सात वारांची कथा

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in जे न देखे रवी...
18 Jun 2008 - 11:52 am

सात वारांची कथा.

सोमवारी नाही कशालाच वेळ
अभ्यासाचा जमत नाही मेळ,
मंगळवार असतो थोडा आळशी
पण तेव्हा मिळते उपासाची लापशी
बुधवार असतो कंटाळवाणा
मी होतो अभ्यासाने दीनवाणा
गुरुवार तसा असतो थोडा वेडा
पण त्या दिवशी मिळतो दत्ताचा पेढा
शुक्रवार माझ्याकडे पहातो केविलवाणे
त्या दिवशी मात्र प्रसादाचे चणे
शनिवार फक्त भरतो रंग
खूप खेळण्याचा बांधतो मी चंग
रविवार म्हणजे वारांचा राजा
म्हणतो करा मज्जाच मज्जा
सारखे-सारखे वाटत राहते
सारेच वार कां न रविवारसारखे!

बालगीतविरंगुळा

प्रतिक्रिया

अमेयहसमनीस's picture

18 Jun 2008 - 12:01 pm | अमेयहसमनीस

कविता सुरेख आहे.

अमेयहसमनीस's picture

18 Jun 2008 - 12:01 pm | अमेयहसमनीस

कविता सुरेख आहे.

रविवार म्हणजे वारांचा राजा
म्हणतो करा मज्जाच मज्जा

छानच ....
खरच मज्जा असते रविवारी , मस्त चमचमीत जेवण. दुपारची वामकुक्षी !!!

विसोबा खेचर's picture

19 Jun 2008 - 12:25 am | विसोबा खेचर

रविवार म्हणजे वारांचा राजा
म्हणतो करा मज्जाच मज्जा
सारखे-सारखे वाटत राहते
सारेच वार कां न रविवारसारखे!

वा वा! क्या बात है..! :)

तात्या.

धनंजय's picture

19 Jun 2008 - 12:49 am | धनंजय

हसरे, खेळकर. लहान मुलांनाही सहज म्हणता येईल, म्हणून त्यांनाही वाचायला देता येईल.

(पण "मी होतो" म्हणणार्‍या वैशालीताई कोल्हापूरच्या दिसतात. येथे कोल्हापुरी मिसळीचे खूप खवय्ये प्रेमी आहेत.)

वैशाली हसमनीस's picture

19 Jun 2008 - 12:29 pm | वैशाली हसमनीस

मी ही कविता माझ्या मुलासाठी केलहा आहे.म्हणून 'होतो' असे लिहीले आहे.मी कोल्हापूरची नसून मुंबईची आहे आणि तिथे सर्व काही मिळ्ते.

वैशाली हसमनीस's picture

19 Jun 2008 - 12:45 pm | वैशाली हसमनीस

वरच्या वाक्यात थोडी चूक झाली आहे.केलहा च्या जागी केली असे वाचावे .त्यावरून गोंधळ नको.धन्यवाद.