बॉम्बे टीव्ही वर काम करणारा एक कलाकार.. पानू रे!
मदन मोहन आणि हेमंत मुखर्जी या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळालेले पानू रे... आणि त्यांचा सांगितीक वारसा मिळालेला त्यांचा मुलगा सुरोजीत रे...! या दोघा बाप-लेकांनी अनूप जलोटा यांच्यासोबत साई बाबांच्या भजनांचा एक अल्बम केला आणि बंगालीतूनही १-२ अल्बम केले होते . पण इतकी वर्ष मुंबईत राहिलेल्या या दोघांना मराठी संगितानेही तितकीच भुरळ घातली आणि मराठीतला पहिला वहिला अल्बम करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले. कोणत्यातरी एका क्षणी सुरोजीतची आणि माझी भेट झाली फेसबुकवर आणि त्यांच्या या अल्बम साठी गाणी लिहिण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या चाली तयारच होत्या.. ९ चालींवर हळूहळू करत मी गाणी लिहिली . बंगाली असले आणि रोजच्या बोलण्यात फारशी मराठी येत नसली तरी सुरोजीतला मराठीची चांगली जाण आहे. कुठेही शब्दांची ओढाताण न होता गायकाला गायला सोपी जावी आणि तितकीच अर्थपूर्णही ... अशी गाणी त्याने माझ्याकडून लिहून घेतली. आणि बघता बघता ९ गाणी अरेंजमेंट होऊन आता ही ध्वनीमुद्रीका प्रकाशनाच्या मार्गावर आहे. अल्बम चं नाव आहे ........ 'ये प्रिये'.... गाणी त्या दोघांची!!
वैशाली सामंत आणि हृषिकेश रानडे यांनी या अल्बममधली गाणी गायली आहेत. बरीचशी शास्त्रीय आणि सुगम संगीत यांचा सुरेख संगम होऊन ही गाणी तयार झाली आहेत. काही गाण्यांच्या कमी लांबीच्या (Audio Clip) ध्वनीमुद्रिका खाली देत आहे..
ऐकून पहा.. कशी वाटताहेत सांगा..
दिसे चांद सोवळा.... हृषिकेश रानडे
http://soundcloud.com/panu-ray-surojit-ray/dise-chand
चढलेली ही नशा.. वैशाली- हृषिकेश
http://soundcloud.com/surojit-ray/chadleli-hi-nasha
पाकळ्या रुसल्या जरी.. हृषिकेश
http://soundcloud.com/panu-ray/pakdya-ruslya?
utm_campagin=timeline&utm_content=http%3A%2F%2Fsoundcloud.com%2Fpanu-ray%2Fpakdya-ruslya&utm_medium=facebook&utm_source=soundcloud
जरा झोक्कात गीत .... वैशाली
http://soundcloud.com/panu-ray/zara-jhokath
गंध हलके हलके प्रमाणेच याही अल्बम ला तुम्हा सगळ्यांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा लाभूदेत.
- प्राजु
(संपादक या धाग्यामध्ये जरा लक्ष घालून त्या लिंका नीट करु शकतील काय? साऊंड क्लाऊड चा प्लेयर इथे आणू शकतील अक?)
प्रतिक्रिया
23 Mar 2012 - 11:01 pm | प्राजु
संपादकांचे मनापासून आभार. :)
23 Mar 2012 - 11:11 pm | गणपा
मस्त गो तायडे.
नव्यावर्षाची भेट आवडली. :)
पुढिल वाटचालीस शुभेच्छा !!!
24 Mar 2012 - 2:06 am | जयवी
अहा.........क्या बात है....!!
छान झालीयेत गं गाणी :)
पुढच्या सांगितिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्राजुडी :)
24 Mar 2012 - 5:25 am | दीपा माने
नववर्षाभिनंदन आणि शुभेच्छा.
24 Mar 2012 - 11:29 am | स्पंदना
अरे वा! अभिनंदन प्राजु.
24 Mar 2012 - 11:44 am | सोत्रि
'पाकळ्या रुसल्या जरी' ह्या गीताचे बोल खूप आवडले आणि 'जरा झोक्कात गीत' ह्या गाण्याचा ठेका खूप आवडला.
बाकीची गाणी ठीक आहेत एवढी नाही खास रूचली.
असो, पुढील वाटचालीस शुभेच्छा !
- ('काहीतरी नवीन' करावेसे वटणारा) सोकाजी
24 Mar 2012 - 2:57 pm | ज्योति प्रकाश
गाणी अप्रतिम व सुंदर झालीत.
पुढील वाटचालीस शुभेच्छा.
24 Mar 2012 - 3:47 pm | पैसा
हृषिकेशचा आवाज खूपच आवडतो. छान झालीत गाणी.
24 Mar 2012 - 3:56 pm | यकु
शुभेच्छा प्राजूताई !
:)
24 Mar 2012 - 3:57 pm | जाई.
छान झालीयेत गाणी
24 Mar 2012 - 4:38 pm | सानिकास्वप्निल
अप्रतिम गाणी
अभिनंदन प्राजु
:)
24 Mar 2012 - 7:49 pm | सुहास झेले
निव्वळ अप्रतिम प्राजू...... खूप खूप अभिनंदन :) :)
24 Mar 2012 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जरा झोकात गीत मला गाऊ दे... चा ठेका लैच आवडला.
बाकी गीतंही पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर आवडतीलच.
शुभेच्छा आहेतच.....!!! आणि मनःपूर्वक अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
24 Mar 2012 - 10:32 pm | निवेदिता-ताई
:)
24 Mar 2012 - 10:34 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार! :)
24 Mar 2012 - 10:42 pm | बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन!!!!!!!!!!!!!!
25 Mar 2012 - 9:42 am | शैलेन्द्र
अभिनंदन प्राजु.. !!
26 Mar 2012 - 3:17 am | चित्रा
अभिनंदन, प्राजु! अशीच तुझी प्रगती होऊ दे आणि आम्हाला तुझी नवनवीन गाणी ऐकायला मिळत राहू देत.
चाली आणि संगीतयोजनाही सुरेख आहेत.
26 Mar 2012 - 6:17 am | धनंजय
गाणी, चाली, आवडल्या.
अभिनंदन!
1 Apr 2012 - 9:57 am | बहुगुणी
असंच म्हणतो...या पुढच्या पावलासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा!
31 Mar 2012 - 5:12 pm | निश
प्राजु जी , अप्रतिम झाली आहेत गाणी व संगीत .
'पाकळ्या रुसल्या जरी' , अप्रतिम गाण आहे.