गेल्यावेळी घरी गेलो तेव्हा लहान भावाला मोबाईलवर मित्रांशी संवाद साधताना बघून खूप खूप आनंद झाला. तोपर्यंत मित्रांना केवळ एसएमएस करूनच समाधान मानवं लागण्यामूळे खट्टू होणारा तो आणि आता ३जी च्या माध्यमातून मित्रांशी गप्पा मारणारा, तो हाच काय यावर सांगून सुद्धा विश्वास बसला नसता.
आधीच मर्यादीत शब्दसाठा त्यातच भाषेचे पूर्ण ज्ञान नसल्याने होणार्या चूका यामूळे कित्तेक वेळातर मलासूद्धा त्याचे मॅसेजेस कळत नसत. मग तो काय सांगायचा प्रयत्न करतो आहे हे आशयावरून समजावे लागे. आई-बाबांशी मी फोनवर बोलताना तो तीथे उभा राही व केवळ चेहर्याच्या हावभावांवरून काय बोलणं सुरू आहे याचा अंदाज लावी. मॅसेजेस करून करून बोटं दुखायला लागलीत किंवा किपअॅडच खराब झालं की तो चिडायचा पण पर्याय नव्हता.
पण म्हणतात ना की काही जणांना शुल्लक वाटणार्या गोष्टी कित्येकांचे आयुष्य बदलू शकतात. ३जीचे सुद्धा असेच झाले. रोज बाजारात येणार्या नवनविन तंत्रज्ञानांप्रमाणे हेही एक त्यात नवल ते काय? असा विचार करून सुरवातीला मी याकडे दूर्लक्ष केले. उगाच कशाला महागडे चोचले?
यथावकाश महागडं वाटणारं ३जी थोडफार स्वस्त झालं म्हणा किंवा आवक्यात आलं. त्याबरोबरच भावाचा नविन मोबाइल घेऊन देण्यासाठी तगादा लागला. आणि तोही साधा नाही तर ३जी ची सुविधा असलेला व दोन्ही बाजुनी कॅमेरा असणारा. मी त्याला विचारलं 'तू रे काय करणार याचं?' 'माझ्या सगळ्या मित्रांकडे आहेत असेच मोबाइल'-भाऊ 'अरे पण मी बघ किती वर्षांपासून तोच मोबाइल वापरतो आहे'. 'तू घेऊन देणार आहेस का नाही? नाहीतर आईच्या मागे लागतो'. शेवटी नमतं घेऊन मी त्याला हवा असलेला मोबाइल घेउन दिला. नाही म्हटलं तरी मनाचा थोडाफार जळफळाट झालाच आणि त्याला हवं ते घेऊन देणारा मोठा भाऊ असल्याचा हेवा पण वाटला.
पण आता जेव्हा घरी गेलो तेव्हा त्याच्या चेहर्यावरून ओसंडून वाहाणारा आनंद बघून मोबाइलसाठी मोजलेले पैसे म्हणजे अगदीच तुच्छ गोष्ट वाटली. ती एक जाहीरात नाही येत काय 'There are few thing which money can't buy...' अगदी तसलच फिलींग होतं ते.
मी बोलतो आहे माझ्या लहान भावाबद्दल आणि त्याच्या सारख्या कित्तेक मूकबधीर मुलांबद्दल ज्यांना ३जी ने आशेचा भलामोठा किरण दिलेला आहे. आजपर्यंत केवळ इतरांच्या गप्पा 'बघुन' मन मारणारी ही मूलं आता ३जी ची पंख लावून खुशाल स्वछंद भरार्या मारायला शिकत आहेत. आजवर मानवानी शोध लावलेल्या बहुमूल्य आविष्कारांपैकी हा एक या मताचा मी आहे. असे म्हणतात की उपकारकर्त्याचे आभार मानावेत आणि त्याचसाठी हा लेखनप्रपंच. ज्याकोणी या तंत्रज्ञानाचा शोध लावला त्याचं आणि स्वतः तंत्रज्ञानाचं आभार मानावं तेव्हडं कमीच. नाही का?
प्रतिक्रिया
22 Mar 2012 - 3:53 pm | मनराव
अप्रतिम...
३जी चा हा खरा उपयोग...
22 Mar 2012 - 4:04 pm | गवि
मस्त.. सुंदर लिखाण..
22 Mar 2012 - 4:14 pm | शैलेन्द्र
छान अनुभव.. बरं वाटल..
22 Mar 2012 - 4:17 pm | मी-सौरभ
तुम्ही एक चांगला मोठा भाऊ आहात
22 Mar 2012 - 4:20 pm | पैसा
सगळंच छान जमून आलेलं आहे या लेखात. तुमच्या या भावाबद्दल आणखी काही लिहाल का?
22 Mar 2012 - 4:37 pm | सर्वसाक्षी
कथन आवडल. ३ जी चा एक नवा पैलु दिसला.
22 Mar 2012 - 4:50 pm | ५० फक्त
व्हॉट अॅन जेम ऑफ अॅन आयडिया सरजी,
खुप पटलं अन मनात राहिल बरेच दिवस.
22 Mar 2012 - 5:03 pm | प्यारे१
+१००००००००००
तंत्र ज्ञान असं असावं... आपल्या जवळच्यांच्या उपयोगी पडणारं.
उगाच २०० प्रकाशवर्षे दूर हिरेमाणकांचा तारा सापडला. उपयोग काय त्या शोधांचा?
22 Mar 2012 - 4:55 pm | परिकथेतील राजकुमार
भाई हो तो ऐसा. :)
22 Mar 2012 - 5:08 pm | जाई.
सुंदर लिखाण
22 Mar 2012 - 5:16 pm | स्वातीविशु
मस्त लेखन. ३ जी चा हाच खरा उपयोग आहे, आपल्या प्रियजनांच्या नेहमी संपर्कात.... नव्हे नेहमी समोर राहण्यासाठी. :)
22 Mar 2012 - 5:34 pm | निश
अमृत साहेब , अप्रतिम भारी लेख
22 Mar 2012 - 5:40 pm | मिसळपाव
शेवटच्या परिच्छेदावरून "३ग वापरून मूक-बधीर मुलाना ईतरांशी संवाद साधता येतो " कळलं. पण कसं? अजून माहिती / लिंका देशील का?
(वरच्या सगळ्याना याची माहिती आहे असं दिसंतंय त्यामुळे व्यनि करणार होतो. पण माझ्ह्यासारख्या बाकी अज्ञ लोकाना पण माहिती मिळेल म्हणून ईथे उघड विचारतोय !!)
22 Mar 2012 - 9:29 pm | अमृत
मी इथे ३जी च्या विडीओ कॉलींग सुविधेविषयी बोलतो आहे. या सोईमुळे आपण मोबाइलवर बोलताना दुसर्या बाजुच्या व्यक्तीला बघु शकतो. तुम्ही कदाचीत टीवी वर 'एअरटेल' कम्पनीची जाहीरात बघितली असेल ज्यात एक सैन्यातील शिपाई त्याच्या मैत्रीणीसोबत ३जी ने बोलतो. आणखी खुलासा या युट्युब वरील विडीओ बघुन होइल.
http://www.youtube.com/watch?v=FJScUK6nsVo
साभार - युट्युब.कॉम
अमृत
23 Mar 2012 - 7:16 am | मिसळपाव
थँक्स!
"पण आता जेव्हा घरी गेलो तेव्हा त्याच्या चेहर्यावरून ओसंडून वाहाणारा आनंद बघून मोबाइलसाठी मोजलेले पैसे म्हणजे अगदीच तुच्छ गोष्ट वाटली. ती एक जाहीरात नाही येत काय 'There are few thing which money can't buy...' अगदी तसलच फिलींग होतं ते. "
क्या बात है!!
22 Mar 2012 - 6:29 pm | प्रचेतस
सुंदर लिखाण.
22 Mar 2012 - 7:21 pm | Pearl
सुंदर लेख. आणि ३ जीचा हा उपयोग याआधी कधीच ध्यानात आला नव्हता.
22 Mar 2012 - 8:07 pm | स्मिता.
लेख आणि त्यात सांगितलेला ३-जी चा उपयोगही आवडला. तुम्ही एक जबाबदार भाऊ असल्याबद्दल अभिनंदन!
हरकत नसल्यास ३-जी चा तुमच्या भावाने कसा उपयोग केला ते जाणून घ्यायला आवडेल.
22 Mar 2012 - 9:31 pm | अमृत
मी इथे ३जी च्या विडीओ कॉलींग सुविधेविषयी बोलतो आहे. या सोईमुळे आपण मोबाइलवर बोलताना दुसर्या बाजुच्या व्यक्तीला बघु शकतो. तुम्ही कदाचीत टीवी वर 'एअरटेल' कम्पनीची जाहीरात बघितली असेल ज्यात एक सैन्यातील शिपाई त्याच्या मैत्रीणीसोबत ३जी ने बोलतो. आणखी खुलासा या युट्युब वरील विडीओ बघुन होइल.
http://www.youtube.com/watch?v=FJScUK6nsVo
साभार - युट्युब.कॉम
अमृत
22 Mar 2012 - 8:19 pm | रेवती
ग्रेट!!!
23 Mar 2012 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सॅल्यूट रे....!
-दिलीप बिरुटे
23 Mar 2012 - 12:57 pm | किचेन
भावाच्या डोळ्यातलं समाधान.... ३ग मोबैल्च्या किमितीपेक्षा कीतरी मौल्यवान असेल न. घरी संगनाकावारूनही विडीयो कोल लावता येईल न. म्हण्जे मोठ चित्र दिसेल यासाठी.
23 Mar 2012 - 1:07 pm | यकु
मस्त रे भावा ऽऽ!