मिथक विरूद्ध चिऊ आणि काऊ : एक तौलनिक अभ्यास

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
14 Apr 2012 - 1:14 pm

`मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून सरळसरळ उचलंय असं अवलोकन आहे तरी जाणकारंनी योग्य तो पाहुणचार करावा अशी नम्र विनंती

मिथक : चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला. टाय बांधता बांधता नेहमीच्या सवयीने त्याने स्नेहाला हाक मारली, "स्नेहा, माझं वॉलेट कुठे आहे?"

चिऊ आणि काऊ : काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्रेमाने करत असे

मिथक : आणि दुसर्‍या क्षणी त्याच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे पाण्याने भरून आले. हाताला घाम फुटला. तसाच आवेगाने मागे होत तो पलंगावर दोन हात बाजूला ठेवून मान खाली घालून बसला. येणार्‍या उमाळ्याला आवरायचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. ओंजळीत चेहरा लपवत तो तसाच पलंगावर लवंडला. मुसमुसत रडत राहिला.

चिऊ आणि काऊ : काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत.

(अवलोकन : अजून कथा संपलेली नाही तरी सर्वांनी बसून घ्यावे)

मिथक : अ‍ॅम्ब्युलन्समध्ये स्नेहा आडवी पडली होती. अजय तिच्या शेजारी जाऊन बसला. "तुला नीट ठेवायला काय होतं रे तुझं वॉलेट? हे घे", स्नेहाने पुढे केलेले वॉलेट अजयने हातात घेतले. अजयच्या हातात लाल भडक, रक्त गाळणारे हृदय ठोके घालत होते.

चिऊ आणि काऊ : काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.

मिथक : आजी गेली तेव्हा अजयला जायला जमले नव्हते. कुठल्यातरी असाइन्मेन्टवर तो युरोपमध्ये होता. क्लायंट महत्त्वाचा होता. त्याच्याशिवाय डील होणार नव्हते. थांबणे भाग होते. घरी सगळ्यांनी समजून घेतले होते. अजयची समजूत घातली होती. आजी कोमामध्ये आहे, तू आलास तरी काय उपयोग?

चिऊ आणि काऊ : पण एक दिवस आला काउने ठरवल बस झाली बेगमी आज काहीही होवो आज चिऊ वरिल प्रेम व्यक्त करायचच

(अवलोकन : काऊ हा जरी वरून दिसायला कावळा असला तरी तो अती चतुर असून त्याला अजयच्या आधी `काय सार्थ आणि काय व्यर्थ' ते समजलंय. त्यानं माची वगैरे प्रकार गतजन्मीच केलेत आणि मृत्यू इत्यादि किरकोळ प्रकार त्याला रोजचेच आहेत त्यामुळे चिऊ आणि काऊ लवकर आटोपली आहे इतकंच.)

मिथक : स्नेहाने एक बरीच मोठी रक्कम बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीला देणगी म्हणून दिली होती. स्नेहाला पक्ष्यांचे वेड होते. स्नेहाला सगळ्या निसर्गाचेच वेड होते.

चिऊ आणि काऊ : काऊ म्हणे "काय बोलतेस रोज रोज आय लव यु! मला माहित आहे तुझ माझ्यावरिल प्रेम" चिऊ म्हणे "अरे राजा मी फ़क्त ते व्यक्त करत असते रे जरी तुला माहित असेल तरीही"

(अवलोकन : चिऊ देखील स्नेहापेक्षा जास्त समंजस आहे तिला डायरेक्ट काऊचे वेड आहे, ऊगीच कशाला वेळ घालवायचा?)

मिथक : "मी बळजबरी केली नव्हती. उपकार नाही केलेस माझ्यावर आलास ते. आधी विचारलं होतं तुला. जेव्हा काहीही ठरवायचं असतं दोघांनी करण्यासारखं तेव्हा तुला इच्छा नसते काहीही ठरवायची. मी ठरवलं की तुला इतर उद्योग सुचतात. हे असं अर्धवट मनाने काही करण्यापेक्षा स्पष्ट नाही म्हणालास तर खूप बरं होईल"

चिऊ आणि काऊ : तो चिऊला म्हटला"अग चिऊ मल तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे" चीउ म्हटली "सगळ सांग राजा पण आधी बस,जेवुन घे,आरम कर आणि मग सांग"काउ मनात म्हटला आज चिऊला दुखवायच नाही ती म्हणेल तसच करुयात आणि मग आपल्या मनातिल प्रेम व्यक्त करुयात.

(अवलोकन : अजय आणि स्नेहापेक्षा काऊ आणि चिऊला आयुष्यात नेमकं काय करायला हवं ते लवकर कळलंय)

मिथक : अजयने मागे पाहिले. इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. पण मग त्याने विचार केला, या मिथकाचा शेवट बघून जाणेच कदाचित योग्य ठरेल. "आय नीड क्लोजर", असे पुटपुटत तिथेच एका दगडावर तो वाट बघत बसून राहिला.

चिऊ आणि काऊ : जेवण वगैरे झाल्यावर चिऊ काउला म्हटली "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग"

(अवलोकन : "आय नीड क्लोजर" च्या दोन वेगवेगळ्या छटा)

मिथक : अजय अत्यानंदाने त्याच्याकडे पाहत ओरडला, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!"

चिऊ आणि काऊ : काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.

(अवलोकन : जे मिळवायला अजयला नसते सायास करायला लागले तेच आत्मिक समाधान चिऊनं केवळ काऊच्या कुशित झोपून मिळवलंय. समाधान कुणी मिळवलं अजयनं की चिऊनं हे गौण आहे, कसं मिळवलं ते लक्षात घेण्यासारखं आहे)

मिथक : अजय स्तंभित होऊन ऐकत होता. साक्षात्काराचा क्षण असेल तर तो असाच, याची एक वेगळीच जाणीव त्याच्या मनात होत होती. स्नेहाचे जाणे एक मिथक बनून पुन्हा जन्माला येत होते.

चिऊ आणि काऊ : काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत.

(अवलोकन : स्वत:च्या अत्मोन्नतीत काहीच विषेश नाही ती काय कुणी ही करेल, पत्नीला समाधीप्रत नेऊन काऊनं अजयवर मात केली आहे म्हणून वरील ओळी पुन्हा टाकण्यात आल्या आहेत)

बालकथाआस्वाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Apr 2012 - 2:29 pm | मुक्त विहारि

"संजय" हे महाभारत कालीन नाव आपण सार्थ ठरवलेत....

ह्या "काऊ-चिवू" आणि "मिथक" ह्या कलाक्रुतीतील साम्ये आपण योग्य त्या रीतीने दाखवुन माझी वाचनद्रुष्टी (?)कशी आहे हे जाणवुन दिलेत...

आणि मला दूरचं बघायला चष्मा आहे त्यामुळे जवळच्याजवळ काय असेल ते पाहतो. असो, असे प्रतिसाद न देता आपल्या सूक्ष्म अवलोकनाद्वारे केवळ साम्यस्थळांवर चर्चा व्हावी अशी नम्र विनंती करतो.

अवलोकन : मी आपल्याला `ऋषी द्विजा' म्हटल्यावर आपण लगेच मला `महाभारतातील संजय' म्हटले आहे असे वाटते तरी आता यावर खुलासा करू नये.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2012 - 2:49 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या घासुगुर्जींची उणिव आज भरुन निघाली.

मुक्त विहारि's picture

14 Apr 2012 - 3:02 pm | मुक्त विहारि

दिलीप गेला , दिलीप आला...(क्रिकेटचे २ सम्राट)..

हीच जग रहाटी आहे...

दादा कोंडके's picture

14 Apr 2012 - 3:47 pm | दादा कोंडके

महत्वाचा फरक म्हणजे कथेतली पत्रं आहेत. मिथक म्हणजे फारफार तर साउथिइंडीयन बी ग्रेड सिनेमा आहे. आणि चिउ-काउ म्हणल्यावर "ओल्ड हॅग अँड टीन्स" किंवा "माय फ्रेंन्ड्स मॉम" सुद्धा नाही तर "बिझारे" सारखं वाटलं. :)

रमताराम's picture

14 Apr 2012 - 4:26 pm | रमताराम

एकदा होते ती चूक, वारंवार होतो तो मूर्खपणा!
'आपली समज तोकडी पडत असेल का?' असा प्रश्न काही मनुष्यांना आयुष्यभरात पडत नसावा बहुतेक. चालू द्या.

आणि वारंवार अशा कथा लिहू नयेत.

`चालू द्या' हे त्यांनी संकेतस्थळाला उद्देशून म्हटले आहे, तुम्हाला नाही.

आणि `हम्म' हा त्यांच्या बहुतेक प्रतिसादांचा मूळ स्वर आहे किंवा ती त्यांची सुरूवात करण्याची शैली आहे, त्याचा अर्थ विचारू नये.

रमताराम's picture

15 Apr 2012 - 12:32 am | रमताराम

एकतर तुम्ही फारच भाबडे असावात किंवा फारच धूर्तपणे वेड पांघरून पेडगावला जात आहात.

वरील प्रतिसाद तुम्हाला उद्देशून आहे. काऊ नि चिऊ ही अतिशय सुमार कथा आहे असे 'आमचे मत' आहे (तुमचे वेगळे असू शकते) नि ती मिथकच्या पासंगालाही पुरत नाही. तुमच्या तुलनेच्या पद्धतीने कोणतीही कथा कोणत्याही प्रेम-विरह कथेवरून ढापली असे सिद्ध करता येऊ शकते. उद्या ना. सी. फडकेंच्या काही कथा तुमच्या काऊ नि चिऊ वरून घेतल्या आहेत हे सिद्ध करता येईल. दोष तुमचा नाही. तुम्ही 'काऊ नि चिऊ' च्या पातळीवरून थोडे वर येण्याची गरज आहे. कथेचा तपशील कुठला नि कथाबीज कुठले अथवा कथा मांडणी म्हणजे काय याचा थोडा अभ्यास केलात तर तुमचा हा लेख किती हास्यास्पद नि 'फुट इन द माउथ' प्रकारचा आहे हे तुमच्याच लक्षात येईल.

काऊ आणि चिऊ सारख्या कथा वारंवारच काय कधीच लिहू नयेत! उगाचा उंटा..... जाऊ दे.

आणि हा देखील तसाच घेतो

`मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून सरळसरळ उचलंय असं अवलोकन >> हे चिऊ आनि काऊ काय प्रकरण आहे हे शोधायला जरा वेळ लागला. आधी वाटलेल मराठीतील कुठलीतरी नामवंत कथ वैगेरे आहे जिचा मिथक च्या गाभ्याशी व एकंदर आकृतीबंधाशी भरपूर साम्य आहे व ती मिथकच्या आधी बरेच वर्ष सार्वजनिक रित्या उपलब्ध आहे. त्यामुळे वरील अनुमान निघाले असेल.. पण चिऊ आणि काऊ ही मिपा वर प्रकाशित झालेली (१०/४/२०१२) कथा आहे. कथा वाचली आणि ह्या वरून मिथक "उचलली" हे अनुमान पाहून मात्र ह.ह.पु.वा. झाली.

संजय आपण मिथक वरील प्रतिसादात कालनुक्रमाची दखल घेतली आहेत तरी वरील निष्कर्श कसा? हि कथा माय्बोलीवर दिवळी अंक २०१० ह्यात प्रकाशित करण्याआधी दोनेक वर्श लिहिलेली आहे म्हणजे २००७/२००८ च्या सुमारास आणि चिऊ आणि काऊ , तो आणि ती व सन्याशी वैगेरे कथांचा व मिथकचा दुरान्वयेही संबंध नाही. कल्पना चोरी सारखा गंभिर आरोप करताना मिपा व त्यावरील कथा ह्या वैश्वीक साहित्य नाहीत इतका विचार मनात बाळगला तरी पुरे असे वाटले.

ह्या कथेवरील एकंदरीतच चर्चा वाचुन खुप मनोरंजन झाले.

धन्यवाद
ता.क. मानव चिऊ आणि काउ आपण अधी कुठे प्रसिद्ध केली असेल तर त्याची मला कल्पना नाही. तसे असल्यास अधिच दिलगीर.

चिर्कुट's picture

20 Dec 2012 - 10:28 pm | चिर्कुट

पेशवे आपल्या प्रतिसादामुळे निदान लेख आहे तरी काय हे कळले..त्यावर प्रतिसाद देण्याची आमची कुवत नाही हे देखील कळले. :)

धन्या's picture

15 Apr 2012 - 9:30 pm | धन्या

काय च्यायला दिवस आलेत...

प्यारे१'s picture

16 Apr 2012 - 11:12 am | प्यारे१

अवघड आहे.... वाचकांचं.

स्पा's picture

20 Dec 2012 - 6:53 pm | स्पा

यु राॅक्स संजय जि.

मस्तच.
तुमच्या निरिक्शण शक्तिला सलाम.
अफाट knowledge. आहे या माणसाचं

राजेश घासकडवी's picture

20 Dec 2012 - 7:47 pm | राजेश घासकडवी

मुळातून वाचायला मिळाल्या तर बरं होईल.

अन्या दातार's picture

20 Dec 2012 - 9:17 pm | अन्या दातार

या गोष्टी मुळातून वाचायला मिळाल्या तर काहीतरी संगती लागेल.

बांवरे's picture

21 Dec 2012 - 4:58 am | बांवरे

चिउ आणि काउ इथेच मिपावर आलेली एक कथा आहे. सापडली नाही. शोधलीत तर सापडेल कदाचित.
मिथक दुसरा दुवा

रामपुरी's picture

21 Dec 2012 - 5:33 am | रामपुरी

कितवीत असताना लिहीलंय?

राजेश घासकडवी's picture

21 Dec 2012 - 8:18 am | राजेश घासकडवी

मिथक आणि चिऊ काऊ च्या लिंक्स.

http://www.misalpav.com/node/21359
http://www.misalpav.com/node/21326

मिथक ही एक परिपूर्ण कथा वाटते. चिऊ काऊ हे कथाबीजापलिकडे गेलेलं नाही. या दोघांची तुलना करायची म्हणजे एखाद्या समर्थ चित्रकाराने काढलेलं घोडा आणि त्यावरच्या स्वाराच्या चित्राची तुलना दुसरीतल्या पोराने गिरगटवलेल्या घोड्याच्या चित्राशी करण्यासारखी वाटते. उगाच 'या घोड्याला पुढचा उजवा पाय आहे, याही घोड्याला पुढचा उजवा पाय आहे' वगैरे तोडून गोष्टी दाखवणं फारच हास्यास्पद. कार्यमग्न नवरा आणि त्याची वाट बघणारी बायको इतपत साम्य आहे म्हणून एकाने दुसऱ्याची चोरी केली वगैरे म्हणणं म्हणजे किंग लिअरमध्ये दुःखी म्हातारा आहे म्हणून कुठच्याही दुःखी म्हाताऱ्याच्या कथेची शेक्स्पिअरने केलेली चोरी आहे असं म्हणण्याइतकं बालिश वाटतं.

स्पा's picture

21 Dec 2012 - 9:14 am | स्पा

ओह.

इनिगोय's picture

21 Dec 2012 - 9:54 am | इनिगोय

अहो, पण सगळ्या 'गोष्टी' सोप्या करणं हे काम सुद्धा करायला हवं ना कोणीतरी? आता ते केल्यावर गोष्टी सोप्या होतात का कसं ते आता विचारू नका ब्वा..

Dhananjay Borgaonkar's picture

21 Dec 2012 - 3:20 pm | Dhananjay Borgaonkar

पूर्णपणे नास्तिक असणं हे अतिशय अवघड आहे.
प्रत्येकाचा कोणता तरी देव असतोच!
कोणाचा चार हातांचा, कोणाचा दोन हातांचा, आणि कोणाचा आरशात दिसणारा..

___/\___ ताई दंडवत स्विकारावं या पामराचं

मिपावर आलं की दिसतं काय काय, मग सुचतं असं काय काय. ;)

चिगो's picture

22 Dec 2012 - 12:19 pm | चिगो

"पूर्णपणे नास्तिक असणं हे अतिशय अवघड आहे.
प्रत्येकाचा कोणता तरी देव असतोच!
कोणाचा चार हातांचा, कोणाचा दोन हातांचा, आणि कोणाचा आरशात दिसणारा.."

अत्यंत सुंदर आणि चपखल विधान.. ताई, ह्या नुसत्या एका विधानाच्या जोरावर तुम्ही कुठलीतरी 'देवी/माँ' बनू शकता..;-)

संजय क्षीरसागर's picture

21 Dec 2012 - 11:23 am | संजय क्षीरसागर

यु राॅक्स संजय जि.

मस्तच.
तुमच्या निरिक्शण शक्तिला सलाम.
अफाट knowledge. आहे या माणसाचं

तुम्ही असे प्रतिसाद दिलेत की इतरांना प्रचंड त्रास होतो.

मिथकवर बर्‍यापैकी चर्चा झाली आणि माझ्या आकलनावर इथल्या मान्यवर सदस्यांनी कमेंटस केल्या पण शेवटी खुद्द लेखकानं असं म्हटल्यावर :

कथा पटकन आकलन होत नाही हा तुमचा फीड्बॅक कदाचित रास्त आहे कारण ह्या आधीसुधा ह्या कथे संदर्भात तो मिळाला आहे. कदाचित तो माझ्या लेखनातील दोष आहे. पण कोणतीही कथा / कवीता /कलाकृती जे प्रष्ण जो अर्थ रसिकाच्या मनात निर्माण करते त्याची उत्तरे शोधायची जबाबदारी त्या रसिकावरच असते. जे मला व्यक्त करायच होत ते कथा लिहुन मी केल आहे. माझ्या तोकड्या लेखन सामर्थ्यामुळे ते आपल्या सारख्या वाचकांपर्यंत पोचत नाही आहे हे समजले.

....मान्यवरांचा नाईलाज झाला. माझ्या आकलनापेक्षा त्यांनी उगीच माना डोलवल्या होत्या हे स्पष्ट झालं.

असे प्रतिवाद न करता येऊ शकणारे मग व्यक्तिगत पातळीवर उतरून विडंबनं वगैरे टाकतात आणि त्यावर इतरही तश्याच मानसिकतेची नाराज मंडळी तिथे हात धुवून घेतात.

मी ही पोस्ट गंमत म्हणून लिहिली होती त्यात विषेश काही नाही.

मत्सर हा कामापेक्षाही मोठा रिपु आहे. मत्सर मनाच्या तळ्यात इतका खोल गेलाय की आपण किती उघडपणे लेखनावरचे (याच नाही तर इतर कित्येक) प्रशंसा करणारे आणि इतरांना उपयोगी झालेले प्रतिसाद नजरेआड केलेत किंवा आपल्या कृतीनं आपणच उघडे पडतोय हे लक्षात येत नाही.

स्पा's picture

21 Dec 2012 - 11:47 am | स्पा

leave it संजयजी.
कोणि कसे वागावे हे आपण ठरवु शकत नाही,

this ppl jealous of ur detail knowledge in all topics.,nothing else

`नाही जमत ना आपल्याला उंची गाठायला, खेच दुसर्‍याला खाली' ही वृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कोणताही गुण स्वतःत विकसित होण्याची शक्यता नाही!

स्पा's picture

21 Dec 2012 - 12:36 pm | स्पा

तुम्हि ती उंची गाठायला किति कष्ट केलेत हे कोणाला कळणार णाहि

असो.

आता बास की रे स्पावड्या...

किसन शिंदे's picture

21 Dec 2012 - 2:10 pm | किसन शिंदे

+१

५० फक्त's picture

21 Dec 2012 - 2:58 pm | ५० फक्त

बोला बोला तुम्ही बिचा-या मिस्पालाच, थोडा वेळ द्या, एकदा का ..... असो, आमचं ट्रेड सिक्रेट आहे ते मग नंतर बघु आम्ही सगळ्यांकडे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2012 - 3:02 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्ही खोटे बोलता का ?

स्पा's picture

21 Dec 2012 - 3:07 pm | स्पा

ठिक आहे.

वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो.पण स त्य लपत नाही गवि , किसन, परा.

असो आमचा लेखन विराम

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2012 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार

वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो.पण स त्य लपत नाही गवि , किसन, परा.

पण प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही मला.

परा मला वाटत स्पा खुपच विवेकी आहे.

इनिगोय's picture

21 Dec 2012 - 3:24 pm | इनिगोय

तू धीर सोडू नको स्पा, कोणी काही म्हणू दे.

किसन शिंदे's picture

21 Dec 2012 - 4:06 pm | किसन शिंदे

वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो.पण स त्य लपत नाही गवि , किसन, परा.

ब्वाॅर्रर्र..

५० फक्त's picture

21 Dec 2012 - 3:08 pm | ५० फक्त

श्री.मिस्पा, तुम्हीच (फक्त) खोटं बोलता असं तुम्हाला वाटतं का?

Dhananjay Borgaonkar's picture

21 Dec 2012 - 3:22 pm | Dhananjay Borgaonkar

स्पा यु पण रॉक्स बरका...:P

चौकटराजा's picture

21 Dec 2012 - 3:33 pm | चौकटराजा

आम्ही मिपावर आलो तेंव्हा असे दिसले की इथे लई भारी मानसं अदूगरच म्वाठं चांगलं लिखाण लिहून राहिलेयत.मग आपण संजय सूरकर दिगदर्शित दिलीप प्रभावळकर अभिनित मंद माठ चौकटराजाप्रमाणे आहोत असे आढळून आले. संजय क्षीरसागर यांचे काही धागे वाचले की आमच्या सुरवातीच्या कल्पकतेचे आम्हालाच कौतुक वाटते. सबब आता आणखी बुध्यांक चाचणीची( आमच्या) -( हो, नाहीतर बाजार का काय म्हनत्यान ना? ते नको .) गरज वाटत नाही आमास्नी. संजय दादा लगे रहो ! तुम्हाला बदामा राजा, किलवर राजा . इस्पिक राजा, जोकर ई ई प्रतिसादासाठी मिळोत.

स्पावड्याला एक 'ऑन द रॉक्स!' ;)
सरळ प्रतिसाद देण्यात स्पाचा हात कुणीच धरु शकत नाही.
भावी संपादकपदासाठी स्पाचं नाव जाहीर करुयात काय? ;)

Dhananjay Borgaonkar's picture

21 Dec 2012 - 3:45 pm | Dhananjay Borgaonkar

थांबा..घाई करु नका. कोहलीला उपकर्णधार पद दिल आणि त्याचा फॉर्म हरपत चाल्ला आहे. आपल्या स्पाच तस झालेल चालेल का तुम्हाला?त्याची खेळी बहरुदे अजुन मग त्याला संपादकपद बहाल करा अस मी सुचवु इच्छितो.

प्यारे१'s picture

21 Dec 2012 - 4:20 pm | प्यारे१

>>>त्याची खेळी बहरुदे अजुन

आँ????? आता तो 'आंतरराष्ट्रीय खेळाडूं'समोर 'खेळायला तयार' आहे असं नाही का वाटत बरं तुम्हाला?

इरसाल's picture

21 Dec 2012 - 4:24 pm | इरसाल

संजय क्षीरसागरांवर मिपावर मतदान चालु आहे हे त्यांना कळत नाही की ते खरचं त्यांना कळत नाही.

या तुझ्या वाक्यानं हसूं आलं!

इतक्या जनरेट्यात तू लिहू शकलास हेच तुझं साहस आहे.

प्रश्न माझ्या लेखनाचा नाही, स्वतःच्या मताशी तुम्ही किती इमान राखून आहात हा आहे.

इथे माझा एकही मित्र नाही. अक्षरशः एकालाही मी ओळखत नाही. आय एम रायटींग टू अ फेसलेस मॉब. त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहता.

इट इज यू, द कंप्युटर स्क्रीन अँड योर ओन इंटरप्रिटेशन!

जर त्यात तुम्हाला स्वत्व दिसलं तर ते तुमचं स्वत्व आहे, अहंकार दिसला तर तो तुमचा दृष्टीकोन आहे.

लेखनातली अनेकविधता भावली तर तुम्हाला व्यासंग करावसा वाटेल, निरर्थकता जाणवली तर तुम्हाला नव्या गोष्टींची आस नाही असा अर्थ आहे.

प्रतिवाद करता येत नाही म्हणजे मी स्वतःच म्हणणं खरं करतो असा समज करून घेतलात तर तो तुमचा अँगल आहे पण आपल्या धारणाच ठिसूळ आहेत ही त्यातली खरी मेख आहे.

मला प्रशंसेची आस नाही पण `देव आहे अशी पाटी गळ्यात अडकवून फिरणारे' जेंव्हा विडंबन करतात तेंव्हा त्यांना फार काही कळलंय अशी गोष्ट नसते. केवळ एका भंपक कल्पनेला मी शह दिला आणि त्यांना प्रतिवाद करता येत नाही म्हणून त्यांनी टाकलेली ती पिंक असते.

प्रणयतृप्तीवरच्या मनःपूर्वक लेखनामागे तुमचं सहजीवन सुखी व्हावं हा प्रामाणिक हेतु असतो आणि जहीर त्याची व्य.नि.तून दाद देखील देतो. सोकाजी, अतृप्ताआत्मा, पूजा खुष होऊन जातात. पण ते शिवधनुष्य आता कसं पेलणार किंवा ज्यांनी सहजीवनच नाकारलय अश्याना ते काय कळणार? ते फ्रस्टेट होतात आणि मग विडंबनाच्या गंगेत आपल्या तिरकस प्रतिसादाच घोडं नहावून घेतात.

कवितानागेश's picture

21 Dec 2012 - 9:29 pm | कवितानागेश

ज्यांनी सहजीवनच नाकारलय अश्याना ते काय कळणार? ते फ्रस्टेट होतात आणि मग विडंबनाच्या गंगेत आपल्या तिरकस प्रतिसादाच घोडं नहावून घेतात.>>
'सहजीवन नाकारलय' हे नक्की कुणाला उद्देश्यून आहे?? please explain.
तुम्ही जर का इथे कुणालाही ओळखत नाही, तर कुणाच्याही सहजीवनाबद्दल अश्या प्रकारची कॉमेंट कशाबद्दल आहे?
--- ( इथल्या अनेकांना प्रत्यक्ष ओळखणारी सदस्य) माउ

इथे माझा एकही मित्र नाही. अक्षरशः एकालाही मी ओळखत नाही. आय एम रायटींग टू अ फेसलेस मॉब. त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहता.

तुम्ही फेसलेस मॉब साठी लिहीत आहात म्हणून तो फेसलेस मॉब तुमच्या लेखनात स्वतःला पाहतो हा निष्कर्ष कसा काय काढलात?

क्लिंटन's picture

21 Dec 2012 - 10:12 pm | क्लिंटन

तुम्ही फेसलेस मॉब साठी लिहीत आहात म्हणून तो फेसलेस मॉब तुमच्या लेखनात स्वतःला पाहतो हा निष्कर्ष कसा काय काढलात?

:)

संजय क्षीरसागर's picture

21 Dec 2012 - 10:53 pm | संजय क्षीरसागर

इथे माझा एकही मित्र नाही. अक्षरशः एकालाही मी ओळखत नाही

ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझा प्रतिसाद लेखनाला असतो, लेखकाला नाही. ही पहिली गोष्ट.

आता याचाच दुसरा पैलू आहे

इट इज यू, द कंप्युटर स्क्रीन अँड योर ओन इंटरप्रिटेशन!

ही देखील वस्तुस्थिती आहे कारण तुम्ही मला ओळखत नाही. त्यामुळे लेखनाचा अर्थ हे तुमचं इंटरप्रिटेशन आहे. एकाच वेळी काही लोक प्रशंसा करतात, त्यांना ते उपयोगी वाटतं आणि काही लोक लेखन निरर्थक आहे म्हणतात यावरनं ते सिद्ध होतं.

संक्षी यांनी मांडलेले मुद्दे अतिशय रोचक आहेत यात शंकाच नाही. त्यांच्या विचारात मूलभूत विचार नेहमीच दिसतात

असं गवि म्हणतो तर माझ्याविरूद्ध लिहिणारे विडंबनकार मात्र मी काहीच्याबाही लिहितो म्हणतात...त्यामुळे इंटरप्रिटेशन तुमचय. इट इज यू इंटरप्रेटींग योरसेल्फ थ्रू द मिनींग.

मी असंबद्ध किंवा अंतर्विरोधी लिहित असतो तर इथे माझा कुणीही प्रतिवाद केला असता. इंटरनेट रायटींग इतकं ब्लॅक अँड व्हाइट आहे की तिथे अभ्यास नसताना लिहिलेलं पब्लिक लगेच हाणून पाडतं.

सहजीवन नाकारणारे सदस्य इथे आहेत हे त्यांच्या (इतरत्र दिलेल्या) प्रतिसादांवरून कळणं काय अवघड आहे?

मोदक's picture

21 Dec 2012 - 11:42 pm | मोदक

सहजीवन नाकारणारे सदस्य इथे आहेत हे त्यांच्या (इतरत्र दिलेल्या) प्रतिसादांवरून कळणं काय अवघड आहे?

"सहजीवन" चा नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे आपल्याला..?

लंबूटांग's picture

22 Dec 2012 - 1:33 am | लंबूटांग

त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहता हे कसे? इट इज यू, द कंप्युटर स्क्रीन अँड योर ओन इंटरप्रिटेशन! हे तर कोणत्याही लेखाला लागू पडते. पण त्याचा अर्थ तुमच्या लेखनात आम्ही स्वतःलाच पाहतो असा कसा होऊ शकेल?

परत एकदा इंटरप्रिटेशनची व्याख्या तपासून बघितली तर येथे दिल्याप्रमाणे an explanation of the meaning of another's artistic or creative work; an elucidation: an interpretation of a poem.

ह्यातपण इंटरप्रिटेशन = मी स्वतःलाच पाहणे असे नाही दिलेय.

>>माझा प्रतिसाद लेखनाला असतो, लेखकाला नाही.
अगदी माझाही. पण काय आहे ना.. मला वरील लेखनात लिहीलेले तर्कशास्त्र काही कळले नाही. माझे इंटरप्रिटेशन विचाराल तर कैच्च्याकैच लिहीलेय ... आता परत तेच ह्यात मी स्वतःलाच पाहतोय असे कसे म्हणता येईल?

पण म्हटले असे आपल्याला सगळेच बरोबर कळते असे मानून कैच्च्याकैच लिहीलेय असे समजून चालण्यापेक्षा लेखकालाच विचारावे काय म्हणायचे आहे. म्हणून हा प्रतिसाद लेखकाला.

>>मी असंबद्ध किंवा अंतर्विरोधी लिहित असतो तर इथे माझा कुणीही प्रतिवाद केला असता.
हॅ हॅ.. येथीलच प्रतिसाद बघा. पण शेवटी as you said, "इट इज यू, द कंप्युटर स्क्रीन अँड योर ओन इंटरप्रिटेशन".

संजय क्षीरसागर's picture

22 Dec 2012 - 8:41 am | संजय क्षीरसागर

त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहता हे कसे? इट इज यू, द कंप्युटर स्क्रीन अँड योर ओन इंटरप्रिटेशन! हे तर कोणत्याही लेखाला लागू पडते.

तेच तर मी म्हणतोय.

फरक इतकाच आहे की मी लेखकाला ओळखत नाही त्यामुळे माझा फोकस निव्वळ लेखनावर असतो.

थोडक्यात, माझा कंपू नाही. त्यामुळे प्रशंसा झाली तर ती लेखनाची होते आणि उपहास झाला तर तो लेखनाचा होतो.
मतांचं खंडन झालं तर प्रतिवाद करायला मी सदैव तयार असतो, मला बहुमताची गरज नसते. पण ज्यांना प्रतिवाद करता येत नाही ते फ्रस्टेट होतात (कारण त्यांच्या धारणा प्रश्नांकित होतात) आणि त्याचा परिणाम म्हणून उपहास करतात.

ज्याला लेखन निरर्थक वाटत असेल तो दुर्लक्ष करेल आणि सोडून देईल.

आता तुम्ही शेवटी

हॅ हॅ..

असा स्वर लावलाय त्याचं `उपहास' हे इंटरप्रिटेशन करायला कोणताही शोध घ्यायची गरज कुठे आहे?

आनन्दा's picture

22 Dec 2012 - 10:54 am | आनन्दा

त्यामुळे प्रशंसा झाली तर ती लेखनाची होते आणि उपहास झाला तर तो लेखनाचा होतो.

मला पटत नाही. तुम्ही २० लेख लिहिल्यावर वाचणार्‍याच्या मनात तुमची प्रतिमा तयार होते. आता ती प्रतिमा म्हणजे तुम्ही नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर आपला नाइलाज आहे बुवा.
परंतु येणारे प्रतिसाद हे त्या लेखाला आणि त्याबरोबरच तुम्ही आंजावर जी प्रतिमा निर्माण केली आहे तिलाही असतात.

येवढ्या सगळ्या फापटपसार्‍यातून उपहास हे तुमचे इंटरप्रिटेशन झाले. असो ते तूर्तास राहू देत. मला त्याने काही फरक पडत नाही. कारण काय आहे ना ते महत्त्वाचे नाहीये फारसे. पण माझा मुख्य प्रश्न अनुत्तरीतच राहीलाय.

त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहता

हा निष्कर्ष कसा काढला ते जरा सांगाल का.

ज्याला लेखन निरर्थक वाटत असेल तो दुर्लक्ष करेल आणि सोडून देईल.

तेच करतो मी नेहमी हो, पण असे जबरदस्त तर्क कोणी काढले की राहवत नाही.

तिमा's picture

22 Dec 2012 - 11:57 am | तिमा

सर्व प्रतिसाद वाचल्यावर एक जाणवले की दुसर्‍याचा अहं दिसतो पण स्वतःचा मात्र दिसत नाही अशी बर्‍याच लोकांची अवस्था असते. एखादा लेख लिहिल्यावर ज्या काय प्रतिक्रिया यायच्या त्या येणारच. त्या कशाही असल्या तरी त्यातील प्रत्येकाला प्रतिप्रतिसाद देत बसणे ह्यांतही अहंभाव डोकावत नाही का ? तसेच टीका झाल्यावर जेंव्हा तुम्ही कुणावर व्यक्तिगत टीका करु लागता तेंव्हा तुमच्याच अहंचे प्रतिबिंब त्यांत इतरांना दिसू लागते, जरी तुम्हाला दिसले नाही तरी!

चिगो's picture

22 Dec 2012 - 12:33 pm | चिगो

ते काय ते 'शिवधनुष्य', फ्रस्ट्रेशन इ .मुद्दे वाचून आणि मी 'उपहासक' आहे हे मान्य करुनही एवढेच म्हणू इच्छितो... "आपलं ते लाघवी अन् दुस-याचं ते अतृप्त.. :-D बाकी चालू द्या. आणि तर्कातर्क करण्याआधी सगळ्यांनी इनिगोय ह्यांच्या सहीतील वाक्यावर मनन करावे, ही नम्र इनंती..

संजय क्षीरसागर's picture

22 Dec 2012 - 4:32 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही २० लेख लिहिल्यावर वाचणार्‍याच्या मनात तुमची प्रतिमा तयार होते. आता ती प्रतिमा म्हणजे तुम्ही नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर आपला नाइलाज आहे बुवा.

तेच तर मी सांगतोय. ही माझी प्रतिमा प्रत्येकानं स्वतःच्या मनात वेगवेगळी निर्माण केलीये. ज्यांना ती उपयोगी वाटतीये ते तसे प्रतिसाद देतायत आणि ज्यांना ती निरूपयोगी वाटतेय ते उपहास करतायत.

याचाच दुसरा अर्थ तुम्ही तुमच्या धारणांमधून ते लेखन वाचताय (कारण माझा व्यासंग आहे की नाही, मी व्यक्तिगत जीवनात अध्यात्मिक आहे की भौतिक वगैरे गोष्टींचा व्यक्तिगत ओळख नसल्यानं संबंधच नाही).

देव ही कल्पना आहे असं मी म्हणतो तेंव्हा आस्तिक नाराज होतात, नास्तिक सुखावतात आणि जे दोलायमान आहेत त्यांना नवा विचार मिळतो.

`त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहता' हा निष्कर्ष कसा काढला ते जरा सांगाल का?

याच ही उत्तर तेच आहे.

प्रत्येकाला प्रतिप्रतिसाद देत बसणे ह्यांतही अहंभाव डोकावत नाही का ? तसेच टीका झाल्यावर जेंव्हा तुम्ही कुणावर व्यक्तिगत टीका करु लागता तेंव्हा तुमच्याच अहंचे प्रतिबिंब त्यांत इतरांना दिसू लागते, जरी तुम्हाला दिसले नाही तरी!

प्रतिसाद देण्यात काय अहंभाव आहे? इट इज जस्ट अ रिस्पॉन्स. योग्य विचारणेला प्रतिसाद देणं हे लेखनाची जवाबदारी घेणं आहे

बिरुटे सरांचा प्रतिसाद
पाहा

संजयराव आपले प्रतिसाद, प्रतिसादाची मांडणी, आणि प्रतिसादक म्हणून जवाबदारीने लिहिलेली उत्तरं मला नेहमीच भावतात, आणि सर्व पटतातच असं नाही, पण आपल्या मांडणीमुळे संवाद उत्तम होतो, असे वाटत असते, आवर्जून प्रतिसाद लिहिल्याबद्दल आभारी आहे

टिकेला टिकेनंच उत्तर द्यावं लागतं. आयला तुम्ही मला (तुमच्या कल्पनेतला) संत वगैरे समजू नका. म्हणजे सगळे मिळून मला मधे घेणार आणि मी गप्प बसून ऐकून घ्यायच? माझं एकच म्हणणय एकतर प्रतिवाद करा किंवा मग दुर्लक्ष करा, विषय संपला. पुचाट विडंबन केल्यावर मलाही त्याच शैलीत उत्तर द्यावं लागतं. (खाली पाहा)

"आपलं ते लाघवी अन् दुस-याचं ते अतृप्त

जे तृप्त आहेत त्यांनी तिथे तसे प्रतिसाद दिलेत. पण ज्यांना `पत्नीला पाईची वहाण करणं' हे कसं फोल आहे याचा प्रतिवाद करता आला नाही ते इथे उपहास करतायत!

चिगो's picture

22 Dec 2012 - 6:17 pm | चिगो

पण ज्यांना `पत्नीला पाईची वहाण करणं' हे कसं फोल आहे याचा प्रतिवाद करता आला नाही ते इथे उपहास करतायत!

धन्य आहात, राजे.. अहो, प्रतिवाद करण्याआधी प्रतिसाद वाचत चला की.. "पत्नीला पायीची वहाण मानणे" ही मग्रूर पितृसत्ताक संस्कृती, असं मी म्हणालो होतो.. पुन्हा एकदा इनिगोय ह्यांची सही वाचावी, ही (पुन्हा एकदा) नम्र विनंती.. सुखात रहा, ही तुमच्या (कल्पनेतल्या) देवाला प्रार्थना..

पुण्याचे वटवाघूळ's picture

22 Dec 2012 - 6:24 pm | पुण्याचे वटवाघूळ

धन्य आहात, राजे.. अहो, प्रतिवाद करण्याआधी प्रतिसाद वाचत चला की.. "पत्नीला पायीची वहाण मानणे" ही मग्रूर पितृसत्ताक संस्कृती, असं मी म्हणालो होतो.. पुन्हा एकदा इनिगोय ह्यांची सही वाचावी, ही (पुन्हा एकदा) नम्र विनंती.. सुखात रहा, ही तुमच्या (कल्पनेतल्या) देवाला प्रार्थना..

+१. आपण फार लॉजिकल मुद्दे मांडतो अशी स्वतःविषयीची कल्पना करून घेऊन उगीचच कोणी काड्या घालायला लागले तर त्यांना आवरणे फार कठिण.अशांना अनुल्लेखाने मारणे हेच उत्तम.

प्यारे१'s picture

22 Dec 2012 - 4:57 pm | प्यारे१

स्पावड्याचं पुन्हा एकदा अभिनंदन...!

आणि परा, आज चेसुगुंची उणीव भरुन आल्यासारखं नाही जाणवलं का रे तुला????

अर्धवट's picture

22 Dec 2012 - 6:22 pm | अर्धवट

आयाई गं..
हे गुर्‍हाळ चालू आहेच का अजून.. चालू द्या..

आणि तुम्हाला कळत नसेल तर पुन्हा वाचा, नीट वाचा, विचार करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला काहीच कळत नाही असं जे तुम्हाला वाटतंय ते तुमच्या कळण्याचंच इंटरप्रीटेशन आहे.

कवितानागेश's picture

22 Dec 2012 - 6:36 pm | कवितानागेश

तसेही मूळ 'तौलनिक आभ्यास' म्हणून जे काही भयंकर महत्त्वाचे विचार मांडले आहेत त्यावरूनच कुणाकुणाला कशाकशातून काय काय कळतं आणि काय काय प्रतित होतं ते दिसतच आहे.
तरीही माझ्या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालेच नाहीये.
'सहजीवन नाकारलय' हे नक्की कुणाला उद्देश्यून आहे??
अवांतरः स्पायलूचे अभिनंदन! :)

संजय क्षीरसागर's picture

22 Dec 2012 - 10:58 pm | संजय क्षीरसागर

नाही पटत ना माझं द्या सोडून

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Jan 2013 - 6:52 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हे तुम्ही पण पाळत जा जरा.
लोका सांगे...

किसन शिंदे's picture

18 Jan 2013 - 7:08 pm | किसन शिंदे

ज्जे बात विमे!!

:D

खुप पूर्वी कुठल्याशा कादंबरीत वाचलेलं वाक्य आठवलं. "वंध्यामैथुनाने अपत्यप्राप्ती संभव नसते परंतू मैथुनाचं सुख मिळतंच की."

असंच काहीसं चालू आहे. चालू दया. :)

बोलघेवडा's picture

18 Jan 2013 - 8:35 pm | बोलघेवडा

आता जाऊ द्यात कि राव... कशापायी भांडून राह्यालात
एकदा लेख टाकला कि "इदं न मम " म्हणून मोकळे व्हायचं !