इथे टाकू नये. टाकायची कंडच असेल तर किमान लेखनाचा दर्जा तपासून मगच लेख इथे ढकलावे. तुम्ही स्वतः लिहिले तर ठीक आहे पण वाचनमात्रांसाठी इतका त्याग करू नये. त्यांना मेल मधे लिहिला येते तर इथेही लिहिता येईलच.

प्यारे१'s picture

1 Jun 2012 - 12:35 pm | प्यारे१

विडंबन?
पाहुणा ?
साप ?
काठी ?
हीन प्रयत्न?
पोस्ट'मन'?
अ‍ॅडीभौ ची विनंती?
कंड?
दर्जा?
वाचनमात्र?
लिहीता येणं?

बरेच प्रश्न उपस्थित झाले....! असो.
साडेतीन मिन्टाचा सौजन्य सप्त्या असल्यानं मौन ;)

मदनबाण's picture

1 Jun 2012 - 6:05 pm | मदनबाण

परा आणि आदि या दोघांशी सहमत.
संपादकांनी यात लक्ष घालावे आणि हे टुकार लेखन इथुन काढुन टाकावे.तसेच पोस्टमनगिरी करणार्‍यांना समज देण्यात यावी.

मृत्युन्जय's picture

1 Jun 2012 - 12:42 pm | मृत्युन्जय

सध्यातरी वाचनमात्र सदस्य कोण याची अटकळ बांधतो आहे :) ;)

स्मिता.'s picture

1 Jun 2012 - 1:16 pm | स्मिता.

पण सध्या काही काळ तरी जमले तर ;) गप्प रहायचे ठरवले आहे!

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2012 - 2:48 pm | बिपिन कार्यकर्ते

अंहं! नाही जमलं यार! विशेष हसू आले नाही! मात्र चान्स जबरी होता! असो. बेलनेटा. :(

आरेच्च्य्या माझा पर्तीसाद उडाला की........
भौतेक बुवामाउलीनी सूक्ष्म रुपात वाचन्यासाठी उडवलेला दिसतोय

विजुभौ उगाच कांड्या पिकवू नका. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2012 - 3:37 pm | बिपिन कार्यकर्ते

एक्झॅक्टली... विजुभाऊंचा कोणता प्रतिसाद उडाला हे त्यांनी जाहिर करावे.

विजुभाऊ's picture

1 Jun 2012 - 4:12 pm | विजुभाऊ

माझा प्रतिसाद हा होता?
कोण साप कोण काठी कोण पाहुणा?
प्रस्तुत वाचनमात्र लेखकाचा अभ्यास कमी पडतोय हे मात्र खरे.

जरा मध्येच घुसतो त्याजबद्दल स्वारी, पण तुम्हाला "कंड्या" किंवा "कंड्यारूपी कांड्या" म्हणायचं आहे का? ;)

मन१'s picture

1 Jun 2012 - 3:40 pm | मन१

माझा आय डी उडाला असा मला संशय आहे.

(मृत आयडीने पर्तिसाद देणारा)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Jun 2012 - 5:40 pm | निनाद मुक्काम प...

सदर

कथा वाचून आता काही दिंवस मिपावर परत एकदा जुन्या दिवसांची पुनरावृत्ती होणार असे वाटते.
कोणत्याही कंपू किंवा बाजूने न लिहिता स्वतः च्या मनाला विशेष क्लेश न होऊ देता पुढील काही दिवस वाचनमात्र राहण्याचा निर्णय घेत आहे.

कथा कळली नाही, आवडली नाही. वेळ वाया गेला. नाक पुसणे वगैरे वाक्यांनी किळस आली ती वेगळीच. असो.

नाना चेंगट's picture

1 Jun 2012 - 6:21 pm | नाना चेंगट

अजिबात जमलेले नाही.

मराठे's picture

1 Jun 2012 - 9:54 pm | मराठे

काही गरज होती का?