कोणी तरी काही चांगल्या ओंळी लिहिल्या आहेत.....
मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय?
मी त्याला सागितले की ...
कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे
आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे
महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार
उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचारणारी बहिण म्हणजे प्रेम.
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ
घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून
जेवणाचा डबा बनवणारी बायको ... म्हणजे प्रेम!
कुणाचा मेल ला रिप्लाय येवो अगर न येवो, तरीही मित्राना नियमितपणे मेल
पाठवीत रहाणारा मित्र म्हणजे प्रेम!
प्रतिक्रिया
24 May 2012 - 5:37 pm | यकु
ओहो! असं पणै तर.
थँक्स. :)
24 May 2012 - 6:26 pm | चिरोटा
आवडले.
24 May 2012 - 11:00 pm | कौशी
खरे आहे..
25 May 2012 - 2:00 pm | पांथस्थ
इतक्या जवळच जायचे आहे तर गाडी कशाला हवी जरा चालत जा की हे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम!
आत्ताच तर कपडे घेतले होते ना! असे दटावुन उधळपट्टी न करायला शिकवणे म्हणजे पण प्रेमच!
रात्री दार उघडले तरी सकाळी आज्जीने केलेली कान उघाडणी म्हणजे पण प्रेमच!
आणी नाही विचारले बहिणीने तरी तिचे आपल्यावर प्रेम आहे हि जाणीव म्हणजे प्रेम!
आणी घड्याळ नाहि मिळाले म्हणुन नाराज होता भावाला ओवाळणें म्हणजे प्रेम!
आणी कधी बायको डबा न करता बायको झोपुन राहिली तरी किरकिर न करणे म्हणजे प्रेम!
आणी ह्या नियमीत पणे येणार्या मेल (मित्राला न दुखवता) तितक्याच नियमीत पणे जंक फोल्डर मधे ढकलणे म्हणजे पण प्रेम ;)
----------
जागे व्हा! ह्या अश्या भावनीक शब्दबंबाळ फॉरवर्डसचा जमाना केव्हा संपणार आहे देवे जाणे!
25 May 2012 - 2:51 pm | नाना चेंगट
>>>>>जागे व्हा! ह्या अश्या भावनीक शब्दबंबाळ फॉरवर्डसचा जमाना केव्हा संपणार आहे देवे जाणे!
+१
सहमत आहे
26 May 2012 - 11:47 pm | कवितानागेश
आणी कधी बायको डबा न करता बायको झोपुन राहिली तरी किरकिर न करणे म्हणजे प्रेम!>
जियो पांथस्थ काका! ;)
27 May 2012 - 12:25 am | जेनी...
माऊ ,
बायकोने डबा बनऊन नाहि दिला तर नवर्याच्या चिडचिडपणात
सुद्धा प्रेम असु शकत ;)
25 May 2012 - 3:10 pm | विजुभाऊ
नानाशी सहमत.
25 May 2012 - 6:53 pm | चौकटराजा
प्रेम म्हणजे विश्वातील कशाच्याही ( कुणाच्याही पलिकड्ची व्याप्ती) गुणाबद्दल वाटणारे कवतिक व दोषांबद्दल वाटणारी काळजी !
उदा भारतातील समाधानी काटकसरी लोकांबद्द्ल वाटणारे कौतुक व चलता है या त्यांच्या
दोषाबद्दल वाटणारी काळजी !
27 May 2012 - 1:23 am | अविनाशकुलकर्णी
अरे मी आहे ना कशाला काळजी??? म्हणत क्व्यार्तर ची ऑर्डर देणे
म्हंजे मित्र प्रेम
27 May 2012 - 1:45 am | जेनी...
प्रेम आणि काळजी ह्यात काय फरक अस्तो ????
29 May 2012 - 2:30 pm | मन१
बकरीच्या/हरणाच्या सुरक्षेची चिंता वाटून तिला आपल्या पोटात सामावून घेण्याचा वाघोबाचा प्रयत्न म्हणजेच प्रेम असेही एका डिस्कवरीप्रेमीने सांगितले.