मित्रच आता मित्रांचा खून करतात
आणि वर खंडणी पण घेतात...
आपले मित्र अजून पण टिकून आहेत..
मैत्री खातर जान द्यायला पण तयार आहेत..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
बायकोने प्रियकराला हाताशी धरले
आणि नवऱ्याला ठार मारले
आपली बायको मात्र अजून पण
रात्री २ पर्यंत जेवायला थांबते..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
मुलाने केला आईचा खून
कारण आला दारू पिवून..
माझी मुले काही असे करत नाहीत
कारण ती अद्याप लहान आहेत..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
भाजीचे हे भाव वाढले,
सरकारने पण हात टेकले...
आपण काही भारतात नोकरी करत नाही
शेजारी उपाशी राहिला तरी आपल्याला फरक पडत नाही..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
असते खूपच रांग तिकिटाला
आणि तशीच A.T.M.ला..
आपल्याला काही फरक पडत नाही
कारण कार शिवाय आपण
भाजी आणायला पण जात नाही..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
ज्वारी पासून दारू बनवणार
आणि मग त्यातून कर मिळणार
शेतकऱ्यांचे भले होवो न होवो...
ज्वारीचे भाव मात्र नक्की वाढणार..
आपले मुळात शेतच नाही...
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
कुस्तीगिराला आहे रोजची भ्रांत
तरीपण आहे सरकार शांत..
भुक्कड खेळाडू आहेत क्रिकेटची शान...
त्याला मात्र सगळ्यात मान...
आपण काही कुस्ती बघत नाही...
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
I.P.L. बघण्यात वेळ कसा
जातो ते कळत नाही
कोण जिंकतो कोण हरतो
त्याने काय फरक पडतो....
अर्ध्या कपड्यातील आपलीच मुलगी
I.P.L.मध्ये नाचतांना बघून
तिच्या पालकांना पण काहीच
विशेष वाटत नाही...
कारण मेंदूतच काही शिरत नाही...
माझेच डोळे आता सरावले आहेत
आत्मा कधिच विकल्या गेला आहे..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
माझ्या जाड्या चामडीत, आज-काल
सामाजिक जाणीवेची सुई काही शिरत नाही..
"समाज गेला तेल लावत" असेच रोज
म्हणाल्याशिवाय आपला दिवस सरत नाही....
उद्याचा रोगट समाज बघायला
मी काही असणार नाही
अमरत्वाचा शाप नसल्याने आपले बुवा खरोखरच बरे आहे...
प्रतिक्रिया
2 Apr 2012 - 4:19 pm | मी-सौरभ
ईतर प्रतिसाद बघून मग प्रतिसाद देण्यासाठी जागा धरुन ठेवलिये.
बूच (उपप्रतिसाद) मारु नये ;)
2 Apr 2012 - 4:23 pm | पैसा
...
2 Apr 2012 - 4:55 pm | प्यारे१
वारा पाहून पाठ फिरवण्याच्या वृत्तीस काय म्हणतात हो पैसातै? ;)
बाकी 'कोण म्हणतं बूच मारलं ? नावाचं नवं नाटक येतंय म्हणे! ;)
2 Apr 2012 - 4:22 pm | निश
मुक्त विहारि , अचुक भाष्य केल आहेत.....
सद्य परिस्थितीत जे काही समाजात चालल आहे त्यावर तुम्ही अतीशय अचुक सटीक भाष्य केल आहेत.
माझ्या जाड्या चामडीत, आज-काल
सामाजिक जाणीवेची सुई काही शिरत नाही..
"समाज गेला तेल लावत" असेच रोज
म्हणाल्याशिवाय आपला दिवस सरत नाही....
उद्याचा रोगट समाज बघायला
मी काही असणार नाही
हे तुम्ही जे लिहील आहेत ते भन्नाट तितकच काळजात घुसणार आहे जशी कट्यार घुसावी तस.
तुमच्या सामाजिक संवेदना इतक्या प्रगल्भ आहेत हे बघुन तुम्हाला मनापासुन नमस्कार ....
मस्त तितकीच जबरदस्त कविता.
2 Apr 2012 - 8:53 pm | यकु
व्वा!
आवडले.
गविंच्या 'आपली एक पद्धत' ची छाप जाणवते आहे.
2 Apr 2012 - 9:18 pm | शिल्पा ब
विडंबन आवडलं.
2 Apr 2012 - 9:49 pm | आचारी
आपले लेखन आवडल्या गेले आहे !!
2 Apr 2012 - 10:28 pm | निनाद मुक्काम प...
मस्त जमून गेलंय
2 Apr 2012 - 11:15 pm | जेनी...
आपले बुवा आजारी आहेत
थोडासा जरी वर्कलोड वाढला ,
कि बुवा घामाघून होतात
त्यामुळे आज चक्क बुवा रजेवर आहेत
कारण काय ,तर आपले बुवा आजारी आहेत
खूपदा पाहिलंय त्याना घसा खाकरताना
उगा आपलं दहावेळा चोन्द्लेल नाक पुसताना
लोक म्हणतात बुवा संसर्गाचे भांडार आहेत
खरच हो ..आपले बुवा आजारी आहेत
हापिसात बुवा जागेवर कधीच नाय सापडत
बघावं तेव्हा वॉशरूम मधनच बाहेर पडत
जवळ जावू नका त्यांच्या ते लई बिमार आहेत
वाईट वाटत फार ,आपले बुवा आजारी आहेत
मुक्तविहारि छान लिहिलय तुम्हि :)
रगावु नका हं माझ्यावर :P
2 Apr 2012 - 11:22 pm | अत्रुप्त आत्मा
छान हो बालिके छान ;-)
आत्मारामपंत विडंबन गुरु-कूल
- नाव नेंदणी चालू आहे ;-)
3 Apr 2012 - 11:43 am | मुक्त विहारि
आवडले.....
3 Apr 2012 - 4:21 am | सुहास..
लिही , अजुन लिही !!
कधी नव्हे ते जरा नीट कविता ( मुक्तक ) वाचली आज मिपावर !!
श्री रा रा मेघवेडा पंत यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत
3 Apr 2012 - 11:20 am | स्वातीविशु
हि...हि....हि..... मुक्तविहारी आणि पूजातैंनी बुवांना चांगलेच वेठीस धरले आहे. ;)
बिचारे संभ्रमात पड्लेत मी बरा आहे की आजारी? :~
असो.....कविता आणि विडंबन दोन्ही आवडले आहे :)
3 Apr 2012 - 2:11 pm | सहज
4 Apr 2012 - 1:18 pm | सस्नेह
रोखठोक अन तीक्ष्ण शब्दांत व्यक्त झालेली सामाजिक (सं) वेदना !
मुक्त विहारीजी, जणू आमचीच व्यथा आमच्यासमोर उभी केलीत. आभार अन शुभेच्छा .