रस्सीखेच
रस्सीखेच चालू
तुझ्या माझ्यात
जन्मापासून!
तू बलवान अन
सर्वशक्तिमान,
मी अशक्त अन
वेढलेली, कोंड्लेली.
तरीही खेचत राहिले,
दोर च दोर आणि
जिंकत राहिले
मी आणि मीच.
आताही स्पर्धा
रंगणार आहे!
त्यात मात्र होणार
तुझीच जित!
कारण...........
माझ्या हातीचा दोर
मी केव्हाच सोडला आहे
तुझ्याकडेच येण्यासाठी.
प्रतिक्रिया
16 Jun 2008 - 5:29 pm | शितल
छान काव्य रचना
माझ्या हातीचा दोर
मी केव्हाच सोडला आहे
तुझ्याकडेच येण्यासाठी.
हे तर मस्तच.