लय-
टपटप टपो~~~रे
चमचम चंदे~~~रे
टपटप टपोरे
चमचम चंदेरे
पडपड पावसारेपोरे नाचतात
सळसळ वारा
थडथड गारा
सटसट मारापळाली घरात
सरासरा जाऊन
गारागारा वेचून
भराभरा चावूनफेकल्या मस्तीत
भिरभिर भिंगोर्या
फिरफिर सार्या
भिजभीज पोर्यारमल्या खेळात
पळपळ हुंदाडले
पळभर विसावले
वासरू उनाडलेकानशिरल्या वार्यात
गडगड थंडावली
झडझड मंदावली
पोरेसोरे परतलीभुकेल्या जोमात
दरवळ भाताचा
कळवळ मायेचा
उबेत आयेच्यालाडल्या पोरांस
प्रतिक्रिया
15 Jun 2008 - 4:29 am | अरुण मनोहर
च्यायला! पब्लीक पावसानं पकली वाटतं!
15 Jun 2008 - 8:29 am | फटू
असं काही नाही...
तुम्ही चुकीच्या वेळी तुमची कविता प्रकाशीत केलीत. शनिवार आणि रविवारी सारेजण आपापल्या घरी असतात. आणि खुप कमी जण या दोन दिवशी संगणकाला हात लावतात (अपवाद : आमच्यासारखे भारताबाहेर काम करणारे रिकाम** संगणक अभियंते... ) इन फॅक्ट, या दोन दिवसांमध्ये हजर सभासद आणि पाहूण्यांची संख्या बरेच वेळा एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असते... त्यामुळे आसा काय इचार नाय करनेका... अगर तुम श्याटरडे संडे को कुच लिवते हो तो उसको मंडे को छापनेका... :D
बाकी कविता छान आहे तुमची...
आपलाच,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
15 Jun 2008 - 12:26 pm | पक्या
>>च्यायला! पब्लीक पावसानं पकली वाटतं!
नाही हो अरूण काका, मस्त आहे कविता. नादमय आहे. आवडली. वाचनखूंण म्हणून साठवली आहे. एखाद्या छान बालकवितेसारखी वाटतीये. लहान मुलांना त्यातील नादामुळे नक्कीच आवडेल आणि समजायला पण सोप्पी.
वीक एन्ड मुळे प्रतिसाद द्यायचा राहून गेला.
15 Jun 2008 - 4:20 pm | विसोबा खेचर
मस्त कविता...! :)
15 Jun 2008 - 5:51 pm | शितल
कविता छान, वाचताना उलगत डुलायला होते.
मस्त चाल लागेल ह्या कवितेला.
16 Jun 2008 - 7:53 pm | अविनाश ओगले
छान कविता.