शोध

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in जे न देखे रवी...
17 Jun 2008 - 12:30 pm

शोध
शोध तुझा घेत फिरत राहिले
जळी,स्थ्ळी आणि पाशाणी.
थकले,त्रासले,कोलमडले,
तरीहि भटकतच राहिले.
येउन एक दिवस तूच
कुजबुजलास
''कशाला एवढा त्रास?
नि कसला हा त्रागा!
तू म्हणजे मीच नाही का?''

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वप्ना हसमनीस's picture

17 Jun 2008 - 2:17 pm | स्वप्ना हसमनीस

वाह!! क्या बात है!!
शेवटची ओळ फारच छान......
स्वप्ना

वैद्य's picture

24 Aug 2008 - 9:12 am | वैद्य (not verified)

स्वतःच्या सासूच्या कवितेची शेवटची ओळ नेहमीच सुखावून जात असते !

आम्ही वाचतो आहे.

सर्व हसमनीस कुटुंबियांनी एकमेकांना दिलेल्या प्रतिसादांचे स्वागत.

-- वैद्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2008 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'तु म्हणजे मीच नाही का' खल्लास !!!

अवांतर : स्वप्ना,अमेय, आणि वैशाली हे सर्व 'हसमनीस' या एकाच फॅमीलीतले का ?

Rainman's picture

17 Jun 2008 - 2:38 pm | Rainman

कोण कोणास म्हणाले ???
"तू म्हणजे मीच नाही का?''....
कारण असा काही अध्यात्मिक वैगेरे अनुभव असेल तर मुक्तिपर्यंत पोहचतात म्हणे माणसं :)

वैशाली हसमनीस's picture

24 Aug 2008 - 10:07 am | वैशाली हसमनीस

वैद्यबुवा,आपण आपल्या सासूबाईंच्याबाबतीत आलेल्या अनुभवावरून हा शोध लावला आहे असे वाटते. ;) उत्तम आहे.
आपल्यावरून एक संस्कृत श्लोक आठवला.
" वैद्यराज,नमस्तुभ्यम्,यमराजसहोदर,यम्स्तु हरते प्राणान् ,वैद्यः प्राणान् धनानि च''
अभिप्रायाबद्दल धन्यवाद! असेच अभिप्राय पाठवित रहावे.''निंदकाचे घर असावे शेजारी''

विसोबा खेचर's picture

24 Aug 2008 - 10:43 am | विसोबा खेचर

वा! कविता छान आहे...

तात्या.